Login

का तर ती एक गृहिणी आहे म्हणून...भाग 3 अंतिम

Ka tr ti ek gruhini aahe mhanun

का तर ती एक गृहिणी आहे म्हणून... भाग 3 अंतिम

काल पार्टीतल्या ज्या बाया सुलभा बद्दल कुजबूज करत होत्या. त्या सगळ्या बाया ऑफिसमध्ये होत्या.
राजीव सुलभाला घेऊन गेला आणि


“हॅलो.. हाय..एव्हरीवन. एका व्यक्तीची ओळख करायची राहून गेली होती. मी आज तुम्हाला ओळख करून द्यायला आणलंय.”

सुलभा राजीवच्या बाजूला जाऊन उभी राहिली.
“ही माझी पत्नी.. हम्म माझी प्रिय पत्नी सुलभा. काल पार्टीमध्ये काही बाया हिच्याविषयी कुजबुजत होत्या की बिजनेस पार्टी आहे तरी कशी साडी नेसून आली, कशी टिपिकल दिसते वगैरे.

तर हे सगळं बोलणार्‍यांना मी इथे उत्तर द्यायला आलोय.

“ही माझी पत्नी सुलभा ,ही शरीराने जरी बडौल झाली असेल ना तरीही मनाने अजूनही तरुणच आहे.

ज्यावेळी आमचं लग्न झालं त्यावेळी सुलभा फक्त बावीस वर्षाची होती. ती सासरी आली आणि माझे दहा लोकांचं कुटुंब तिने सांभाळल, घरातली मोठी सून असल्याने सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावर पडल्या. पण तिने तर कधीच हात झटकले नाहीत. लग्नाच्या दोन वर्षानंतर पहिला मुलगा झाला त्या प्रेग्नेंसी मध्ये सुद्धा तिने भरपूर कामे केली पण काही कारणास्तव तिचे सिझेरियन झालं त्यामुळे तिच्या शरीरात भरपूर बदल झाले. त्यातून सावरून ती पुन्हा तिच्याकडे लक्ष देणार तर दुसरी डिलिव्हरी झाली आणि त्यानंतर पुन्हा शरीरात बदल व्हायला लागले.

तुम्ही रोज ऑफिस मध्ये येता, टीप टॉप राहता. स्वतःचा डबा तरी कधी स्वतः बनवता?  ही माझी पत्नी सकाळी पाचच्या गजरला उठते, माझा डब्बा, माझ्या मुलांचा डब्बा, घरचं सगळ  आवरून, सासू-सासऱ्यांचा चहा-नाश्ता औषध पासून सगळं करते. माझ्या दिवसभराचं काम मी बघतो,मी दिवसभर असतो. पण ही घरी राहून माझं घर सांभाळते. माझ्या कुटुंबाला सांभाळते. खरंतर जॉबला इथे मी येतो पण खरा जॉब तर तिचा असतो. ती माझ्या घरातली होम मिनिस्टर आहे. तुम्ही सगळे काल तिला इतकं बोललात, का तर ती एक साधी गृहिणी आहे म्हणून...

ती साधी गृहिणी असली तरी सगळ्यात जास्त काम ती करते. तुम्हाला तिची किंमत कळणार नाही कारण की तुम्ही पार्लरमध्ये जाता, टीप टॉप राहता. तिची साधी रहाणी आहे कारण तिला पैशाचं मोल आहे.

माझा नवरा दिवसभर ऑफिसमध्ये जाऊन कष्ट करतो तेव्हा हातात पैसे येतात याची जाणीव आहे तिला. तुम्हाला तुमची जबाबदारी नसेल पण तिला घरची जबाबदारी आहे. मी तिला महिन्याला जेवढे पैसे देतो त्यातुन घर कसं चालवायचं याचा बॅलेंसिंग तिला येत. पैसे किती खर्च करायचे, कुठे खर्च करायचे हे तिला माहीत आहे म्हणून ती माझ्या घरातली अकाउंटंट आहे.

घरी कोणाला काय काय आवडतं इथपासून  कुणाची तब्येत बिघडली तर हे सगळं ती एकटीने बघते.

यातलं तुम्ही काही करता? तर नाही. तुम्ही फक्त स्वतःच बघता.

तिच्यासाठी फॅमिली महत्वाची आहे. इतक्या वर्षात कधी तिने स्वतःकडे लक्ष दिले नाही कारण तशी तिला गरजच भासली नाही. तिच्या भोवताली आम्ही सगळे असताना तिला कधी गरज भासलीच नाही. ती आमच्यात पूर्णतः गुंतली आहे. तिचं प्रेम आमच्या कुटुंबावर आहे. कुटुंबावरच प्रेम तुम्हाला काय कळणार? तुम्ही फक्त स्वतःवर प्रेम करता. ती इतरांवर प्रेम करते आणि म्हणूनच वीस वर्ष होऊन देखील आज ती माझ्यासोबत आहे.  जशी जशी वर्ष वाढत आहेत तसा तसा आमचा संसार फुलतोय.” इतकं बोलून राजीव सुलभाचा हात धरून तिला घेऊन गेला.


ऑफिस बाहेर आल्यानंतर,
सुलभा राजीवकडे बघत होती.

“काय झालं, अशी का बघतेस?” राजीव
“आज तुम्ही माझ्या बाजूने बोललात त्याचं आश्चर्य वाटलं. कारण कालपर्यंत मी तुम्हाला गबाळीच वाटत होते. आज अचानक काय झालं?” सुलभा

“मी बोलतो तुला ते प्रेमानेच ग, माझ्या रागाच्या बोलण्यात पण तुझ्याबद्दल प्रेम असतं. तू माझ्यासाठी जे काही केलंस आणि करते आहेस ते मी कधीही विसरू शकत नाही. मला प्रमोशन मिळावं म्हणून तू तुझी नोकरी सोडलीस. आणि एक गृहिणी झालीस. आणि गृहिणी ही घरातली लक्ष्मी असते. मी तुला कितीही बोललो तरी चालेल ग पण इतरांनी बोललेलं मी खपवून घेणार नाही.

घरातल्या लक्ष्मीला कमी लेखू नये. बिनपगारी दिवसभर ती घरात राबत असते. एका गृहिनीच महत्व कळायला हवं. तिला हवं ते बोलणं, टोचून बोलणं चुकीचं आहे , तिला कमी लेखायच का तर ती एक गृहिणी आहे म्हणून.”

राजीवच्या या बोलण्यावर सुलभाने स्मितहास्य केलं आणि राजीवने तिला मिठीत घेतलं.

समाप्त:

आपल्या समाजात गृहिणीला महत्व देत नाही, ती घरीच असते, तिला काहीच काम नसतात. बहुधा असचं बोललं जातं. पण सगळ्यात जास्त काम तीच करत असते. सगळ्यांच करून देखील बोलणीही तिलाच खावी लागतात का तर ती एक गृहिणी आहे म्हणून..

धन्यवाद

0

🎭 Series Post

View all