कबंध भाग ५ (अंतिम)

भयानक सत्य सामोरे येवून खरा गुन्हेगार सापडतो.
" आत्ताच्या आत्ता बोलावून घे तिला. नाहीतर मला फोन नंबर दे. मला तरी बघू दे कोण आहे ती."

" त्या पहाटेच आल्या आहेत. झोपल्या आहेत रुममध्ये त्यांच्या. उठवतो त्यांना."

" एवढा गोंधळ चालला घरात तरी तिला काडीचा फरक पडला नाही का? अशी कशी कुंभकर्ण सारखी झोपली आहे ती."

"पहाटे आल्या असल्याने दमून झोपल्या आहेत त्या. उठवून आणतो त्यांना."

इतक्यात ती खाली येत होती. तिला पाहताच झहिर नुसता पाहतच बसला होता.

" ताई तू. इथे कशी काय. "

" सुहानी, तू इकडे काय करत आहेस."

दोघेही आश्चर्याने सुहानी कडे पाहत होते.

" ते पोत्यातला खून तूच केला आहेस ना."

" नाही ह्यानेच केला असणार.त्याने तुला मिळवण्या करता तुझ्या नव-याला देखील ठार केले आहे. त्याने आत्तापर्यंत असेच अनेक जणांचे खून करुन स्टोरी लिहून पैसे कमवण्याचे चांगला मार्ग शोधून काढला आहे."

" खर सांग सुहानी काय बोलते ते खर आहे का. मला मिळवण्याकरता तू माझ्या नव-याला ठार केले का."

" खर आहे हे. पण मी फक्त तेवढेच एक खून केला आहे. सुहानी माझ्यावर तर अनेक खूनाचा आरोप करत आहे."

यांचे बोलणे सुरु असतानाच पोलिसांची विशेष नेमलेली टिम तिथे येवून पोहचते. ते सुहानीचा शोध घेत पोहचले होते.

" यू आर अंडर अरेस्ट. आम्हांला आत्तापर्यंत सगळ्या शहरात एकाच पद्धतीने पोत्यात टाकून धडावेगळा होणारी बाॅडी ज्या मिळाल्या. त्या तुम्हीच करत असल्याचा दावा आहे."

" हो हो मीच केलं आहे आत्तापर्यंत सगळे हे. लहानपणापासून सख्खा भाऊ असून कधी मला पैसे दिले नाहीत. मी जश्याप्रकारे धडापासून बाॅडी वेगळी करत खून करत कोणत्या ठिकाणी ते ठेवत होते. तो याचीच नक्कल करत मी केलेल्या खूनावर पैसे कमवत होता. तो रुस्तम देखील याचा फायदा घ्यायला निघाला होता. त्या डायरेक्टरला देखील मीच संपवला होता. या सगळ्याचा मला झहिरवर सूड उगवायचा होता. म्हणून मी या मार्गावर वाहत गेले होते.

अखेरीस पोलिसांच्या विशेष टिमने गुन्हेगाराला शोधून काढले होते. पेपरमधली भयानक मृत्यूच्या घडणा-या घटनांमधून आता पब्लिक शांत झाले होते. त्यांच्यातली भिती गुन्हेगार सापडल्या मुळे कमी झाली होती.

रुस्तमला मोठा शाॅक बसला होता. रुस्तम सोफियाला फोन लावून सुहानीने त्या डायरेक्टरला संपवल्याचे सांगत होता. सोफिया देखील निश्चिंत होवून टेन्शन फ्रि आपल्या कामात व्यस्थ झाली होती. तिने टॅक्सी ड्रायवरचा जाॅब त्याचक्षणी सोडून दिला होता. ज्यावेळी त्या डायरेक्टरचा खून झाल्याची बातमी ऐकून ती थरथरली होती. आता ती मोठ्या कंपनीत नोकरीला लागली होती. तिच्या बहिणीचे आॅपरेशन देखील यशस्वी रित्या पार पडले होते.

सुहानीला पोलिस स्टेशन मध्ये घेवून जात असताना ती सोबत एक पोत घेवून निघाली होती. वाटेत एका ठिकाणी ती गाडी थांबवायला सांगते. एका पोलिस अधिका-याची तीने बंदूक स्वत:कडे घेतली होती.

" माझी एक इच्छा आहे. मी स्वत:ला आता संपवणार आहे. थकली आहे मी खूप. सगळ्यांना जस मी संपवले तसेच आज मला स्वत:ला संपवायचे आहे. एवढ्या लोकांचे तळतळाट मला लागले आहेत. फाशी घेवून वर जाण्यापेक्षा मला माझ्याच हाताने संपवून घ्यायचे आहे."

" हे बघा ऐसा कायद्याने सगळ्या गोष्टी घडू द्या."

" तुम्ही काहीपण कारण देवू शकता ओ. सांगा एनकाउन्टर केला ते."

"वाटल तर एखाद्यावर गोळी झाडू का हाताला."

" नको अस काही करु नका. तुम्ही म्हणाल तसेच करु आम्ही."

" मग मी म्हणते तसे करुन धडापासून वेगळी झालेली बाॅडी या मी आणलेल्या पोत्यात टाका आणि एका सुमसाम ठिकाणी सोडून द्या. माझ्या आत्माल्या तेव्हाच शांती लाभेल. मी केलेल्या कृत्याची हिच शिक्षा असणार आहे. आणि ती मी स्वत:ला करुन घेणार आहे."

इतर पोलिस नाही नको म्हणायच्या आत सुहानीने गोळी झाडून घेतली होती. तिच्या इच्छेप्रमाणे ती बाॅडी रस्त्याच्या कडेला ठेवून एनकाउन्टर केल्याचे पोलिस डिक्लेअर केले होते.

सोनिया झहिरला माफी करते परंतु नव-याच्या खुनामुळे त्याला देखील शिक्षा सुनावण्यात येते. काही वर्षांनी झहिर जेलमधून सुटून आल्या नंतर त्यांचा विवाह करण्यात येतो.

दोघे आनंदाने संसार करत होते. झहिर आता मर्डर स्टोरी न लिहता प्रेमात पडणा-या स्टोरी लिहायला लागला होता. सोफियाच्या आयुष्यात देखील सय्यद चे आगमन झाले होते. सय्यद तिच्या कंपनीत काम करत होता. सोफिया आणि सय्यद एकत्र असताना त्यांची रुस्तमशी भेट होते. घडलेला विचित्र प्रकार सय्यद ला सांगतिला होता. तो आश्चर्याने रुस्तम आणि सोफियाकडे बघतच राहिला होता.

" किती भयानक परीस्थातीतून तुम्ही गेला आहात. कौतुक वाटते तुमचे." असे म्हणत सय्यद सोफियाला शबासकी देत होता.

सोफिया आणि सय्यद देखील लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले जाणार होते.

🎭 Series Post

View all