ज्युलिया राघव शास्त्री ३

प्रवास तिचा.. अपवित्रतेकडून पवित्रतेकडे..
ज्युलिया राघव शास्त्री

भाग ३

ज्युलियाने पेपर्स साइन करून त्या मुलाकडे दिले.

"थँक्यू मॅडम." म्हणत तो तिथून निघून गेला.

"ज्युलिया मॅडम, कोणतेही पेपर्स असे साइन करायचे नसतात." पुजा.

"आय हॅव ब्लाइंड फेथ ऑन हिम. यू डोन्ट वरी." ज्युलिया हसत म्हणाली.

"प्रेमात माणूस आंधळं होतं म्हणतात, ते अगदी अगदी पुढे दिसत आहे." पुजा हसली.

"हि इज लाईफ डियर. तो आणि तू मला कधीच जज करत नाहीत, माझे कॅरेक्टर क्लासिफाईड करत नाहीत आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्ही मला मी जसे आहे तसे स्वीकारले आहे. तर इतका विश्वास तर मी तुमच्यावर ठेऊच शकते." ज्युलिया.

त्यावर पुजा हसली. "कारण तुम्ही प्युअर आहात."

"हम्म.. माहिती नाही." ती परत आळसावत बेडवर बसली.

"नो नो मॅडम, आता आराम करायला एवढा वेळ नाही. बऱ्याच काही पूजा पण आहेत म्हणे. तुम्हाला लवकर रेडी व्हायचं आहे." पुजा.

"ओह गॉड!" ती जांभया देत होती.

"तुमची झोप नीट झालेली दिसत नाही. तुम्ही लग्नाचे टेन्शन घेतले काय?" पुजा.

"नो, नॉट एट ऑल. तयारी करूयात. हा पण साडी ड्रेपर चेंज कर."

"का? तो त्याच्या कामात खूप परफेक्ट आहे."

"हो माहिती आहे. पण कुणीतरी लेडी बोलव, नाहीतर माझी मी घालेल."

"काय फरक पडतो? आणि तो प्रोफेशनल आहे."

"या बेब्स, आय नो. पण माझ्या अंगाला दुसऱ्या कुठल्याच पुरुषाचा स्पर्श झालेला मला नको आहे."

"पण आधी तर काही प्रोब्लेम नव्हता. इनफॅक्ट तुम्ही याला निवडले होते. मग आज अचानक काय इश्यू झाला?"

"ही टच्ड मी.. ही टच्ड माय सोल.. आता कुणी दुसरा नाही.." ज्युलिया.

"ओह, सो सर फायनली किस्ड यू.."

ज्युलियाने आनंदाने हसत मान हलवली.

"ओके मॅडम, त्याची फिज देऊन त्याला पाठवून देते. पण आता वेळेवर आवडीची कोणी भेटणार नाही. पण तरी चेक करते. जे अव्हेलेबल असेल त्यांना बुक करते."

"ओके. तोपर्यंत एक झोप घेते." ज्युलिया.

"मॅडम, नो. आता परत झोपायचे नाही. तुम्ही आता झोपलात तर मी सरांना कॉल करेल. तुम्हाला लवकर तयार करायचे हे त्यांनी स्ट्रिक्टली सांगितले आहे. व्होल टीम इज वेटींग आऊटसाईड. गेट अप मॅडम."

ज्युलिया चुपचाप उठली आणि फ्रेश व्हायला गेली.

पुजाने ज्युलियाची तयारी करून देणाऱ्या पूर्ण टीमला आतमध्ये बोलावले.

इकडे लग्नासाठी ज्युलियाची तयारी सुरू झाली आणि तिकडे बाहेर सनई, चौघडा, बँडचे ताल सुर वातावरणात गुंजू लागले. जिथे या सनईच्या आवाजाने नवरदेवाच्या आनंदाला उधाण आले तर ते ऐकून नवरीबाईच्या हृदयाची धडधड वाढली. ज्युलिया जरी एक सेलिब्रिटी असली तरी शेवटी ती एक मुलगीच होती आणि इतर मुलींप्रमाणे लग्न हे खूप मोठे स्वप्न होते. जवळजवळ ते तिला अशक्यच वाटत होते आणि आज तिचे तिने बघितलेले सर्वात सुंदर स्वप्न पूर्ण होणार होते. अगदी परिकथेसारखी तिची कथा सुरू होती. तिचा राजकुमार तिला घ्यायला येणार होता. पुर्ण जगासमोर तो तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून तिचा स्वीकार करणार होता. तिचा मानसन्मान आणखी वाढणार होता.

"ओह माय माय.." पुजा ज्युलियाच्या खोलीत आली. ज्युलियाला बघून तिचे डोळे मोठेच्या मोठेच राहिलेत.

"द प्रिटीएस्ट ब्राईड इन द वर्ल्ड!" पुजा ज्युलियाच्या भोवती गोलगोल फिरत, तिला बघत म्हणाली.

ते ऐकून ज्युलियाच्या ओठांवर छान गोड हसू उमलले.

"आणि या सौंदर्यावर कालचा सरांच्या प्रेमाचा रंग भारी पडला, बरं का मॅडम.. चेहरा जो तेजाळला आहे ना.. हे तेज फक्त प्रेमानेच येते." पुजा.

"ओह गॉड!" ज्युलियाने आपल्या हातात आपला चेहरा झाकून घेतला.

"आई ग, मॅडम लाजल्या म्हणायच्या की काय? पण खरंच सांगतेय, रोज तुम्हाला बघते पण आजचे तेज कुछ और ही है.." पुजा तिच्या सौंदर्याचे कौतुक करत होती.

"बस झालं बाबा, आता आणखी नको.. कुठे लपू कुठे नाही, असे व्हायला झाले." ज्युलिया.

"तुमच्यासाठी एक सरप्राइज आहे." म्हणत पुजाने एक बॉक्स उघडला. त्यातून एक लाल जाळीदार, त्यावर खूप सुंदर नाजूक नक्षीकाम केलेली ओढणी बाहेर काढली.

ज्युलिया ते आश्चर्याने बघतच होती.

"सरांनी स्पेशली डिझाईन करून घेतली आहे. प्युअर गोल्डचे काम केले आहे." पुजा माहिती पुरवत होती.

"हुशार झाले म्हणावेssssss तुमचे सर." ज्युलियाने मस्करी केली.

"यातील स्पेशल गोष्ट दाखवते. थांबा." म्हणत पुजाने ती ओढणी उकलली आणि ज्युलियाच्या डोक्यावरून घेतली.

"आता तुमचे लूक परफेक्ट झाले. गॉर्जीअस!"

ते बघून आता ज्युलियाच्या डोळ्यात आसवे जमू लागली.

"यावर तुमच्या आणि सरांच्या नावाने पूर्ण बॉर्डर कोरली आहे. जन्मोजन्मी असेच एक रहा.. आय एम वेरी हॅपी फॉर यू मॅडम.. यू डीजर्व बेस्ट, यू डीजर्व सर. " पुजाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

"ओह माय बेबी.." म्हणत ज्युलियाने तिला मिठी मारली.

"एक मिनिट.." म्हणत पुजाने काजळाचे एक बोट जुलियाच्या कानामागे लावले.

"हे काय?" ज्युलिया.

"कुणाची म्हणजे कुणाचीच दृष्ट लागायला नको, म्हणून असे काजळ लावतात." पुजाने हसत उत्तर दिले.

"नजर कशी लागणार? माझ्यासारखी लाईफ कोणाला हवी असणार?" ज्युलिया हसत म्हणाली.

"सर्वांना.."

"कुछ भी.." परत ज्युलिया हसली.

"ते बघा तिकडे, त्या मुली आणि त्यांच्या आया सरांच्या मागे लागल्या होत्या बरं.." पुजा तिची मस्करी करू लागली.

"हा हा हा.." ज्युलिया हसू लागली.

"वेट हा.." म्हणत पुजाने तिचा मोबाईल बाहेर काढला आणि ज्युलियाचे फोटो काढू लागली.

"काय करते?"

"सरांना फोटो पाठवायचा आहे." पुजा.

"नो. डोन्ट सेंड फोटो." ज्युलियाने तिच्या हातून फोन काढून घेतला.

"अरे पण तुम्हाला बघण्याचा त्यांचा हक्क आहे."

"त्याला रिअलमधे बघू दे..इथे घ्यायला येईल तेव्हा तसेही तोच पहिले बघणार आहे."

"मॅडम पण.."

"मला त्याचे एक्स्प्रेशन बघायचे आहे. माझा पण हक्क आहे ना त्यावर. लाईफटाइम मेमरीज असतील, ते असे फोटोमध्ये लॉक करता येणार नाही." ज्युलिया.

"यस मॅडम, यू आर राईट. तुमचे हे अनमोल क्षण आम्ही कोणीच तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. फोटो पाठवणार नाही."

ज्युलियाने तिला फ्लायिंग किस दिले.

बाहेर बँडचा आवाज आता जास्तच जोर धरू लागला होता.

"मॅडम, युअर प्रिन्स चार्मिंग इज हिअर.." खिडकी जवळ पळत जात पुजाने सांगितले. ज्युलिया सुद्धा लगबगीने तिथे खिडकीजवळ गेली.

"वाव!" घोडीवर बसलेल्या त्याला बघून ज्युलिया आवासून त्याला बघत उभी होती. पांढऱ्या घोड्यावर बसून येणाऱ्या राजपुत्राच्या कथा पूर्ण होतात, त्याला बघून यावर तिचा विश्वास बसला. त्याला बघून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले.

"नो नो नो.. सेलिब्रेट करण्याचा टाईम आहे. आता फक्त स्माईल अँड स्माईल हा." पुजाला तिच्या भावना समजत होत्या. टिश्यू पेपरने ज्युलियाचे डोळे टिपत ती म्हणाली.

"हम्म.. "

"वरात जाम भारी दिसतेय. तुम्हाला तिकडे सगळ्यांसोबत नाचता येणार नाही. तुम्ही सरांसोबत माझ्या लग्नात नाचून घ्याल हा. पण मी जाते. तुम्ही इथेच रहा आणि दूर दर्शन घ्या." पुजा.

त्यावर ज्युलिया हसली.

"आणि हो बाहेर कुठे जाऊ नका. इथेच रहा." पुजा इन्स्ट्रक्शन्स देत बाहेर जायला निघाली.

"पुजाss.." ज्युलियाला काही आठवले आणि तिने आवाज दिला.

"यस मॅडम.."

"ते.. ते.. तू मला इथे कानामागे ते लावले ना.."

"काजळ?"

"हो तेच.. त्याला पण लाव.."

ज्युलियाच्या त्या निरागस बोलण्यावर पुजा गालात हसली.

"यस मॅडम.. आमच्या सरांना कुणाची दृष्ट लागणार नाही.. तुम्ही इथूनच वरात एन्जॉय करा." म्हणत पुजा बाहेर पळाली सुद्धा.

ज्युलिया खिडकीत उभी राहून समोरील सुंदर दृश्य बघत होती. तिने स्वप्नात बघितले होते त्यापेक्षाही खूप सुंदर ते दृश्य होते. ते बघतांना तिच्या ओठांच्या कोना आणखी आणखी रुंदावल्या होत्या. तिचा आनंद गगनात मावेना झाला होता. तिच्या डोक्यावरील त्या दोघांच्या नावाची ती ओढणी तिने घट्ट पकडून घेत समोरील सोहळा बघत उभी होती. हो तिच्या आनंदाचा, तिच्या आयुष्यातील सर्वात जास्त सुखाचा तो सोहळा होता.

तेवढयात कोणीतरी तिच्या खोलीचे दार ठोठावले.

तिने हसत हसत दार उघडले..

"या.. प्लीज कम." म्हणत तिने दारावर उभ्या असलेल्या व्यक्तीचे स्वागत केले.

"मला थोडे महत्वाचे बोलायचे आहे."

"हो बोलाना.."

"इथे नाही, थोडे इकडे बाहेर.." तिथे लागलेले सीसीटीव्ही कॅमेरा बघून ती व्यक्ती म्हणाली.

ज्युलिया हसत त्या व्यक्तीच्या मागे बाहेर गेली.


*****
क्रमशः


नमस्कार फ्रेंड्स..
मागच्या भागात… खुडा, पिवडा, नीडा हे ज्युलियाचे शब्द विचित्र वाटले काय? ते खुळा, निळा, पिवळा असे होते…
जसे ते लाडाने.. मेरे लाल, हरे , नीले पिले असे म्हणतात.. तसेच…