Login

विदूषक आणि मुले !

विदूषकाचे मुलांना समजवण्यासाठीचे पत्र!
सर्कशीतल्या विदुषकाचे मुलांना पत्र!

दि. २१ डिसेंबर २०२४

प्रिय मुलांनो,

कसे आहात तुम्ही? माझा कालचा कार्यक्रम तुम्हाला आवडला का? आता तुम्हाला वाटले असेल की हे विदूषक दादा आता का आम्हाला असे पत्र लिहून त्रास देत आहेत तर मला थोडे तुमच्याशी पत्राद्वारे काही सांगायचे होते.

काल तुम्ही मी पडलो तरी हसत होता हा म्हणजे हसायला हवेच की विनोदी सर्कस होती ना. बरोबरच केलेत तुम्ही पण बाळांनो तुम्ही आता हळू हळू मोठे व्हाल ना तेव्हा कोणी पडले तर हसू नका पुढे होऊन त्यांना उठण्यासाठी मदत करा.

काल आपण कृत्रिमरीत्या विविध प्राणी आणि त्यांचे खेळ पाहिले.तर तसेच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्राण्यांना त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या. ते पण आपल्यासारखेच आहेत ना. तेही आपल्या सोबत राहतात मग आपण त्यांचे मित्र बनायचे.

तुम्ही खूप गोड मुले आहात. हसताना खूप छान दिसता पण काल जसे तुम्ही मुद्दाम पाच-सहा जणांनी माझ्या अंगावर पाणी उडवले तसे पुन्हा करू नका. नाही करणार ना?

शहाणी मुले असे दुसऱ्यांना त्रास देत नाहीत तर मदत करतात.

मला तुम्हाला पुन्हा भेटायला आवडेल बरं का? का माहीत आहे कारण तुम्ही माझे छोटे आणि सुंदर मित्र-मैत्रीण आहात.

काळजी घ्या आणि मी सांगितलेलं लक्षात ठेवा.

तुमचाच,
विदूषक दादा.

© विद्या कुंभार

PC Google

सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all