कबंध भाग ३

गायब झालेली गाडी पाहून रुस्तम आणि सोफिया घाबरले होते.
मागील भागात आपण पाहिले की सोफियाने रूस्तमच्या बॅगेत पिस्तुल पाहिली आहे आणि ती पुरती घाबरली होती.

रुस्तमचा भाऊ झहिर लग्नाच्या वयाचा झाला होता. तरीही त्याचे कुठे लग्न जमत नव्हते. त्याला जी मुलगी पटायची ती त्याला रीजेक्ट करत होती.काय करावे झहिरला कळत नव्हते. एक दिवस त्याची बहिण सुहाना त्याला एका मित्रांच्या पार्टिला घेवून गेली होती. तिथे अनेक मित्र मैत्रीणी जमल्या होत्या.

त्यातली एक मुलगी झहिरला आवडली होती. तिचे नाव सोनिया होते. झहिरकडे पाहून ती देखील हसत होती. डोळ्यांच्या नजरेणे जणू काही ती झहीरला बोलवत होती. तिच्याकडून सिग्नल मिळताच बोलण्याच्या बहाण्याने तो सोनियाच्या जवळ गेला होता. इतक्यात,
आय आम सो साॅरी म्हणत सोनियाच्या हाताला धरुन एका माणसाने तिला कोणाशी तरी ओळख करुन देण्याकरता तिथून निघून गेला होता.

झहिरने विचार करताच त्याच्या कानावर असे शब्द आले की तो सोनियाचा नवरा होता. आपण जिच्यावर प्रेम करतो त्या मुलीच आधीच लग्न झाले होते. ह्या विचाराने तो अस्वस्थ झाला होता.

झहिर एक आरकिटेक्चर तर होताच शिवाय उत्तम लेखक देखील होता. त्याला मर्डर रीलेटेड स्टोरी लिहण्यात हातखंड होता. रुस्तम त्याच्याच स्टोरींची पुस्तके छापून भरपूर पैसे कमवत होता. एका डायरेक्टरला झहिरची स्टोरी खूप आवडली होती. चित्रपटा करता त्याने ती स्टोरी मागितली देखील होती. पण ती झहिरला इतक्यात पब्लिश करायची नव्हती. एकदम पाच-सहा भाग लिहून झाल्यावरच त्याला स्टोरी सर्वांसमोर मांडायची होती.


रुस्तमने आपल्या भावाला समजून न देता एका नामांकित डायरेक्टरला ती स्टोरी विकणार होता. त्याच्याकडून पैसे घेवून तो झहिरला नंतर सत्य सांगणार होता.

रुस्तम सोफियाच्या गाडीतून मध्यरात्री त्या डायरेक्टरला भेटायला चालला होता. दिलेल्या पत्यावर रुस्तम पोहचला होता. बराच वेळ झाला तरी डायरेक्टर तिथे आलाच नव्हता. सोफिया रुस्तमला सोडून निघून गेली होती. सोफिया गाडी चालवत असताना अचानक स्टेअरींग एका बाजूला ओढले गेले होते. समोरुन येणाऱ्या गाडीचा वेग‌ देखील जोरात असल्याने दोघांचा अपघात झाला होता. त्यात गाडी चालवणारा गंभीर जखमी झाला होता. सोफिया घाबरली होती. युसूफ चाचांना काय सांगायचं? त्यांनी आपल्याकडून नोकरी वरुन काढून टाकले तर, अश्या एका मागून एक गोष्टी भेदारलेल्या मनात येत होत्या. त्या ड्रायवरच्या खिशातून फोनची रींग ऐकू येत होती.

सोफियाने तो फोन उचलला होता.

" हॅलो, मी सांगितलेल्या ठिकाणी पोहचलो आहे. तुम्ही कधी येणार आहात. मला परत मित्राच्या घरी पोहचायचे आहे."


आवाज तर ओळखीचा वाटत होता. सोफियाने आधी पटकन फोन ठेवून दिला होता. नंतर पुन्हा आपल्या मोबाईल वरुन त्या नंबरवर फोन लावला होता.

" रुस्तम बोलताय का तुम्ही? "

" हो. मीच काय झाले."माझे काही सामान राहिले का गाडीत."

" मी जिथे सोडले तुम्हांला तिथेच आहात ना तुम्ही? "

" हो. पण झाले काय."

" आलेच मी, तिथेच थांबा."

" गाडीत बसा पटकन. सांगते सगळे."

" माझ्या हातून एक अॅक्सिडेंट झाला आहे. तो तुम्ही ज्याला भेटायला आला आहात त्याचाच झाला आहे."

" जिवंत तर आहे ना तो."

" हो. आहे जिवंत."

त्या ठिकाणी पुन्हा पोहचताच गाडी आणि तो माणूस तिथून निघून गेले होते. रुस्तम सोफियाला त्याच्या मित्राकडे सोडायला सांगतो. व डायरेक्टर कदाचित दवाखान्यात गेला असेल असे सांगून तिला तिथून निघून जायला सांगितले होते.

सोफिया देखील विचार करत घरी निघून गेली होती. दुस-या दिवशी ती वर्तमान पेपर आणि न्यूज ला ती त्याच माणसाची बाॅडी धडापासून वेगळी एक पोत्यात नदिच्या कडेला सापडलेली आढळलेली होती. आपण ज्याला काल घेवून गेलो होतो. त्या रुस्तमनेच या डायरेक्टरला ठार मारले असेल तिला वाटत होते.त्याच्या बॅग मधे असणारी पिस्तुल तिने पाहिली होती.

रुस्तम तर शाॅक मधे होता. आज सकाळी तो त्या डायरेक्टरला फोन करुन तब्येतीविषयी बोलणार होता. तेच त्याचा फोन देखील स्विच आॅफ आणि न्यूज पाहून तो क्षणभर घाबरला होता. त्याला वाटले ती टॅक्सी ड्रायवर सोफियाने कदाचित याला मारले असणार असे तो कल्पना करत होता.

झहिरने लिहलेल्या स्टोरी हुबेहुब वर्तमानातल्या मर्डर स्टोरींशी जुळत होत्या. रुस्तमला कधी - कधी आपल्या भावावरच शंका येत होती. कि तोच तर अश्या घटना प्रत्यक्षात घडवून आणत असणार आणि मग मर्डर करुन त्यावर पैसे तर कमावत नसेल ना? आपल्या नकळत त्याने असे बरेच पैसे जमा करुन ठेवले असतील असे रुस्तमला वाटत होते.

सोनिया झहिरलचे लक्ष स्वत:कडे वळवण्या करता सुहाना कडून झहिर बद्दल माहिती काढून घेते. झहिरला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असते. तिचा नवरा तिला मारझोड करुन, सिगरेटचे चटके देतो असे ती झहिरला सांगत होती.त्याला अंगावरचे चटके, हात पिरगळलेला, गालावर मारलेली चापटीच्या खुणा दाखवत होती.

काळजीने हैरान झालेला झहिर आता मात्र सोनियाला त्याला सोडून माझ्याशी लग्न कर असे सुचवत होता.

" तो जिवंत असताना मी कोणाशी लग्न करु शकत नाही. तो आणि मी जोपर्यंत जिवंत असणार तोपर्यंत मी असाच अन्याय सहन करत राहणार."

" पण का अस' तू पोलिस कंपेल्ट करु शकतेस की."

" मला असले कुठलेही काम करायच नाही. माझ्या आई-वडिलांची आणि सासू-सास-यांचे नाव धूळीला मिळवायचे नाही मला."

सोनियाला मिळवण्यासाठी तो तिच्या नव-याला मारुन टाकले होते. कोणाला संशय येवू नये म्हणून त्याने शहरात पसरणा-या खूनाप्रमाणे त्याची खांद्यापासूनची अर्धी बाॅडी एका पोत्यात भरुन घाटात टाकून आला होता.

" काय होवून बसले हे. माझा नवरा मला सोडून गेला."

" तू आता माझी होशील ना. आपण दोघे लग्न करूया."

" करेल मी लग्न पण अस कस झाले ना. काही दिवसांपूर्वी आपल्यात बोलणे झाले. आणि लगेच अशी घटना घडली. तू तर काही केले नाहीस ना यात."

" मला तर काही माहित नव्हते. तूच आज मला भेटायला बोलवून सांगितले. म्हणून मी म्हटले आता तर आपण लग्न करु शकतो. आणि तू तर बातम्यांमधे, पेपर मध्ये हल्ली अश्या घडणा-या घटना पाहतच असशील. त्याचेच कोणाचे तरी काम असणार हे."

" बरोबर आहे तुझे."

" आपण उद्या जरा बाहेर जावूया. माझ काम आहे थोडे. तेवढेचं आपल्याला एकत्र वेळ घालवता येईल."

" हो जावूया नक्की."

क्रमश:

🎭 Series Post

View all