ज्युलिया राघव शास्त्री २

समाज मान्यतेनुसार प्रवास अपवित्रतेकडून पवित्रतेकडे..
ज्युलिया राघव शास्त्री


भाग २

"आता गळ्यात मंगळसूत्र घातल्यावरच..उद्या.."

"नो. मला तू माझी आजच झालेली हवी आहे."

"का हा हट्टपणा? मी इथेच आहे, तुझ्याजवळ."

"मला तू हवी आहेस..कायमची..माझी.."

"पण हे तुझ्याच उसुलांच्या खिलाफ आहे ना?"

"मी उद्याची आता वाट बघू शकत नाही."

"मला काय प्रोब्लेम असू शकतो? पण हे तुझ्याच रुल्स, एथिक्सच्या विरोधात आहे ना? तुच म्हणाला होतास की हे सगळं लग्नानंतरच करायचं असतं. मग आता स्वतःच्याच उसुलांच्या विरोधात जाणार?"

"हे लग्न तर जगासाठी आहे, आपण तर मनाने कधीच एक झालो आहे. मला तू माझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक स्पर्शात, माझ्या रोमात प्रत्येक कणात हवी आहे. तुला माझ्यात सामावून घ्यायचे आहे, आणि मला तुझ्यात. प्लीज माझे ऐक." त्याची तळमळ सुरू होती.

"तुच म्हणतो, आपल्याला आपल्या हार्टवर अँड स्पेशियली बॉडीवर कंट्रोल ठेवायला पाहिजे. मग ज्या चांगल्या गोष्टी आहे ते इम्प्लिमेंट व्हायला मदत करायला हवी ना?"

"तुला कळत का नाहीये?" चिडचिड करत तो बाहेर बाल्कनीत चालला गेला.

"व्हॉट हॅपेंड? हा असा का वागतो? मधेच खुश होतो, मधेच दुःखी. मधेच चिडतो रागावतो, मधेच प्रेमाने फुंकर पण मरतो. नक्कीच समथिंग इज रॉन्ग. कशाचा तरी त्रास होतोय, नाहीतर आपल्याच थॉट्सच्या विरोधात गेला नसता. ज्युलिया, तुला तो खुश, आनंदी हवा आहे ना? मग तू तरी का आज अडून बसलीय? तू तर मनाने कधीच त्याची झाली आहेस. उद्या हे होणारच आहे ना? मग आज झाले तर काय फरक पडतो? तसेही तू त्याच्यासाठी जीव देऊ शकतेस, मग हे बॉडी काय चीज आहे?" त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तिच्या डोक्यात असे अनेक विचार सुरू होते.

बाहेर खूप छान थंडी पसरली होती. हवेत फुलांचा सुगंध दरवळत होता. नदीचा झुळझुळ आवाज येत होता. हवेची झुळूक येत शरीराला स्पर्श करून गेली की, अंगावर गोड अशी शिरशिरी येत होती. अगदी कुठल्याही प्रेमी युगुलांना हवे असे प्रेमात पाडणारे वातावरण होते. त्याला मात्र ती रात्र वैऱ्याची वाटू लागली होती. ती हवा सुद्धा बोचत होती अन् तो नदीचा झुळझुळ आवाज सुद्धा कानाला टोचत होता. तो एकटक कुठेतरी शून्यात बघत उभा होता. तेवढयात त्याच्या पाठीमागून त्याला त्याच्या मानेवर एक कोमल ओठांचा स्पर्श जाणवला. त्याने मागे वळून बघितले.

"माझा होशील का?" ज्युलिया खाली एका पायाच्या गुडघ्यावर बसली होती. तिने आपला एक हात पुढे करत त्याला विचारले.

तिला असे बघून त्याच्या डोळ्यात आसवे जमा झाली. त्याच्या ओठांवर हसू तर डोळयात अश्रू होते. त्यात काळजी, भीती, हुरहूर, प्रेम, आनंद असे सगळे भाव दिसत होते.

"खुडा की निडा की पिवडा, माझा हनी पागलच आहे." त्याच्या डोळ्यात आसवे बघून तिला एकदम वाईट वाटले. लगेच जागेवरून उठत तिने त्याला एक करकचून मिठी मारली.

"मला काय होतेय मलाच कळत नाही आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे, आता सगळं लग्नानंतरच शोभेल. मी असे काहीही हट्ट करायला नको. आय एम.." तो बोलतच होता तसे मिठीतच त्याला त्याच्या गळ्यावर ओठांचा स्पर्श जाणवला आणि बोलता बोलता त्याचे पुढले शब्द ओठातच विरले. भावना अनावर झाल्या आणि तिच्याभोवती असलेली त्याची मिठी आणखी घट्ट झाली.आता त्या दोघांमध्ये हवेला सुद्धा जायला जागा नव्हती. त्याच्या हृदयाचे हार्ट बिट्स तिच्या सोबत बोलत होते. तो कशासाठी तरी घाबरला आहे, तिला सांगत होते. एक हात त्याच्या मानेभोवती गुंफत, त्याच्या पावलांवर आपले पाय ठेवत, तिने आपल्या टाचा उंचावल्या आणि त्याच्या चेहऱ्यावर तिच्या प्रेमाचा वर्षाव सुरू केला.

"आय एम नथिंग विदाऊट यू. आय लव यू स्वीटहार्ट." म्हणत तिने त्याच्याकडे बघत गोड स्माईल दिले आणि क्षणाचाही विलंब न करता त्याचा ओठांचा ताबा घेतला.

तिचे नाजूक स्पर्श त्याला घायाळ करू लागले होते. थोड्यावेळ आधी बोचरे वाटणारे ते वातावरण आता त्याला खूप मोहक वाटू लागले होते. तिच्यावर किती प्रेम करू, असे त्याला व्हायला लागले होते. एका हाताने तिला आपल्या मिठीतच घट्ट पकडून ठेवत त्याने तिच्या केसांची वेणी सैल करत केस मोकळे केले. तिच्या केसांमध्ये बोटं गुंफत कितीतरी वेळ त्याची बोटं तिच्या चेहऱ्यावर फिरत होती. तिचे ते रेशमी केस हवेसोबत झिम्मा फुगडी खेळू लागले होते. हवेच्या येणाऱ्या लहरींसोबत तिच्या केसांच्या बटा कधी त्याच्या चेहऱ्यावर, कधी हातांवर, कधी मानेला तर कधी त्याच्या ओठांना स्पर्श करत होत्या. त्या स्पर्शाने त्याचे मन धुंद होऊ लागले. त्याने तिला आपल्या हातांवर उचलून घेतले. त्याच्या शर्टच्या कॉलरवर असलेली तिच्या हातांची मूठ आपोआप आवळून आली. त्याची प्रेमळ नजर बघून ती लाजून चूर झाली आणि तिने तिचा चेहरा त्याच्या शर्टमध्ये लपवले. तिचा लाजताना लाल झालेला चेहरा बघून आपसूकच त्याच्या ओठांच्या कडा रुंदावल्या आणि तो तिला घेऊन आतमध्ये खोलीत आला. तिला बेडवर झोपवले. त्याच्याकडे बघून ती गोड हसली आणि आपल्या दोन्ही हातात तिने आपला चेहरा झाकून घेतला. त्याने दिवे विझवले.

प्रेमाला उधाण येऊ लागले. तिच्या शरीरावरील एक एक दागिना हळूहळू गळून पडू लागला. त्याचे बलदंड शरीर तिच्या नाजूक शरीरावर प्रेमाचा वर्षाव करत होते. निसर्गाच्या साक्षीने त्यांचे प्रेम फुलू लागले. त्याला स्वतःचा विसर पडू लागला आणि तो तिच्यात सामावू लागला. ती त्याच्या प्रेमात न्हाऊन निघाली होती.

खिडकीतून चंद्रमा डोकावत होता. उघड्या खिडक्यांवरील पडदे हवेसोबत झुलत होते. झाडांची पाने सळसळत होती. नदीचा प्रवाह झुळझुळत होता. वारा शांतपणे घोंगावत होता. जणूकाही निसर्गच या दोघांच्या मिलनाचे गीत गात होता.

कधीतरी तो अगदी शांतपणे तिच्या मिठीत झोपी गेला. २-३ तास होत आले होते, ती मात्र जागीच होती. त्याच्या चेहऱ्यावरील समाधान, प्रेम, तेज सगळं टिपत होती. पाणी प्यायचे म्हणून तिने उठण्यासाठी चुळबुळ केली तर झोपेतच त्याने तिला आणखी घट्ट पकडून घेतले. झोपेत पण त्याला असे बघून तिला गंमत वाटली. ती तशीच त्याच्याकडे बघत पडून राहिली.

"काय बघतेय?" थोड्या वेळाने त्याची झोप चळवळली. तिला स्वतःकडे बघतांना पाहून त्याने विचारले.

"तुला." ओठांवर गोड हसू आणत तिने उत्तर दिले.

"काय?" तो तिच्या गालावर किस करत म्हणाला.

"मुलं अशी पण असतात, मला माहिती नव्हते."

"अशी म्हणजे?" तो प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत होता.

"इतकी चांगली."

"तू काय बोलतेय, मला काहीच कळत नाही आहे."

"तू किती सॉफ्टली, जेंटली हॅण्डल केले. तुझ्या प्रत्येक स्पर्शात फक्त प्रेम होतं. माझ्या मनासोबत तू माझे शरीर सुद्धा जपले." बोलतांना तिचा आवाज कापरा झाला.

"जर प्रेम असेल तर ते कधीच हिंसक नसते. दुसऱ्यानेच काय माझ्याकडून सुद्धा माझ्या या फेअरीच्या शरीरावर एक सिंगल छोटेसे सुद्धा खरोच आलेले मला चालणार नाही. तुझ्या शरीरावर छोटूसा, इत्तुसा सुद्धा घाव मी बघूच शकत नाही. मला ते सहन होत नाही."

"आज मी पूर्ण झाले. तू माझा झाला. नाऊ लाईफची ओन्ली वन विश."

"डोन्ट वरी, टिल माय लास्ट ब्रेथ आय विल रिमेन युअर्स ओन्ली. कोणी मला टच पण करू शकणार नाही."

"नो नो नो नो, ते नाही. तुला कोणी टच केले ऑर तू कुणाच्या जवळ गेलास तरी आय वोंट माईंड. रिश्ता तो दिल का दिलसे जुडा होना चाहिए ना हनी? मी फक्त तुझी राहणे हे माझ्यासाठी महत्वाचे आहे." ती छान हसत म्हणाली.

"मग काय विश आहे?"

"आज तुझ्या सोबतीने मला पुर्णत्व मिळाले. माझ्यातील वुमन पूर्ण झाली. बस माझी डेथ तुझ्या कुशीत व्हावी..एवढेच."

"ज्युलिया, तू मॅड आहेस." तो हसला.

"हो तुझ्यासाठी. तू माझी झोप घालवली. आता मी तुला सोडणार नाही."

"तू काय करणार आहेस? झोप आता. नाहीतर सकाळी डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स येतील." तो हसत म्हणाला.

"मी तुला..मी तुला.. आता झोपू देणार नाही.. नाऊ इट्स माय टर्न बेबी.." म्हणत तिने त्याला आपल्या ताब्यात घेतले. तिच्या इच्छेचा मान राखत तो पण तेवढयाच उत्साहाने तिला साथ देत होता.

"आय लव यू वन, टू, थ्री, फोर… टील द स्काय, अबोव द स्काय.. अबोव द युनिवर्स.. मोर दॅन लाईफ.. मोर दॅन एव्हरीथिंग.." म्हणत तिने त्याला जोरदार घट्ट मिठी मारली आणि दमलेली ती त्याच्या कुशीत विसावली.

तो हसला. एका हाताने अंगावर पांघरून नीट केले. तिच्या भोवती आपले हात गुंफत, तिच्या डोक्यावर किस करत झोपी गेला.

******

लग्नाची पहाट उजाडली. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. त्याला जाग आली. ज्युलिया अजूनही त्याला पकडून झोपली होती.

"ज्युलिया उठ, सकाळ झाली." त्याने आवाज दिला.

"उम्म झोपू दे. बाहेर अंधार आहे." ती झोपेत त्याच्या कंबरेभोवती हात टाकत, त्याला पकडत म्हणाली.

"नो बेबी, उशीर व्हायला नको. चल उठ, पटापट रेडी हो."

"साहेब, मुहूर्त अकराचे आहे." ती डोळे चोळत खिडकीतून बाहेर बघत म्हणाली.

"हा असुदे. तरीही उठ लवकर. तयार हो. आय कांट वेट नाऊ."

"तू काय आताच घोड्यावर जाऊन बसणारे का?" ती त्याचा उतावीळपणा बघून म्हणाली.

"घोडा नाही घोडी.." तो हसला.

"व्हॉटएव्हर, सारखेच असते."

"काहीही. सारखे कसे काय असते?"

"दुरून सेमच दिसते."

तो आता लोटपोट होत हसू लागला.

ती एकटक त्याच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघत होती.

"ओके, मी जातोय आणि तुला घ्यायला येतोय. तयार होऊन माझी वाट बघ." तो बेडवरून उठत म्हणाला.

"ओके बॉस!" तिने अंगठा दाखवला.

"मी येतोय, तयार रहा. कुठे जाऊ नको. येतोय मी बँड बाजा बारात घेऊन.. " त्याचा उत्साह बघण्यासारखा होता. तो खूप एक्साईटेड, खूप आनंदी दिसत होता. हातानेच आपले केस नीट करत त्याने दार उघडले.

"हनी.." तिने त्याला आवाज दिला.

"हा ज्युलिया.." तो दारात थांबला.

"वेट." म्हणत ती त्याच्या जवळ गेली.

"आय लव यू!" ती त्याच्या कानाजवळ जात हळूच म्हणाली. तो लाजला.

"आलोच.." म्हणत त्याने तिच्या ओठांवर छोटेसे किस केले आणि आपल्या खोलीकडे पळला.

"येडा खुडा!" ती स्वतःशीच हसली आणि तिने दार बंद केले. घड्याळात बघितले तर ५च वाजले होते. दोन तास परत झोपावे विचार करत तिने अंग बेडवर टाकले.

******

दारावरची बेल वाजली. ज्युलियाने आळोखे पिळोखे देत दार उघडले.

"गुड मॉर्निंग ज्युलिया मॅडम." पुजा तिची सेक्रेटरी दारावर उभी होती. ती तिची सेक्रेटरी तर होतीच पण जवळची मैत्रीण सुद्धा होती.

"हे गूड मॉर्निंग पूजा. इतक्या लवकर का आली यार?" ती परत जात बेडवर आडवी झाली.

"मॅडम आज तुमचं लग्न आहे. अँड मेकप आर्टिस्ट, हेअर स्टाइलीश, साडी ड्रेपर आर वेटींग आउटसाईड." पूजा.

"अरे हा.. कॅन्सल दॅट साडी ड्रेपर." ज्युलिया.

"का? तो बेस्ट साडी ड्रेपर आहे. त्याच्या ॲपॉइन्मेंटस् असे इझिली मिळत नाही."

"कॅन्सल हिम."

"वेळेवर दुसरं कोण आणणार? तोच बेस्ट आहे. तुम्हीच त्याला सिलेक्ट केले होते."

"हो पण आता नाही. त्याला वापस पाठवा."
"पण मॅडम.."

तेवढयात दारावरची बेल वाजली.

पुजाने दार उघडले तर एक मुलगा दारात उभा होता.

"ज्युलिया मॅडम?" तो म्हणाला.

"विदाऊट परमिशन इथे कसे आलात?" पूजा.

"ते सरांनी काही पेपर्स दिले आहेत. ज्युलिया मॅडमचे सिग्नेचर पाहिजे आहे." तो मुलगा म्हणाला.

"बरं ठीक आहे. मॅडम रिड करतील मग देतील. तुम्ही जा." पूजा त्याचा हातातील पेपर हातात घेत म्हणाली.

"मॅडम इट्स अर्जंट." तो म्हणाला.

"पूजा दे ते इकडे." ज्युलिया म्हणाली. तसे पुजाने ते पेपर्स तिला दिले. ती काहीही न वाचता त्यावर साइन करू लागली.

"मॅडम आधी वाचा तर ते." पूजा.

"इट्स फाईन. आय ट्रस्ट हीम."

"सरांनी तुमची प्रोपर्टी त्यांच्या नावावर केली तर?" पूजा.

"सगळं त्याचेच आहे." ज्युलियाने भराभर पेपर साइन करत त्या मुलाला दिले.

******

क्रमशः

******


नमस्कार फ्रेंड्स..
तुम्हाला बहुतेकांना ज्युलिया बोलताना जी भाषा, शब्दप्रयोग करतेय, ते थोडे विचित्र वाटत असेल. तर ती तसे का बोलते, कळेलच आपल्याला.. पुढल्या भागात. धन्यवाद!