ती काही न म्हणता फक्त मान हलवून होकार दिली . हे बघून प्रदीप म्हणाला .
प्रदीप -" ओके... भेटू कॉलेजनंतर..."
तेवढ बोलून तो बाहेर आला. विवान तिथेच उभा होता. दुरून मॅडम येताना पाहतच विवान म्हणाला.
विवान -" चल मी जातो लायब्ररीला ... लेक्चर संपल्यावर येईन परत."
लेक्चर तर सुरू होती खरी पण त्याच्या मनात भेटीची उत्सुकता लागलेली होती. कधी एकदा सगळे लेक्चर्स होतील याची वाट तो बघत होता.
स्टेटिस्टीक्सचा लेक्चर संपला खर पण अजुन एक लेक्चर होता. मॅडम बाहेर गेल्यावर विवान क्लासमध्ये आला आणि प्रदिपच्या शेजारी बसला. त्यालासुद्धा कळून चुकलं होत की प्रदीप भेटीसाठी उत्सुक होता. पण हे लेक्चर फिजिक्सचा होता. हा सब्जेक्ट आम्हाला जी मॅडम शिकवत होती , ती खूप स्ट्रिक्ट होती. पण तरीही ती चांगली शिकवत होती. त्यामुळे कित्येक जणांना फिजिक्स समजायचं. ते लेक्चर बघता बघता संपल . आता फक्त मॅडम जायची बाकी होती.
मॅडम बाहेर जाताच सगळे जण बाहेर जाऊ लागले. दाराजवळ मुलींचे बेंचेस होते , म्हणून आधी मुली बाहेर गेले. त्याच्यानंतर मुल जाऊ लागले. पण सगळ्यात जास्त गडबड या दोघांना लागलेली होती. दीप्ती आणि तिची मैत्रीण कधीची क्लासमधून गेल्या होत्या. ती न भेटताच गेली तर , हे भीती या दोघांना लागलेली होती.
ते दोघे क्लासमधुन बाहेर येऊन मागच्या गेटजवळ येऊन थांबले. संध्याकाळचे ६ वाजत आले होते. त्यामुळे कॉलेजमध्ये गर्दी नव्हती. शेवटच लेक्चर यांचं होत त्यामुळे कोणी विद्यार्थी कॉलेजमध्ये नव्हते . हे दोघे वाट बघतच होते की दुरून दीप्ती आणि त्यांचं ग्रुप येत असताना दिसले. ते सगळे त्यांचे त्यांचे बॅग्सचे फक्त एक साइड घातलेल्या होत्या. ते बघून विवानच्या मनात एक विचार आल की , ' मुलींना बॅगमधील दोन्ही साईड वापरता येत नाही काय? ' ते जवळ येताच फक्त दीप्ती आणि प्रदीप पुढे उभे होते. बाकी तिचे मैत्रीण आणि विवान मागे उभे होते.
प्रदीप -" हाय."
ती फक्त स्माइल देत म्हणाली.
दीप्ती - " कुठले नोट्स हवे होते?"
प्रदीप त्या सब्जेक्टचा नाव सांगितला. दीप्ती मागून तिची बॅग काढून ती त्या विषयाची वही काढून प्रदिपकडे दिली. वही देताना तिच्या हाताच स्पर्श त्याच्या हाताला झालं. त्याच्या मनात एक वेगळीच स्पंदने उत्पन्न झाली होती. ते अनुभवत असताना ती अचानक एक प्रश्न विचारून त्याच मन पुन्हा रिॲलिटीमध्ये आणली .
दीप्ती -" नोटबुक कधी देशील?"
प्रदीप जरा इकडे तिकडे बघत विचार केला.
प्रदीप -" देईन दोन - तीन दिवसात ."
ती फक्त मान हलवत होकारार्थी दर्शवली.
प्रदीप -" आता तर उशीर झालंय . तुम्ही कसं जाता?"
विवान फक्त त्यांचा संवाद ऐकत उभा होता.
दीप्ती - " आम्ही ऑटोनी जातो ."
प्रदीप -" कुठ राहता तुम्ही सगळे ?"
सगळे एक एक करून त्यांचं राहणार नगर सांगितले. थोडा वेळ शांततेत गेलं .
दीप्ती -" आता उशीर होतोय . आम्ही जातो."
प्रदीप -" ओके.. बाय."
ते सुद्धा बाय करत तिथून निघाले.
विवान -" भावा.. सेटिंग तर झाली म्हणा ."
प्रदीप - " काही काय म्हणतोय ."
विवानची ती संध्याकाळ तर प्रदिपला चिडवण्यात गेली. तो दिवस दोघांसाठी चांगलं गेला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळच्या लेक्चरसाठी विवान उशिरा पोहचला. लेक्चर संपल्यावर लगेचच त्याच प्रॅक्टिकल होणार होत. त्यामुळे लेक्चर संपल्यावर सगळे बाहेर निघाले आणि गडबडीने दुसऱ्या मजल्यावर जाऊ लागले . विवान मात्र अगदी निवांत प्रॅक्टिकलला निघाला . वर गेल्यावर सगळे आपापल्या डेस्कवरचे प्रॅक्टिकल करण्यासाठी सज्ज झाले होते. तो लॅबमध्ये शिरला खर पण तिथे सगळ्या प्रोफेसर यांच्या डेस्कवर कोणी एक मुलगी ओरडा खात होती. तीच पाठच फक्त त्याला दिसत होती. त्यातली मॅडम म्हणत होती.
मॅडम -" किती प्रॅक्टिकल मिस केलेस माहिती का तुला? "
ती -" ४ मॅडम..."
ती खाली बघत उत्तर दिली.
मॅडम -" मग तुझी एवढं अब्सेंटी का लागली?"
ती -" मॅडम ... मी मागील एक महिना मी आजारी होते. "
मॅडम -" बर जा... त्या डेस्कवर असलेली एक्सपेरीमेंट तुला करायचं आहे आणि तुझी जर्नल मला कंप्लीट हवं आहे ."
जेंव्हा ती मागे फिरली , तेंव्हा विवानला कळाल की ही तर ती मुलगी आहे जी पहिल्या दिवशी त्याला घायाळ केली होती. ती पुढे येऊन तो ज्या डेस्कजवळ उभा होता , त्याच्या बाजूच्या डेस्कवरच एक्सपेरीमेंट करायला आली. तो दुसऱ्यांदा तिला एवढ्या जवळून पाहत होता.
ती अजूनही तशीच हेअरस्टाईल केली होती. त्यात तीच घायाळ करून टाकणारी परफ्यूम त्याच्या हृदयाचे ठोके वाढवत होती . ती इतकी जवळ उभी होती की एकवेळ त्याला स्वप्नात असल्यासारखं वाटू लागलं.
इतक्यात मॅडम एक्सपेरीमेंट एक्सप्लेन करण्यासाठी त्याच्या जवळच्या डेस्कला आली होती. हे बघून तो बॅग मधील जर्नल काढला . ती ह्याला जर्नल काढताना पाहील. मॅडम जवळच्या डेस्कची एक्सपेरीमेंट विद्यार्थ्यांना शिकवत होती. विवान स्वतःचा एक्सपेरीमेंट वाचत होता , कारणही तसच होत . त्याचा पार्टनर आज आलेला नव्हता त्यामुळे त्याला हे प्रॅक्टिकल एकटाच करावं लागणार होत. तेवढ्यात ती थोड त्याच्याजवळ सरकत गळा साफ केल्याचा आवाज काढली. तो आवाज ऐकून त्याचसुद्धा लक्ष तिच्याजवळ गेलं.
ती -" तुझ जर्नल कंप्लीट आहे ?"
विवान -" हो."
ती -" ओह.. मला देशील ?"
ती डायरेक्ट अशी विचारली अस बघून तो सुद्धा डायरेक्ट म्हणाला.
विवान -" का ?"
हा अनपेक्षित उत्तर त्याच्याकडून ऐकल्यावर ती सुद्धा एका क्षणासाठी स्तब्ध झाली.
ती -" म्हणजे माझं जर्नल इनकंप्लीट आहे."
विवान -" ओके.. तू आमच्या क्लासमध्ये असतेस?"
ती -" हो.. पण एक महिना आजारी असल्याने मी आले नाही. दोन दिवसापासून मी कॉलेजला येऊ लागले . "
विवान -" तुझ नाव काय आहे?"
विवान थोडासा लाजत म्हणाला.
ती -" श्वेता .. तुझ ?"
विवान -" माझं विवान ..."
त्याच्या मनात स्पंदने निर्माण झाले होते. का होणार नाही? कारण त्याला घायाळ केलेली मुलीशी त्याच आज ओळख झालेली होती.
श्वेता -" काल तुला मी क्लासमध्ये पाहील. तू आणि अजुन एक मुलगा पुढे उभा होतात आणि तुझा मित्र फ्रंट बेंचवर बसलेल्या मुलीशी काहीतरी तुम्ही बोललात. काय होत ते?"
विवान काहीसा हळू आवाजात म्हणाला.
विवान -" काही नाही. जस्ट कॅजुवल .."
श्वेता -" अच्छा."
तेवढ्यात मॅडम त्याच्या डेस्कजवळ येऊ लागली. हे बघताच दोघे दूर झाले. मॅडम येऊन त्याला एक्सपेरीमेंट समजावून सांगितली. तसा तो त्यात बिझी झाला. त्यानंतर मॅडम श्र्वेताकडे गेली आणि तिला सुद्धा तिचा एक्सपेरीमेंट समजावून सांगू लागली.
विवान प्रॅक्टिकल करताना तिच्याकडे अधूनमधून बघत होता. तिच्या चेहऱ्यावरून तिला त्यातल काहीच समजत नसल्याचा अंदाज त्याला आला होता . मॅडम जाताच ती डेस्कवर असलेल्या साहित्याकडे बघू लागली होती. तिला काहीच समजलं नाही अस त्याला कळालच होत. पण तो त्याचा प्रॅक्टिकल करत होता.
शेवटी काही काळानंतर त्याला कन्फर्म झालं की ती काहीच कळाल नाही. न राहवून तो तिच्याजवळ थोडासा सरकत म्हणाला.
विवान -" काही कळाल नाही अस दिसतय ."
ती लगेच तिच्याकडे बघितली आणि मॅडम त्यांच्याकडे बघत तर नाही ना याच कन्फर्म करून ती म्हणाली.
श्वेता -" हो."
तीच उदास झालेलं चेहरा बघून त्याला कसं तरीच वाटलं. मग तो तिला काय करायचं हे हळू आवाजात सांगू लागला. ती सुद्धा त्याच बोलणं ऐकुन तसच करू लागली. शेवटी तो म्हणाला.
विवान -" आता रिडिंग घे आणि तुझ्या प्रॅक्टिकल बुकमध्ये लिही आणि दाखव."
ती शेवटी त्याला स्माइल दिली आणि पेन्सिल घेऊन रिडिंग घेऊ लागली. तिच्या त्या एका क्यूटश्या स्माइलने तो एका क्षणासाठी स्तब्ध झाला. नंतर त्याला कळून चुकलं की तो लॅबमध्ये आहे. मग तो सुद्धा त्याचा प्रॅक्टिकल करू लागला.
काही वेळात ती सगळी रिडिंग घेतली आणि मॅडमकडे जाण्या अगोदर ती त्याच्याकडे वळून म्हणाली.
श्वेता -" हे बरोबर आहे ना?"
तो तिच्या रिडिंगकडे बघितला आणि थोडासा विचार करून म्हणाला.
विवान -" चुकलं आहे ..."
हे ऐकताच ती थोडी निराश झाली . कारण आता प्रॅक्टिकलची वेळ संपत आलेली होती. बाकी सगळे निघून गेले होते. फक्त हे दोघेच लॅबमध्ये प्रॅक्टिकल करत होते. तो तिच्या निराश झालेल्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला .
विवान -" एक मिनट .."
अस म्हणत तो जर्नल काढला .
विवान -" हे घे रिडिंग आणि आहे तस नको लिहू . थोडा चेंज करून लिही. "
ती वेळ न घालवता ते रिडिंग लिहू लागली. तो सुद्धा त्याचा रिडिंग लिहिण्यात व्यस्त झाला. मॅडम दुरूनच ," झालं का तुमचं ?" अस प्रश्न विचारू लागली.
मग थोड्यावेळाने ते दोघं मिळून मॅडमसमोर गेले. पहिला तो त्याचा एक्सपेरीमेंटचा रिडिंग दाखवला. मॅडम काही प्रश्न करून त्यावर सही केली. त्याच्यानंतर ती तिच्या बुकवरील रिडिंग दाखवली. मॅडम एक क्षण त्याकडे बघत म्हणाली.
मॅडम -" हे नक्की तूच घेतलीस ना?"
ती थोड चाचपळत म्हणाली.
श्वेता - " हो.."
मॅडमला कधीच कळून चुकल होत की विवान हेल्प केलेला होता. तरीही ती काही न म्हणता त्याच्यावर सही केली आणि म्हणाली .
मॅडम -" तुझ जर्नल लवकरात लवकर कंप्लीट करून दाखव ."
श्वेता -" हो.."
ती तीच सर्वकाही आवरून लॅबच्या बाहेर आली , तर तिथे विवान उभा होता.
श्वेता -" थंक्स विवान ... "
विवान -" मेन्स्शन नॉट."
श्वेता -" मला जर्नल देशील ?"
विवान -" तुला लेक्चर संपल्यावर देईन."
श्वेता -" ओके .. कुठे भेटायचं ?"
विवान -" कॅन्टीन .."
श्वेता -" ओके.. बाय."
तो खर तर आता सुद्धा दिला असता , पण तिच्याशी अजुन एकदा भेट व्हावं अस त्याला वाटत होतं .
आज झालेल्या प्रॅक्टिकलच्या विचाराने लेक्चर कशे गेले त्याला कळलसुद्धा नाही. शेवटचं लेक्चर संपलं. दररोज हळू जाणारा तो आज मात्र लवकरच क्लासमधून निघाला आणि कॅन्टीनजवळ जाऊन ती येण्याची वाट पाहू लागला.
थोड्यावेळाने ती तिथे आली. आज कॅन्टीनमध्ये गर्दी नव्हती.
श्वेता -" हाय.."
तो सुद्धा हात हलवत हाय म्हणाला.
श्वेता -" तू काही घेणार आहेस का? "
ती कॅन्टीनकडे बघत म्हणाली.
विवान -" नाही.. तू घेणार आहे का?"
श्वेता -" नाही .. आत भूक नाहीये."
दोघात आता थोडावेळ शांततेत गेल्यावर ती म्हणाली.
श्वेता -" जर्नल??"
विवान -" अरे हो.."
तो बॅगमधून त्याच जर्नल काढला आणि तिला दिला. ती जर्नल तिच्या बॅगमध्ये घातली.
श्वेता - " आता खूप उशीर झालाय."
तो तिच्याकडे बघत म्हणाला.
विवान -" हो.."
श्वेता - " मग आता उद्या भेटू.."
विवान -" नक्की... जर्नल कधी देशील ?"
श्वेता -" लवकरच झाल्यावर .."
विवान - " तुझ झालं हे मला कसं कळणार.."
श्वेता -" अरे हो नाही का?... बरं तुझ नंबर सांग. तुला मी त्यावर सांगते."
त्याला तर विश्वास बसत नव्हता. एक मुलगी एका दिवसाच्या ओळखी नंतर नंबर मागेल.
श्वेता -" देणार आहेस ना ?"
विवान -" हो घे ना.. ७०५८****** .."
ती एक मिस कॉल दिली.
श्वेता -" मिस कॉल दिलाय. "
विवान -" बर.."
श्वेता -" बर बाय..."
विवान -" बाय..."
ती जाताना परत एकदा एक क्युटशी स्माइल दिली. तो बघताच त्याच्या मनात एक वेगळीच झटका देवून गेली. आजचा दिवस त्याला खूप वेगळा गेला. तिचा नंबर तो सेव केला आणि घरी निघाला. आजचा दिवस आठवताना त्याच्या मनात वेगळीच प्रेमाची भावना निर्माण झालेली होती.
आता त्याला खरी कॉलेजची मजा येणार होती.
**********************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती
तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कळवा.. माहिती आहे खूप उशिरा हा भाग आला आहे. पण परीक्षा आणि दिवाळी नंतर मला क्वचितच वेळ मिळत आहे , त्यामुळे समजून घ्या... नक्की कमेंट करा... धन्यवाद ????????????
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा