कबंध भाग ४

झहिरचे सोनिया बद्दल प्रेम सबंध जुळतात. तो तिला सरप्राइज द्यायला बंगल्यात येतो. तिथे वेगळेच दृश्य बघायला मिळते.
मागील भागत आपण पाहिले की, रुस्तमचा चुलत भाऊ झहिरला सोनिया बरोबर प्रेमाचे सबंध जुळतात ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असताना, अचानक सोनियाच्या नव-याचा मृत्यू होतो. आता सोनिया आणि झहिर एकत्र येवून संसार थाटणार होते.

सोनियाला बरोबर घेवून झहिर त्याच्या कामासाठी जायला निघाला होता. गप्पा मारत दोघेही एकमेकांच्या सहवासात हरवून गेले होते. झहिर ज्या ठिकाणी गेला होता तिथे नेटवर्कचा प्राॅब्लेम तर होताच शिवाय फोनची बॅटरी देखील संपली होती. काम करुन पुन्हा घराकडे परतत असताना गाडी वाटेत बंद पडली होती.

बाजूलाच एक बंगला होता. त्या बंगल्यात जाण्याचा विचार झहिरने केला होता. त्या बंगल्याला कुलूप लावलेले होते. आता जाणार तर कसे हा विचार सोनियाच्या मनात रेंगाळत होता.

इतक्यात झहिरने त्या कुलपाला असणारी चावी तुळशीच्या कोना-यातून आधीच माहित असल्यासारखी काढून घेतली होती.

सोनियाला या गोष्टीचे आश्चर्य वाटत होते. झहिर त्या दरवाजाचे दार उघडणार इतक्यात कोणीतरी आतूनच तो दरवाजा उघडला होता.

" या, आत या. एवढ्या रात्री आला आहात या वाटेकडे. तुमची गाडी बंद पडली की काय? "

" हो ना. आम्ही इथे थांबू शकतो का थोडावेळा करता."

" काहीच हरकत नाही थांबा की."

" हा माझाच बंगला आहे. माझ्या ताईसाहेब आणि मी राहतो इथे. त्या काही कामानिमित्त शहराबाहेर गेल्या आहेत."

" अच्छा. तुम्ही आम्हांला घरात येवू दिले. आभारी आहोत आम्ही."

" मी काॅफी करुन आणतो तुमच्या करता."

काॅफी पिताना गप्पा मारुन झाल्या होत्या. झहिर एक लेखक आहे. हे समजताच बंगल्यातला तो व्यक्ती भरभरुन त्याचे कौतुक करत होता. त्याला मर्डर वाल्या स्टोरी, पिक्चर बघण्याची हौस होती.

ब-याच वेळ गप्पा सुरु होत्या. मेकॅनिक बोलावून गाडी दुरुस्त करण्याविषयी झहिरचे त्या ड्रायवरशी बोलणे सुरु होते. एवढ्या रात्री कोणीच मॅकॅनिक उपलब्ध होणार नव्हता.

" साहेब, सकाळी गाडी दुरुस्त झाली की तुम्ही इथून निघून जा. आजची रात्र इथेच थांबा."

कुठलाही पर्याय समोर दिसत नव्हता. आजची रात्र इथे काढणे हाच एक पर्याय असल्याने दोघेही राहण्याचा निर्णय घेतात. नविन ठिकाणी सोनियाला थोडे अस्वस्थ वाटत होते. तरीही दिवसभराच्या थकव्यामुळे झहिर आणि सोनिया झोपून गेले होते.

सकाळ झाली होती. नाश्ता करुन गाडी दुरुस्तीचे काम सुरु होते. सोनिया आवरुन बॅग पॅसेज मधे आणून ठेवत होती. तरीपण गाडीचे काम सुरुच होते. ती चक्कर मारायला म्हणून घरातली एक-एक रुम पाहत खाली वर बंगला न्याहळत होती.

इतक्यात वातावरणात बदल घडून आला होता. अंधारुन येत विजेचा कडकडाट सुरु झाला होता. लाईट गेल्या होत्या. सकाळ आहे की रात्र याचा ठांगपत्ताच लावता येत नव्हता. ती चालता चालता एका रुम पाशी पोहचली. तिथे तिला एक बांधून ठेवलेला माणूस दिसला होता. ती घाबरुन मोठ्याने किंचाळत वरुन खाली पॅसेज मधे आली होती.

तिने सांगितलेल्या ठिकणी झहिर आणि ते बंगल्यात असणारे काका मेणबत्ती घेवून गेले होते.पण तिथे त्यांना काहीच दिसले नव्हते.

" अग वेडा बाई, कोणी नाही तिकडे. लाईट गेल्यामुळे तू घाबरुन मनातल्या मनात विचार करत असशील काही. आणि तसे तुला दिसले असणार."

सगळे परत गाडी दुरुस्त झाली का ते पाहायला गेले होते.

गाडी दुरुस्त झाली होती. पाऊसाचा जोर देखील कमी झाला होता. लाईट देखील आले होते.

" आता मी फक्कड चहा बनवतो. तेवढा घेवून जा तुम्ही."

" चालेल, तेवढेच आम्हांला फ्रेश वाटेल."

इतक्यात लाईट देखील येतात. आपल्य मनाची खात्री पटण्याकरता सोनिया परत त्या रुममध्ये झहिरला सोबत येण्यासाठी मनवत होती. तिथे एक बांधून ठेवलेले पोतं दिसत होते.

सोनिया झहिरला ते पोते उघडायला सांगत होती. बंगल्यातल्या काकांना बोलावून घेवून झहिर आणि काका पोत्यात काय आहे ते बघायला गेले होते.

पोत्यात धडापासून अलिप्त असणारी बाॅडी आढळून आली होती.

" मी सांगत होते ना. की माणूस होता बांधून ठेवलेला इथे."

" कोणी मारले याला."

" साहेब तुम्ही मारले का याला."

" मी कशाला मारु."

" तुम्ही अश्या पद्धतीचे खून खराबा लिहत असता. तुम्हीच मारले असेल याला."

" तुझ्या करता हा बंगल नविन आहे ना. मग तुला तुळशीच्या रोपात असणारी चावी कशी काय माहित होती."

" अग खरतर हा बंगला आपला आहे. तू माझ्या आयुष्यात आली म्हणून तुला हा बंगला भेट देण्याकरता सरप्राइज म्हणून तुला मी इथे घेवून आलो होतो."

" तू कोण आहेस. तू आत कसा आलास ते सांग आधी मला? आणि कोण तुझी ताईसाहेब ते पण सांग मला."

" साहेब मी काही केल नाही. मी इथे दोन दिवसापूर्वीच आलो होतो. त्यांनी मला एक नवरा-बायको येतील इथे त्यांची देखभाल कर एवढेच सांगितले होते. बाकी मी पाहून घेईल असे बोलली होत्या ताईसाहेब."

🎭 Series Post

View all