रात्रीचे एक वाजून गेले होते, अक्षताला अजून झोप लागतं नव्हती. रात्रीचा अभ्यास करायची तिला सवय झाली होती, त्यामुळे आता उशिरा पर्यंत झोप लागत नव्हती. हॉस्टेलवर सुद्धा फार कोणी नव्हत. नुकत्याच परीक्षा संपल्याने सगळे घरी गेले होते. ती आणि अजून काही आठ - दहा मुली होत्या हॉस्टेलवर, तिने एक गोष्टीचं पुस्तक आपल्या कपाटातून काढून वाचायला घेतलं. पण कसलं काय त्यातही तिचं मन काही लागत नव्हत. तिने वैतागुन पुस्तक बाजूला ठेवून, पुन्हा अंथरुणावर पडली.
" काय झालंय, ह्या कुत्र्यांना आज देवजाणे. नुसते भुंकत आहेत. झोपू सुद्धा देत नाहीय, ना पुस्तक वाचायला देत आहेत. मगाशी जेवण देऊन आले मी त्यांना तेव्हा ठीक होते आता परत कसली भूक लागली आहे. रोज शांत असतात आणि आज नेमक आराम करायचा तर ह्यांनी आरडा - ओरडा लावला आहे. आता खाली सुद्धा जावू शकत नाही खूप अंधार असेल. त्यात आता ह्या वेळेला बाहेर जायला सुद्धा देणार नाहीत." अक्षता रूममध्ये येरझाऱ्या मारत, एकटीच मनाशी बडबडत असते.
कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज अजूनच वाढत असतो. जसे काही, काहीतरी विपरीत घडणार आहे. त्यांचं ते भुंकण साधं नसत, कोणी माणूस रडत आहे. असे ते भुंकत असतात.
अक्षता कानात हेडफोन लावून मोठ्या आवाजात गाणी चालू करते. ती गाणी ऐकत पुन्हा आपल्या बेडवर पडून राहते. पण काही केल्या तिला काही झोप लागतं नाही. शेवटी काही वेळाने उठून ती हेडफोन काढते. तरी भूंकण्याचा आवाज येतच असतो. शेवटी काही विपरीत घडलं तर नाही ना, ह्या काळजीने ती खिडकी उघडून काही दिसतंय का ते बघण्याचा प्रयत्न करते. ती खिडकी उघडुन बघते तर निकु रस्त्यात खाली पडलेली असते आणि तिच्या भोवती तिची पिल्ल भुंकत असतात.
अक्षताच्या काहीच लक्षात येत नाही. निकूला गाडीने वैगरे उडवलं असेल का? ती अशी का पडून असेल? तिला तिच्या बाळांच्या आवाजाने जाग ही येत नसेल का? जाऊदे मीच खाली जाऊन बघते. काय झालं आहे ते. सोबत खालच्या कोणाला तरी घेऊन जाते.
निकुला असे बघून अक्षताच काही रूममध्ये मन लागतं नसतं. ती रोज तिला न चुकता खायला घालते. निकुने महिन्याभरापूर्वी पिल्लांना जन्म दिलेला असतो. तिची पिल्ल तिच्यासारखी गोरी गोरी असतात. नीकु सुद्धा अक्षता खाली आली की तिला हँडशेक करत असे. तिच्या भोवती गोल गोल फिरून, तिच्या मागे मागे पळून तिला पकडत असे. अक्षताला लहानपणापासून प्राण्यांची खूप आवड होती पण हॉस्टेला आल्यावर ती गावाच्या प्राण्यांना खूप मिस करायची आणि त्यांची कमी एकट्या निकूने भरून काढली होती. ती दिवसातून एकदा तरी नीकुला न चुकता भेटायची. एकदा तर अक्षताला लागलं होत तर निकुच्या डोळ्यात पाणी आलेलं. तिला असे आपल्यासाठी रडताना बघून अक्षताला तिचा अजूनच लळा लागला होता.
अक्षता धडाधड पायऱ्या उतरून खाली गेली. खाली मॅडमना विनंती करून तिने हॉस्टेलचा गेट उघडायला सांगितला. अक्षताच्या मागेमागे प्रिया मॅडम सुद्धा बाहेर गेल्या. अक्षता निकूच्या जवळ गेली तिने निकुचा चेहरा हातात घेतला , नीकुने डोळे उघडुन अक्षताकडे पाहिलं. नीकुच्या डोळ्यातून अश्रूंचा एक थेंब अक्षताच्या हातावर पडला आणि तशीच नीकूने अक्षताच्या तळहातांवर मान टाकली. तिला असे बघून तिची पिल्ल अजून जोरात भुंकायला लागली, ते भुंकत नाहीत तर आपल्या आईला असे बघून रडत आहेत हे अक्षताच्या लक्षात आले. तिने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. तिच्या स्पर्शाने ती पिल्ल अजून तिला कवटाळून रडू लागली. तिने त्यांना हलकेच बाजूला केलं आणि एका जाड कपड्यात निकूला उचलून बाजूला ठेवलं. निकूचा श्वास अजूनही चालू होता पण एवढ्या रात्री प्राण्यांचा कोणता दवाखाना चालू मिळणार आहे. प्रिया मॅडमने पाणी आले. अक्षता निकुला पाणी पाजायचा प्रयत्न करत होती पण नीकू तोंड सुद्धा उघडतं नव्हती. अचानक प्रिया मॅडमच लक्ष निकुच्या शेपटी जवळ गेलं. त्यांनी अक्षताला खुणवून नीकूच्या शेपटी जवळ बघायला सांगितल.अक्षता अलगद तिची शेपटी वर करते आणि बघते तर निकुच्या प्रायव्हेट पार्ट मधून रक्त येत, ते बघून त्या दोघींना धक्का बसतो.
" अक्षू , अग कोणीतरी काठी टाकली आहे. तिच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये आणि एवढं रक्त जातंय. काय करायचं आपण आता?" प्रिया मॅडम अक्षुला विचारतात.
"हो मॅडम. काय झालं आहे नेमक काहीच कळत नाहीय. पण दवाखान्यात तर न्यावं लागेल हिला. ते ही लवकरात लवकर नाहीतर ही इथेच प्राण सोडेल. खुप आशेने पाहिलं आहे, तिने माझ्याकडे. तिची पिल्ल सुद्धा पोरकी होतील. तुम्ही प्लीज काहीतरी करा ना." अक्षु प्रिया मॅडमना विनंती करत असते.
" बरं थांब. प्राण्यांच्या हॉस्पिटलमध्ये फोन लावून बघते. त्यांना विचारते काय करता येईल ते." प्रिया मॅडम गुगलवरून नंबर शोधून काढतात आणि फोन लावतात.
तीन - चार वेळा फोन केला तरी कोणी फोन उचलत नाही. शेवटचा एक प्रयत्न म्हणून त्या पुन्हा फोन लावतात. समोरून नेमका फोन उचलला जातो.
तीन - चार वेळा फोन केला तरी कोणी फोन उचलत नाही. शेवटचा एक प्रयत्न म्हणून त्या पुन्हा फोन लावतात. समोरून नेमका फोन उचलला जातो.
" हॅलो. समीर बोलतोय. आपण कोण?"
" हॅलो. मी प्रिया बोलतेय. आमच्या हॉस्टेलच्या परिसरातील एक कुत्री आहे, निकु. तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये कोणीतरी काठी टाकली आहे. ती बेशुद्ध झालीय आणि खूप रक्त जातंय. आता आम्ही तिला इथे जास्त वेळ ठेवलं तर ती प्राण सोडेल. तुम्ही काही मदत करू शकता का?" प्रिया मॅडम विनवणीच्या स्वरात बोलतात.
" अहो मॅडम पण आता इथे कोणी डॉक्टर नाहीय आणि मी तपासू शकतो. पण उपचार नाही करू शकत." समोरचा व्यक्ती वैतागुन बोलतो.
" मग तुम्ही दवाखाना कशाला उघडला आहे. जर तुम्ही तुमच्या पेशंटवर वेळेत उपचारच नाही करू शकत तर..." प्रिया मॅडम आता ओरडून बोलतात.
" बरं ठीक आहे. तुम्ही त्या कुत्रीला दवाखान्यात घेऊन या. मी डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतो." एवढं बोलून समोरून फोन कट होतो.
अक्षू चल लवकर. निकुला उचलून घे आणि गाडीवर बस. प्रिया मॅडम त्यांची स्कूटी चालू करत म्हणतात. अक्षता सुद्धा निकुला छातीजवळ कवटाळून घेते आणि स्कुटीवर बसते. प्रिया मॅडम स्कूटी चालू करतात.तशी तिची पिल्ल स्कुटीच्या मागे धावायला लागतात. हॉस्टेलच्या मेन गेट पर्यंत ते पळत येतात, नंतर प्रिया वेगाने स्कूटी पळवते तशी बिचारी तिथेच त्या भरधाव जाणाऱ्या स्कुटीकडे बघत भुंकत उभी राहतात.
प्रिया स्कूटी दवाखान्याच्या मेन गेट मधून आत घेते. बाहेरच एक डॉक्टर उभे असतात. ते अक्षता कडून निकुला आपल्या हातात घेतात आणि नेऊन एका बेडवर ठेवतात आणि त्या दोघींना बाहेरच थांबायला सांगतात. काही वेळाने तपासून झाल्यावर ते त्या दोघींना आत बोलावतात.
" मॅडम ही तुमची स्वतःची कुत्री आहे का?" डॉक्टर त्या दोघींना प्रश्न करतात.
" नाही. म्हणजे आमच्या हॉस्टेलच्या आवारात असते. मी रोज बघते तिला, खायला घालते." अक्षता उत्तर देते.
" बरं. हा फॉर्म भरा. ह्यात तुमचं नाव, नंबर द्या. हीच एक ऑपरेशन करावं लागेल. वाचेल की नाही ते सांगू शकत नाही कारण रक्त गेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिच्यावर बलात्कार झालाय तोही माणसांकडून. कदाचित सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. ती सगळी चौकशी नंतर करता येईल पण सध्या हीच ऑपरेशन चालू करणं गरजेचं आहे. तुम्ही बाहेर थांबा." डॉक्टर दोघींना माहिती देऊन तयारीला लागतात.
बऱ्याच वेळाने डॉक्टर बाहेर येतात. प्रिया व अक्षता त्यांच्याकडे आशेच्या नजरेने बघत असतात. कारण अक्षताला तर नीकुचा खूप लळा असतो.
" काळजी करू नका. ती वाचली आहे. फक्त पुन्हा तिच्यासोबत असे काही घडणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही तिला चार - पाच दिवस इथे ठेवा. तिला औषधे, सलाईन लावायला लागेल. तुम्ही तिला भेटायला येत जा. ती चालू लागली की तिला घेऊन जा परत."
अक्षता हात जोडून डॉक्टरांचे आभार मानते. ते सुद्धा हात जोडून स्मित हास्य देऊन. तिला प्रतिसाद देतात.
चार - पाच दिवसांनी अक्षता आणि प्रिया, निकुला घेऊन येतात. आईला बघून तिची पिल्ल पळतच अक्षता जवळ येतात. अक्षता, निकुला खाली सोडते. निकू आपल्या पिल्लांना जवळ घेऊन चाटत असते. तिचे डोळे पाणावलेले असतात. नंतर अक्षता जवळ येऊन आपल्या एका हाताने अक्षताच्या पायाला हात मारते. अक्षता खाली बसते, निकु तिच्या दोन्ही हातांनी अक्षता आणि प्रिया समोर हात जोडते.
तिला असे बघून अक्षूच्या डोळ्यात पाणी येतं. ती निकुचे दोन्ही हात धरते आणि तिला मिठी मारते. त्यांना असे बघून तिची दोन्ही पिल्ल सुद्धा त्यांच्या जवळ जातात.
( कथा काल्पनिक आहे. पण अश्या घटना सत्यात घडतात. माणसांवर होणाऱ्या अत्याचाराची चौकशी होते. तशीच तक्रार सुद्धा होते पण मुक्या जनावरांवर होणाऱ्या अत्याचाराची साधी चौकशी केली जात नाही. कुत्रे भुंकले, मांजरी रडल्या तर ते अशुभ पण ते का रडत असतील ह्याचा विचार कोणी करत नाही. आपल्या घराबाहेर सुद्धा निकु सारखं कोणी असेल. कधीतरी त्यांना जवळ घेतल तर ते सुद्धा जीव लावतील.
नुकतीच एक घटना घडली आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानात एका मोठ्या घोरपडीवर बलात्कार झाला. शिकारीसाठी आलेल्या चार जणांनी तिच्यावर बलात्कार केला.
ह्या अगोदर कुत्रींवर, शेळी , माकड अश्या अनेक मुक्या प्राण्यांवरच्या बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. अश्या हैवानाना शिक्षा कोण करणार? इथे स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराला न्याय देता देता अनेक वर्षे उलटून जातात. तिथे ह्या मुक्या प्राण्यांना न्याय कोण देणार? )
ह्या अगोदर कुत्रींवर, शेळी , माकड अश्या अनेक मुक्या प्राण्यांवरच्या बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. अश्या हैवानाना शिक्षा कोण करणार? इथे स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराला न्याय देता देता अनेक वर्षे उलटून जातात. तिथे ह्या मुक्या प्राण्यांना न्याय कोण देणार? )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा