ज्युलिया राघव शास्त्री ९

भारताची पवित्र भूमी
ज्युलिया राघव शास्त्री

भाग ९


राघवला रात्र रात्र तसे अश्लील व्हिडिओ डिलीट करताना, रिपोर्ट करतांना बघून ज्युलियाला खूप वाईट वाटत होते. त्याला त्याचा भाऊ गमावण्याचे किती दुःख झाले आहे, हे दिसत होते.

"राघव, धिस इज नॉट सोल्युशन." ती त्याला म्हणाली.

"मग काय आहे, सांग. माझ्या भावासारखी दुर्गती अजून दुसऱ्याची होऊ नये." त्याचा आवाजात ओलावा जाणवत होता. त्याच्या आवाजातून टीनएजर मुलांप्रतीचे दुःख जाणवत होते.

"राघव, तुच तर जास्ट व्रोंग खेले. किरणचे फ्रेंडने तुला हे पॉर्न व्हिडिओ बद्दल सांगितले, तू पण तेच्या लॅपटॉप मधे हे व्हिडिओ बघितले, तुला डाऊट होता किरणचा डेथ अँड हे व्हिडिओज रीलेटेड आये, तेव्हाच तू पोलीसकडे कंप्लेंट करायचा होता. धिस इज कम अंडर सायबर क्राईम अँड हे जे ट्रॅपींग आये त्याला सायबर पॉर्न ट्रॅपींग म्हणतात. इफ रिअली केअर फॉर अदर्स, तू हे सर्व पोलिसांना दिले असते. किरण नाय वाचला बट पोलिसांना ते लोकांपर्यंत पोचायला रोड भेटला असथा." ती म्हणाली.

"माझ्या घरचे वातावरण खूप स्ट्रिक्ट आहे."

"हो ते समझले, तुला बगून, रूटीन बगून."

"माझी आई पण जॉब करत होती, आता किरण गेला तेव्हापासून तिने सोडला जॉब. मी हुशार होतो, पण फी अभावी मला पाहिजे ते करता नाही आले, माझे कॅम्पस सिलेक्शन झाले आणि चांगला जॉब मिळाला. सो मी माझ्या लहान बहीणभावांच्या शिक्षणासाठी पैसे जमवू लागलो. सगळं त्याच्यासाठीच करत होतो, पण तो.." बोलता बोलता तो थांबला.

"पैशेला इंपॉर्टन्स जास्त दिले, किरण निग्लेक्ट झाले."

"मी पण सेम वातावरणात वाढलो आहे. जे जे संस्कार माझ्यावर झाले तेच त्याच्यावर पण झाले आहेत. मी कधीच या वाटेला गेलो नाही."

"किरण तुज्यापेक्षा किती स्मॉल होटा. नाऊ अ डेज टू ईअर मध्ये जनरेशन गॅप येते, थॉटस चेंज होतात. तुजा फोकस क्लिअर होता, तुला मनी इंपोरटन्स समजत होता. तेला सगलं अव्हेलेबल करून दिले, तेला टाईम देयचा सोडून लॅपटॉप तेला दिला, ते लॅपटॉप मधे काय करताय कोणालाच माहित नाई, हे राँग आये के नाई? फ्रेंड्स , सरौंडिंग मॅटर एज वेल… तुजा चुकला, तू तो मोठा होत होता तर सगले सांगायला पायजे होते. तुजे मॉम डैड डिफरेंट कल्चर असेल, इंडिया मधे हेच प्रोब्लेम आये, सेक्स, बॉडी चेंजेस सब्जेक्टवर किड्सला प्रॉपर सांगत नाई, ओन्ली गूड अँड बॅड थिंग्जचे लिस्ट देऊन देतात, अँड फॉलो करायला सांगतात, बट व्हाय फॉलो करायचे तेचे कारण सांगत नाई.. नाऊ अ डेज धिस जनरेशन इज सो स्मार्ट, ते असे आइज बंद करून ट्रस्ट करत नाई, दे नीड प्रॉपर रिजन्स फॉर दॅट. मी जेव्हा मोटे झाले, माझ्यात चेंजेस माज्या मॉमला दिसत होते, तिने मला खूप गोष्टी समजावून सांगितले. माजे बॉडी चेन्जेस सांगितले. अपोजिट जेंडर अट्रॅक्शन होईल सांगितले. लव्ह अँड सेक्सचे डिफ्रेंस सांगितले. सेक्स अब्युज कसे होते, ते सांगितले. फ्रेंडली डिस्कस केले तिने. तू किरणला सांगायला पाईजे होते, फॅमिली शुड टेक इनीशिएटीव फॉर धिस, जर तुम्हाला किड्स, तेंचे फ्युचर सेव्ह करायचे असेल तर.."

"सी व्हु इज टेलिंग धिज ऑल, अ पॉर्न स्टार गिविंग मी लेसन्स ऑन वेळ बिइंग्ज. घरात काय शिकवायला हवे अँड काय नाही." तो हसत होता.

"सॉरी.. जे मी स्टडी केले ते सांगितले. मी ते काम सोडले. मी फक्त माज्या मॉमला सेव्ह करायला केले ते.." ती मान खाली घालत म्हणाली.

"व्हेअर इज युअर मॉम?"

"शी डाईड. तू मला किल नाई केले, मला सोडले, तेच्या नंतर तिचे सर्जरी होते, बट शी डीडन्ट रिस्पॉन्डेड आफ्टर दॅट." तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले, ते तिने अलगद पुसून घेतले.

"रात्र खूप झाली, झोप आता." एवढे बोलून त्याने लॅपटॉप बंद केला आणि आपल्या खोलीत जाऊन झोपला. पण त्याचा कानात सतत जुलियाचे बोलणे ऐकू येत होते आणि विचार करतांना त्याला तिचे बोलणे पटू लागले होते. किरणसाठी ज्युलियाला दोष देणे, हे फार एकतर्फी आहे; कुठेतरी तो पण जबाबदार आहे, असेच त्याला वाटू लागले होते. इकडे ज्युलियाला तिच्या आईच्या आठवणीने झोप येत नव्हती. खूप वेळ ती एकटीच रडत बसली होती. रडता रडता कधीतरी तिचा डोळा लागला.

सकाळ झाली तसे राघवने परत गोमूत्रची बाटली उघडली आणि घरभर ते शिंपडले.

"मी तेने बाथ करेल तर पवित्र होईल का? मला असे अछूत सारखे नाई राहायचे, मला पवित्र व्हायचे." ती खूप केविलवाणी दिसत होती. त्याने एकदा तिच्याकडे बघितले आणि परत तो आपल्या कामाला लागला.

"तू तर खूप बुक्स रिड केले, सांग मला मी पवित्र कसे होऊ? इंडियाच्या धरतीवर पाय ठेवले की सगले पवित्र होतात, माय मॉम म्हटली."

त्यावर तो काहीच बोलला नाही.

थोडा वेळ असेच नाश्ता वगैरे करण्यात गेला.

"ओके, आता वेदर बेटर आये, मी जाते." ती म्हणाली.

"पण ती लोकं अजूनही तुला शोधत असतील."

"हो, पण घाबरून किती डेज बसणार? लाईफ जगावी लागेल."

"मी भारतात वापस चाललो."

"मला घेऊन चालतो सोबत? आय हॅव इंडियन व्हिसा एज वेल." ती एकदम बोलून गेली.

तो काहीच बोलला नाही.

"सॉरी बाय मिस्टेक, मी जाते." म्हणत ती जाण्यासाठी उठली.

तो खूप वेळ काहीतरी विचार करत होता. इथे तिचे राहणे तिच्यासाठी घातक आहे, हे त्याला चांगलेच माहिती होते. काहीच नाते नसतांना सुद्धा त्याला उगाच काहीतरी कनेक्शन वाटत होते. वारंवार ती भेटते आहे, म्हणजे देवाची काहीतरी त्यात मर्जी दिसतेय, देव काहीतरी इशारा करतोय, असे त्याला वाटून गेले. प्रत्येकाला एक संधी मिळायला हवी, असे त्याला वाटले.

"बट तुझे पासपोर्ट, अदर स्टफ्स्, तुझे घर? तुझ्या घराभोवती तर ते लोकं फिरत असतील."

"व्हॉट?" ती आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती.

"भारतात जायचं म्हणते ना?"

"तू सोबत नेशील?"

"आय विल ट्राय ऑर आय विल गाईड यू.."

"रिअली?" ती एकदम आनंदाने उड्या मारत त्याला हग करायला गेली. ती जसे त्याला हग करणार तसे तो मागे सरकला.

ती ते बघून आपलीच हसली.

"माजा काम असा होता की ते लोकं खतरनाक आये मला माहिती होते, मनजे ते कामच तसे असते, तेथून बाहेर पडणे नॉट इझी. सो मी माजे ऑल इंपॉर्टन्ट डॉक्युमेंट्स बँकमधे ठेवते. घरचा काय प्रोब्लेम नाई, मी होस्टेल मधे राहते."

"ओह.."

"मी खरंच इंडियाला येऊ शकते?"

"तुझे डॉक्युमेंट्स रेडी असेल तर.."

तिने आनंदाने मान डोलावली.

****

राघव ज्युलियासाठी काही कपडे घेऊन आला होता. नंतर तिच्या बँकेत जाऊन त्यांनी तिचे सगळे महत्वाचे कागदपत्र घेऊन आले. राघवने तिकीट बुक केली. आईला बरे झाले की भारतात जाऊ म्हणून ज्युलियाने आधीच व्हिसा काढून ठेवला होता, त्यामुळे तिकीट बुक करतांना तसे फार प्रोब्लेम आले नाही.

"तू 19 ईअर्सची आहे?" तिकीट बुक करतांना तिच्या पासपोर्टवर तिची जन्म तारीख बघून तो चक्रावलाच.

"यस." तिने होकारार्थी मान हलवली.

"तू ऑल्मोस्ट ३-४ वर्षापासून पॉर्न ॲक्टर म्हणून काम करत आहेस? 18 ईअर्स पाहिजे एज."

"गरज इतकी होती की फेक डॉक्युमेंट्स रेडी केले."

ते ऐकून तिला समजदार म्हणावं की मूर्ख, हेच त्याला कळत नव्हते, पण त्याला थोडे वाईट सुद्धा वाटले; का वाईट वाटले हे मात्र त्याला कळत नव्हते, कदाचित या एवढया मोठ्या जगात ती आता एकटीच उरली होती, तिचे कोणीही नव्हते, म्हणून पण वाईट वाटत असावे असा त्याने तर्क बांधला.

काही दिवसांनी ज्युलिया मागे लागलेली लोकं सुद्धा पकडल्या गेली होती, त्यामुळे मग तिने आपले होस्टेलला जाऊन सगळ्या फॉर्मालिटिज पूर्ण करून घेतल्या आणि शेवटी तो दिवस उगवलाच, ज्या दिवसापासून तिचे आयुष्य बदलणार होते, ज्युलिया राघवसोबत भारतात आली.

भारताच्या जमिनीवर पाय ठेवला तसे तिला ती सर्व गोष्टीतून मुक्त झाल्यासारखे तिला वाटू लागले. पहाटेच्या हवेत आपले दोन्ही हात पसरून तिने स्वतःभोवती गोल फिरून घेतले. दोन्ही हात स्वतःभोवती गुंडाळत तिने स्वतःलाच स्वतःच्या कवेत घेत एक मोठा मोकळा श्वास घेतला.

"आय एम सो हॅपी.." तिने आनंदाने राघवला सांगितले.

"हम्म." तो एवढेच बोलला.

ज्युलिया परदेशातून आली होती म्हणून एअरपोर्टवर तिला थोड्या जास्त फॉर्मालिटिज पूर्ण कराव्या लागल्या. राघव तिची वाट बघत बसला होता. जवळपास एक तासाने ती आपले सामान घेऊन आली. त्याने टॅक्सी आधीच बुक केली होती. दोघेही टॅक्सीमध्ये बसले. कुठे जातोय, वगैरे असे एकही प्रश्न तिने त्याला विचारला नाही, तो जे करेल ते चांगलेच करेल, असा एक विश्वास तिला त्याच्यावर बसला होता. म्हणून ती चुपचाप खिडकीतून बाहेर बघत बसली होती. थोड्या वेळात एका ठिकाणी टॅक्सी थांबली.

"ज्युलिया बाहेर ये." राघव म्हणाला. तसे ती बाहेर आली. त्याने तिचे सगळे सामान काढून दिले.

"ते बघ, ते हॉटेल, चांगले आहे. तिथे जा आणि तुला राहण्यासाठी बुक कर. फार कॉस्टली नाही, पण छान आहे. पंधरा दिवसात स्वतःसाठी घर शोध. ते हॉटेलवाले मदत करतील, त्यांना ब्रोकरचा नंबर माग.. सेटल झाले सगळे की स्वतःसाठी काम शोध." तो आपल्या पाकिटातून काही पैसे काढत, तिला देत म्हणाला.

"व्हाय?"

"एक महिना पुरेल तुला पैसे..घे."

"नाई नको. आय हॅव इंडियन करन्सी. मी ऑलरेडी एक्सचेंज करून आणले. माझे बँक बॅलन्स आये, मोअर दॅन अ ईअर, आय कॅन मॅनेज." ती त्याचे पैसे परत करत म्हणाली.

"ग्रेट."

ती हसली.

"इथे पवित्र व्हायला काय काम करावे लागेल?"

तिच्या त्या निरागस प्रश्नावर त्याला हसू आले.

"देव व्हावे लागेल." तो हसत म्हणाला.

"ओह, ओके.." तिने मान डोलावली.

"बरं, आपला प्रवास इथपर्यंतच होता; आता परत आपण कधी भेटणार नाही. आता तुझा मार्ग वेगळा, माझा मार्ग वेगळा." तो

तिने होकारार्थी मान डोलावली.

"टेक केअर." म्हणत तिने त्याला हॅण्डशेकसाठी आपला हात पुढे केला, पण त्याने मात्र काही आपला हात पुढे केला नाही.

"ते वॉटर टाकून देशील हातावर. लास्ट टाईम आये तर एकदा करून घे हॅण्डशेक." ती म्हणाली.

"ते गोमूत्र आहे. चुकून झालेले पाप त्याने धुवून निघतात, मुद्दाम केलेले पाप नाही." त्याने उत्तर दिले.

"कडुस."

"व्हॉट?"

"नथिंग. तू कदी नाई चेंज होणार, ओके बाय.." म्हणत ती जायला वळली.

तो तिला जातांना बघत उभा होता. त्याला त्याचे हृदय जड जाणवू लागले होते. तिने वळून बघावे, उगाच त्याला वाटत होते, पण तिने मात्र वळून बघितले नाही. ते बघून तो स्वतःशीच हसला.

त्याला सोडून जातांना तिच्या डोळ्यात आपोआपच, तिच्या नकळत आसवे जमा झाली होती, गळा दाटून येत होता. पुढे जातांना तिची पावले जड झाली होती. एक एक पाऊल टाकत ती रस्ता ओलांडत होती. त्याने एकदा तरी आवाज द्यावा, असे तिला वारंवार वाटत होते.

"ज्युलिया, बी स्ट्रॉंग.. नाऊ यू आर अलोन, तुजा रस्ता तुच शोधायचा आणि चालायचा." विचारत करत तिने रस्ता पार केला. पण तिला राहवल्या गेले नाही आणि ती वळून बघणार तोच कोणीतरी तिच्या जवळून धावत जात तिची पर्स ओढून, जोऱ्याने पळाला. तिला काय झाले, थोड्यावेळसाठी काहीच कळले नाही, नंतर लक्षात आले की तिची पर्स चोराने पळवली आहे.

"हेल्प हेल्प…" म्हणत ती ओरडू लागली पण तोपर्यंत तो चोर दिसेनासा सुद्धा झाला होता. काही लोकं त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे पळाली होती, पण तो निसटून फरार झाला होता.
एवढयात राघव सुद्धा तिच्याजवळ पोहचला होता.

"माय मॉम वॉज टेलींग, इंडियामधे सगले लोकं चांगले असतात.. इट वॉज राँग. ही स्टोल माय पर्स.." तिचा चेहरा रडका झाला होता.

राघव तिच्याकडे कशातरी नजरेने बघत होता.

"माजा पासपोर्ट, बँक कार्ड्स, पैशे सगले तेच्यात आहे.."

ते ऐकून राघवने डोक्यावर हात मारला.

"चल." तो म्हणाला.

"कुठे?"

"पोलिस कंप्लेंट करायला." तिने मान हलवली.

दोघेही तिथे जवळच असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये गेले. ज्युलियाने तिची पर्स हरवल्याची रीतसर कंप्लेंट केली.

"आता मी काय करू? पैशे नाई." ती विचार करत म्हणाली.

तो पण तिच्या बाजूला उभा, आता काय करायचे, विचार करत होता.

"माझ्या घरी चल. तुझे पैसे ॲक्केस होईपर्यंत रहा तिथे. बघू काय तरी होईलच. पोलिस पण काहीतरी करतीलच." परत दोघेही टॅक्सीमध्ये जाऊन बसले. टॅक्सी घराजवळ येऊन थांबली. दोघेही गाडीतून उतरले.

"तुजे मॉम डॅड काय म्हणेल?"

"ते इथे राहत नाहीत. माझा जॉब इथे आहे म्हणून मी इथे राहतो." त्याने माहिती पुरवली.

"ओके.."

"तुजे फ्रेंड्स काई म्हणेल.." तिने तिची दुसरी शंका विचारली.

"मी इथे एकटा राहतो. पार्टनर असते, मग त्यांचे फ्रेंड्स, गर्लफ्रेंड आल्या असत्या."

"यस, तुला आवडत नाई." ती पटकन म्हणाली. त्याने एकदा तिरप्या डोळ्यांनी तिच्याकडे बघितले आणि पुढे जाऊ लागला.

"इथे कदी गर्ल आली नाई तर तुजा हाऊस ओनर काय म्हणेल?"

"माझा स्वतःचा फ्लॅट आहे. मला कोणी काही विचारू शकत नाही." तो घराचे दार उघडत म्हणाला आणि आतमध्ये गेला. ती मात्र तिथेच दाराबाहेर उभी होती.

"ये." त्याने आवाज दिला.

"माज्यामुळे तुजे रुल्स तुटत आये, पाप लागेल तुला."

"सांगितलेना मुद्दाम केले तर ते पाप असते, आता आपल्यावर तशी वेळ आली आहे. ये आता आतमध्ये."

ती आपले सामान घेऊन आतमध्ये गेली. ती फ्रेश झाली. त्याने बाहेरून जेवण ऑर्डर केले. तो आल्याचे त्याने त्याच्या घरी फोन करून कळवले. दोघांनी जेवण केले. राघव आपल्या खोलीत आराम करायला निघून गेला, ती तिथेच सोफ्यावर पडली.

" वेरी पीसफुल!" सोफ्यावर पडल्या पडल्या ती घराचे निरीक्षण करत होती.

रस्त्याने तसे तिला फार कोणी ओळखले नव्हते, फक्त परदेशातील ती म्हणून काही लोकं तिच्याकडे बघत होती, एवढेच. दोन दिवसांनी पोलिसांनी तिची पर्स आणून दिली. पण पैशे मात्र सापडले नाही, सांगितले. तिने पर्स तपासली तर तिचे पासपोर्ट, बँक कार्ड्स मात्र तिला मिळाले होते. पण तरीही तिने आधीच मेल करून सगळे कार्ड्स ब्लॉक करून घेतले होते.

राघवने तिला मोबाईल दुकानात नेले. तिथे तिने आधी स्वतःसाठी फोन घेतला. नंतर त्याने ब्रोकर शोधून दिला. त्याच्या थ्रू काही दिवसातच ज्युलियाला राहण्यासाठी एक छोटा फ्लॅट मिळाला. ती तिकडे राहायला शिफ्ट झाली. आता दोघेही आपापल्या आयुष्यात बिझी झाले. राघवने तिच्यासोबत कोणताच संपर्क ठेवला नव्हता त्यामुळे त्याच्या इच्छेचा मान ठेवत, ती पण त्याच्यासोबत बोलत नव्हती.

राघवचे आपले रूटीन सुरू होते. त्याने पोलिसात जाऊन त्याच्या भावाची सुसाईड केस परत ओपन केली. यावेळी त्याने त्यांना सगळी माहिती पुरवली. त्याचा लॅपटॉप सुद्धा दिला. किरणला जाऊन जवळपास एक वर्ष होत आले होते, त्यामुळे आता परत केस ओपन करून काही फायदा होईल की नाही माहिती नाही, पण ५% पण काही मदत झाली तरी किरणला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली मिळेल, असे त्याला वाटले. आधी त्याच्या घरून यासाठी विरोध झाला होता, पण त्याने त्यांना खूप समजावून सांगितले, तर मग ते सगळे मानले होते.

पोलिसांकडून ज्युलियाने सांगितलेल्या माहिती सारखीच माहिती पुढे येत होती, त्यामुळे ज्युलिया खरं बोलत होती, असे पण सायबर पॉर्न सारखे गुन्हे होतात, यावर त्याचा विश्वास बसला होता. पोलिसांना अगदी किरणचा गुन्हेगार सापडला नसला तरी बरीच लोकं त्यांनी पकडली होती. काही मुलांना त्यातून सोडवले होते. तर राघवने घेतलेल्या पुढाकारामुळे काहीतरी मदत होत होती, यातच त्याचे समाधान होते. पण त्याचे रोज रात्री अश्लील व्हिडिओला रिपोर्ट करणे मात्र सुरूच होते.

ज्युलियाला एका दुकानात सेल गर्लचा छोटासा जॉब मिळाला. ते ती करू लागली. काही दिवसातच तिला एका मोठ्या प्रसिद्ध कॅफेमध्ये जॉब मिळाला, तिथे तिला थोडा चांगला पगार मिळत होता. ज्युलियाचा आवाज चांगला होता. ती थोडेफार संगीत शिकली होती. ती खूप छान डान्सर पण होती. त्यामुळे काहीतरी इव्हेंटमध्ये इमर्जंसीमध्ये तिने गाणे गायले तर आता कॅफेमध्ये अधून मधून पार्ट टाईम म्हणून तिला गाण्याचे काम सुद्धा मिळत होते. इथे भारतात तिला कोणी फार ओळखत नव्हते पण तरीही कधी कधी लोकं, खास करून पुरुष तिच्याकडे संशयाने पाहत आहे, हे मात्र तिला जाणवत होते. तिथे तिला एक दोन मैत्रिणी भेटल्या होत्या. एकंदरीत तिचे पण आयुष्य ठीक सुरू होते, पण अजूनही पवित्र व्हायचं आहे, हे काही तिच्या डोक्यातून गेले नव्हते.

कामाचा ब्रेक झाला तसे ज्युलिया, बाकी स्टाफ कॉफी पिण्यासाठी जमा झाला.

"एथे देव कसे बनायचे?" ज्युलियाने तिच्या मैत्रिणीला विचारले. तसे तिथे उभ्या असलेल्या एका सहकारी मुलाला हसू आले.

"इथे तीनच टाईपचे लोकं देव आहेत." तो हसत म्हणाला.

"कोण?" ज्युलिया एकदम उत्साहाने ऐकू लागली.

"एक फिल्म ॲक्टर्स, दुसरा पॉलिटीशियंस. ऑर तिसरा.."

"तिसरा कोण?"

"ते बाबा लोकं.. टीव्ही वर येतात प्रवचन वगैरे करतात ते." त्याने हसत उत्तर दिले.

"अच्छा.."

"हो." तो तिची गंमत करून चालला गेला. ती मात्र त्यावरच विचार करत बसली होती.

एक दिवस तिच्या कॅफेमध्ये ती गाणे गात होती तेव्हा चित्रपट करणारे काही लोकं आले होते.

"तिची फिजिक्स भारी आहे, एकदम सेक्सी." त्या फिल्म टीमचा एक व्यक्ती म्हणाला.

"नॉन इंडियन दिसत आहे." दुसरा म्हणाला.

"चित्रपटासाठी कमी पैशात भारी आयटेम भेटेल. व्हॉट से?" पहिला म्हणाला.

"आयडिया तशी चांगली आहे, पण ती करेल का?"

"इथल्या पेक्षा जास्त पैसे ऑफर करू, करेल करेल."

त्या लोकांनी ज्युलियाला एका चित्रपटात काम करण्यासाठी ऑफर दिली. ज्युलियाने ती ऑफर लगेच स्विकारली. कारण तिच्या डोक्यात तिच्या त्या सहकाऱ्याचे बोलणे अगदी फिट बसले होते, ॲक्टर्स, नेता आणि ते बाबा हेच लोकं देव बनतात. बाबा, नेता तर तिला शक्य वाटत नव्हते, ॲक्टर बनायचे तिने आधीच ठरवले होते. आणि आज ती संधी तिला चालून आली होती.