या सगळ्या विचारतचं शिवन्या शिखाला सोडून घरी पोहचते. थोडी रिलॅक्स होऊन घरात आईला थोडी स्वयंपाक घरात मदत करून स्टडी रूम मध्ये अभ्यास करायला बसते. तितक्यातच तिच्यासमोर एक रोलिंग केलेला नकाशा नजरेस पडतो.
शिवन्या मनातच ' अरे हा इथे कसा? सकाळी मी निघताना तर टेबल आवरून निघाली होती. मग अचानक कसा आला ? आईला विचारायला हवं.'
" आई..ऽऽऽ ए आई " शिवन्या आरडाओरडा करतचं खोलीतून बाहेर पडली.
" बोल लाडू, काय झालं ओरडायला ?"
" ए आई, हा नकाशा कुठून आला तू ठेवलास का माझ्या खोलीत नेऊन ? प्रश्नार्थक नजरेने तिने आईकडे पाहिले.
"अगं हो, दुपारी तो कुरिअरवाला आला होता त्याने आणला तुझ्या नावाचा. तूच मागवलास ना मग मला काय विचारतेस ? एक तर तुझ्या या आगळ्या वेगळ्या रिसर्च त्यातून तू काही मागवायचं आणि वरून मलाचं विचारायचं कोणी आणलं. लाडू तू दिवसेंदिवस विसरत चालली आहेस का ? शेवटच्या आठवड्यात तू ते काय अँन्टीक घड्याळ मागवलं तरी तुला माहीत नाही बोलते आणि आता हा नकाशा." आई कमरेवर हात ठेवून शिवन्याकडे बघत म्हणाली.
पण शिवन्या ऐकायला तिथे नव्हतीच. ही पोरगी ना कधी काय करते हिलाचं ठाऊक नाही आणि वरून मलाच विचारते. हे कोणाचं आहे, हे कोणी आणलं... आई बडबड करत स्वयंपाक घरात निघून गेली.
इथे खोलीत शिवन्या त्या नकाशाकडे निरखून पाहत होती. खूप वेगळाच नकाशा वाटतं होता. वेगळी चित्र, एकीकडे गोळे गोळे करून ठेवलेली ठिकाणं, एका ठिकाणी शिवाची नजर पडताच तिचा चेहरा पांढरा फटंक पडला. तसा तिने तो नकाशा पटापट गुंडाळला आणि कपाटात ठेवून दिला.
" हे...हे कसं? म्हणजे नक्की काय आहे? तो नकाशा आ...आणि हे.." खूप प्रश्न पडूनही ती निरूत्तर झाली होती. काळाचे चक्र तिच्या समोर येऊ पाहत होते. पण तिला ना त्याची अनुभूती होती ना पुढे जाऊन तिच्यासोबत काय घडणार आहे हे तिला माहीत होतं.
-----------------------------------------------------------
हळू हळू कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टीची तयारी सुरू झाली होती आणि प्रत्येक जण आपल्या पार्टनरच्या शोधात इकडे तिकडे मुलांना आणि मुलींना विचारायला चालू केलं होतं. कोणाला ना कोणाला मनासारखे पार्टनर मिळालेही होते. शिखालाही तिचा पार्टनर मिळाला होता पण ती कट्ट्यावर बसून शिवाची वाट बघत होती.
" अरे..!! यार ही शिवा ना एक तर आज लेट येणार मग पार्टनर कधी शोधणार काय माहिती ?" शिखा कॉलेजच्या गेटकडे बघत एकटी बडबडत असते. तितक्यात शिवाची एन्ट्री होते आणि ती शिखाजवळ येऊन थांबते.
" सॉरी खूप लेट झाला ना.. चल लवकर चल नाही तर लेक्चर मिस व्हायचं." शिवा गडबड करत क्लासरूमच्या दिशेने धावत होती आणि शिखा पाठी होती. इतक्या समोर ती कोणाला तरी जाऊन आदळते.
" सॉरी... सॉरी.... सॉरी" शिवा गडबडीत बोलून क्लासरूममध्ये घुसते.
" काय रे अन्या ही अशी वाऱ्यासारखी आली आणि वाऱ्यासारखी वेगाने गेली." तो अनिकेतला बोलला.
" शिवन्या इनामदार नाव आहे तिचं. एकही लेक्चर बंक करत नाही ही मुलगी. साहित्य आणि ऐतिहासिक रिसर्चसाठी खूप वेडी." अनिकेतने तिची छोटी ओळख करून दिली.
" तुला कसं माहिती रे हिच्याबद्दल एवढं सगळं ?" प्रश्नार्थक नजरेने त्याने अन्याला विचारले.
"अरे वाटते साधी सरळ पण कोणी वाकड्यात गेलं ना तिच्या मग काय त्या माणसाचं खरं नाही. त्या दिवशीच सांगतो ना. त्या रॉकीला कॅम्पसच्या मधोमध उभं राहून कानाखाली वाजवली होती. मुलांची रॅगिंग करत होता. हिने पाहिलं आणि हाणलाच चांगला. दोन आठवडे झाले तो कॉलेजला येत नाही." अन्या हसत हसत किस्सा सांगत होता.
हा त्याच्या विचारात तिचा विचार करायला लागला अन् ती गेलेल्या दिशेने पाहत होता.
" अरे ! अंश चल ना आपल्याला फ्रेशर्स पार्टीची अरेंजमेंट पण बघायची आहे." अन्या त्याला खेचत नेऊ लागला.
" हा चल." अंश बोलला.
" तुला कळत का शिवा? माहिती आहे का तुला आता तू कोणाला धक्का मारून आलीस. अगं तो काय साधा सुधा वाटला का? हा त्याचा स्वभाव आहे लाघवी पण जर कळलं ना की तू अंशला धक्का मारला आणि साधं वळून माफी पण नाही मागितली तर किती चर्चा होईल." इकडे शिखा चांगलीचं शिवावर चिडली होती.
" अगं मग काय झालं माणूसच आहे ना तो आणि आपण घाईत होतो म्हणून धावत सुटलो. त्याला मी नाही बोलली की तिकडे खांबासारखा उभा रहा. त्याची चूक आणि मी त्याची माफी मागायची ?" शिवा शिखाला बोलली.
" अगं हो पण शिवा तो 'शिवांश राजाध्यक्ष' आहे. या कॉलेजच्या ट्रस्टीचा मुलगा. उद्या त्याच्या मनात आलं की हीच ती होती. धक्का मारून साधी माफी पण नाही मागितली म्हणून.." शिखा अजून चिडून बोलत होती.
शिवाने पण जास्त ओढाताण न करता तिथेच विषय संपवला आणि लेक्चरकडे लक्ष देऊ लागली. अन् शिखा तिला गुरगुरत पाहत होती.
शिवा स्वतः च्या विचारात मग्न झाली, ' हूं आला मोठा असेल कोणी पण चूक त्याची होती. खांबासारखा मी नव्हते बोलले त्याला उभा रहा म्हणून. जाऊदे शिवा वेळ आल्यावर बघू.'
"नियतीने पुन्हा खेळीला सुरूवात केली होती. डाव रचला होता, जाळं पसरलं होतं, पण यातला राजा यावेळी पुनः तयारीनिशी आला होता."
क्रमशः
© प्रणाली कांचन कृष्णा शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा