Login

तिचा प्रवास...

ती


लहानाची झाली थोर
घेऊन इतरांचे विचार
घेऊन मनी सतत मान मोठ्यांचा
इतरांच्या सुखात शोधत
आनंद हा स्वतः चा

चालून मग ती सप्तपदी
झाले रावांची अर्धांगिनी
बदलेल माझे जीवन
आस उरी ही जागली.

काहीच न बदल झाला मनी
होते जशी काल
तशीच आजही या जीवनी
कर्तव्य पार पाडत सुटले


मागे सोडून इच्छा साऱ्या
जगले जीवन इतरांसाठी
कधी कसे जगावे जीवन
हे चितले मनातच फक्त


कधी न झाले साकार स्वप्न
स्वतः चे जग दिसले न मज
कुठं गेली इच्छा अन्
कुठं गेले स्वप्न
आप्तेष्टांसाठी झिजतो
माझा दिन रात

कधी होईल का सकाळ
मिळेल का कधी मोकळे आकाश
पंख पसरूनी घेऊन भरारी
उंच उडावे स्वप्नाच्या नगरी

दिशा मिळाली नवी जगण्याला
उमेद दिली नव्या जीवाने
रंगून गेले त्यात सारी
मागे पडली स्वप्ने सारी

काय होते काय झाले
मातृत्वाचे दान मिळाले
भारावून त्या आनंदात
स्वप्न सारी विसरून गेले.

चिमुकल्यांचे आगमन झाले
त्याच्यासाठी स्वप्न पाहिले
पुरे करण्या ती सारी
मीच माझी न राहिले

त्यांच्यात पुन्हा नव्याने
माझे स्वप्न आठवले
परि न ते पूर्ण झाले
जग हे त्यांचे वेगळे अन
माझे स्वप्न स्वप्न च राहिले

प्रवास माझा स्वप्नाचा
स्वप्नातच पाहिले
चालून ती वाट इच्छेची
स्वप्नातच हे जगले....

इतरांच्या सुखात
आनंद मानून
इतरांसाठी जगले
माझे मला जगणे असे
कायमचे राहून गेले....
कायमचे राहून गेले....
✍️स्वागंधरा