ज्युलिया राघव शास्त्री ७

सेक्स स्कँडल
ज्युलिया राघव शास्त्री

भाग 7

"व्हॉट हॅपेंड टू युअर ब्रदर?" ज्युलिया परत गेली होतीच की हे आठवून परत राघवच्या घरी आली.

"ही हँग हिमसेल्फ. ही वॉज जस्ट फिफ्टीन ईअर ओल्ड."

"मग स्टील मी थ्याला मारले, असे तू खा म्हणत होता? सुसाईडसाठी दुसरे रिजन पण असू शकतात?"

"कम अँड सी धिस." म्हणत त्याने तिला आतमध्ये बोलावले आणि एक लॅपटॉप ओपन केला. तो त्याचा नेहमीचा लॅपटॉप नव्हता.

"हा किरणचा लॅपटॉप आहे." लॅपटॉपच्या कीबोर्डवर बोटं चालवत तो म्हणाला.

ती फक्त त्याच्याकडे बघत होती.

"किरण माझा छोटा भाऊ, बघ हे.." म्हणत त्याने लॅपटॉप तिच्या पुढे सरकवला. तिने लॅपटॉपकडे बघितले, त्यात तिचा एक पॉर्न व्हिडिओ सुरू होता. त्या व्हिडिओमध्ये ज्युलिया आणि एक तरुण मुलगा होते. त्यात हळूहळू कपडे काढण्याचा सीन सुरू झाला, तसे राघवने लॅपटॉपवरून आपली नजर हटवली आणि असेच इकडे तिकडे बघू लागला. ती व्हिडिओ बघत असताना आपले कपडे उगाच नीट करत होती.

"काय फायदा आता नीट करून? अख्ख्या दुनियेने बघून झाले आहेत. आता अंग झाकतेस तरी कोणासाठी? माझ्यासाठी? मला तुझ्या शरीराकडे बघावे पण वाटत नाही, कपडे घाल नाहीतर नको घालू, माझ्यासाठी सारखंच आहे." तो थोडा कुत्सितपणे हसत म्हणाला. तरी ती आपल्या गळ्याजवळ वारंवार हात नेत, तो बंद गळ्याचा असलेला ड्रेस सुद्धा झाकत होती.

थोड्यावेळाने त्या व्हिडिओमधून उत्तेजीत करणारे आवाज येऊ लागले, त्यात ज्युलियाचेच आवाज जास्त येत होते. जसे ते आवाज यायला सुरुवात झाली, राघवने आपली मान दुसऱ्या दिशेने वळवली आणि बाहेर कुठेतरी बघत होता. ज्युलियाला तसे तर कधीच कोणाच्या बोलण्याचा, असण्याचा फरक पडत नव्हता, पण राघवचे अस्तित्व तिला अस्वस्थ करत होते. तिने पटकन लॅपटॉपचा आवाज म्युट केला.

"माय फादर डिवोर्स्ड माय मम..फ्रॉम लास्ट थ्री ईअर्स शी वॉज फाईटिंग विथ लाईफ थ्रेटनिंग डीसिज. मला खूप पैशांची गरज होती. नो वन वॉज देअर टू हेल्प मी. मॉमने लव्ह मॅरेज केले होते, सो टिचे फॅमिलीने ऑल रिलेशन्स थोडले होते. कुठल्याच जॉबमधे मला खूप पैशे भेटले नाही. आय वॉन्टेड टू सेव्ह माय मॉम." बोलता बोलता तिचा आवाज कापरा झाला. तिचा आवाज इतका खोल गेला होता की, त्या आवाजाने राघवच्या शरीरावर शहारे आले. त्याने वळून बघितले तर ज्युलिया तिचे डोळे पुसत होती.

"मला आवडत नाई मला खोणी टच केले तर, फॉर ओन्ली दिज रीझन, मी कधी बॉयफ्रेंड पण नाही केला. हे काम करतांना सुरुवाटीला मला वोमीटिंग होत होती, फूड पण खायला यक् वाटत होठे. बाथ करताना बॉडी एवढी रब खरत होती खी स्किन आऊट येत होती. यक्.." ते आठवून तिला ओकारी आल्यासारखे होत होते.

"बट माय फोकस वॉज ओन्ली माय मॉम. ती नसते तर मी सुसाईड केले असते. बट ओन्ली फॉर मनी, मी हे काम केले नसथे. माझ्या फॅमिलीसाठी मला माझे जीव द्यावे लागले असते टरी मी माझे जीव डीले असटे. नथिंग इज मोर इंपॉर्टन्ट दॅन माय फॅमिली. मी आता अल्कोहोल पिऊन हे काम करते, मोस्ट ऑफ द टाईम, आय एम आयदर ड्रंक ऑर ऑन ड्रग्स."

तो निःशब्द तिच्याकडे बघत होता.

"प्लीज खोणाच्या मजबुरीला जज खरू नखो." ती शांतपणे म्हणाली आणि लॅपटॉप समोर जाऊन बसली. तिने त्या लॅपटॉपमधील सगळे व्हिडिओ ओपन करून बघितले, त्यात तिचेच व्हिडिओ होते.

"तिच्यावर तर मी रागवायला हवे, मला तिचा जीव घ्यायचा होता पण आता मीच तिच्यापुढे नरम पडतोय." त्याला काहीच कळत नव्हते.

"मॅक्स व्हिडिओज आय एम देअर, बट त्याचे अर्थ हे नाई खी मी तुझ्या ब्रदरला मारले आये." ती म्हणाली.

"किरणने त्याच्या फ्रेंडला सांगितले होते की, हे व्हिडिओ कधी बघू नको, ज्युलियाचे व्हिडिओ पाहू नको, ते तुला मारतील, ते खूप डेंजरस आहेत."

"ग्रेट. तू पोलीसकडे जायचे सोडून मला किल करायला आला.. वॉव!"

"या व्हिडिओवरून माझ्या भावाची बदनामी झाली असती, तेवढया लहान वयात तो हे व्हिडिओ बघतो म्हणून सगळीकडे थू थू झाली असती. त्याने स्वतःला हँग केले होते, त्यामुळे सुसाईडच पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये आले होते, त्यामुळे कुठलीही केस केली तरी बदनामी आमचीच होती. पण तो चांगला मुलगा होता, निरागस होता. हे व्हिडिओ कसे काय बघू लागला माहिती नाही. मी इथे तुला मारायला आलो नव्हतो, मी ऑफिस कामाने इथे आलो आहे. माझे आईवडील, पूर्ण परिवार खूप दुःखात आहेत. घरात झालेल्या गोष्टी विसरायला, माहोल चेंज करायला इकडे आलो होतो. पण माझे नशीब जोरदार आहे की, तू माझ्या भावाची किलर, तुच मला इथे भेटली." तो जोरजोराने हसू लागला.

"मी मर्डरर ना…" ती बोलतच होती की तिचे लक्ष त्याच्या डोळ्यांकडे गेले, त्याचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले होते. ते बघून तिच्या सुद्धा काळजात दुखल्यासारखे झाले. आपली लोकं गमावणे काय असते तिला माहिती होते आणि म्हणूनच बोलता बोलता ती चूप झाली.

"आता तुला त्रास देणार नाही आणि भेटणार पण नाही. बट मारणे ऑर मरणे इज नॉट द सोल्यूशन, थिंक अबोव दॅट. टेक केअर." म्हणत ती निघून गेली.

नियती पण किती खास असते, जी लोकं आपल्याला आवडत नाही, नेमकी तीच आपल्या पुढ्यात येऊन उभी ठाकतात.
जगात इतकी लोकं असतात, पण नेमकी तीच कशी भेटली, याचे त्याला आश्चर्य वाटत होते. काही गोष्टींवर आपला कंट्रोल नसतो, हे मात्र नक्की.

त्या दिवसानंतर राघवचे तिथे मन लागत नव्हते. त्याने ऑफिसमध्ये भारतात परत जाण्यासाठी ट्रान्सफर मागितली. ऑफिसवाल्यांनी ते मान्य केले पण अगदी लगेच त्याला जाता येणार नव्हते, कागद पत्र पूर्ण व्हायला काही काळ लागणार होताच.

*******

बर्फाचे दिवस ओसरत आले होते, तरी सुद्धा थंडी तशी खूप होती. काहीच दिवसात राघव भारतात परत जाणार होता. त्या आधी सहज फिरायला म्हणून तो बाहेर पडला. तो बाजूला जवळपास दीडशे किलोमीटर असलेल्या एका दुसऱ्या गावात फिरायला म्हणून आला होता. बाहेर गर्दी तशी फार नव्हती. बरीच दुकानं मिळून एक मोठा शॉपिंग एरिया पसरला होता. तिथेच तो पायीपायी फिरत होता. तो समोर दिसणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरील भाव वाचत, इकडे तिकडे बघत फिरत होता. तेवढयात त्याचे लक्ष पलीकडील लेन कडे गेले, तर ज्युलिया मागे मागे बघत, पुढे पळत होती. कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे, हे त्याच्या लक्षात आले. तिला बघून आधी तर त्याने दुर्लक्ष केले, पण क्षणात त्याची पावले आपोआप तिच्याकडे वळली. तिचा हात पकडत त्याने तिला आपल्याकडे एका कॉर्नरमध्ये ओढले.

"व्हॉट द.." असे ओढल्याने ती एकदम घाबरली होती. ती बोलतच होती की तिला तिच्या पुढ्यात तिला राघव दिसला.

"रिमुव्ह यूअर स्कर्ट." तो आपले जॅकेट काढत म्हणाला.

"व्हॉट? आर यू मॅड?" ती वारंवार मागे बघत बोलत होती. एवढया थंडीतही तिच्या कपाळावर खूप घाम जमा झाला होता.

"काढ पटकन." म्हणत त्याने तिच्या अंगातील जॅकेट, टॉप काढून फेकले. तिने पण स्कर्ट काढला. त्याने त्याच्या अंगातील शर्ट काढत तिच्या कंबरेभोवती बांधला आणि तिच्या कंबरेला पकडत तिला स्वतःकडे ओढले आणि दोघांच्याही डोक्यावरून त्याचे जॅकेट पांघरले. ( आशिकीमध्ये दाखवले आहे तसे..)


"व्हॉट आर यू डुईंग? मी पॉर्न ॲक्टर असली टरी अशे खोनाला पण खीस खरत नाई." ती त्याच्या पकड मधून सुटण्याचा प्रयत्न करत, त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत होती. पण त्याने तिला खूप घट्ट पकडले होते.

"व्हेअर इज शी?" जवळूनच एका पुरुषाचा आवाज येत होता.

ती बडबडच करते आहे बघून राघवने एकदम तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. त्याच्या ओठांच्या स्पर्शाने ती एकदम शांत झाली. उन्हाच्या झळाळीने कोरड पडलेल्या घशाला थंड पाण्याचे दोन घोट मिळून शरीराला तृप्ती मिळावी, तसेच आता या क्षणी त्याच्या ओठांच्या स्पर्शाने तिला जाणवत होते. त्याने त्याचे दोन्ही हात तिच्या भोवती गुंफले होते. तो मागून तिच्या कंबरेवर हात फिरवत होता. बाहेरच्या लोकांना ते रोमान्स करत आहेत, असे जाणवत होते. तिथे सार्वजनिक ठिकाणी या अशा गोष्टी खूप कॉमन होत्या, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या, बघणाऱ्या लोकांना त्याचे काही विशेष वाटत नव्हते. पण दोन तीन पुरुष मात्र तिथेच घुटमळत होते. त्यांच्या बोलण्याचा आवाज येत होता आणि त्यावरून लक्षात येत होते की ते ज्युलियाला शोधत आहेत.

ती त्याच्या खूप जवळ होती. तिला त्याच्या शरीराची उब जाणवत होती. पहिल्यांदा तिला परपुरुषाचा तो स्पर्श हवाहवासा वाटत होता. तिला त्याच्याजवळ खूप सुरक्षित जाणवत होते.

अजूनही ती लोकं तिथेच होती. त्यांचा आवाज ऐकून त्याने कीस करण्यासारखे थोडे रोमँटिक आवाज काढणे सुरू केले. तेवढयात तिला शोधणाऱ्या पुरुषांपैकी एकाने त्यांच्या डोक्यावरील जॅकेट ओढले. एक क्षणाचाही वेळ न घालवता त्याने ज्युलियाच्या मानेभोवती हात टाकत तिचा चेहरा झाकत आपल्या छातीजवळ घेत, तिला लपवले आणि त्या माणसावर ओरडला, " व्हॉट्स धिस बिहेविअर?"

"शी इज नॉट दॅट गर्ल.. शी वॉज विअरिंग समथिंग एल्स." दुसरा हळूच पहिल्याच्या कानात म्हणाला.

"दे आर लूकिंग लाईक इंडियन्स." तिसरा म्हणाला.

" सॉरी ब्रदर." पहिला राघवला म्हणाला. तसे राघवने उगाच स्माईल केले.

"हे एटलिस्ट गो इन द कार अँड हॅव फन." बोलत ते हसत ज्युलियाला दुसरीकडे शोधायला निघून गेले. ते पूर्णपणे दिसेनासे होईपर्यंत त्याने ज्युलियाला आपल्या छातीशीच धरून ठेवले होते. जसे ते दिसेनासे झाले, त्याने तिच्या हाताला पकडले आणि आपल्या सोबत नेत तिला आपल्या कारमध्ये बसवले.

"ते खूप डेंजर दिसत होते. कोण होते ते? तू कोणाला त्रास देत नाहीस असेच तू म्हणाली होती, मग ते लोकं तुझा पाठलाग का करत होते?" त्याचे प्रश्नांवर प्रश्न सुरू झाले.

"त्यांना मला खील खरायचे." ती कशीबशी म्हणाली.

"व्हॉट?" म्हणत त्याने आपली गाडी सुरू केली आणि सरळ तो आपल्या घराकडे निघाला. अचानक वातावरण बिघडू लागले होते. स्टॉर्म येण्याची वार्निंग मिळाली होती. त्याने गाडी फास्ट केली.

"मी व्हिडिओ शूट खरते, तिकडले लोकं होते. त्यांच्या थिथे पोलीस रेड झाली." ज्युलिया सांगत होती.

"पण इकडे तर हे काम लीगल आहे."

"यस, बट काही आहे जे इलगल आहे. मीच पोलिसांना टेंच्या कॉम्प्युटर सिस्टीम मधून मॅसेज पाठवले होते. पोलिसांनी थ्यांना पकडले, थ्यांना हे खाम मी खेले आहे खळले, म्हणून तेंना मला पखडून मारायचे आये." ज्युलिया माहिती पुरवत होती. राघव गाडी चालवत होता.

"लिव्ह मी हीअर, आय विल गो." थोड्या दूर अंतरावर आल्यावर ज्युलिया म्हणाली.

"दॅट्स ओके, यू आर कमिंग विथ मी.. इथे ते तुला पकडतील."

"नाई, तू यात पडू नखो. दे आर वेरी डेंजरस."

"मिस्टर राघव शास्त्री, जर मी तूजी पूर्ण इन्फॉर्मेशन काढू शकते, तर ते मला शोधून काढू शकतात."

"वील सी.. फॉर नाऊ वी आर गोईंग टू माय होम."
बाहेर बर्फाची सुरुवात झाली होती.

दोघेही राघवच्या घरी पोहचले. तिचे तर कपडे त्याने तिथेच फेकले होते. त्याने त्याचा एक शर्ट काढून तिला घालायला दिला आणि कपाटातून गोमुत्रची बाटली काढत आपल्या अंगावर शिंपडले. त्या दिवशी तिला त्याला तसे करतांना बघून राग आला होता पण आज ते बघून हसू येत होते.

"पण तुजा शर्ट अपविथरा होईल."

"मी त्याला गोमूत्रमधे धुवेल ऑर फेकून देईल, इट्स नन ऑफ युअर बिझनेस. ते घाल आधी, मी तुला इथे असे नंगेपुंगे बसलेले बघू शकत नाही." म्हणत तो किचनमध्ये गेला आणि त्याने गरम गरम कॉफी बनवून आणली. तिच्या हातात एक मग दिला आणि तो तिच्यापासून दूर सोफ्यावर जाऊन बसला. दोघांमध्ये खूप शांतता होती. तो बाहेर बघत होता तर ती त्यालाच बघत होती. आज तो तिला वेगळाच भासत होता, चांगला मुलगा वाटत होता.

"व्हाय यू सेव्हड मी?" तिने शांतता भंग केली.

"माणुसकी म्हणून." त्याने उत्तर दिले.

"व्हॉट?"

"त्या दिवशी माझा ॲक्सिडेंट होण्यापासून तू मला वाचवले. तुझे उपकार खूप जड होत होते, ते आज फेडले."

"मनजे?"

"नथिंग."

ती गालातच हसली.

दोघेही कॉफी पित होते.

"तुजा ब्रदर."

"प्लीज, तो विषय बोलू नको, इट हर्टस् मी. मग माझ्यातला हैवान जागा होतो, जो मी बिलकुल नाहीये."

"मला एक रिजन भेटले तेच्या सुसाईडचे, आय गेस इट वॉज दॅट. जर थेच असेल तर पॉर्न व्हिडिओज आर रिस्पॉन्सिबल फॉर हिज सुसाईड." ती परत पुढे म्हणाली.

"व्हॉट?" तो चक्रावून तिच्याकडे बघत होता.

"दॅट डे, थ्या लॅपटॉपमधे मी सगळे व्हिडिओ जिथून डाऊनलोड खेले होते थी सोअर्स लिंक सर्च खेले. ऑल व्हिडिओचे नाही भेटले बरोबर पण एक व्हिडिओची भेटले. थे मी माझ्या मेल ला सेंड खेले होते. सॉरी आय डीड इट विदाउट युअर परमिशन.."

"हाऊ डेअर यू?"

"सॉरी, बट तुला खाय आहे थे लिसन खरायचे का?"