जुळून येती रेशीमगाठी ( एक अनोखी प्रेमकथा)
भाग6
आधीच्या भागात ,
चिन्मयच्या एक्सीडेंट नंतर, चिन्मयनी नित्याशी अबोला धरला होता, नित्या खुप प्रयत्न करते त्याच्याशी बोलण्याचा सॉरी वगैरे सगळं म्हणून होते पण काहीच उपयोग होत नाही ....
नित्याच्या वाढदिवसाच्या दिवशी नित्याला कुणीच विश करत नाही तिला वाटतं सगळे आपला वाढदिवस विसरले पण संध्याकाळी तिला चांगलाच सरप्राईज मिळतो नित्या खूप खुश होते चिन्मय गुडघ्यावर बसून हॅप्पी बर्थडे टू यू नित्या आय लव यू म्हणतो नित्या खूप खूश होते .....
आता पुढे,
वाढदिवस साजरा केल्यानंतर सगळे आपापल्या खोलीत जातात... नित्या पण तिच्या खोलीत जाते...
चिन्मय : उत्तर दिलेले नाही तू अजून....
"उत्तर? "कशाचे उत्तर .....
"अच्छा मी तुला आय लव यु म्हणालो, पण तू काहीच बोलली नाहीस ....नित्या गप्प असते ती स्वतःच्या आवरण्यात माझं काही लक्षच नाही असं दाखवून खोलीतून निघून जाते, येईपर्यंत चिन्मय झोपलेला असतो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी...
" चिन्मय ,लवकर तयारी कर... आपल्याला बाहेर जायचे आहे..."
" कुठे ..?
"मी सांगते , तू आधी तयार हो..."
चिन्मय तयार होतो , नित्या कॅब बुक करते आणि त्याला घेऊन जाते... चिन्मयला कुठल्याच गोष्टीची कल्पना नसते... गाडी एका हॉटेल समोर येऊन थांबते नित्या चिन्मयच्या डोळ्याला पट्टी बांधते...
" हे काय केरतेस...."
" काही नाही , काल तू मला सरप्राईज केलंस ना मग आज मी करते त्यामुळे गप्प बस आणि निमुट माझा हात पकड आणि चल.... ती त्याला हॉटेलच्या बाजूला तलावाकाठी नेते त्याला नाव मध्ये बसवते आणि घेऊन जाते दुसऱ्या किनारीवर आल्यावर चिन्मयच्या डोळ्याची पट्टी उघडते पाहतो तर काय समोर मोकळ्या आकाशात एक सुंदर टेंट तयार केलेला असतो ,त्याला फुलांनी सजावट केलेली असते, खूप सुंदर दिसते ...चिन्मयला खूप भारी वाटतं आज,समोर जातात तर एक छान टेबल डेकोरेट केलेला असतं टेबलवर केक ठेवलेला असतो आणि त्यावर ठळक अक्षरात "आय लव यु चिन्मय" असे लिहिलेले असते चिन्मय खुश होऊन....
" नित्या , हे सगळं काय आहे ...अग मी हे सगळं करायला हवं तर हे सगळं तू केलस थँक्यू नित्या म्हणून तिचा हात पकडतो ...."
"नाही चिन्मय.... माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला त्याच्यासाठी कदाचित तुझा जीव गेला असता मला माहिती आहे मी माफीच्या लायक नाही पण तरीही आय एम एक्स्ट्रीमली सॉरी...."
" इट्स ओके, तू वारंवार तेच बोलू नकोस... पण हे तू खूप छान अरेंज केलेस आय एम सो हॅपी....
नित्यानी जेवणाची व्यवस्था केलेली असते , जेवण केल्यानंतर पुन्हा चिन्मय साठी एक सरप्राईज असतं , नित्या चिन्मयचा हात पकडते, पडदा बाजूला सरकवते समोर एक बेड सजवलेला असतो.... बेडशीट वर हार्ट आकारात गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेला आणि ठळक अक्षरात आय लव यू चे अल्फाबेट्स बनवलेले असतात ....चिन्मय खूप खुश होतो त्याला खूप भारी वाटतं म्हणजे हे सगळं मी करायला हवं असं त्याला वाटतं... नित्या चिन्मयचा हात पकडत डोळ्यात डोळे टाकत
"आय लव यू " असं म्हणते
"चिन्मय मी पूर्णपणे मनाने आणि शरीराने तुला स्वीकारले रिअली आय लव यू ..."
"आय लव यु टू .."त्यांची आज खरी सुहागरात झाली मनाने जुळले आणि शरीरानेही जुळले, घरी परतल्यानंतर बघतात तर काय... आई-बाबा समोर वाट बघत बसलेले दोघांना वाटलं आता आल्याआल्या आपल्याला ओरडा खायला मिळेल, पण तसं होत नाही ...चिन्मय- नित्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता बघून त्यांना ओरडा नाही तर आशीर्वाद मिळतात.... दुसऱ्या दिवशी निर्मलाने सत्यनारायणाची पूजा ठेवलेली असते दोघांना पूजेवर बसवतात दोघे अगदी खुश असतात,, आता हळूहळू सगळं स्थिर होत चाललंय चिन्मयनी ऑफिस जॉईन केलं आणि नित्या पण बुटीकला जायला लागली..... तीन-चार महिने आनंदाने भरभर निघून गेले...
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा