कबूली #मखमली कवडसा (जलद लेखन)
कबूली - लघुकथा (भाग-३)
काकूंनीच तिघांसाठी कॉफी ऑर्डर केली. ते सांगण्या अगोदर त्यांनी दोघांना नाश्ता किंवा स्नॅक्स घेणार का असं विचारलं होतं.
बोलता बोलता काकूंनी विषय जुईकडे वळवला.
"निशांत तुझं प्रेम आहे जुईवर ?"
"काकू ते सांगीतलं ना पर्सनल म्हणून. . !" तो अडखळला.
"अरे, कबूली दिलीस ना प्रेमाची. . लिखित रूपात. . मग सांगायला का भितोयस ?"
" मी ? कबूली? कधी?"
"काल मोबाईलवर. . आणि आज भेटायला बोलावलंस ना . .
"पण काकू तुम्हाला कुणी सांगितलं? जुईने? काय यार या पोरी?"
"नाही निशांत . तिला तर माहित पण नाही. . की तू प्रेमाची कबूली दिलीस. . तिच्या मनात काय आहे ते सुद्धा मला माहित नाही!"
आता मात्र निशांत व गौरांगच्या चेहर्यांवरचा रंग उडाला.
"पण काकू. . ? तुम्ही ओळखता जुईला. . आणि ते तिला माहित नाही . . ते कसं काऽय?"
" जास्त ताणत नाही आता! हा पहा जुईचा फोन . . काल सकाळपासून माझ्याकडेच आहे!"
" काकू तुम्ही ? ते ? जुई? वाट्सअप चाट?"
"अरे इतका घाबरतोस कशाला. . प्रेम आहे ना तिच्यावर. . आता फायनल इयरला आहेस . . नोकरीही मिळेल ना कॅम्पस सिलेक्शन मधे. .
मी जुईची आई. . !"
तिने हात पुढे केला.
त्याने हात मिळवला. पण आ वासून. तो कालपासून सगळ्या घटनांचा विचार करायला लागला. . फोन काकूंकडे मग काही खरं नाही. . मनात वाटलं.
" भिऊ नकोस निशांत. . तुमचं प्रेम पूर्णत्वास जावं यात मला आनंद आहे. मी बस स्टॉपवर तुमचं बोलणं ऐकलय. माझ्या मुलीवर इतका जिवापाड प्रेम करणारा मुलगा मला आवडला.तुम्ही दोघं सेट व्हा. . जुईच्या वडिलांना तयार करण्याची जिम्मेदारी माझी!"
आता मात्र निशांत थक्कच झाला. हे सारं त्याच्यासाठी अनपेक्षित होतं.
" पण काकू तुम्ही कसं काय? म्हणजे?"
"निशांत जुईच्या बाबांचं आणि माझं पण १२ वी पासून अफेयर होतं . आम्ही खूप नियोजन करून घरच्यांकडून परमिशन घेवून लग्न करण्याचा विचार केला होता. पण दोघांच्या घरून परवानगी नव्हती. मग आम्ही रजिस्टर मॅरेज केलं। . त्यामुळे आमचा विरोध होणार नाही."
" थँक्यू काकू. . तुम्हाला माहित नाही तुम्ही मला जणु जीवनदान दिलंय. . आता बघाच मी कसा सेटल होवून जुईला किती सुखात ठेवीन."
" एकच अट किंवा विनंती आहे माझी. . . ?"
तो घाबरला.
"अट. . ती काय काकू. . ?"
" " जुई तुला एक वर्ष ज्युनिअर आहे तर तिचं चौथ्या वर्षीचं एक सेमिस्टर होईपर्यंत तिला तुझी प्रेमाची कबूली देवू नकोस!. . "
"पण का. . आणि पण अलरेडी मी तिला मेसेज केलाय !"
"हो ना. . पण ती कबूली माझ्याकडे आहे. जुईला गंधही नाही या गोष्टीचा. तुझे जुने मेसेज पाहून मी विचारलं तर म्हणाली की आई तो सिनियर आहे आमचा आणि चांगला फ्रेड आहे. तुमची फ्रेंडशिप असू देत. हरकत नाही. पण प्रेमाचं बोलू नकोस! "
"काकू. . थँक्यू ! तुम्ही निशांतला सपोर्ट करताय पण . . ही अट का ?" गौरांग मधेच बोलला .
" हां तर गौरांग तुझ्या प्रश्नाचं उत्तर . . आमची जुई खूप इमोशनल आहे. .निशांत तुझ्या कबूलीने ती स्कॅटर होईल किंवा तिचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. . किंवा काहीही होईल, म्हणजे दडपणात राहील . . काहीही होवू शकतं. . पण तिला तू आवडत असशील तर मात्र मी तुमच्या प्रेमाच्या आड येणार नाही. थोडा वेळ जावू देत. परवा बँकेच्या कामासाठी आले आणि काल सकाळी पाण्यात पडून माझा फोन खराब झाला. काल सकाळपासून तिचा फोन माझ्याकडे आहे. मला फोन वापरायला देताना तिने एक मिनिटही विचार केला नाही किंवा आढेवेढे घेतले नाहीत. "
"खरंच . . कमाल आहे. पण मी फक्त कालच तिच्याशी फोनवर चाटिंग केली. "
"हो ना पण तिकडे मी होते. . " त्या मोठ्यांदा हसल्या.
"ठिक आहे ! काकू आता निघूयात का? मी माझा शब्द पाळीन. तुम्ही तुमचा शब्द पाळा!"
" नक्की . . मी म्हणाले म्हणू संपर्क तोडू नकोस तिच्याशी. . मैत्री राहू दे. . भेटत बोलत जा. . ते गरजेचे आहे. तुम्ही पोरं कुटुंब सोडून इथे राहता. . तेव्हा. . मित्र मैत्रिणीं गरजेच्या आहेत."
" थँक्यू काकू. . पण माझं जुईवर जिवापाड प्रेम आहे. . तिच्या सोबत मला जगायचंय . . !" असं म्हणून निशांत आशीर्वाद घेण्यासठी झुकला. . तर काकूंनी त्याच्याशी हात मिळवला.
"सुखी रहा! यशस्वी हो!. .ही कबूली मात्र अनोखी आहे ना गौरांग. . कुठल्याच मुलाने मुलीच्या आईकडे कबूली दिली नसेल!"
तिघेही मोठ्याने हसत कॅफेच्या बाहेर पडले.
समाप्त
©सौ. स्वाती बालूरकर देशपांडे, सखी
दिनांक - ०५.१२.२०२०
पुनः प्रकाशन ७.१२ . २०२२
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा