© शुभांगी शिंदे
सगळेच आग्रह करायला लागतात , तस मेघा OK म्हणून दोन घोट पिते, पण ते काही तिला जमत नाही…
मेघा : ईईई… (विचित्र तोंड करत) याकक् किती बेकार आहे… सगळी तोंडाची चव बिघडवली….
आणि मेघा फ्रेश होण्यासाठी निघून जाते…
आता पुढे...
का कळेना!! (भाग ४)
मेघा जातच असते इतक्यात समोरून येणार्या एका मद्यधुंद व्यक्तिचा धक्का वेटरला लागतो आणि त्याच्या हातातील ड्रिंक्सची प्लेट मेघावर पडणार त्याच क्षणाला विक्रम तिला तिच्या हाताला धरून बाजुला ओढतो… मेघा स्वतःला सावरते….
विक्रम : Are you OK ???
मेघा : Yaaa. . … I am fine…..
(दोन मिनिटे कुणीच कुणाशी बोलत नव्हत… )
विक्रम : निघूया…?? सगळे वाट बघत असतील….
मेघा : Hmmm.... (हलकेच मान डोलवत)
विक्रम : मेघा हे तुझ्यासाठी… (दुसऱ्या हातात असलेल soft drink पुढे करत).. It’s just soft drink no alcohol… तु Hard drinks घेत नाही म्हणून आणली तुझ्यासाठी….
मेघा : Thank you (मिश्किल हसत)
(आणि दोघेही आपल्या जागेवर येऊन बसतात…. )
दिया : ए चला ना नाचूया…. जाम भारी म्युझिक सुरू आहे…
????????शाम है जाम है
और है नशा
तन भी है मैं
भी है पिघला हुवा
छायी है रंगीनिया
फिर भी है बेताबियाँ
क्यों धड़कता है दिल
क्यों यह कहता है दिल
दीवानो को अब्ब तक
नहीं है यह पता
आज की रात खोना है
क्या पाना है क्या खाना है क्या
आज की रात खोना है
क्या पाना है क्या खाना है क्या ????????
मेघा आणि विक्रम सोडून बाकीचे डान्स फ्लोअरवर जातात…. हे दोघे बसूनच इन्जॉय करत होते….
स्वभाव एकसारखा जुळत असल्याने रोहन आणि दिया चांगलेच जवळ यायला लागले होते.….
पहाटे चार वाजता सगळे घरी जायला निघतात… यावेळेस दिया आणि रोहन बाईक ने निघतात… विक्रम स्वतः गाडी चालवतो....
रेवती मस्त प्रमोदच्या खांद्यावर डोक ठेवून मागच्या सीटवर झोपी जाते…. खिडकीतून येणाऱ्या गार वार्यामुळे प्रमोदही तिच्या डोक्यावर डोक ठेवून झोपून जातो…
पहाटेच्या वेळी मोकळ्या रस्त्यावर गाडीच्या वेगात गार वाऱ्याची झुळूक मन प्रसन्न करत होती…
दोघेही शांतच… मेघा गाडीतला म्युझिक सिस्टिम चालू करते नकळत गियर बदलताना विक्रमच्या हाताला मेघाचा स्पर्श होतो दोघेही शाहारतात….
विक्रम sorry बोलुन समोरचा मिरर ठीक करतो… मेघाही मनात चलबिचल झाल्याने खिडकीतून बाहेर न्याहाळत बसते…. विक्रम अधून मधून तिलाच बघत असतो….
गाडी एकदाची दारावर येउन थांबते…. मेघा, रेवती आणि प्रमोदला उठवून घरी आल्याच सांगते…. तसे ते दोघेही जांभळी देत आपाआपल्या खोलीत निघून जातात….
दिया आणि रोहन आले नाही म्हणून मेघा आणि विक्रम तिथेच गाडीजवळ त्यांची वाट बघत असतात….
विक्रम : खूप उशीर झालेला आहे…. तु जाऊन झोपू शकतेस…. मी थांबतो इथे त्यांची वाट बघत…
मेघा : It’s ok… थांबते मी पण…. तेवढीच तुम्हाला कंपनी…
विक्रम : (हळूच गोड स्माईल देत) okkk…
दोघांच्याही छान गप्पा रंगतात….
गप्पांमध्ये सहा कधी वाजले कळतच नाही दोघांना….
इतक्यात बाबा morning walk साठी बाहेर पडतात…..
बाबा : काय रे लवकर उठलात… (त्यांनी दोघांच्या कपड्यांवरुन आधीच ओळखल की हे अजून घरात गेलेले नाही)
विक्रम : नाही…. दिया आणि रोहन अजून आले नाही ना…. त्यांचीच वाट बघतोय….
बाबा : ते तर कधीच येऊन झोपले… ती काय त्यांची बाईक….. (आणि ते निघून जातात)
मेघा आणि विक्रम आश्चर्याने बघत गालातल्या गालात हसतात….
विक्रम : (मेघाला जाताना अडवून) मेघा!!….. तुझी कंपनी खरच चांगली वाटली…. Thanks…..
मेघा हसून पुढे जाते…. विक्रमच्या या एका वाक्याने ती वेगळीच आनंदून जाते…..
************************************
आज रेवती आणि प्रमोद ची मेहंदी आहे….. दिया जरी धांदरट वाटत असली तरी तिने तीची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली…. सकाळी मेहंदी होती रात्री असाच नाचगाण्याचा कार्यक्रम ठरला होता….
रेवतीच्या चेहर्यावर प्रमोदच्या प्रेमाने आधीच रंग भरला होता…. आता मेघाच्याही सजण्या सवरण्यात हलकासा बदल झाला होता….
आपल्याला कोणीतरी नोटीस करतं या विचाराने ती स्वतःकडे जास्त कटाक्ष टाकत होती…. आता तीची नजर विक्रमलाच आधी शोधत होती….
मेहंदीच्या कार्यक्रमात पुरूष मंडळींच काहीच काम नसल्याने त्यांना वेगळी सोय केलेली होती…. त्यांच्या मस्त गप्पा टप्पा सुरू होत्या… विक्रम Laptop वर त्याचे काही मेल चेक करत होता….
हवेची एक झुळूक त्याला स्पर्श करून गेली तो पुन्हा रात्रीसारखा शहारला.... त्याने त्या वाऱ्याच्या दिशेने पाहिलं तर …..
आबोली रंगाची घागरा चोली… त्यावर जाळीदार आणि नाजूक मोती असलेली ओढणी पांघरलेली …. त्यातुन तीची नाजूक कंबर लपाछपी करत नजरेस पडत होती…. त्याने लगेच नजर चोरली पण मन काही थांबत नव्हत….न राहवून त्याने परत तिला पाहिल…. त्याच कमरेवर ती सोनसाखळी अजून आकर्षक वाटत होती…. गोर्या हातावर काढलेली ती नक्षीदार मेहंदी…. पायात घुंगरूनी भरलेले पैजण…. कानात खड्यांचे झुंमके….. ओठांवर हलकीशी लिपस्टिक…. आणि तिच तीची गालावरची खळी….आज तो परत तिच्या सौंदर्यावर भूलला होता…. तिला येताना पाहतच बसला….
ती येतच होती की खाली पडलेल्या काचेच्या तुकड्यावर तिचा पाय पडला…. आई गं म्हणत ती ओरडली…. तसा विक्रम भानावर येत तिच्याकडे धावला पण आधीच तिथे रोहन पोहचला….
रोहनने लगेच तिच्या पायात रुतलेला काचेचा तुकडा काढला आणि आपल्या किशातला रूमाल तिच्या जखमेवर बांधला…. काय मेघा खाली बघून चालायच ना??? दिया घेऊन जा नीट हिला आता आराम कर थोडा ….. रोहन म्हणाला…..
विक्रम अजूनही तिला न्याहाळत होता…. न बोलुन दोघांचीही नजर खूप काही सांगून जात होती….
हा हा म्हणता लग्न फार व्यवस्थित पार पडल…. लग्नानंतर पाचसहा दिवस तिथेच राहून उरलेल्या विधी पूर्ण करून रेवती आणि प्रमोद direct हनिमूनला जाणार होते….. त्यांच्या जवळच्या मित्रांनीच तसा पॅकेज त्यांना गिफ्ट दिला होता…..
मेघाला काही कामामुळे लवकर निघाव लागल…. तिने पॅकिंग केली आणि एअरपोर्टसाठी कॅब बुक केली…. कॅब येताच सगळ्यांचा निरोप घेऊन निघाली…..
पंधरा मिनिटांनी आणखी एक कॅब आली….. मेघाला एअरपोर्टवर नेण्यासाठी…
(मग आधीची कॅब कोणी बोलवली???)
तो कॅब ड्रायव्हर विक्रमला भेटतो आणि सांगतो… दियाही तिथेच असते…. विक्रम आणि दिया काळजीत पडतात…. विक्रम बाइक घेऊन मेघाला शोधायला निघतो…. घरी सगळे घाबरतील म्हणून दिया आणि रोहन इतक्यात कोणाला काही सांगत नाही….
विक्रम बाइक घेऊन थेट एअरपोर्टच्या दिशेने निघतो… अधून मधून तिला फोनवर contact करण्याचा प्रयत्न करत असतो…. पण तिचा फोन बंद येतो… या पंधरा मिनिटांत नक्की काय झालंय काहीच कळायला मार्ग नव्हता…
एअरपोर्टवर पोहचण्यासाठी लागणारा तासाभराच अंतर विक्रमने अर्ध्या तासात पार केला होता…. इथे रोहन आणि दिया सुद्धा तिला शोधण्याचा प्रयत्न करत होते….
विक्रम एअरपोर्टवर सर्वत्र चौकशी करतो पण मेघाचा काहीच पत्ता लागत नाही…. सतत रोहन आणि दियाला सुद्धा संपर्कात ठेउन असतो….
विक्रमच्या मनात मेघाबद्दल भीती वाटायला लागते….. दुपारपासून मेघाला शोधता शोधता रात्रीचे नऊ वाजतात…. इथे घरी सगळे विक्रम कुठे गेला म्हणून विचार करतात तस रोहन काहीतरी काम सांगुन वेळ मारून नेतो….
दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडतच होता…. आज आत्ता अचानक पावसाने जोर धरला होता …..
एका चहाच्या टपरीवर येऊन विक्रम थांबला…. तिथे पण मेघाचा मोबाईल मधला फोटो दाखवत तिची चौकशी करू लागला…. पावसात तो पूर्णपणे भिजला होता…
गार वाऱ्याची थंडी घालवण्यासाठी तो तिथेच थांबून चहा पीत बसला….. पावसाचा जोर वाढत होता…. म्हणून टपरीवालाही घरी जाण्याच्या घाईत होता…. सहज विक्रमला आठवले की त्याच्या सॉफ्टवेअर क्षेत्रातील मित्राकडे Location tracking device आहे…. आहे म्हणजे त्या device च काम सुरू आहे…
विक्रमने त्याची मदत घेण्याच ठरवल पण तो अशा ठिकाणी होता जिथे मोबाईलला रेंजच नव्हती…. तो परत घराच्या दिशेने मेन रोडवरून निघाला…..
थंडीने आता त्यालाही कापरी भरली होती पण तरीही मेघाला शोधण्याची वेगळीच ओढ लागली होती…. भर पावसात बाईक वेगाने चालवणं शक्य नव्हतं म्हणुन तो normal गतीने चालला होता…. आसपास नजर फिरवत होता की कुठेतरी मेघा दिसेल… असच जाता जाता रस्त्याच्या कडेला कोणीतरी पडलेल त्याला दिसल…. त्याने बाईक थांबवली आणि तिथे जायला लागला….
एकीकडे मेंदू पुढे जाण्यास नकार देत होत कारण येवढ्या पावसात अशा सामसूम ठिकाणी कोण का येईल…. कुणी लुटारू टोळी असली तर???? पण दुसरीकडे मन म्हणतं होत की न जाणो मेघाला अशी मदत लागली तर कोणीतरी करावी कदाचित आपली पुण्याई तिच्या कामी येईल…
विक्रम जवळ जाऊन बघतो तर ती एक स्त्री असते हे त्याच्या लक्षात येत… ती अक्षरशः चिखलात माखलेली होती…. ती पाठमोरी असल्याने तिचा चेहरा दिसत नसतो…. आणखी जवळ जाऊन तिला सरळ करताच तो चमकतो…. कारण ती मेघा असते…..
एक क्षण त्याला खूप आनंद होतो पण तिची अवस्था बघता तो थोडा काळजीत पडतो…. तिला उचलून बाईकवर बसवतो पण तिची शुद्धच हरपल्यामुळे थोड कठिण होत…. तो स्वतःचा शर्ट काढतो त्याला दोरी सारख पीळ घालतो आधी तिला बाईकवर बसवून स्वतः पूढे बसतो आणि त्या शर्टने तिला आपल्या पाठीवर घट्ट बांधून लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी पोहघण्याचा प्रयत्न करतो….
धो धो पावसामुळे रस्ता सुद्धा नीट दिसत नव्हता…. इतक्यात विक्रमचा फोन वाजू लागला पावसात रिंगटोन तर ऐकू येत नव्हती पण vibration मूळे कळाल….. गाडी थांबवून तो फोन रिसीव्ह करतो…. गावाच्या जवळपास आल्यामुळे मोबाईलने रेंज पकडली होती….
रोहन : Hello….. विक्रम??? कुठेस तु??? काही पत्ता लागला का मेघाचा आणि पावसात कुठेस??? काळजी करत आहेत सगळे…. आत्ता कुठे तुझा फोन लागलाय….
विक्रम : Relax…. मेघा भेटली पण तिची कंडीशन खूप खराब आहे…. मी नंतर सविस्तर सांगतो…. आम्हाला घरी पोहचायला बराच वेळ लागेल आणि पावसाचा जोर बघता सगळच कठीण आहे….
रोहन : okk मला सांग सध्या तुम्ही कुठे आहात???
विक्रम त्याला तो उभा असलेल्या गावच्या ठिकाणाच नाव सांगतो…. अनायसे त्या गावी रोहनचा डॉक्टर मित्र राहत असतो…. तो विक्रमला तिथे जाण्याच सुचवतो…. आणि स्वतः त्या मित्राला विक्रम मेघाच्या येण्याची कल्पना देऊन ठेवतो…..
मेघाची हालत बघता या पावसात दुसरा कोणताच पर्याय नसल्याने विक्रम रोहनच्या डॉक्टर मित्राकडे जातो…. डॉक्टर दारातच त्यांची वाट बघत असतो…. विक्रमला येताना बघून तोही धावत त्याच्याजवळ जातो आणि मेघाला सावरतो… दोघे मिळून मेघाला आत घेऊन येतात…. डॉक्टरच्या दोन मजली घराची care taker बाजूलाच राहत असते… तिच्या मदतीने मेघाचे ओले कपडे बदलून मेघाला आतल्या खोलीत बेडवर झोपवतात….
डॉक्टर : विक्रम…. मी तिला injection दिल आहे… तिला लवकरच बर वाटेल… तिला आराम करु देत… बाकी सगळं normal ahe…. देवाच्या कृपेने तिच्या सोबत काहीही वाईट घडलेल नाहीए… So calm down…
विक्रम : Thank you so much doctor…. देवासारखे भेटलात….
डॉक्टर : आता तुही चेंज करुन घे… त्या कपाटात माझे काही कपडे आहेत ते घे… तुही खूप भिजलायस…. By the way… मला हॉस्पिटलला निघायला हवं माझी night shift आहे… सकाळी भेटू …
येवढ बोलून डॉक्टर निघून जातो…. विक्रम कपडे बदलून येतो…. आणि मेघाचा हात हातात घेऊन तिचा निरागस चेहरा न्याहाळत तिथेच तिच्या उशाजवळ बसतो….शरिर थकल्यामुळे त्यालाही झोप लागते…. तो तिथेच मेघाचा हात हातात घेऊन बसल्या बसल्या झोपून जातो…..
इथे रोहन, दियाला मेघा सापडल्याच सांगतो….. घरी सगळे काळजीत पडतील म्हणून ते दोघे घरी काहीच सांगत नाही…. मेघा आणि विक्रम घरी आल्यावर सगळं खरं सांगायचं अस ते दोघे ठरवतात….
सकाळी विक्रमला जाग येते तेव्हा अजूनही अंधार पडलेला असतो…. तो घड्याळात पाहतो तर आठ वाजलेले असतात… तो खिडकी उघडून बघतो तर सर्वत्र पावसामुळे अंधार पडलेला असतो…. बाहेर अजूनही धो धो पाऊस पडत असल्याने सगळीकडे पाणी भरलेल असत….
विक्रम मागे वळून बघतो तर मेघा अजूनही झोपेत असते… तो तिलाच एकटक न्याहाळत असतो… इतक्यात मेघाला जाग येते…. आसपास नजर फिरवते तर सगळच अनोळखी असतं …. विक्रम तिच्या जवळ जाऊन बसतो…. त्याला बघताच तिचा जीव भांड्यात पडतो….
विक्रम : कशी आहेस मेघा??? तुला बरं वाटतंय ना???
(तशी मेघा विक्रमच्या गळ्यात पडून रडायला लागते, तिच्या मिठीत येताच विक्रमलाही वाटल की आपण आलिंगन द्याव… पण त्याने फक्त तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवला…)
विक्रम : मेघा… शांत हो… मी आहे ना इथे… Hmm… Please calm down…. (तिच्या डोक्यावरुन हळूवार कुरवाळत)
मेघा : (अजूनही प्रचंड घाबरलेली विक्रमच्या मिठीत रडतच होती…)
विक्रम : (विक्रमही काही वेळ तीला मोकळ होउ देतो) मेघा….ए मेघा…. ए वेडाबाई….. मी आलोय ना…. काळजी करू नको…. शांत हो आधी…. तु थांब मी तुझ्यासाठी first class coffee घेऊन येतो….
एव्हाना तिच्या लक्षात येत की ती नकळत विक्रमच्या मिठीत विसावली….
मेघा : (विक्रमच्या मिठीतून स्वतःला सावरत नजर चोरते…..) I am sorry…
विक्रम : It’s okay… मी coffee घेऊन येतो….
मेघा उठून फ्रेश व्हायला जाते पण पायात चमक भरल्याने तिला चालता येत नव्हते…. इतक्यात विक्रम कॉफी घेऊन येतो…..
विक्रम : काय झालं?? (तिला धडपडताना बघून)
मेघा : कदाचित पायात चमक भरली आहे…
विक्रम : हममम् बस इथे… कॉफी घे आधी….
मेघा : Thanks…
विक्रम : Thanks काय त्यात…. कॉफीच तर आहे….
मेघा : कॉफीसाठी नाही…. Thanks for everything….
(दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवतात… काही सेकंदात भानावर येऊन )
विक्रम : बघू कुठे पाय मुरगळला ते….
मेघा : आपण कुठे आहोत??? आणि तु मला कस शोधलस???
(मग विक्रम कालपासून ते आत्तापर्यंतचा सगळा घटनाक्रम मेघाला सांगतो… )
मेघा : माझ्यामुळे खूप त्रास झाला ना तुला…
विक्रम : बरं ते जाऊ दे…. काल नक्की काय झालं???
मेघा : काल कॅबमध्ये बसल्यावर काही अंतरानंतर ड्रायव्हरने अचानक गाडीचा वेग वाढवला…. मी त्याला गाडी थांबवायला सांगितली…. माझा विरोध बघून त्याने कसलासा स्प्रे माझ्या तोंडावर मारला…. त्यानंतर काय झालं मला आठवत नाही…. मला जेव्हा जाग आली तेव्हा मी एका पडीक खंडरमध्ये होते….अंधार पडत आला होता… आसपास फक्त झाडी होती…. मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण रस्ता काहीच कळत नव्हता…. माझा फोन, माझ सामान काहिच जवळ नव्हत… एका ठिकाणी सात ते आठ जंगली श्वापद होती मला बघताच माझ्या अंगावर धावून आली…. मी माझा जीव वाचवण्यासाठी पळत सुटले… एका दगडावर ठेच लागून पडले… कदाचित त्यातच माझा पाय मुरगळला असावा…. पण जीव वाचवण्याच्या नादात त्यावेळी कळल नाही…. त्यातच पाऊससुद्धा सुरू झाला… मी नक्की कुठच्या दिशेने चालले आहे हे पण माहित नव्हतं…. मी पूर्णपणे घाबरले होते…. धावून धावून पूर्ण थकले होते…. भर पावसात माझा अवतार बघून मेन रोडवर कोणी गाडीही थांबवत नव्हत…. त्यातच मला कधी ग्लानी आली माहित नाही…. आता जाग आली तेव्हा तुम्ही समोर दिसलात आणि जिवात जीव आला….
विक्रम : तुम्ही नाही तु म्हणं… तुम्ही पेक्षा तु जास्त जवळच वाटत….
(मेघा त्याला बघतच बसते….)
विक्रम : (तिच्या डोळ्यासमोर टिचकी मारून) कुठे हरवलीस…. ??
मेघा : काही नाही (स्वतःशीच लाजते)
विक्रम : बाहेर जागोजागी पाणी भरले आहे सगळे रस्ते बंद आहेत… मगाशी डॉक्टरचा पण फोन येऊन गेला… तो सुद्धा हॉस्पिटलमध्ये आहे पावसामुळे तोही अडकला आहे….
अरे….. मी बोलत काय बसलोय?? किचनमध्ये आपल्या खाण्याचा बंदोबस्त करतो… तु आराम कर….
(आणि तो किचनमध्ये निघून जातो)
क्रमशः
(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल, फोटो साभार गूगल ????????)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा