Login

जीवनाची शिदोरी

लेख
जीवनाची शिदोरी म्हणजे संस्कार.
संस्काराचे खूप महत्त्वाचे आहेत.त्यावरच आपले आयुष्य घडते.एक वेळ प्रॉपर्टी,पैसा नाही दिला तर चालेल,पण प्रत्येक आई वडिलांनी चांगले संस्कार मुलाला दिलेच पाहिजेत.ही संस्काराची शिदोरी मुलांसोबत कायम सोबती बनते आणि आपला आशीर्वाद पण त्यांच्यावर कायम राहतो.
संस्कार हे घरातूनच होत असतात त्यामुळे लहानपणी कोण कश्या वातावरणात वाढले आहे त्यावर त्याचे पुढचे आयुष्य ठरते.प्रत्येकासाठी परिस्थिती चांगली असेलच असे नाही पण त्या परिस्थितीत पण जर संस्कार चांगले झाले असतील तर नक्कीच पुढचे आयुष्य सुखा समाधानी भरून जाईल.
संस्कार शब्द जरी छोटा असला तरी त्याचा प्रभाव खूप मोठा असतो.