Login

का कळेना... (भाग ३)

Short & sweet love story

© शुभांगी शिंदे

आज तिच्या रुपाने विक्रम पूर्ता घायाळ झाला होता….. याआधी त्याने तिला अस कधी पाहिल नव्हत…. कारण तो लग्नाच्या संवादात कधी नव्हताच…. पण आज नव्याने त्याच्या मनाला पालवी फुटली…..

आता पुढे


का कळेना!!  (भाग ३)


पण आज नव्याने त्याच्या मनाला पालवी फुटली…
मेघा आणि प्रमोद आत प्रवेश करतात…. हळूहळू लोकांची गर्दी वाढायला लागते…. 

रेवतीचे आईवडील मेघाची पाहुण्यांना ओळख करून देत असतात…. विक्रम तिथेच आसपास असतो…. गर्दीतून चोर नजरेने मेघाला बघत असतो….

काहीवेळाने रेवती तयार होऊन येते…. दोन्ही उत्सव मुर्ती स्टेजवर हजर असतात…. साखरपुडा व्यवस्थित पार पडतो…. अगदी पारंपरिक पद्धतीने…. 

रेवती आणि प्रमोद एकमेकांना अंगठी घालतात…. तसा वरून त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो… दोघेही खूप खुश असतात….
पण हल्लीच्या मुलांची नाचगाण्याची हौस…. मग काय हॉलमध्ये मंद दिव्यांच्या रोषणाईत छान रोमॅन्टिक गाण वाजू लागले….


प्रमोद आणि रेवती दोघेही हातात हात घेऊन कपल डान्स करु लागले…..


????????“जब कोई बात बिगड़ जाये, जब कोई मुश्किल पड जाये

तुम देना साथ मेरा, ओ हमनवाज

ना कोई हैं, ना कोई था, जिन्दगी में तुम्हारे सिवा

तुम देना साथ मेरा, ओ हमनवाज”????????


लांबूनच मेघा त्या दोघांना पाहत असते… त्या दोघांना अस खुश बघून आईबाबाही सुखावतात…. 


आता हळूहळू इतर बाकीचे पण जोडीने नाचायला येउ लागले…. इतका वेळ गैरहजर असलेला रोहन आत्ताच हॉलमध्ये आलाय…. सर्वांना डान्स करताना बघून हाही मेघाला जबरदस्ती घेऊन गेला….


अचानक साउंडवाल्याने म्युझिक आणि तिथली रोषणाई बदलली….. त्या डान्सफ्लोरची थीम अजूनच रोमँटिक झाली… 

रोहनने आपला उजवा हात मेघाच्या कमरेत तर त्याच्या डाव्या हातात मेघाचा हात घेतला… तिला थोड आपल्या जवळ ओढल आणि गाण्याच्या तालावर तिच्या नजरेला नजर लावून नाचू लागला…..


????????आँखों की गुस्ताखियाँ माफ़ हों
ओ आँखों की गुस्ताखियाँ माफ़ हों
एक टुक तुम्हें देखती हैं

जो बात कहना चाहे ज़ुबान तुमसे वो ये कहती हैं

आँखों की शर्मोहाया
माफ़ हो

तुम्हें देखके झुकती हैं

उठी आँखें जो बात ना कह सकीं
झुकी आँखें वो कहती हैं ????????


मेघाला हे अजिबात आवडत नाही पण लोकांसमोर उगाच तमाशा नको आणि येवढा छान कार्यक्रम सुरू असताना गालबोट नको म्हणून तीही त्या सोबत नाचत होती…. यासगळ्यात विक्रम तिलाच बघत होता… अधूनमधून तिनेही ते पाहील होत ….. म्हणजे आँखों की गुस्ताखियाँ तिघांचीही सुरूच होती….????


साखरपुढ्याचा सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला…. लव बर्डस म्हणजे प्रमोद आणि रेवती खूप खुश होते….


दुसऱ्या दिवशी सकाळी मेघा रोहनच्या नवीन घरी जाते…. आपल्या प्रोजेक्टची काम कुठपर्यंत आली आहेत हे पाहायला… तिने बनवलेले डिझाइन हे प्रॉपर वर्क होत की नाही याकडे ती जातीने लक्ष देते…. काही वेळाने तिथे रोहन येतो…. 

रोहन तिला मागून येऊन मिठी मारतो… मेघा तडक मागे फिरून रोहनच्या कानशिलात लगावते….. रोहन स्तब्ध होऊन जातो.. .. आसपास बघतो तर तिथे त्या दोघांशिवाय कोणी नसत….. मेघा तिथुन निघून जात असते….


रोहन : मेघा….  Is anything wrong with me…. माझ्यात काही कमी आहे का??? आजवर खूप मुली पाहिल्या… 

“Good looking” .. “श्रीमंत” मुलगा म्हटलं तर लगेच भाळतात…. तु पहिली आहेस जी मला ignore करतेस….


मेघा : रोहन…. मी एक साधी सरळ मुलगी आहे… माझ जगण्याच way of thinking वेगळ आहे… मी तुझ्या टाईपची नाहीए… And you are not my first choice…. हृदयातून जी भावना एका जोडीदारासाठी येते ती तुझ्यासाठी नाही येत…. So please stay of it…


रोहन : All right…. कमीत कमी माझी चांगली मैत्रीण तर बनशिल ??? याररर मी मित्र म्हणून येवढा वाईट नाहीए…. तुझ straight forward उत्तर मला आवडल….


मेघा : (काहीशी हसून) OK…

रोहन : चला मघ…. घराच काम कुठपर्यंत आल ते दाखवा…..

दोघेही हसून पुढच्या कामाला सुरुवात करतात…..


रेवतीच्या घरी लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे…. दोन दिवसांनी गोव्याला जायच आहे त्याचीच तयारी सुरू आहे….


आई : विक्रम… अरे तु दियाला फोन केलास का??? पोहचली का ती गोव्याला????


विक्रम : आई कशाला काळजी करतेस…. पोहचेल ती…. Wedding planner आहे ती… तीला तिच्या जबाबदारीची जाणीव आहे….


आई : धांदरट आहे नुसती…. पण तुम्हाला तीच हवी होती…


बाबा : अगं तुझ्या भावाचीच मुलगी ना ती…. आपल्या विक्रमसाठी तिचच नाव सुचवत होतीस तू…..


आई : हो… पण त्यांना करियर महत्वाच होत तेव्हा…. काय दिवे लावले…. Wedding planner बनुन…. दहा पैकी चारच लग्न नीट पार पडले….


विक्रम : अग पण उरलेल्या सहा मधली दोन लग्न cancelled झाली त्यात तिचा काय दोष…. आणि बाकी चारचे नवरा नवरी पळून गेले….


आई : हिनेच पळवून लावले....


बाबा : अग उलट हिने दोन प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणले...
(सगळे हसतात)


आई : हो हो….. रेवू तो फोन ठेव आता… . तयारी कर ……


*************************************


सगळे दोन दिवसांनी गोव्याला येऊन पोहोचले…. संध्याकाळी मेघा आणि प्रमोद सुद्धा तिथे पोहचले…. 

संध्याकाळच्या मावळतीला तांबडा शुभ्र आकाश… न्हाऊन निघाला होता…. तांबूस चांदण्या प्रकाशात खळखळणारा समुद्राच्या लाटा मन प्रसन्न करत होत्या…. गार वाऱ्याची झुळूक अंग मोहरत होती…. 


आणि अशा निसर्ग रम्य ठिकाणी रेवतीच्या बाबांच आजोळ होत. रेवती आणि प्रमोदच wedding destination……


रेवती मेघाला त्यांची खोली दाखवला घेऊन जाते…. बाबा दियाला मेघाची ओळख करून देण्यासाठी घेऊन येतात
मेघाला बघताच दिया जोरात ओरडते…..


दिया : (आनंदाने नाचून) आ…. Ohh my God … मेघा….


मेघा : दिया…. (आश्चर्याने) what a pleasant Surprise ….


दिया : Uncle… मेघा माझी कॉलेज फ्रेंड आहे….


आई : (त्याचवेळी मेघाला जेवणासाठी बोलवायला येतात) दिया तुझ कॉलेज तर पुण्यात होत…


मेघा : आई आम्ही special course दरम्यान एकत्र होतो…


आई : चला सगळे जेवायला…. काय आमची wedding planner सगळीकडे मलाच लक्ष द्यावे लागत आहे ….


(दिया आणि बाबा एकमेकांना बघून हसतात. . .)

सगळे जेवणाच्या पंगतीत बसतात…. आणि थोड्या फार गप्पा पण जमतात…..


मेघा : दिया…. तु आणि wedding planner??? Finally तुला तुझा goal मिळाला तर….


दिया : हमम्…. ए आत्तू…. जरा तो पापड दे ना…. (आईच लक्ष दुसरीकडे केंद्रीत करत) मेघा जेवणानंतर रात्री तयार रहा….


मेघा : (गोंधळून) कशाला??? आणि तु इतक्या हळू का बोलतेस???


आई : मी सांगते ना ती इतक्या हळू का बोलतेय…. (दियाचा प्लान ओळखून) अग ही भटकी तुलाही भटकायला घेऊन जाणार…. काय गं बरोबर ना???


