Login

काळ आला होता, पण.. भाग -1

सामाजिक
भाग -1

काळ आला होता पण वेळ आली नव्हती - नाश होण्याची वेळ आली होती पण थोडक्यात बचाव झाला.
-------------------------------------------------------------------
" अनघा आय सी यु मध्ये आहे, तुम्ही लवकरात लवकर पोहचा. " विक्रांत मधुला बोलतो.

अनघा विक्रांतची बालमैत्रीण, अनघा आणि विक्रांत लहानाचे मोठे एकाच एरियात झाले होते, शिक्षण दोघांनी एकत्रच घेतलं होतं.

मधु म्हणजे माधवी, विक्रांत आणि अनघाची कॉमन फ्रेंड मैत्रीण.

मधु आहे त्या परिस्थितीत सिटी हॉस्पिटलला पोहचते विक्रांत डोक्याला हात लावून आय सी यु च्या बाहेर बसलेला असतो.

" हे नक्की झालं तरी काय ? अनघा ठीक आहे ना ? " मधु विक्रांत ला अनेक प्रश्न करते.

तेवढ्यात डॉक्टर आय सी यु च्या बाहेर येतात, डॉक्टर एक मोठा श्वास घेतात, " आपल्याला पोलीस स्टेशन ला कळवावे लागेल. आणि कळवन गरजेचं आहे, बरं तुम्ही कोण पेशंटचे ? " डॉक्टर विक्रांतला विचारतात.

" मि तिचा मित्र, ही मधू आमची मैत्रीण. " विक्रांत डॉक्टरांना सांगतो.

मधू चक्रावून जाते, नक्की काय घडलंय हे तिला कळलंच नव्हतं. ती विक्रांतच्या तोंडून ऐकण्याची वाट पाहत होती.

तेवढ्यात सुशांत येतो, सुशांत, मधु , विक्रांत आणि अनघा हे कॉमन एकमेकांचे मित्र होते. चौघांमध्ये चांगली मैत्री होती फक्त मैत्री आणि त्या मैत्रीत पाचव्याला सहभागी करून घेणं शक्य नव्हतं.

" मला घाईघाईत ने बोलावलं, काय झालं ? अनघा ठीक आहे ना ?" सुशांत विक्रांत आणि मधु ला विचारतो.

" मि सुद्धा कधी पासुन विक्रांतला हेच विचारतेय नक्की काय झालंय ? " मधु वैतागते.

विक्रांत शांतपणे बोलतो, " बलात्कार.. बलात्कार झाला आहे. "

हे ऐकून मधु आणि सुशांत शॉक होतात, " काय ? तु खोटं बोलतोयस विक्रांत.. " मधुला जास्त शॉक लागतो, ती सावरूच शकत नव्हती स्वतःला हे ऐकून.

सुशांत मधुला सावरत, " अरे काही काय बोलतोस ? हे कसं शक्य आहे ? अनघा ने मला कॉल केलेला ती आणि विनोद डेट वर जाणार होते. "

" अरे हो ती मला दोन दिवसांपूर्वी हेच मला ही सांगितलं तिने, मग विनोद सोबत असताना कसं शक्य आहे ? " मधु मनातली शंका बोलावून दाखवते.

" ते मला नाही माहित, मला जेव्हा सांगितलं तेव्हा मि सुद्धा असाच शॉक झालो. की कसं शक्य आहे ? मि जेव्हा अनघाला घटना घडली त्या ठिकाणी पाहिलं तेव्हा ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. " विक्रांत घडलेली घटना सांगतो.

" पण तुला कॉल करून कोणी बोलावलं ? " मधु विक्रांतला विचारते.

" हेच तर खुप मोठं शॉकिंग आहे की मला विनोद ने कॉल करून सांगितलं. आणि जेव्हा मि घटना स्थळी पोहचलो तेव्हा तिला रस्त्यावर एकटं टाकुन विनोद तिथे नव्हता. " सुशांत आणि मधु हे ऐकताच शॉक होतात.

" काय ? पण मग त्याला तु कॉल केला का ? " सुशांत विक्रांतला विचारतो.

विक्रांत हे पाहुन खुप रडत असतो, " केलेला पण त्या मुर्खाने फोन बंद ठेवलाय !" विक्रांत खुप चिडलेला असतो.

" पण मग आता हे कसं कळेल की बलात्कार नक्की कोणी केला ?" मधु बोलते.

" आणि बलात्कार होतं असताना हा विनोद कुठे होता ? ती एकटीच होती का ? " सुशांत आणि मधु, विक्रांत एकमेकांशी चर्चा करीत असताना तेथे पोलीस येतात.

" अनघा पाटीलला ओळखता का ? " सब इन्स्पेक्टर विचारतात कठोर आवाजात विचारतात.

विक्रांत उठून उभा राहतो, " हा साहेब आम्ही ओळखतो.. " पोलीस इन्स्पेक्टर त्या चौघांकडे ही पाहतात, " बरं तुम्ही कोण. भावंड की..? " सब इन्स्पेक्टर विचारतात.

" नाही ते आम्ही मित्र आहोत तिचे. " मधु घाबरत घाबरत बोलते.

" बरं.. बरं.. " आणि सब इन्स्पेक्टर आत आय सी यु मध्ये जातात.

काही वेळाने इन्स्पेक्टर बाहेर येतात, त्यांच्या सोबत एक लेडीज कॉन्स्टेबल आणि एक हवालदार असतो.

" हिला इथे कोणी आणलं ? आणि हिचे पालक कुठे आहेत ? " त्या इन्स्पेक्टर चा आवाज जरा चढलेला आणि कठोर होता. कोणी ही घाबरेल अशी पर्सनॅलिटी होती.

विक्रांत पुढे येतो, " मि... साहेब मि आणलं तिला इथे.. "

इन्स्पेक्टर वरतून खालून त्याला नीट न्याहाळतात, " हिचे आई वडील कुठे आहेत ? त्यांना बोलावून घ्या. "

" हो हो मि आता कळवतो त्यांना. " विक्रांत फोन काढतो आणि त्याच्या पुढ्यात कॉल लावतो.

" हॅल्लो... " समोरून अनघाच्या आई ने फोन उचललेला असतो.

" हा बेटा विक्रांत बोल, काय रे इतक्या रात्री कॉल केलास ते ? " समोरून अनघाची आई बोलते.