कालासूर भाग ३

पुनः एकदा या चक्रव्यूहात ती अडकणार की बाहेर पडण्यास सफल होणार
कालासूर भाग ३

काळात झालेल्या गोष्टी पुन्हा एकदा सामोरे येऊन आव्हान देतं होते अन् या गोष्टींपासून अभिन्न होती ती 'दोघं'. या चक्रव्यूहात ती पुनः अडकणार होती की त्यावर मात देणार होती.

कॅम्पिंगला जाण्याचा दिवस उजाडतो. मही आणि चैत्रा खूप खूश असतात. तिकडे लागणाऱ्या वस्तू त्या गाडीत नेऊन ठेवतं असतात. एवढ्यात गेट मधून बुलेटचा आवाज करत गाडी एंटर करते. अंगावर ब्लॉक लेदर जॅकेट आणि जीन्स, डोळ्यांवर गॉगल,  हातात ग्लोव्हज, चेहऱ्यावर वेगळंच तेज अन् समाधानी हसू असा नुकताच या अवतारात आलेला "रुद्र".

तो दिसताच वासू जाऊन त्याला मिठी मारतो अन् हसून स्वागत करतो. चैत्राही हसून ग्रीट करते.  तो महीकडे चोरटा कटाक्ष टाकतो तसा मही फक्त हलकं हसून प्रतिसाद देते. तसा एक सुस्कारा सोडत गाडीत जाऊन बसतो. तसे सगळे जाऊन बसतात आणि गाडी कर्कट डोंगरकडे वळू लागते.

वासू गाडी चालवत गप्पा मारत असतो आणि त्याचे पांचट जोक ऐकवतं असतो त्यावर मही आणि चैत्रा पोट धरून हसत असतात तर एकीकडे रुद्र महीचं निरिक्षण आरश्यातून  करतं होता. अशीच मज्जा मस्ती करत सगळे डोंगराच्या पायथ्याशी कुल्लाळेश्र्वर गावात पोहचतात. नावाप्रमाणेच महादेवाच्या भक्तीत लीन असलेलं गाव. त्या मंदिराचा महीमा अगाध होता. प्रसन्न वातावरणात आल्यानंतर महीच्या शरीरात एक वेगळ्याचं शक्तीचा संचार आला होता आणि वेगळंच तेज चेहऱ्यावर झळकू लागलं होतं.

एक धाबा पाहून चौघेही गाडीतून खाली उतरतात आणि धाब्यावर जाऊन नाश्ता करायला बसतात. मही, चैत्रा आणि वासूची मस्ती चालूच होती तर रुद्र फ्रेश होण्यासाठी रेस्ट रूमकडे गेला. काहीवेळाने नाश्ता येतो तसा सगळे पेटपूजा करून पुढच्या प्रवासाला निघतात.

सायंकाळची वेळ असते गाडी खाली लावून चौघैही डोंगर चढून वर जात असतात. एक ठिकाण ठरवून रुद्र पेंट लावत असतो तर वासू लाकडं आणि पाण्याच्या शोधात जातो. मही आणि चैत्रा दोघी आणलेलं सामान गाडीतून काढून‌ ठेवण्यात व्यस्त होत्या. काही वेळाने रात्र चढत होती. सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. अन् इथे एकीकडे उच्छाद मांडला होता. होम हवन पेटवला गेला होता. कोंबड्या, बकऱ्या अशा अनेक प्राण्यांचा बळी दिला जात होता. एवढं निर्घृण कृत्य चालू होतं बघणाऱ्यांचाही थरकाप उडेल आणि त्या पुढे "उघड बोंब्या कालासूर" अंगाला भस्म फासून थयथय नाचत होता.

ही..ही..ही..ही हाच तो रत्नजडीत हिरा आणि तो खजिना... हवेतचं एक वलय निर्माण झालं होतं पारदर्शकाप्रमाणे ते दिसत होतं. एका बंद खोलीत या गोष्टी दिसत होत्या अन् हे पाहून तो विचित्र दातांनी हसत असलेला बोंब्या कालासूर भेसूर आवाजात हसत होता अन् बोलू लागतो.

"पूर्वीपासून हाच तो रत्नजडीत हिरा, तो शिवकालीन खजिना आणि हेच ते जे मला हवं आहे मी या जगाचा स्वामी होईन" असे बोलून गडगडीत हास्य करुन त्याचे डोळे लालसेने भरलेले होते. लालसेच्या अधीन गेला होता त्यांच्या पुर्वजांसारखा पण नियतीने पुढे काय मांडून ठेवलं होतं त्या थोडी फारही भनक नव्हती. काळ त्याच्या पुढ्यात चालून आला होता.‌ शक्तीचा संचार झाला होता तिच्या स्वामींचा संरक्षणासाठी ती कालासूरचा संहार करण्यासाठी पुनः एकदा नव्या शक्तीने जन्मलेली होती.

सकाळच्या प्रवासाने थकायला झालं होतं म्हणून चौघेही झोपायला निघून गेले होते. सळसळत्या पानांमधून सरपटत तो जवळजवळ येऊ लागला होता. "फुसऽऽऽ फुसऽऽऽ "करत फुत्कारा सोडत तो आपल्या मालकीनीला शोधत आला होता ती आली आहे याची खबर त्याला लागली होती. तितक्यात मही दचकून उठली अंग पूर्णपणे घामाने ओलंचिंब झालं होतं. श्वासही खूप जास्तच चढला होता. मोकळी हवा घेण्यासाठी ती उठून टेंटच्या बाहेर आली आणि थोडं पाणी पिऊन बसली. रात्री पेटवलेली समोर शेकोटी आता थोडी शांत होऊन त्यातून धूर निघत होता. थोडी शांत झाली आणि परत त्या गोष्टींचा विचार करू लागली.‌ इथे आल्यापासून तिला खूप वेगळं वाटतं होतं. कोणी तरी आसपास आहे याचा तिला भास होतं होता. विचारांचं चक्र गतीने फिरत होतं तितक्यात मागून आवाज आला.

"कायं झालं झोप नाही येतं आहे का?"

"ना...नाही. असंच नवीन जागा आहे म्हणून जरा.." थोडंसं अडखळतच उत्तर दिलं.

"हम्म..".

"खूप छान वातावरण आहे ना इथे. स्वच्छ हवा आणि मनाला शांतता देणार..."

"हो... खूप सुंदर आणि विलोभनीय दृश्य आहे समोर पाहत मही बोलू लागते."

रुद्र ही समोर पाहू‌ लागतो. तसा लगेच बोलतो. "चल जरा फेरफटका मारून येऊ."तसे दोघेही उठून डोंगराच्या चढ्यावर जाऊ लागतात. हलक्या पावसाला सुद्धा सुरूवात झाली होती. हलक्या सरी अंगावर पडून‌ लुप्त होतं होत्या. पुढे चालतं असतातच की महीला थोडं वेगळं वाटतं आणि ती त्या जागेपासून आधीपासून अभिन्न आहे अशी वाट काढून चालतं असते. थोडं पुढे गेल्यावर तिच्या चेहऱ्यावर हलकं स्मित पसरतं आणि पुढे जाऊ लागते. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून महादेवाचे दर्शन करत प्रसन्न मुद्रेने ते बाहेर पडतात. थोडावेळ मंदिराबाहेरचा परिसर फिरून दोघे परत टेंटकडे जायला निघतात.

इथे वासू आणि चैत्रा अजूनही घोरत पडले होते. रुद्र आणि मही आल्यावर आधी त्यांना उठवायला गेले. चौघांनीही आवरून घेतलं. नाश्ता करून आता ते सगळे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी निघाले‌.

दुपारचा प्रहर होता. वासू भुकेने व्याकुळ झाला होता. तसा तो चालता चालता तांडव करू लागला.

"अरे यार मही चल ना इथे थांबू खूप भूक लागली आहे मला.." चिडचिड करत तो तिथेच बसतो.

रुद्र आणि चैत्राही त्याला साथ देत तिथे थांबतात मग महीला पण भुकेची जाणीव होते आणि सगळे दुपारच्या जेवणाची तयारी चालू करायला लागतात. चैत्रा आणि वासू वाळलेली लाकडं गोळा करायला जातात तर रुद्र आणि मही तिथेच थांबून बाकीची कामं करत असतात.

"पार्टीच्या दिवशी जे झालं त्यासाठी सॉरी" अचानक रुद्र बोलू लागतो.

"अ...हं..." मही थोडीशी गोंधळून त्याच्याकडे बघते आणि परत ती तिचं हातातलं काम करू लागते.

एक नजर तिच्याकडे पाहून ती काही बोलली नाही म्हणून तो ही शांत होत काम करू लागतो. अजूनही त्यांच्यात अबोला होता पण तो कधीपर्यंत टिकणार होता त्यांनाच माहित होतं.


क्रमशः
©®प्रणाली कांचन कृष्णा शिंदे


🎭 Series Post

View all