कबंध भाग १

भयंकर बातमीने गोंधळून गेलेला रुस्तम आपल्या कामा करता मोठ्या मुश्किल ने परीवाराला सोडून जायला तयार झाला होता.
वर्तमान पेपरमध्ये रोज मृत्यूच्या घडणा-या घटना वाचून रुस्तमला आपल्या कुटूंबाची नेहमीच काळजी वाटत होती. रुस्तमला बिजनेस मिटिंग करता आठवडा तर कधी दोन आठवडे घरापासून दूर रहावे लागत होते. घरात आई-वडिल, बायको मारीया, मुलगा ईशान आणि मुलगी रुही असा छोटासा परीवार होता.

काल परवाचीच गोष्ट होती, रुस्तमच्या गल्लीतले आजोबा बेपत्ता झाले होते. आणि शहानिशा करताच त्यांची धडापासून वेगळी झालेली बाॅडी एक सुमसामा ठिकाणी रस्त्याच्या कडेला गोणीत भरलेली आढळून आली होती.

पोलिसांचा शोध सुरु झाला होता. कारण अशी घटना त्यांच्या करता नविन नव्हती. एका जिल्हातून दुस-या जिल्हात एका मागोमाग अश्याच घटना घडत होत्या. पोलीसांची स्पेशल टिम देखील याकरता नेमली गेली होती.

रुस्तमला बिजनेस मिटिंग करता यावेळी आठवडा भरासाठी गेला होता. जावू की नको या विचारत त्रस्त असणारा रुस्तम मोठी आॅर्डर मिळत असल्याने मनावर दगड ठेवून अखेरीस रात्रीची टॅक्सी बूक करुन जायच्या तयारीत होता.

रुस्तमचे पोहचण्याचे ठिकाण गावाच्या थोडे आतल्या बाजूला असल्याने अनेक टॅक्सी त्या बाजूला जाण्यास तयार होत नव्हत्या.

" ओ दादा.. थांबा की जरा, मला त्या जागेवर अर्जंट पोहचायचे आहे. आता रात्रीच अस कितीवेळा वाट पाहत बसायचे मी."

" साहेब, तुम्ही तुमच्या ठिकाणी पोहचून आरामात पुढिल कामास सुरवात कराल. पण माझं काय?? कुटूंबाची जबाबदारी आहे माझ्यावर. त्यात बायको आजारी आहे जराशी. तिच्या दवाखान्यासाठी पैसे नको का?? तुम्ही सांगता त्या ठिकाणावरुन परत येताना मला काय भाडं मिळणार नव्हते."

" हव तर.. दोन-चार पैसे जास्त घ्या. पण मला पोहचवा त्या ठिकाणी."

" साहेब समजून घ्या मला. माफी असावी."

एवढे बोलून टॅक्सी ड्रायवर तिथून निघून गेला होता.

इंजिनियर बनून सोफियाने अनेक ठिकाणी नोकरी केली होती. तिचे काम पाहून सोफियाला साहिलने पार्टनरशिप करण्यासोबतचा निर्णय बोलून दाखवला होता. कन्स्ट्रक्शन कंपनी स्थापन करुन फायनान्स हवा तेवढा पुरवला जाणार होता. सोफियाला मेहनत आणि बुद्धीच्या जोरावर अनेक साईटची कामे निर्विघ्न पणे पार पाडत कंपनीचे काम पाहयाचे होते.

सोफिया आधी हे काम आपल्याला जमेल की नाही या विचारात होती. एवढी मोठी जबाबदारी स्विकारताना आपल्या हातून जर एखादी चूक झाली आणि साहिल सरांना ती पटली नाही तर आपल्याला कायमचे काढून तर नाही ना टाकणार. या विचाराने सोफिया चिंतेत होती.

अखेरीस सोफिया उत्तमपणे तिचे काम पार पाडत होती. साहिल देखील तिच्या कामावर खूश झाला होता. कामा निमित्ताने दोघांच्या भेटी गाठी वाढत चालल्या होत्या. हळूहळू दोघांमधे मैत्री निर्माण होत चालली होती.

