© शुभांगी शिंदे
विक्रम : बाहेर जागोजागी पाणी भरले आहे सगळे रस्ते बंद आहेत… मगाशी डॉक्टरचा पण फोन येऊन गेला… तो सुद्धा हॉस्पिटलमध्ये आहे पावसामुळे तोही अडकला आहे….
अरे….. मी बोलत काय बसलोय?? किचनमध्ये आपल्या खाण्याचा बंदोबस्त करतो… तु आराम कर….
(आणि तो किचनमध्ये निघून जातो)
आता पुढे...
का कळेना!! (भाग ५)
थोड्यावेळाने मेघाही तिथे येते…. विक्रम खाण्यासाठी काय बणवता येइल किंवा आता काय available आहे ते बघत असतो…. मेघा किचनच्या दारातूनच बघत असते…. रोहनने सांगितल्याप्रमाणे डॉक्टर unmarried आहे म्हणजे घरात काही उपलब्ध असणं कठीण होत …. तो फ्रीज उघडून बघतो तर त्यात ब्रेडच पॅकेट आणि अंडे, जॅम, बटर हेच थोड्याफार प्रमाणात होत…
ओट्यावर बास्केटमध्ये चार पाच मॅगीचे पॅकेट होते…. काल दुपारपासून उपाशी त्यामुळे भूक तर खूप लागली होती…. मस्तपैकी अंडाब्रेड खाण्याचा बेत केला आणि तयारीला लागला…. मेघा लांबूनच हसत होती…. तिच्या हसण्याचा आवाज ऐकून तो तिला आधी ओरडू लागला….
विक्रम : ( काळजीपोटी थोडस रागात ) मेघा….. तुला आराम कर सांगितले होते ना….??
मेघा : मी आता बरी आहे… आण ते.. मी ओमलेट बनवते…
विक्रम : का?? माझ्या हातच खाल्याने पोट बिघडणार नाहीए.…
मेघा : काय माहीत मला थोडीच त्याचा अनुभव आहे... (विक्रमला चिडवत)
विक्रम : हो का?? ( ओमलेट बनवता बनवता) मग आज खाऊनच बघ…
मेघा : हो मग.. खावाच लागेल… दुसरा पर्याय नाही ना (लटकेच गोड हसत)
विक्रम : हो का?? (उगाच खोटा राग दाखवत)
काही वेळाने दोघेही टेबलवर नाश्ता करायला बसतात
मेघा : छान झालाय पण… मीठ टाकायचे राहून गेले… (उगाच विक्रमला घाबरवत)
विक्रम : खरचं?? बघू… (आणि तो ओमलेट पाव खाऊन बघतो) काहीही……. बरोबर आहे सगळं…
मेघा : हो…. बरोबरच आहे सगळ (उगाच विक्रमला चिडवत)
दोघेही हसत खेळत नाश्ता संपवतात…. विक्रम सगळ आवरून ठेवतो…. मेघा बाहेरचा अंदाजा घेण्यासाठी बाल्कनीत जाते…. पावसाची सर तिच्या अंगावर येते…. गार वाऱ्याची झुळूक मनाला भुरळ घालून जाते…
आपले दोन्ही हात पसरवून ती त्या पावसाचा आनंद घेत असते… तिला भिजताना बघुन विक्रम तिला आत ओढतो… अडखळल्यामुळे तोल जाऊन ती विक्रमवर पडते, विक्रम बाजूच्या सोफ्याचा आधार घेत तिला सावरतो…
त्याचा स्पर्श, त्याचा सुगंध तिला भुरळ पाडतो… दोघाची नजरभेट होते…. या नजरभेटीत दोघेही हरवून जातात… इतक्यात Land-line वर फोन वाजल्यामूळे दोघे भानावर येतात…
विक्रम मेघाला सावरून सोफ्यावर बसवत फोन उचलतो… रोहनचा फोन असतो…. रोहनला हालहवाल सांगून विक्रम फोन ठेवून देतो… अशीच गप्पांमध्ये संध्याकाळ कधी होते कळतच नाही….
मेघा कॉफी घेऊन येते…. विक्रम मोबाईल Bluetooth ला कनेक्ट करुन गाणी लावतो…. बाहेर पडणारा पाऊस.. गार वारा.. आणि रेडिओवरील रोमँटिक गाणे… आहाहा काय योग जुळून आला होता…. रेडीओवाले पण अशा पावसात खूप छान गाणी लावतात…
????????सावन बरसे तरसे दिल
क्यूं ना निकले घर से दिल
बरखा में भी दिल प्यासा है
ये प्यार नहीं तो क्या है
देखो कैसा बेकरार है भरे बाज़ार में
यार एक यार के इंतज़ार में
सावन बरसे तरसे … ????????
दोघांनाही अशा वातावरणात अशा प्रकारची गाणी ऐकायला खूप आवडतात हे दोघांनाही आज माहीत झाल होत…
????????रिमझिम रिमझिम, रुमझुम रुमझुम
भीगी भीगी रुत में, तुम हम, हम तुम
चलते हैं, चलते हैं ????????
एका मागून एक गाणं वाजत होत आणि अचानक एक नवीन गाण सुरू झाले… मेघा गाण्याचा आवाज वाढवण्यासाठी उठते..
खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने तिच्या गालावरची केसाची बट उडत असते… अशा वातावरणात अशी सुंदर गाणी ऐकल्यावर कोणाचाही मूड बदलेल… तसच काहीस दोघांचही झाल होत… एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेम भावना उफाळून येत होत्या…. आणि अशात गाणं कानावर पडत
????????भीगी भीगी रातों में,
मीठी मीठी बातों में
ऐसी बरसातों में, कैसा लगता है
ऐसा लगता है, तुम बन के बादल
मेरे बदन को भीगों के मुझे छेड़ रहे हो ????????????
मेघा डोळे बंद करून हे गाणं अनुभवत असते… मंत्रमुग्ध असतानाच डोळे उघडते… अगदी समोर विक्रम उभा असतो…
मेघा वळून खिडकीजवळ पाऊस न्याहाळते… मुरगळलेल्या पायामूळे धडपडणार तोच विक्रम तिला दोन्ही हातांनी सावरतो…
????????बरखा से बचा लूँ,
तुझे सीने से लगा लूँ,
आ छुपा लूँ
दिलने पुकारा देखो, रुत का इशारा देखो
उफ़ ये नजारा देखो, कैसा लगता है
ऐसा लगता है, कुछ हो जायेगा
मस्त पवन के ये झोंके सैय्य़ा देख रहे हो ????????????
या रोमॅंटिक वातावरणात गाण्यांची जोड मिळाली आणि हे अल्लड मन त्यातच हरवून गेलं.
विक्रमने मेघाला आपल्या दिशेने वळवले….तशी मेघा हळूच त्याच्या मिठीत शिरते…. तोही तिला अलगद आपल्या मिठीत सामावून घेतो… त्या गाण्याच्या तालात असेच हरवून जातात…. त्याच्या ह्रृदयाची धडधड वाढायला लागते जी तिला स्पष्ट ऐकू येऊ लागते… त्याच्या स्पर्शाने तिच्याही अंगावर शहारे आले होते… पण जगातली सर्वात सुरक्षित जागा हीच आहे याची खात्री तिला होती… प्रेम कितीही उफाळून आल असल तरी प्रणयाची सीमारेषा त्यांनी ओलांडली नव्हती…. दोघेही असेच नंतर सोफ्यावर बसून होते… ती त्याच्या मिठीत त्याच्या हृदयाचे ठोके ऐकत कधीच झोपी गेली होती…..
सकाळपर्यंत पाऊस बऱ्यापैकी कमी झाला होता… रस्त्यावरच पाणीही कमी झाल होत… आता घरी निघायला हरकत नाही या विचाराने डॉक्टरचा निरोप घेऊन दोघे बाईकने निघतात…
मेघा अजूनही गालातल्या गालात लाजत असते…. आज घरी जाऊन आईबाबांना सांगून मेघाला आपल्या पास्ट बद्दल सगळं खर सांगून प्रपोज करायच विक्रमने ठरवल होत…. मेघाही खूप खुश होती…. तिनेही आपल्या भावना विक्रमला सांगण्याच ठरवल होत….
गाडी एकदाची विक्रमच्या आजोळी येऊन थांबते…. सकाळीच रोहन आणि दियाने मागच्या दोन दिवसाचा सारांश घरी आईबाबांना आणि रेवती, प्रमोदला सांगितला होता…. सगळे वाटच बघत होते…
मेघा आणि विक्रम घरात येतच होते…. इतक्यात समोरून शिखा येते… आल्या आल्या विक्रमला मिठीमारून ओठांवर हलकेच किस करते….. तिच्या येण्याने विक्रमला धक्काच बसतो…आणि तो स्तब्ध होऊन जातो…
मेघा त्यादोघांना अशाप्रकारे एकत्र बघून तिथेच थांबते.. बाकीचे मेघा जवळ जाऊन ती ठीक असल्याची विचारपूस करून मेघाची शिखा सोबत ओळख करून देतात….
शिखा : Hiiii मेघा…. मी शिखा…. विक्रमची बायको…
मेघा फक्त आश्चर्याने बघत बसते…. प्रमोद येऊन मेघाला मिठी मारतो...
प्रमोद : दी!! कशी आहेस?? चल तु.. आधी आत चल…
प्रमोद मेघाला हात पकडून आत घेऊन जातो… पण मेघाची नजर विक्रमवरच स्थिरावते… इथे शिखा अजूनही विक्रमचा दंड घट्ट धरून आहे…. पण विक्रम मात्र मेघालाच पाहतोय…
सगळे आत निघून जाताच विक्रम शिखाला दूर लोटतो….
विक्रम : का आली आहेस परत??
शिखा : (लाडात येऊन) अस नको बोलू ना… (मागून येऊन मिठी मारून) मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय…
विक्रम : Really??? आज दहा वर्षानंतर कळल तुला?? सगळकाही तुझ्या मनासारख घडत होतं तरी निघुन गेलीस… प्रेम करत होतो आपण एकमेकांवर… मग माझा विचार न करताच निघून गेलीस….
शिखा : I am sorry…. मूर्खपणा केला मी…. नितीनच्या खोट्या प्रेमाने भुरळ घातली होती मला… पण आता मी तुला सोडून कुठेच जाणार नाहीए….
विक्रम सरळ खोलीत निघून जातो… इथे आई बाबा सगळेच मेघाच्या अवतीभोवती आहेत…
आई : (मेघाच्या डोक्यावर वात्सल्याचा हात फिरवत) मेघा आता जास्त विचार करू नकोस… आराम कर… मी सर्वांसाठी पानं वाढायला घेते… जेवन करून घ्या सगळे…
बाबा : आणि आता मेघाला जास्त कोणी प्रश्न विचारू नका…
रेवती : आई मी पण येते ग मदतीला… (आणि रेवती किचनमध्ये निघून जाते)
दिया : मेघा….
बाबा : दिया तु विक्रमला बोलावतेस का जेवायला???
दिया : हो आलेच मी….
शिखा : (मेघा जवळ येऊन) काय ग मेघा… Any Problem?? तु नेहमीच अशी गप्प असतेस का??? (शिखाला अजून काहीही सारांश माहीत नाही…. )
बाबा : मेघा बेटे जा तू….. फ्रेश होऊन ये जा….
(आणि मेघा जाते) शिखा…मेघा आत्ताच आली आहे… जा आवरून ये… नंतर निवांत गप्पा मारा…
शिखा : OK… I don’t mind…
बाबा : रोहन…. पोलिसांना काही माहिती हाती लागली??
रोहन : नाही अजून… त्यांचा तपास सुरू आहे….
सगळे जेवायला बसतात…. आणि त्यांच्या गप्पा टप्पा सुरू होतात… मेघाच्या अगदी समोरच्या खुर्चीवर शिखा बसते… विक्रमही येतो… त्याच्यासाठी शिखाच्या जवळची खुर्ची रिकामी असते तो नाइलाजाने तिथे बसतो… शिखा सारखी विक्रमच्या मागे… हे वाढू का? ते वाढू का?? असच सुरू होत….
विक्रममात्र तिला avoid करत होता…. मेघाच जेवणात अजिबात लक्ष नव्हत…. विक्रमचीही काहीशी तीच परिस्थिती होती… बाबांनी हे बरोबर हेरल पण आता शांतच राहण पसंत केल….
मेघा : आईबाबा उद्या मला निघायला हवं. …म्हणजे इथले सगळे functions संपले आहेत.. आता पुढची तयारी करायला मला जाव लागेल….
आई : अग पण काय घाई आहे…. उद्या रेवती आणि प्रमोद हनीमूनला फिरायला जाणार आहेत… तु एकटी घरी कशी रहणार त्यापेक्षा पाच दिवसांनी आमच्या सोबतच नीघ....
मेघा : नको आई तिथे खूप काम खोळंबली आहेत…. मला जाव लागेल…. (कंठ दाटून )
शिखा : Mom म्हणतायत तर रहा ना… अजून आपली नीट ओळखही झाली नाहीए…. विक्रम तुच सांग ना आता…
आई : हो विक्रम तुच सांग… तुझ नक्की ऐकेल….
विक्रम : (मेघाला सगळं सविस्तर सांगता येईल या विचाराने) थांब ना मेघा…. Please… (जीवाच्या आकांताने)
मेघा : (डोळ्यातील अश्रूंचा बांध आवरता न आल्याने) जेवन अर्धवट सोडून जाते… )
दिया : मेघा.… अग….
तिला तस जाताना बघून विक्रमही बैचेन होउन उठुन जातो….
आई : अरे सोन्या आता तुला काय झालं ??
बाबा : जाऊ देत… थकले असतील दोघे…. तुम्ही जेवा सगळे….
दिया : (रेवतीच्या कानात हळूच कुजबूजते) यावेळेला मी जोडी जुळवायच्या आधीच जोडी जमली की काय ??
रेवती : Shut up दिया… It’s not possible… But … जर अस असेल then it’s very difficult to भाई…. (काळजी करत)
दिया : हममम् (काहीसा विचार करत) मी जाऊन बघते मेघाला …
दिया मेघाला भेटायला जाते तेव्हा ती गच्चीवर एकटीच विचारात गुंग असते…. (दिया मागून येऊन तिला घाबरवत)
दिया : काय ग कुठे हरवलीस??? आल्यापासून बघतेय…..
मेघा : ना…. काही खास नाही….
इतक्यात रेवती आणि रोहनही तिथे येतात….
रोहन : मला कोणी सांगेल हे शिखाच काय मॅटर आहे….
दिया : ए डफ्फर मॅटर काय?? काहीही???
रोहन : अरे म्हणजे विक्रमच लग्न झालं आहे हे कधी बोलला नाही तो…. आणि ही आज एकदम इथे उगवली म्हणून विचारलं…..
रेवती : मी सांगते…. Actually… शिखा आणि भाई एकाच कॉलेजमध्ये होते…. भाई last year आणि शिखा first year ला असताना त्यांची ओळख झाली… तिथेच भाईने तिला प्रपोज केलं आणि शिखाच कॉलेज संपल्यावर दोघांनी लग्न केलं…. बाकी त्यांची लव स्टोरी डिटेलमध्ये सांगण्यात मला अजिबात interest नाही… कारण ते खरच प्रेम होतं अस मला नाही वाटत…
शिखा आपल्या आजी आजोबांकडे वाढली… Her parents was separated… तरी लग्न सगळयांच्या सहमतीने झाले होते…. सगळकाही हिच्या मनासारखच केल होत…. Catholic wedding, Europe tour, येवढच काय तर लग्नानंतर वेगळ घर आणि वेगळा संसार सुद्धा… दिवसभर फक्त शॉपिंग, फिरण आणि पार्टी, रात्री उशिरा घरी यायच… हेच lifestyle….. नवीनच लग्न झाले आहे जबाबदारी सांभाळायला थोडा वेळ लागेल… म्हणून भाई सगळं ignore करत होता….
एक दिवस अचानक शिखा चक्कर येऊन पडली… डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर कळलं…. की, she’s pregnant… भाई तर जाम खुश झाला होता…. तिला कुठे ठेवू, नी कुठे नको अस झाल होत, त्याने घरी कळवल्यावर आई सुद्धा भाईकडे रहायला गेली…. specially शिखाची काळजी घेण्यासाठी….
दोन चार दिवस सगळं ठीक होत…. पण…. शिखाच्या मनात वेगळच चालू होत….
आजी आजोबांकडे थोडे दिवस रहायला जाते सांगून हि मैत्रिणीकडे रहायला गेली… आजी आजोबा घरी आले होते शिखाच अभिनंदन करायला तेव्हा कळाल की ती खोट बोलून दुसरीकडेच कुठे गेली पण कुठे गेली आणि खोट बोलायची काय गरज होती हे ती आल्यावर सविस्तर कळल….
