कॉलेज सुरू व्हायला अजुन खूप दिवस होते. घरी बसून विवानला खूप बोरिंग वाटतं होत . कधी एकदा कॉलेज सुरू होईल आणि कधी एकदा पहिल लेक्चर अटेंड करू अस त्याला वाटू लागलं होत. बारावीनंतर सगळ्यांनाच उत्सुकता लागते की नवीन कॉलेज कसं असेल? नवीन कॉलेजमध्ये कसे शिकवतात ? तीच उत्सुकता त्याला सुद्धा लागून होती आणि वरून पहिल्याच दिवशी त्याला एका परीच दर्शन झालेलं होत , जिला तो विसरू शकत नव्हता. ते त्या वयाच आकर्षण होत का खरच वेगळं काही?? हे त्याला माहिती नव्हत. पण त्याला एवढं माहिती होत की ती फिलिंग वेगळीच उत्सुकता निर्माण करत होती.
अखेर सोमवारचा दिवस उजाडला. तो लगेच तयार झाला आणि कॉलेजला निघाला. तिथे पोहचताच तो थेट नोटीस बोर्ड जवळ गेला आणि नोटिसबोर्ड वरील टाइमटेबल बघू लागला. त्यात कुठले लेक्चर्स कधी आणि कुठल्या क्लासमध्ये आहेत हे तो लिहून काढू लागला. तो सकाळी लवकर आल्यामुळे नोटीस बोर्ड जवळ जास्त गर्दी नव्हती .
टाइम टेबल नीट निरखून बघितल्यावर त्याला कळाल की त्याच एक लेक्चर ( इलेक्ट्रॉनिक्स) सकाळी १० वाजता होणार आणि त्यानंतर २:३० पर्यंत प्रॅक्टिकल होणार आणि परत ३:०० ते ६:०० पर्यंत दुसऱ्या विषयांचे लेक्चर्स होणार होते. त्याला कळून चुकल की ज्या दिवशी त्याच प्रॅक्टिकल नव्हतं त्यादिवशी त्याचा १० चा लेक्चर संपल्यावर थेट ३:०० लेक्चर होणार आहे. म्हणजे बाकीचा वेळ टाईमपास मध्ये जाणार. त्याच घर लांब असल्याकारणाने तो परत जाऊन येऊही शकत नव्हता. त्यामुळे त्याचा १० ते ३ पर्यंतचा वेळ कॉलेजमध्येच काढावा लागणार होता. एकतर नवीन कॉलेज आणि अजुन कोणी नीट ओळखीचं नव्हतं. मग एकटाच ही मधली वेळ कसं काढणार हा विचार तो करू लागला . तेवढ्यात त्याला कळाल की १० वाजले , म्हणजे आता पहिला लेक्चर सुरू होणार होता. लगेचच टाइमटेबल बघितला आणि क्लास शोधत तो कॉलेजमध्ये फिरू लागला. तब्बल १० मिनिटे शोधल्यावर त्याला कळाल की त्या लेक्चरचा क्लास नोटीसबोर्ड जवळच होता. डोक्याला हात मारत तो क्लासमध्ये जाऊ लागला.
क्लासमध्ये जातच त्याला जरा नवलच वाटू लागलं. कारण तो क्लास होतच तस , म्हणजे तिथे बेंचेस पायऱ्या सारखे ठेवले होते. पुढे उभे असलेले सगळ्यांच प्रोफेसर किंवा बाकी कुणालाही बसलेले सगळ्यांचे चेहरे दिसत होते आणि तसले क्लास विवान कधीच बघितला नव्हता . त्या बेंचेसच्या रांगा १४ असावेत.
तो जेंव्हा क्लासमध्ये निरखून पाहू लागला तर तो थक्कच झाला. कारणही तसच होत . मुलींची संख्या मुलांच्या संख्येपेक्षा कित्येक पटीने जास्त होती आणि त्यातल्या त्यात मुल फक्त ८ जण होते ( त्याला धरून ). म्हणजे एवढी तफावत फक्त इथेच दिसायला मिळत होती.