दिया : You are the best आत्तू… तुच मला बरोबर ओळखते ….. (थोडीशी चिडवत… आपल्या आत्याला मीठी मारते)


आई : हममम्…. चल आता मस्का नको मारूस…. लवकर जा नी लवकर या…. .


मेघा : येवढ्या रात्री कुठे जायचं????


दिया : Night lights बघायला…. (full excited ) गोव्यात आल्यावर जर त्याची “Night life” नाही बघितली तर गोवा पाहिलाच नाही अस होइल…..


बाबा : हि काय तुम्हाला सोडायची नाही…. जा पोरांनो फिरून या…. नंतर लग्नाची तयारी सुरू झाली की वेळ नाही मिळणार…..


रेवती : ये हुई ना बात…. I love you दिया… तु खरी मैफिलची जान आहेस….


रोहन : (नुकताच येतो) एक जान इधर भी है |


बाबा : अरे रोहन्या तु कुठे राहीला होतास???

दिया : हे कोण ध्यान म्हणायचं????

विक्रम : friend आहे माझा…. रोहन नाव आहे त्याच…


रोहन : Hiiii मेघा…. Hello… Everyone….


आई रोहनलापण जेवण्याचा आग्रह करते पण तो जेवण बाहेरच करून आल्याच सांगत फ्रेश होण्यासाठी जातो….


इथे दिया आणि रेवती तयार होऊन बाहेर सर्वांची वाट बघत असतात…. लगेचच तिथे रोहन आणि प्रमोद हे दोघेही येतात … अजून विक्रम आणि मेघा यायचे बाकी होते….


रेवती : काय करुया?? bikes नी जायच की four wheeler???


प्रमोद : ladies first.. तुम्ही सांगाल तस….
रोहनही हो मध्ये हो करतो इतक्यात समोरून मेघा आणि विक्रम येतात…. 


मेघाने छान गडद निळ्या रंगाचा वन पीस घातला होता आणि विक्रम जिन्स टी-शर्ट आणि ब्राउन लेदरचा जॅकेट…. विक्रमही दिसायला एकदम हँडसम…… अगदी सिनेमातल्या हिरोसारखा…..


दिया : (हळूच रेवतीच्या कानात कुजबुजते ) जोडी छान वाटते ना ही???


रेवती : तु please…. आता यांच्या बाबतीत नको ना सुरू करु…. भाई माहित आहे ना तुला ?? सोड तू…. चल आता… .


रोहन : मी drive करतो… Come on let’s go….


दिया : let’s rock…. Yuuuu huuuu….
सगळ्यात पुढच्या सीटवर विक्रम आणि रोहन… मागे दिया आणि मेघा…. रेवती आणि प्रमोद bike ने निघतात…..


सगळे एका ओपन पब जवळ येतात….
आत entry करताच….. आपल्याला थिरकायला लावणार म्युझिक, वेगळ्याच विश्वात नेणारी रोषणाई होती… Dance floor वर पण वेगळीच अशी ढिंच्याक रोषणाई बदलत होती… 


सगळेच मस्त enjoy करत होते…. बीचवर टेंट रिझर्व्ह करून सगळे तिथे बसले….
रोहन आणि दियाने मस्त सर्वांसाठी काजू भेळ, prawns fry आणि सहा बिअर ओर्डर केल्या… आणि मग ते दोघेही जागेवर येऊन बसले….


दिया : प्रमोद आणि रेवती आज की पार्टी तुम्हारे नाम….

(सगळे टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतात)


प्रमोद : Thanks दिया….


इतक्यात starters and drinks टेबलवर हजर होतात…

सगळे गप्पा मारत ड्रिंक्सची मजा घेत होते….


दिया : मेघा आज सब माफ हे |

मेघा : A…. please… हा… No Hard drinks…


रेवती : Only one time दी…

रोहन : प्रमोद तु तरी सांग…

प्रमोद : no comment please…. मला यात नका पाडू…

विक्रम उठून जातो…

रोहन : आता ह्याला काय झालं???? (विक्रमला जाताना पाहून)

दिया : Only one sip मेघा… नाही आवडली तर नको घेऊ .. But try न करता नाही नको बोलू… गोवा आये हो तो let’s enjoy!!


सगळेच आग्रह करायला लागतात , तस मेघा OK म्हणून दोन घोट पिते, पण ते काही तिला जमत नाही…


मेघा : ईईई… (विचित्र तोंड करत) याकक् किती बेकार आहे… सगळी तोंडाची चव बिघडवली….
आणि मेघा फ्रेश होण्यासाठी निघून जाते…

क्रमशः

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल, फोटो साभार गूगल  ????????)

🎭 Series Post

View all