मैत्रीण आणि तिच्या boyfriend ची मदत घेतली, म्हणजे मैत्रिणीच्या boyfriend ला नवरा म्हणून खोटी सही करायला लावली आणि abortion करुन आली….
शिखाला बाळ नको होत… तिला तीची नेहमीची लाईफस्टाईल गमवायची नव्हती… भाईच आणि तिच खूप जोरदार भांडण झालं…. रागाच्या भरात भाईने तिला कानशिलात लगावली… पण नंतर अजून एक संधी द्यावी असा विचार करून तीची समजूतही घातली… पण शिखा…. हट्टी होती… .गेली आठवड्याभराने नोट लिहून….
"Dear विक्रम,
मी जात आहे कायमची मला शोधण्याचा प्रयत्न करु नको… मला हवी असलेली lifestyle, माझ स्वातंत्र्य जगायला…. So good bye…
शिखा…."
त्या दिवशी जी गेली ती आज पाच वर्षांनी परत आलीए…. भाई खूप प्रेम करतो तिच्यावर…. आताही मनात आलं तर कदाचित तिला माफही करेल… शिखा भाईची निवड होती…. तिच्या बाबतीत सगळे निर्णय भाईच घेईल… म्हणून बाबाही शांत आहेत त्यांनी सर्व निर्णय भाईवर सोपवले आहेत…. त्याचा आनंद हाच आमचा आनंद….
इतक्यात शिखा तिथे येते… आणि तीला पाहून सगळे गप्प होतात...
शिखा : Hiiii… any secret meeting???? मी आल्यावर अगदी गप्प झालात सगळे….
रोहन : हो… मग काय?? (तिला चिडवत)
रेवती : (अगदी त्रासून) मी निघते… मला उद्याची packing करायची आहे….
दिया : रोहन आपण पण निघूया…. येतोस ना (आवाज वाढवून हलकेच रागात)
रोहन : हो हो... येतो ना …..
मेघाही जायला निघते तर शिखा तिला अडवते…..
शिखा : मेघा…. यार तु तरी बोल माझ्याशी…. बाकीच्यांचा राग मी समजू शकते पण…. It’s okay… Forget it…
तु काय करतेस ?? I mean professionally काय करतेस????
मेघा : Interior design करते मी….
शिखा : फक्त येवढच ना…
मेघा : घराला घरपण देते…. तुला नाही कळणार… मला आराम करायचा आहे येते मी….
शिखा : okkk…..
आणि मेघा निघून जाते….
रात्री सगळं आवरून सगळे आपाआपल्या खोलीत निघून जातात…. इथे शिखा विक्रमला मनवण्याठी पूर्ण तयारी करत असते…
थोड्यावेळाने विक्रम खोलीत येतो…. दार उघडून बघतो तर संपूर्ण खोलीत मंद असा सुगंध दरवळत होता…. चहूबाजूंनी रंगबेरंगी candles प्रकाशत होत्या…. बेडवर छान गुलाबाच्या पाकळ्या सजवल्या होत्या…. आणि समोर शिखा होती…. गडद लाल रंगाचा शॉर्ट टू पीस गाऊन… केसांचा बांधलेला मेसी बन…. त्यातून चेहर्यावर दोन्ही बाजूंनी गालावर ओघळणारी केसांची शीर हलकेच उडत होती…. गडद रंगाची लिपस्टिक तिच सौदर्य खुलवत होती…. एकेकाळी याच सौंदर्याच्या प्रेमात पडला होता विक्रम…..
शिखाने विक्रम आत येताच मागून दाराला कडी लावली…. आपल्या मादक चालीत त्याच्या जवळ गेली… पटकन त्याच्या मिठीत शिरून बिलगली…. तो अजूनही स्तब्ध होता… त्याच्या शर्टाची कॉलर बाजूला करुन त्याचा मानेवर किस करायला जाणार तोच विक्रम तिला दूर करतो…. आणि बाहेर जाण्यासाठी दार उघडायला लागतो पण शिखा त्याला मागून घट्ट मिठी मारते…. तिच्या लाडिक सुरात त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते….. पण विक्रम तिचे दोन्ही हात झटकून बाहेर निघून जातो…..
विक्रम बीचवर फिरत असताना त्याला काही अंतरावर मेघा दिसते…. वाळूत बसून छान निखळणारा समुद्राचा आवाज… आणि सुसाट वाहणाऱ्या वार्याचा गारवा यात आपल्याच विचारात गुंग होती…. तिच्या बाजुला काही अंतरावर रोहन आणि दिया गप्पा मारत बसले होते…
विक्रम हळूच जाऊन तिच्या बाजूला बसतो…. तोही एकटक त्या समुद्राच्या खळखळणार्या लाटांकडे पाहात असतो…. मेघा आणि विक्रमला एकांत मिळावा या हेतूने दिया आणि रोहन त्यांना सोडून फेरफटका मारायला निघून जातात…. विक्रम मेघाकडे वळुन बघतो…. ती शांत डोळे मिटून असते…
तो तिला बराच वेळ बघत होता…. मेघा तसच स्वतःला वाळूवर झोकून देते आणि डोळे उघडून निळाशार आकाशात चांदणे पहात बसते…. दोघेही शांतच… बोलायचं तर खूप काही आहे पण सुरूवात कुठून करावी इथेच सगळं अडल होत…..
विक्रम कुठे निघून गेला हे पाहायसाठी घरातून निघालेली शिखा त्याला शोधत शोधत बीचवर आली…. आणि लांबूनच तिने विक्रम आणि मेघाला एकत्र पाहिले….
विक्रम : मेघा मला तुला काही सांगायचे आहे….
मेघा : (उठून उभे रहण्याच्या तयारीत) मला माहीत आहे… रेवती कडून सगळं कळलय मला….
विक्रम : तु काहीच बोलणार नाही त्यावर….
मेघा : माझ्या बोलण्याने काय होणार आहे…. तुझी बायको परत आली आहे.. .. सगळ विसरून माफ कर तिला… After all तुझ प्रेम आहे तिच्यावर…. नव्याने संसार सुरू करा….
विक्रम : मेघा… आणि तु ???
मेघा : माझ काय विक्रम?? मी आली तशी जाणार….
विक्रम : (आश्चर्याने बघत बसतो… काहिच बोलत नाही)
मेघा : निघूया … उशिर झाला आहे खूप…
दोघेही घरी यायला निघतात…. समोर शिखा वाटच बघत असते…. त्या दोघांना एकत्र बघून रागाने लालबुंद होऊन खोलीत निघून जाते…. इथे मेघाही शांतपणे निघून जाते…. विक्रमचे बाबा लांबूनच सगळं पाहत असतात…. विक्रम तिथेच सोफ्यावर पाय पसरून, डोक्यावर हात ठेवून झोपून जातो….
सकाळी उठतो तेव्हा बाबा समोरच बसलेले असतात…. आई त्याला चहा आणून देते….
बाबा : विक्रम नात्यांमध्ये कधी संशय येऊ देऊ नये…. दोन दगडांवर पाय ठेवून चालण्यापेक्षा एकच काय तो निर्णय घ्यावा नेहमी… बाकी तुझा निर्णय तुच घ्यायचा आहे….
विक्रम : बाबा…. (एवढच काय ते बोलतो आणि बाबा उठून जातात)
रोहन : (नुकताच येतो ) अरे तु अजून ईथेच??? आवर लवकर प्रमोद आणि रेवती ला एअरपोर्टवर सोडायला जायच आहे…. आम्ही कधीपासून तयार आहोत…
विक्रम : आलोच तयार होऊन….
शिखा : ए मी पण येणार आहे….
दिया : आता हि कशाला?? ? (हळूच कुजबुजत)
शिखा : काही म्हणालीस का???
रोहन : नाही म्हणजे.. गाडीत जागा होणार नाही ना…. म्हणून (टेर खेचत)
शिखा : very funny (तोंड वाकडं करून)
रेवती आणि प्रमोद तयार होऊन येतात… देवघरात नमस्कार करून आई बाबांच्या पाया पडून निरोप घेतात…. विक्रमही तयार होऊन येतो…. इतक्यात रोहनचा मोबाईल वाजतो…
रोहन : Hello….
पोलिस : Hello…. Mr. रोहन… मेघा मॅडमच ज्याने अपहरण केल होत तो पकडला गेलाय…
रोहन : Great…., Sir…. पण काही कळल का त्याने अस का केल किंवा कुणाच्या सांगण्यावरून केल…
पोलिस : Actually हि सराईत चोरांची टोळी आहे… Functions च्या ठिकाणाची माहिती ठेवून असतात हे लोक… त्या कॅब एजंसीच्या माणसाला पण पकडले आहे आम्ही… तो एजंट ह्या टोळीला बुकिंगची माहिती पुरवायचा .. आणि ओरिजिनल कॅबवाल्या ऐवजी या टोळीची कॅब यायची….
रोहन : Ohhh my God…. हे तर जाम serious आहे…
पोलिस : हो… ह्यांचा मुख्य हेतू फक्त ऐवज लंपास करण्याचा होता… but don’t worry…. आता ते आमच्या ताब्यात आहेत…. I am sorry… पण त्याच्याकडून काहीच सामान हाती लागल नाही… हे चोर सगळं सामान ताबडतोब विकून टाकतात….
रोहन : It’s okay sir… सामानाच काही नाही… ते लोक पकडले गेले हे महत्त्वाचं…. Thank you… Thank you so much…..
पोलिस : My pleasure…. (फोन ठेवून देतात)
रोहन फोन ठेवून सगळं संभाषण बाकीच्यांना सांगतो….
आई : देवच पावला बाई…. चला पोरांनो निघा आता खूप उशीर होतोय….
सगळे गाडीत बसतात…. रोहन पुढे ड्रायव्हिंग सीटवर, त्याच्या बाजूला दिया… त्यांच्या मागे रेवती आणि प्रमोद… आणि सर्वात शेवटी मेघा, मध्ये विक्रम आणि त्याच्या बाजूला शिखा…. शिखा अगदी विक्रमला खेटून बसली होती… मेघाने आपल लक्ष खिडकीबाहेर ठेवणंच योग्य समजल….
एअरपोर्टवर पोहचल्यावर प्रमोद आणि रेवतीला निरोप घेऊन बाकीचे कॉफी शॉपमध्ये बसले कारण बाहेर नुकताच पाऊस सुरू झाला होता…. दिया, रोहन आणि मेघा एका टेबलवर बसले… विक्रम शिखाला घेऊन मुद्दाम दुसऱ्या टेबलवर बसतो… कारण मेघाच्या रात्रीच्या उत्तराने त्याचा इगो थोडा दुखावला होता… शिखा सोबत बघून किंवा त्याने तिला avoid केल तर ती चिडेल त्याच्याशी भांडेल अस विक्रमला वाटत होतं….
इथे कॉफी पीत असताना अचानक कुणीतरी मेघाला उत्साहाने हाक मारत… शिखा, विक्रम, रोहन, दिया सगळेच बघायला लागतात…
प्रितम : मेघा…?? मेघा सबनीस???
मेघा : प्रितम… Hiiii …. कसा आहेस आणि इथे कसा???
प्रितम : मी बसू का ईथे की उभ्यानेच उत्तरे देऊ…. (अगदी गमतीशीर माणूस)
मेघा : नाही म्हटलं तर नाही बसणार का???
दिया : तु already बसलायस....
मेघा : कॉफी?? (प्रितमला आग्रहाने विचारते)
प्रितम : नेहमी प्रमाणे माझ्या choice ची…. या पावसातली..
मेघा : Cold coffee with ice cream??? Right???
प्रितम : तुला अजूनही माझी choice चांगली माहित आहे…
अशाच गमतीशीर खूप गप्पा रंगतात तिथे… विक्रम काहिसा मेघाच्या मित्रावर चिडलेला असतो कारण आधीच मेघा कालपासून दुर्लक्ष करत होती आणि आता या प्रितमच्या गप्पांमध्ये रंगली आहे….
विक्रम : (रागात) निघायचे का?? तुमच्या गप्पा संपल्या असतील तर???
प्रितम : I am sorry…. मी तुमचा बराच वेळ घेतला…. पण तुम्ही सगळे आज संध्याकाळी माझ्या बर्थडे पार्टीला येताय… Okkk. .. मी पत्ता पाठवतो what’s app वर.. .. You all are invited…. (प्रितम आणि मेघा फोन नंबर exchange करतात)
शिखा : (विक्रमला मध्येच अडवून) हो आम्ही नक्की येऊ….
सगळे बील पे करून निघतात… यावेळेस रोहन विक्रमला ड्राइव्ह करायला सांगतो…. शिखा त्याच्या बाजूला…. मधल्या सीटवर मेघा आणि सगळ्यात शेवटी रोहन आणि दिया….
शिखा : प्रितम छान मुलगा आहे नाही???
रोहन : हो…. एकदम jolly माणुस आहे…
दिया : हो ना असा गप्पा मारत होता जसा कित्येक वर्षांपासून आम्हाला ओळखतोय….
शिखा : मेघा आणि त्याची जोडी छान दिसेल… हो ना??
विक्रम कच् करून गाडीचा ब्रेक दाबतो…. आणि मिरर मधून मेघाला बघतो… मेघाही आश्चर्याने शिखाला बघते…..
शिखा : काय झालं??? येवढा कचकन ब्रेक लावलास???
विक्रम : काही नाही… दगड आढवा आला… (उगाच कारण देत खरंतर त्याला शिखाच बोलणं hurt झालं होतं)
विक्रम परत गाडी स्टार्ट करतो.… पण गाडी काही स्टार्ट होत नाही… तो परत दोन तीन वेळा सेल्फ मारतो पण नाही गाडी काही केल्या सुरू होत नाही…. म्हणून बाहेर पडून गाडी चेक करतो…. पण काही उपयोग होत नाही….
विक्रम पावसात भिजत असतो…. घर अजून वीस मिनिटाच्या अंतरावर असत म्हणून सगळे चालतच जाण्याचा विचार करतात…
दिया : Wow….. What a romantic climate….
रोहन : मग काय विचार आहे ??? (हलकेच हसून)
विक्रम : तिथे चहाची टपरी आहे… थोडा वेळ थांबूया तिथे…
रोहन : (टपरीवर) दादा सगळ्यांसाठी तंदूर चहा ….
दिया : एक नंबर चहा मिळतो इथे … त्यातल्या त्यात तंदुरी चहा तर क्लास आहे….
शिखा : Really ???
थोड्यावेळाने लाल मातीच्या छोट्या मटका आकाराच्या भांड्यात चहा हजर होतो… ते छोटस भांड दोन्ही हातांच्या ओंजळीत धरायच…. त्या भांड्याचा गार हाताला होणारा ऊबदार स्पर्श आणि वाफाळलेल्या चहाच सुगंध घेत, या कुडकुडणार्या गारव्यात, फूरर्र फूरर्र करत एक एक घोट करत चहा प्यायची मजा फार वेगळीच असते…
मेघा : खरचं खूप मस्त आहे चहा. …
शिखा : हो खरंच…. Owesome आहे….
रोहन : (त्या पावसात आपल्या गुडघ्यावर बसून तेच चहाच छोट मठक पुढे करून) दिया…. या चहाच्या सुगंधाप्रमाणे तुही माझ्या आयुष्यात दरवळत राहशील?? सगळ्यांच्या जोड्या जुळवता, जुळवता आज आपली जोडी जुळवून घेशील???
शिखा : How romantic… (अगदी लाडिक होऊन)
दिया : (आनंदाने) डफ्फर… मगाशी हेच माझ्या मनात होत… I love you yaarrr.…
रोहन खुश होऊन yuuuu huuuuu... तिला उचलून घेतो… दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात…. वरुन पडणारा पाऊस आणि हवेतील गारवा याला आता नवीन ऊबेची गरज होती… दोघांचेही ओठ आता एकमेकांत गुंतलेले होते…. एकमेकांच्या श्वासात श्वास गुरफटत चालले होते…. थरथरणारं अंग नव्या जोमाने बहरायला लागल होत …. आणि टपरीवर एक गाण वाजत होत …
????????प्यार को हो जाने दो, प्यार में खो जाने दो
ऐतबार किसका है, इंतज़ार किसका है
अभी न हुआ तो फिर, कभी नहीं,कभी नहीं
प्यार को हो जाने दो, प्यार में खो जाने दो ????????
विक्रम आणि मेघा समोरासमोर फक्त एकमेकांना पाहत बसले आहेत….
क्रमशः
(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल ????????)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा