काय म्हणतेस जया कशी आहेस"
" अगदी छान मजेत आहे "
"अगं नाही काल अवनी भेटली होती ती म्हणत होती तुझ्या हाताला फॅक्चर झालय म्हणून म्हटलं बरं वाटतंय की नाही तुला "
"काही नाही ग अगं थोडासा वेंधळेपणा नडला माझा, घरातल्या घरातच पडले ,पण बरं झालं बाई डावा हातच फॅक्चर झालेला आहे. उजवा हात किंवा पाय झाला असता तर ,किती कामे अडली असती माझी ,आणि त्यावेळी मी घरात असण्याऐवजी गाडी चालवत असते तर. बरे झाले बाई घरीच पडले"
जयाची माझ्या मावस बहिणी ची चौकशी करण्यासाठी मी फोन केला होता ,नुकतेच दुसऱ्या एका बहिणीकडून, मला तिच्या हात फॅक्चर बद्दल कळले होते .
आत्ता तिच्याशी बोलताना जाणवले की तिने दुखावलेल्या हात, आनंदाने स्वीकारला होता, उलट तिने उजव्या हातात झाला नाही, याविषयी आभार आणि पाय चांगले असल्याबद्दलही कृतज्ञताच व्यक्त केलेली होती.
जया साधारण माझ्याच वयाची आहे ,सोबतच आजोळी भेटत वाढलो आम्ही .माझी मावस बहीणअसल्यानेतिला लहानपणापासून चागले ऐळखून होते. तिच्यातला हा आनंददायक बदल खरंतर गेल्या तीन चार वर्षातलाच. एरवी लहानपणीपासून आम्ही ,जयाला "कुरकुरी जया" म्हणून चिडवत असायचो, पण या जयाला तिच्या सासूबाईंच्या रुपात एक आनंदी गुरू भेटला आणि जयाचा कायापालट झाला.
खरेतर लहानपणापासून जयाला लहानसहान गोष्टींमध्ये खोट काढायची आणि आपल्याकडे काय काय वाईट आहे, याचा सतत विचार करायचा अशी सवय होती .
पण लग्न झाले आणि नीलू ताईच्या रूपाने एक आनंदाचे झाड तिला सासू म्हणून मिळाले. सदैव चांगलाच विचार स्वतःसाठीही आणि इतरांसाठीही करणे ,नीलू ताईंची सवय होती. आपण एखाद्या माणसांच्या सहवासात राहिलो ,की त्याचे अनुसरण आपोआप करायला लागतो .त्याचप्रमाणे हळूहळू जया मध्येही बदल घडायला लागला .आता प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मकता शोधणारी जया, हळूहळू सकारात्मक शोधायला लागली.
सुरुवातीला हे आनंदाचे झाड वागवतांना, तिला होणारा त्रास ती मला सांगायची ,पण हळूहळू तो त्रास तिने आपोआपच संपवला. थोडेसे प्रयत्न करावे लागले खरे, पण आता हे आनंदाचे झाड वागवणे तिला जमायला लागले.
घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगले शोधणे ,किंवा आपल्या सोबत जे वाईट घडले असेल ,तर यापेक्षाही जास्त वाईट घडू शकले असते ,पण हे कमीच घडले असा विचार करणं तिला जमायला लागले .
रोज सकाळी उठल्यावर आज दिवसभरात आपल्यासोबत काय काय चांगले घडू शकते ,आणि आपण काय काय चांगलं करणार आहे ,याचा विचार पहिल्यांदा मनात घोळवणे ,ही सवय तिने सासूबाईंच्या मदतीने आत्मसात केली .
म्हणतात ना एखाद्याच्या संगतीचा परिणाम ,आपल्यावर चांगला होतो, हेच हेच घडत होते. त्याचप्रमाणे रात्री झोपताना ही आज दिवसभरात आपल्यासोबत काय काय चांगल्या गोष्टी घडल्या, अशा दहा गोष्टींची यादी करायची सवयही, तिने स्वतःला लावून घेतली .
सुरुवातीला एखाद-दुसऱ्या गोष्टीची यादी होत असे, पण हळूहळू दहा, पंधरा-सोळा गोष्टीही दिवसभरात चांगल्या घडायला लागल्या. त्या आठवतांना आपोआपच ही आनंदाची सवय ही चांगलीच वृद्धिंगत झाली.
मैत्रिणींनो तुम्हीही वागवणार ना सोबत असेच जया सारखे आनंदाचे झाड .