हि मैत्री कधी प्रेमाच्या रुपात रुपांतरीत झाली हे दोघांनाही माहित नव्हते. एकमेकांचा सहवास दोघांना हवाहवासा वाटत होता. सोफियाने साहिल समोर लग्न करण्या विषयी विचारले होते.

" लग्नाची काय घाई आहे एवढी. आपण अजून एकमेकांना समजून घ्यायला थोडा वेळ घ्यायला हवा असे नाही का वाटत तुला."

" बरोबर आहे तुमचे. पण असे किती दिवस लपून-छपून भेटत बसायचे. आपल्या नात्याला आता नाव द्यायची वेळ आली आहे."

" मैत्रीच्या धाग्यात तर आपली मैत्री गुंफली गेली आहे ना. मग झालं तर."

" एक ना. मला वाटते आपण अष्टविनायकाचे दर्शन घ्यायला हवे. बाप्पाच्या आशिर्वादाने आपल लग्न निर्विघ्न पणे पार पडेल. मग आपण घरच्यांना सांगून लग्न करण्याचा प्रस्ताव मांडूया."

" घरचे तयार होतील की नाही माहित नाही. मी तुझ्या बरोबर कधीही पळून यायला तयार आहे. माझ्या घरचे ऐकायचे नाही."

" आधी दर्शना करता तर जावून येवूया."

" जस तुला योग्य वाटेल तसे करुया."

दर्शन घेत असताना, "देवा माझ्या आयुष्यात सोफियाला आणल्याबद्दल मी तुझे अत्यंत ऋणी आहे. हिची साथ मला आयुष्यभरासाठी हवी आहे. तू त्या प्रकारची परीस्थिती निर्माण कर आणि माझ लग्न तिच्यासोबत होवू दे."

अष्टविनायकाचे दर्शन झाल्यानंतर सोफीया आपल्या घरी निघून गेली होती. तिने आपली मैत्रिण स्वरा हिला साहिल बरोबर लग्न करण्याच्या निर्णयाबाबत सांगत होती.

" अस काय बोलते तू. मैत्री आणि पार्टनरशिप बाबत ठिक होते. पण तू एका लग्न झालेल्या मुलाबरोबर कस काय नात जोडत आहेस."

" काय सांगते तू हे. मला खरच याबाबत माहित नव्हते. साहिलने त्याचे लग्न झालेलं मला या आधी सांगितले नव्हते."

" फक्त लग्नच नाहीतर त्याला डाॅली नावाची पाच वर्षाची मुलगी देखील आहे."

"हे सगळे भयंकर आहे. मी आजच त्याची नोकरी आणि पार्टनरशिप सोडून देणार आहे. मला आता त्याच्याशी कोणताच सबंध ठेवायचा नाही."

आपण जो निर्णय घेत आहोत त्याने भविष्यात कोणते संकट तर ओढवणार नाही ना याचा विचार सोफिया करत होती. विचार सुरु असताना साहिलचा फोन आला होता. साहिलचा फोन घ्यावा की नाही याचा विचार सोफिया करत होती. एकदा फोन कट करुनही साहिल तिला सारखा सारखा फोन करत होता.

अखेरीस साहिलचा फोन तिने उचलला होता.

" तू आज मला समीर हाॅटेलला भेटशील का? मला तुझ्याशी जरा महत्वाच्या विषयावर बोलायचे आहे."

"आज नाही जमणार मला पण उद्या नक्की भेटूया आपण. तुझी खूप आठवण येते मला. मिस यू जानू."

" चल भेटूयात मग आपण उद्या."

" काय झाले ग सगळे ठिक आहे ना? "

" हो. अस काय विचारतो तू."

" नेहमीप्रमाणे तू माझ्या बोलण्यावर सेम टू यू बोलली नाहीस ना."

" थोड काम चालू होत माझे. ऐक ना मी फोन ठेवते भेटूया आपण. "


क्रमशः

🎭 Series Post

View all