Login

का कळेना... (अंतिम भाग)

Short and sweet love story

© शुभांगी शिंदे


का कळेना!!  (अंतिम भाग)

विक्रम आणि मेघा समोरासमोर फक्त एकमेकांना पाहत बसले आहेत….


थोड्यावेळाने घरी पोहचल्यावर…


दिया : आत्तु….. ए आत्तु…. आम्ही आलो ग…

आई : (सगळ्यांना भिजलेले बघून ) लहान आहात का रे ?? अस पावसात भिजायला ??


रोहन : अहो गाडी बंद पडली...  मग चालतच आलो…


बाबा : फोन करायचा ना… दुसरी गाडी पाठवली असती….


शिखा : उलट बर झालं गाडी बंद पडली ते… काय छान पाऊस पडतोय… मुड फ्रेश झाला...


आई : हममम् (जरा रागातच मान मुरडली)

सगळे आपापल्या खोलीत निघून जातात…. थोड्यावेळाने विक्रम शॉवर घेऊन बाहेर येतो नी तसाच खिडकीतून बाहेर न्याहाळत राहतो….


शिखा त्याचे ओले केस पाहून टॉवेलने पुसायला जाते….. विक्रम त्याच्या आणि मेघाच्या याच पावसातल्या आठवणीत रमलेला असतो त्याला भानच नसते की सोबत शिखा आहे…..


विक्रम : (त्या रात्रीतली मेघाने मारलेली मिठी आठवत शांत डोळे मिटून) I love you …. Please अशीच माझ्या मिठीत रहा…. हे क्षण असेच राहू देत ….


शिखा : Thank you विक्रम … याच शब्दांसाठी कान आतुरले होते माझे …. (त्याची मिठी अजून घट्ट आवळून)


विक्रम शिखाचा आवाज ऐकताच भानावर येतो, तिच्या पासून दूर होत बेडवर जाऊन झोपतो…


शिखा : काय झालय विक्रम???


विक्रम परत काहीही न बोलता बाहेर निघून जातो…. मागच्या अंगणात पाऊस न्याहाळत मेघा उभी असते…. तोही यिथे जाऊन उभा राहतो….


विक्रम : का आलीस माझ्या आयुष्यात??? मी माझ्या लाईफमध्ये समाधानी होतो…. का मला नव्याने प्रेम करायला भाग पाडलस…. का???…. बोल ना?? (मनात वादळ आहे काहीच कळायला मार्ग नाही हा त्याचाच राग आहे)


मेघा फक्त डोळ्यात पाहतेय, नक्की काय आणि कसं उत्तर द्याव हेच कळत नाहिए….


विक्रम : एकट्याने छान जगत होतो मी… मला तुझ्या प्रेमात पाडून, मला इथे एकट्यालाच झुरत ठेवलेस… याची शिक्षा मी एकट्याने का भोगावी..??

आणि मेघाला दोन्ही हातांनी घट्ट धरून तिला स्वतःकडे ओढतो…


मेघा : It’s hurting विक्रम…. (विक्रमच्या बोलण्याने आधीच डोळे पाणावले आहे… मनातल्या भावना व्यक्त करताना मनात एक भिती पण आहे)


विक्रम : Hurting??? मी पण hurt होतोय तुला दूर जाताना पाहून… प्रेमात झुरत राहण्याची शिक्षा मी एकटाच का भोगू???? ती शिक्षा तुलाही मिळायला हवी…..


येवढ बोलुन विक्रम मेघाला अजून जवळ ओढतो… आणि पॅशनेटली आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवतो…. मेघा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते पण तो असफल ठरतो…


आज त्या ओढीत परत एकदा दोघेही हरवून गेले… आता तिच्याही नकळत त्यांची मिठी घट्ट होत चालली होती… संपूर्ण वेळ त्यांच्यासाठी इथेच थांबली होती… काही वेळाने भानावर येऊन दोघेही वेगळे होतात…. इतक्यात…..


आई : (आतून आवाज देत) विक्रम ???? विक्रम लवकर ये…. रोहन??… रोहन???

आईच्या हाकेला ऐकून सगळे जमा होतात… समोर शिखा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडली होती आई तिला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करत होत्या…. रोहन गाडी काढ.. (विक्रम म्हणाला )….तिला अस पाहून सगळेच घाबरतात…. विक्रम तिला उचलून गाडीत नेतो…. गाडी थेट हॉस्पिटलला रवाना होते…. मागोमाग दिया आणि मेघा सुद्धा हॉस्पिटलमध्ये दाखल होतात…..


डॉक्टरांची तातडीने हालचाल सुरू होते… रोहनचा डॉक्टर मित्र तिथेच असल्याने उपचारात जोर धरला जातो…. विक्रम आणि बाकीचे सगळे डॉक्टरांना विचारणा करतात…. शिखा कसल्याशा जीवघेण्या आजाराने ग्रस्त असल्याचे निदर्शनास येते.. आणि तिला ताबडतोब मुंबईला शिफ्ट करण्याचा सल्ला डॉक्टर देतात… विक्रमच्या तर पायाखालची जमीनच सरकते… शिखाला मानसिक आधाराची गरज असल्याचे डॉक्टर सांगतात…. विक्रम सगळी परिस्थिती घरी सांगतो आणि सगळे मुंबईला रवाना होतात….


विक्रम शिखाच्या आई वडिलांना बोलावून घेतो… ते वेगळे झाले असले तरी मुलीसाठी पहिल्यांदा एकत्र आले होते….शिखा अजूनही विक्रमची बायको होती… तिने जरी पूर्वी तिची कर्तव्ये नाकारली असली तरी शिखाच्या आजी आजोबांना दिलेल वचन विक्रम कसा विसरणार होता…”आमच्या नातीला आईवडीलांचा सहवास नाही लाभला…तुम्ही प्रेमाने लग्न केले आहे… शिखा थोडी अल्लड आहे पण तु समजदार आहेस… तु तिला अतंर देऊ नकोस वचन दे आम्हाला….” आज ते या जगात नाही… असते तर त्यांना माझ्या मनाची घालमेल नक्कीच कळली असती….


एक महिना झाला शिखा आता हळूहळू पूर्वपदावर येत होती…. घरी तिची खूप काळजी घेतली जात होती…. विक्रमही तिला कसलीच कमी पडू देत नव्हता…..


नवरा म्हणून असलेली सगळी कर्तव्ये तो चोख पार पाडत होता…. पण मनात मेघाची आठवण अजूनही कायम होती….


इथे मेघाने सर्व आठवणी मनातच दडवून आपल्या पूर्वायुष्याला सुरुवात केली होती…. विक्रमच्या आठवणीचा त्रास होऊ नये म्हणून स्वतःला कामात व्यस्त करुन घेतले होते… यातच मेघाला मोठा contract मिळाला US च्या कंपनीचा… त्यामुळे ती सहा महिन्यांसाठी US ला स्थाईक झाली होती….. रेवती आणि प्रमोद यांचा संसाराचा गाडा सुरळीत सुरू होता…..


************************************


आज सहा महिन्यांनंतर मेघा परत येतेय…. प्रमोद आणि रेवती दोघेही तिला आणायला एअरपोर्टवर गेले होते…. मेघा दोघांनाही बघून खूप खुश होते….


प्रमोद : दी…. आज घरी surprise party आहे… तुझ्यासाठी……


मेघा : Ohhh Wow…. अरे पण याची काय गरज होती…


रेवती : छोटासा get together आहे… दी….


मेघा : okkk….


मेघा घरी आल्यावर पाहते तर अगदी पार्टी वातावरणात घर सजवल होत… रोहन आणि दिया आधीच हजर असतात… दोघांना भेटून तिला फार बरं वाटतं…. मेघा फ्रेश होण्यासाठी रुम मध्ये जाते… बाहेर आल्यावर पाहते तर आई, बाबा आणि विक्रम बसलेले असतात…. बाजुला रोहन आणि दिया सुद्धा उभे असतात… 


विक्रमला बघताच जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या… नकळत डोळे भरून आले… पण कोणालाही तस जाणवू न देता ती आई बाबांना वाकून नमस्कार करते ….


मेघा : कसे आहात आई बाबा?


आई : आम्ही सगळे मस्त आहोत… आज खास तुझ्यासाठी आलो आहोत…


मेघा हलकेच हसून प्रतिसाद देते…. विक्रम अजूनही शांत बसून आहे… दोघांचीही नजर मिळवण्याची हिंमतच होत नाही….


बाबा : मेघा तुझी हरकत नसेल तर हा!!! आम्हाला तु सून म्हणून पसंत आहेस…. आज आम्ही तुला लग्नाची मागणी घालतो आहोत….
विक्रम आणि मेघा दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसतो….


प्रमोद : (मेघाचा हात हातात घेऊन ) दी…. हेच सरप्राईज होत तुझ्यासाठी….


आई : मेघा आज तुमच्या दोघांसाठी आम्ही हा सरप्राइज प्लान केला…. शिखा आता या जगात नाही… दोन महिने झाले…. पण जाण्याआधी तिने तुम्हा दोघांविषयी मला सांगितले….. येवढच नाही तर तिने तुझीही माफी मागितली… ती ज्या आजाराने ग्रस्त होती त्याविषयी तिला आधीपासूनच माहित होते… पण जाण्यापूर्वी तिच्याबद्दल कोणाच्याही मनात सल राहू नये म्हणून तिने सर्वांची मने जिंकण्यासाठी नव्याने सुरुवात केली…. आणि आपले शेवटचे क्षण आनंदाने घालवण्यासाठी ती इथे आली होती… तिला माहीत होतं की विक्रमच तिच्यावर खूप प्रेम होत आणि त्यामुळे तो तिला नक्की माफ करेल…. 


तुम्हा दोघांना एकत्र बघून तिला त्याच वेळी खात्री पटली होती आणि म्हणून काही दिवस सोबत राहून ती परत जाणार होती पण त्याआधीच तिच्या आजाराबद्दल आपल्याला कळल…. तिने विक्रमची देखील माफी मागितली की शेवटच्या क्षणीही स्वार्थ साधला म्हणून… हे सगळं तिने मला त्या वेळेस सांगितलं जेव्हा ती ventilator वर शेवटचे श्वास घेत होती….


विक्रम : आई??? मग मला का नाही सांगितलं इतके दिवस….


आई : तुम्ही तरी कुठे आम्हाला काही सांगितल….आणि जर सांगितलं असतं तर आजचा सुखद धक्का कसा अनुभवला असता….


बाबा : आता झाल गेल सोडून देऊया…. आता तुम्हाला जास्त वाट बघायला न लावता… आज, आत्ता , इथे तुमची Ring ceremony पण करूनच टाकू आपण काय ??

(आणि सगळे हसायला लागतात….)

मेघा एकदम लाजते… आता तिची नजरभेट व्हावी म्हणून विक्रमही उत्सुक आहे….


दिया आणि रेवती… मेघाला तयार करण्यासाठी घेऊन जातात….पण विक्रमला आधी एकट्यात तिला भेटायचे होते… तो तिची तयार होण्याची वाटच पहात खोली बाहेर उभा होता … रेवती आणि दिया बाहेर आल्यावर विक्रम आत जातो….


हिरवीगार पेशवाई सिल्क साडी नेसून, केसात आबोली आणि मोगऱ्याचा गजरा माळला होता तिने … समोरच्या खुर्चीत खाली मान घालून बसली होती मेघा … विक्रम तिच्या जवळ जातो.. आपल्या गुडघ्यावर बसतो…. उजव्या हाताच्या दोन बोटांनी तीची हनुवटी अलगद वर उचलतो…पापण्या अजूनही झुकलेल्या, त्या पापण्यांवर गुलाबी रंगाचा आय शॅडो, काळ्या रंगाचा आयलायनर, ओठांवर फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक, नाकात नाजूक नथ, माथ्यावर छोटीशी बिंदी… आणि त्या बिंदीचा डूल बरोबर कपाळावर लावलेल्या चंद्रकोरीच्या मध्यावर होता… तिला पाहून विक्रम पूर्ता घायाळ झाला….


विक्रम : आज त्या चंद्राची चांदणीही फिकी पडली माझ्या मेघा समोर…. एकदा नजर उचलून बघ तरी माझ्याकडे….


मेघा नजर उचलून विक्रमकडे बघते…. डोळे पूर्ण पाणावलेले होते…. आज अश्रूंचा बांध फुटला होता…. विक्रमने तिला आपल्या मिठीत सामावून घेतले आणि तिचे मन मोकळे करु दिले….


विक्रम : (काही वेळाने) ए वेडाबाई बस कर आता….. नाहीतर माझा शर्ट ओला होईल….


मेघा : (हलकेच चापटी मारत हसायला लागते) काय रे….?


आणि विक्रम तिला अजून घट्ट मिठी मारत तिच्या माथ्यावर हलकेच किस करतो…. विक्रम मेघा हातात हात घालून बाहेर येतात… त्या दोघांना एकत्र बघून सगळे खूप खुश होतात…. Ring ceremony छान पार पडते… रेवती आणि दिया दोघांवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करत असतात आणि रोहन म्युझिक सिस्टिम चालू करतो….


एक मी एक तू… शब्द मी गीत तू…
आकाश तू.. आभास तू…
साऱ्यात तू…

ध्यास मी श्वास तू…स्पर्श मी मोहर तू….
स्वप्नात तू सत्यात तू…
साऱ्यात तू…

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे…
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे…

बंध जुळती हे प्रीतीचे…
गोड नाते हे जन्मांतरीचे…

समाप्त….

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि  कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल ????????)

🎭 Series Post

View all