कबंध भाग २

सोफाया टॅक्सी ड्रायवर बरोबर ठरलेल्या ठिकाणी पोहचला. समोर दुसरे संकट ओढावले होते.
मागच्या भागात आपण पाहिले सोफियाला तिच्या मैत्रिणीकडून साहिलच्या लग्नाबाबत तसेच त्याला एक मुलगी आहे हे समजले होते. अचानक असे सत्य डोळ्यासमोर आल्यानंतर नेमकं करायच देखील काय? या प्रश्नार्थक विचाराने साहिलशी बोलून यावर मार्ग काढण्याचे सोफियाने ठरवले होते. आज ते दोघे भेटणार होते.

सोफियाला यायच्या आधीच समीर हाॅटजलमध्ये साहिल आधीच पोहचला होता. सोफियाला आवडणारे टोस्ट सॅण्डविच, कोल्ड काॅफीची आॅर्डर साहिलने आधीच दिली होती.

" तू कधी आलास? मला यायला उशीर झाला का खूप."

" नाही ग मी दिलेल्या वेळेच्या आधी आलो होतो जरा. एका मित्राला स्टाॅपवर ड्राॅप करायचे होते."

" आॅर्डर देते मी थांब."

इतक्यात टोस्ट सॅण्डविच आणि कोल्ड काॅफी घेवून वेटर त्यांच्या टेबल जवळ येत होता.

आपल्याला आवडणारे सॅण्डविच आणि कोल्ड काॅफीवर असणारे हार्ट शेप चाॅकलेटचा आकार पाहून कसं विचारावं साहिलला असा प्रश्न सोफियाला पडला होता.

सोफियाचा हात हातात घेवून,
"तुला माझ्याशी बोलायचे होते ना, सोफू बोल ना."

" आपला हात साहिलच्या हातातून बाजूला सारत, जरा स्पष्ट मुद्यावर येते मी."

" एवढं सिरीयस आहे का काही?"

" तूझे लग्न झाले हे खर आहे का? आणि तुला एक मुलगी देखील आहे."

" मी तुला सांगणार होतो. पण तू मला सोडून जाशील या विचाराने मी तुझ्यापासून हि गोष्ट लपवून ठेवली होती. कधी‌ ना कधी हे उघड होणार होतेच याची खात्री होतीच मला."

" तू मला अंधारात ठेवून माझ्याशी संसार करणार होतास का? "

" लग्न झाल्यावर मी तुला सगळे काही शांतपणे समजून सांगणार होतो."

" बरोबर आहे तुझे. एकदा लग्न झाले की मी तुला कुठेच सोडून जाणार नाही हे तुला माहित होते ना. माझी तू फसवणूक केली आहेस."

" अग नाही. तुला गमवायची भिती होती. म्हणून माझा धीर होत नव्हता तुला सांगायचा."

" पण मला आता तुझ्याशी कोणताच सबंध ठेवायचा नाहीये. आपलं नात आता इथेच थांबलेलं बरे. कोणाच्या संसारात मला अस विष कालवून स्वत:ला सुखी झालेलं नाही पाहवणार."

" अस बोलू नकोस. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. प्लिज मला सोडून जावू नकोस ना? "

" आता बोलून काहीच होणार नाही. आणि हो आपली पार्टनरशिप देखील मला नाईलास्तव सोडावी लागणार आहे आत. "

" अग निदान कामा पुरते तरी आपण एकत्र येवूच शकतो ना? "

" नाही. आता मला नाही राहायचे काॅन्टॅक्ट मधे."

सोफिया साहिलला सोडून त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती. सोफिया आता दुसरे काम मिळवण्याच्या शोधात होती. दोन-तीन ठिकाणी मुलाखती दिल्यानंतर तिला कुठेच नोकरी मिळत नव्हती. एका ठिकाणावरुन स्पष्ट नकार देण्यात आला होता. साहिल सारख्या मोठ्या बिजनेसमन बरोबर पार्टनरशिपचे काम सोडून असे अचानक बाहेर पडण्याचे त्यांना पटेल असे कारण वारंवार मागत होते.

सोफियाला पैशाची गरज होती. तिच्या बहिणीचे कॅन्सरचे आॅपरेशन तातडिने करायचे होते. युसूफ काकांच्या गाडीवरचा एक ड्रायवर कालच नोकरी सोडून कायमचा गावी गेला होता. हि बातमी आशा चाचीकडून सोफियला समजली होती.

" मी तुमच्या गाडीवर आजपासून काम केले तर चालेल का? मला कामाची गरज आहे."

" तू तर काम करत होतास ना चांगले. मग एवढ चांगले काम सोडून तुला हि नोकरी का करायची आहे."

" त्या कंपनीतले सर आता फाॅरेनला कायमचे शिफ्ट होणार आहेत. त्यामुळे सध्या तरी दुसरे काम मिळेपर्यंत मला तुमच्या गाडीवर काम करायची परवानगी द्याल का."

" हो चालेल ना. उलट माझ्या डोक्यावरचे अर्ध टेन्शन तू चुटकीसरशी दूर केले आहेस. तुला मदत करुन मी माझाच फायदा होणार आहे बघ. "

" धन्यवाद चाचा. आता काय आवडत नसले तरी पैसा कमवण्याचे तात्पुरते का होईना सोय झाली होती."

सोफिया आता टॅक्सी ड्रायवरची नोकरी उत्तमपणे सांभाळत होती. दिवसा तर सोफिया गाडी चालवायचीच. पण आता तिने रात्री देखील गाडी चालवण्याचा निर्णय घेतला होता. सगळे सुरळीत चालले होते. ट्रिटमेंट करता पैसे हळूहळू सोफिया बाजूला ठेवत चालली होती.

रुस्तमने जी टॅक्सी आता बुक केली होती ती सोफियाची निघाली होती. सोफियाची टॅक्सी रुस्तम जवळ येवून थांबली होती.

" अरेच्चा एवढ्या रात्री तुम्ही लेडीज असून मला ज्या ठिकाणी पोहचायचे तिकडे जायला तयार झाल्या आहात. आता पर्यंत एकही टॅक्सी ड्रायवर तिकडे जायला तयार झाला नव्हता."

" येणाऱ्या पॅसेंजरला त्याच्या ठिकाणी पोहचवणे हे माझे कर्तव्य आहे. आणि ते आम्हांला ईश्वरा समान आहेत काका."

" तुझ्या सारखी गुणी ड्रायवर भेटली मला. आता निश्चिंतपणे पोहचेल मी याची नक्कीच खात्री वाटत आहे मला."

" बिनधास्त व्हा, काका आपली सफर नक्कीच छान होणार आहे बघा."

काही तासाच्या प्रवासा नंतर रुस्तमला सिगरेट ओढण्याची तलब जाणवत होती. सोफियाला गाडी बाजूला घेण्यास सांगितली होती. तो उतरल्यानंतर सोफियाची नजर रुस्तमकडे असणा-या बॅगेकडे गेली होती. रुस्तम गाडीतून खाली उतरल्यानंतर सोफियाने ती बॅग उघडली होती. त्यात तिला एक पिस्तुल आढळून आली होती.

सोफिया पुरती घाबरुन गेली होती. थोड्याच वेळात रुस्तम तिथे आला होता. येताना त्याने सोफिया करता कोल्ड ड्रिंक घेवून आला होता. त्यामुळे डोळ्यावर आलेली झोप उडून जाईल असे तो सोफियाला सांगत होता.

" मला रात्रीची गाडी चालवायची सवय आहे. मला कधीच झोप येत नाही गाडी चालवताना. जर आलीच ना, तर मी गाडी बाजूला घेवून एक झोप घेवून मग गाडी चालवायला घेते."

" रात्री गाडीत बसणारा पॅसेंजर मग ओरडत नाही का ? पोहचायला उशीर होईल म्हणून?

" जिवापेक्षा काय वेळेत पोहचणे इतके महत्वाचे आहे का साहेब?"

" काका वरुन आता डायरेक्ट साहेब म्हणायला लागली का पोरी तू आता. अग मी मस्करी करत होतो."

" चला निघूया आता आपण. "

प्रवासाला पुन्हा सुरवात झाली होती. आता तर पावसाने देखील बरसायला सुरवात केली होती. रिमझिम बरसत्या धारा, भयान शांतता, रस्त्याच्या दूतर्फा एक चिटपाखरु देखील दिसत नव्हते.

सोफिया रुस्तमच्या बॅगेत‌ असणारी पिस्तुल पाहून घाबरली होती. ती जरा घाबरलेल्या अवस्थेत चेह-यावरचा घाम पुसत गाडी चालवत होती.

गाडीच्या मागच्या सीटवर बसणा-या रुस्तमने हि गोष्ट अचूक हेरली होती.

" आपण गाडीत बसल्या पासून तुम्ही घाबरलेल्या दिसत आहात मला. काही झालयं का? "

क्रमशः

🎭 Series Post

View all