सगळया समोरून जाताना त्याला सगळ्यांचे चेहरे दिसत होते . खास करून मुलींचे चेहरे त्याला स्पष्ट दिसत होते. त्यांचे चेहरे अगदी खुललेला कळीसारखे भासत होते. त्यांना पण नव्या कॉलेजची उत्सुकता होती. विवान मुलांच्या साइडला जाताना मुलींच्या त्या घोळक्यात तिला शोधत होता , जी त्याला पहिल्या दिवशी घायाळ करून सोडली होती. तिला शोधत असताना त्याचे पाऊले मात्र हळू पडत होते. त्याला हळू जाताना बघताच पुढच्या लाइनमध्ये बसलेले मुली त्यालाच बघत होते. हळू हळू दुसऱ्या , तिसऱ्या अस करत करत सगळ्या मुली त्याला बघत होते. जेंव्हा त्याला कळाल की सगळे मुली त्यालाच बघत आहेत त्याला ऑकवर्ड वाटलं आणि खाली बघत मुलांच्या साइडला जाऊन बसला. मोजून ८ मुलांमध्ये कोणीही पहिल्या बेंचावर बसायला तयार नव्हते. विवान सुद्धा तिसऱ्या बेंचवर जाऊन बसला.
काही मिनिटात प्रोफेसर क्लासमध्ये आले. ते येताच सगळे उभारले . विवानला त्यांना बघून नवलच वाटल. त्यांच्या हातात ना कोणते नोट्स होते , ना कोणतं पुस्तक होत. त्यांच्या हातात होत ते फक्त डस्टर आणि एक खडू .. ते आल्या आल्याचं एक काम केले. क्लासमधील पोरांना , जे मागे बसले होते . त्यांना पुढे बसायला सांगितले . पोरंसुद्धा त्यांच्या भयाने पुढे बसले. त्यात विवान आणि अजुन एकजण पहिल्या बेंचवर बसले. प्रोफेसर एक नजर अख्या क्लासमध्ये टाकले आणि एक प्रश्न विचारले.
प्रोफेसर -" What is Ohm's law ? "
हे प्रश्न विचारताच विद्यार्थ्यांमध्ये बडबड सुरू झाली. मुलींमध्ये तर थेट चर्चाच होऊ लागली.
प्रोफेसर -" अरे प्रश्न मी विचारलाय . इथे उत्तर द्या.. कोण देणार?"
हे म्हणताच अख्खा वर्ग शांत झाला. कोणी उठून उत्तर द्यायला तयार नव्हते. प्रोफेसर ते बघून परत म्हणाले.
प्रोफेसर -" अरे उत्तर तुम्हाला येत. तुम्ही मगाशी केलेल्या चर्चा बघून मला कळतंय. मग उभारून उत्तर द्यायला काय होत? मी काय खाणार आहे का तुम्हाला??.. चुकलं तर चुकू दे पण उभारून उत्तर द्यायला शिका. आता नाही शिकणार तर कधी शिकणार?"
एवढ बोलतच परत काहीकाळ वर्गात शांतता पसरली. त्यानंतर एका मुलीने हात वर करताच प्रोफेसर तिला उद्देशून म्हणाले.
प्रोफेसर -" Yes .. सांगा."
सगळ्या वर्गाचं लक्ष तिच्याकडे गेलं. ती उभारली तस मुलांचं लक्षसुद्धा तीच्याकड गेलं. तिला चष्मा असलेल पाहून विवानच्या मनात म्हणाला ,' एका स्कॉलारची निशाणी चष्मा असते का? असो..' ती उभारून उत्तर देऊ लागली.
ती -" Ohm’s law states that the voltage across a conductor is directly proportional to the current flowing through it. "
तीच उत्तर ऐकताच बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये समाधानाची भावना उत्पन्न झाली की कोणीतरी उत्तर सांगितल. तीच उत्तर सांगताच सरांनी परत प्रश्न केला.
प्रोफेसर -" हे उत्तर बरोबर आहे का? "
हे प्रश्न करताच परत विद्यार्थ्यां मध्ये संभ्रम निर्माण झालं . त्यात सरांनी पहिल्या बेंचवर बसलेली मुलीला उभारून विचारले.
प्रोफेसर -" बरोबर आहे का उत्तर ?"
ती घाबरत उभारून म्हणाली.
ती -" हो .."
तिच्याकडून परत मुलांकडे येऊन ते थेट विवानला परत तेच प्रश्न विचारले ," बरोबर आहे का तीच उत्तर ?" तो सुद्धा उभारून उत्तर दिला.
विवान -" नाही.."
प्रोफेसर -" हा म्हणाला नाही.. मग उत्तर काय आहे?"
प्रोफेसर विवानच्या बाजूला बसलेला मुलाला विचारल .
प्रोफेसर -" सांग .. अजुन काय पाहिजेल तिच्या उत्तर मध्ये?"
तो उभारला आणि विचार करून उत्तर सांगितला.
तो -" Ohm’s law only holds true if the provided temperature and the other physical factors remain constant. "
प्रोफेसर -" बरोबर... ही गोष्ट अॅड् करायचं राहील होत. कळाल का??"
ते उत्तर दिलेल्या मुलीकडे उद्देशून म्हणले आणि त्यांच्या लेक्चरला सुरुवात केले. त्यातून विवानला कळाल की हे सर कन्सेप्टला महत्त्व देतात , जे विवानसुद्धा करत होता . त्याला कधीच पाठांतर जमत नसे. तो फक्त कन्सेप्ट आठवत असे . त्यामुळे त्याला मात्र ते प्रोफेसर खूप आवडले.
पहिलं लेक्चर संपलं. सगळे मुल आपापसात ओळख करून घेऊ लागले. त्यातून विवानला त्या कॉलेजमधला दुसरा मित्र भेटला , जो लेक्चरला त्याच्याच बाजूला बसला होता आणि उत्तर सुद्धा दिलेला होता. त्याचा नाव ,' शिवा मसुती '... तो राहणारा अक्कलकोटचा आणि त्याची मातृभाषा कन्नड असल्या कारणाने तो बोलत असलेल्या मराठीत कन्नडचा टोन येत होता. जे विवानला आवडायच .
कॉलेज सुरू होऊन आता एक महिना झाले होते. प्रॅक्टिकल चालू झालेले होते. त्यातल्या त्यात लेक्चर्ससुद्धा सुरूच होते. इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रॅक्टिकलला शिवा आणि विवान दोघेही पार्टनर होते आणि त्यांचा प्रॅक्टिकल सर्वात आधी संपायचा . असेच दिवस जात होते. इतर प्रॅक्टिकलला सुद्धा विवानला वेगळीच आनंद मिळत होती. कारण , त्याला बारावीला कधीच प्रॅक्टिकल घेतले नव्हते. फक्त फुकटचे मार्क्स देऊ केले होते.
विद्यार्थ्यांना लेक्चर्सला बोलायची संधी क्वचितच मिळत होती. एका लेक्चरला मात्र त्यांना गप्पा मारण्याची संधी मिळत असे. ते म्हणजे गणिताच्या तासाला... सर जेंव्हा गणित सोडवायला फळ्याकडे तोंड करत होते. तेंव्हा मागे बसलेल्यांना खूप वेळ गप्पा मारण्यासाठी मिळत असे. त्यात विवान आणि प्रदीप ( जो पहिल्या दिवशी भेटलेला होता. ) बाजूला बसलेले होते आणि त्यांची सुद्धा गप्पा मारत होते.
विवान -" अरे इथे सगळ्याच लेक्चरला मुली जास्तच आहेत. "
प्रदीप - " त्यांना घरी काम लावतात रे.. म्हणून इथ येतात."
ते ऐकून विवानला हसूच आलं. पण तो कंट्रोल केला.
विवान -" पण गर्लफ्रेंड बनण्याची चान्स खूप आहेत."
प्रदीप -" ह्म.."
असेच गप्पा मारताना आणि गणित सोडवताना प्रदीप सांगितला
प्रदीप -" मलापण एक मुलगी आवडते रे.."
विवान त्याच्याकडे बघत म्हणाला.
विवान-" कोण??"
प्रदीप हळूच म्हणाला.
प्रदीप - " ती जे पहिल्या बेंचवर बसली आहे बघ ती.."
विवान तिथे बघितल्यावर म्हणाला.
विवान -" तिथे तर ६ जण आहेत. त्यातली कोण?"
प्रदीप -" डावीकडून दुसरी "
विवान तिला बघून म्हणाला.
विवान -" अरे किती हडकुळी आहे ती ..( त्याचा अर्थ ती किती बारीक आहे ..) .."
प्रदीप -" अरे आजकालचे तसेच असतात.."
विवान -" पण एवढे??"
प्रदीप त्यावर काहीच नाही म्हणाला.
विवान - " नाव काय तीच ?"
प्रदीप -" दीप्ती माने... "
विवान -" तुला कसं माहिती तीच नाव ?"
प्रदीप -" अरे प्रॅक्टिकलला तीच आणि माझं एकच बॅच आहे. तेंव्हा लिस्टमध्ये नाव बघितल. "
विवान -" मग काय बोलण वैगरे झालं का?"
प्रदीप -" अरे कुठून होणार ?.. ओळखतच नाही तर कुठून बोलणार ??"
विवान थोडा वेळ विचार करत होता. काहीवेळाने तो म्हणाला.
विवान -" एक काम कर. पुढचा लेक्चर statistics चा आहे. म्हणजे माझं लेक्चर नाहीये. या नंतर मी लायब्ररी मध्ये जाईन आणि हे लेक्चर संपल्यावर तू तिच्याजवळ जा आणि तिला विचार की आज कॉलेज संपल्यावर भेटणार काय?? तुमचा लेक्चर संपल्यावर पुढच्या लेक्चर ला येईन. "
प्रदीप -" येडा आहेस काय ?.. डायरेक्ट बोलायचं ??"
विवान -" अरे मग आता नाहीतर कधी करशील... ती तर कॉलेज संपल्यावर थेट घरी जात असेल. मग काय रस्त्यावर विचारणार आहेस का?"
प्रदीप -" अरे पण पूर्ण क्लाससमोर कसं विचारू?"
विवान -" अरे हिम्मत कर... आणि विचारून टाक."
प्रदीप -" मग भेटण्याचं कारण काय सांगू?"
विवान -" सांग काहीतरी... नोट्स पाहिजेल वैगरे.."
प्रदीप -" अरे मग अस कसं विचारू??"
विवान -" हे बघ ... आताच चान्स आहे ."
प्रदीप -" ती नाही म्हणली तर..."
विवान - " पुढचं विचार नंतर करू. तू विचार तर आधी.."
प्रदीप विचार करतच होता की लेक्चर संपलं. सर गेल्यावर ज्यांच पुढचं लेक्चर होत ते तिथेच थांबले . विवानच लेक्चर नसल्याने तो बाहेर आला आणि त्याच्या बाहेर प्रदीप सुद्धा बाहेर आला. ती मात्र तिच्या मैत्रीण सोबत बोलत होती.
विवान -" अरे जा ... बोल..."
प्रदीप - " अरे तू पण ये की.."
विवान - " ठीक आहे... मी मागे दाराजवळ थांबेन.."
ती मात्र तिच्या मैत्रिणीसोबत बोलत होती. प्रदीप कुणाचाही विचार न करता तिच्या बेंचजवळ जाऊ लागला. जाऊन तो त्याचा दोन्ही हात तिच्या बेंचवर ठेवला आणि म्हणाला.
प्रदीप -" तू आज कॉलेजच्या मागच्या गेटजवळ भेटशील का?"
त्याचा आवाज जरा जास्तच मोठा आला. सगळेजण अगदी शांत झाले. मुल मुली सगळे त्यांच्याकडं बघू लागले. अगदी शांत झालेले पाहून विवानला वाटलं , ' काय म्हणेल ही?'
तो अचानक समोर आल्याने ती सुद्धा चकित झाली होती. ती अगदी हळू आवाजात म्हणाली.
दीप्ती -" का?"
प्रदीप -" तुझ्याकडून नोट्स पाहिजे होते."
सगळे आता त्यांच्याकडे पाहत होते. कारण कोणी एक मुलगा एका मुलीला भेटण्यासाठी विचारणे म्हणजे नवीन नव्हतं . पण अख्ख्या क्लास समोर म्हणणे नवीन होत.
ती काही न म्हणता फक्त मान हलवून होकार दिला. तो बघून प्रदीप म्हणाला.
प्रदीप -" ओके... भेटू कॉलेज नंतर..."
तेवढ बोलून तो बाहेर आला. विवान तिथेच उभा होता. दुरून मॅडम येताना पाहतच विवान म्हणाला.
विवान -" चल मी जातो लायब्ररीला ... लेक्चर संपल्यावर येईन परत."
तो तसा म्हणाला खर , पण प्रदीपच्या मनात भेटीची उत्सुकता लागलेली होती.
**********************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती
पुढील भाग लवकरच.. ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे. तर त्यावर तुमची टिपण्णी महत्वाचं ठरणार आहे. तर कमेंट करा आणि कळवा की कसं वाटलं???
धन्यवाद ????????
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा