जलद कथालेखन स्पर्धा फेब्रुवारी 2026
काच घर/ चक्रव्यूह भाग १
"साहिल, तुला वाटतंय का की कॉर्पोरेट जगात फक्त 'काम' बोलतं? नाही रे, इथे कामापेक्षा 'कावे' जास्त महत्त्वाचे असतात. आणि तुझा प्रॉब्लेम हाच आहे की तुला फक्त कोड समजतो, माणसं नाही!"
पुण्यातील एका प्रसिद्ध आयटी पार्कमधल्या कॅफेटेरियामध्ये बसून साहिलचा मित्र त्याला समजावत होता. पण साहिलच्या डोळ्यासमोर फक्त त्याचे गेल्या सहा महिन्यांचे कष्ट आणि त्याने डेव्हलप केलेले 'स्मार्ट-टेक' मॉडेल फिरत होते.
साहिल हा पुण्यातील एका नामवंत सॉफ्टवेअर कंपनीत सीनियर डेव्हलपर म्हणून काम करत होता.
साहिल हा पुण्यातील एका नामवंत सॉफ्टवेअर कंपनीत सीनियर डेव्हलपर म्हणून काम करत होता.
संयमी स्वभाव, कामाप्रती निष्ठा आणि प्रचंड कल्पकता हे त्याचे गुण. पुण्यातच स्थायिक झाल्यामुळे त्याची पत्नी कृत्तिका आणि सहा वर्षांची मुलगी शुभ्रा यांच्यासोबत त्याचे आयुष्य आनंदी चालले होते. पण गेल्या काही दिवसांपासून ऑफिस मधलं वातावरण बदललं होतं.
साहिलने आपल्या टीमसोबत मिळून एका जागतिक क्लायंटसाठी एक अतिशय क्रिएटिव्ह आणि आधुनिक सॉफ्टवेअर आर्किटेक्चर तयार केलं होतं. या प्रोजेक्टच्या यशावर साहिलचं प्रिन्सिपल आर्किटेक्ट म्हणून होणारं प्रमोशन अवलंबून होतं. साहिलला खात्री होती की हे पद त्यालाच मिळणार.
आज ऑफिसमध्ये प्रमोशन्सची घोषणा होणार होती. मीटिंग रूममध्ये सर्वजण जमले होते. साहिलच्या मनात थोडी धाकधूक होती, पण आत्मविश्वासही होता.
बॉसने घोषणा केली,
" या वर्षीचं प्रिन्सिपल आर्किटेक्ट हे पद आणि या प्रोजेक्टचं संपूर्ण नेतृत्व जातंय... तुषार कडे !."
" या वर्षीचं प्रिन्सिपल आर्किटेक्ट हे पद आणि या प्रोजेक्टचं संपूर्ण नेतृत्व जातंय... तुषार कडे !."
साहिलच्या पायाखालची जमीनच सरकली.
तुषार ?
ज्याने या प्रोजेक्टमध्ये एका ओळीचा कोडही लिहिला नव्हता ?
तुषार हा फक्त बोलघेवडा होता आणि बॉसचा जवळचा मित्र. त्याने साहिलच्या आयडियाज चोरून, त्या स्वतःच्या नावावर बॉसला प्रेझेंट केल्या होत्या.
मीटिंग संपल्यावर तुषार साहिलच्या जवळ आला आणि कुत्सितपणे हसून म्हणाला,
" काय साहिल, चेहरा का पडलाय ? बघ, फक्त राबून काही होत नाही, कोणाचे कान भरायचे हे पण जमलं पाहिजे. आता तू माझ्या अंडर काम करणार आहेस, सो बी रेडी ! "
तुषारचे ते शब्द साहिलच्या कानात शिशासारखे टोचले. ज्या प्रोजेक्टला त्याने पोटच्या मुलासारखं जपलं होतं, त्याचं श्रेय आज एका अपात्र व्यक्तीच्या पदरात पडलं होतं.
संध्याकाळी साहिल घरी परतला, पण त्याच्या खांद्यावर जणू जगाचं ओझं होतं. पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेला असताना त्याच्या डोक्यात फक्त तुषारचा तो चेहरा आणि ऑफिसमधलं ते घाणेरडं राजकारण फिरत होतं.
घराची बेल वाजली. कृत्तिकाने दरवाजा उघडला. साहिलचा चेहरा पाहून तिला काहीतरी बिनसल्याची जाणीव झाली.
" साहिल, काय झालं ? रिझल्ट काय लागला ? " कृत्तिकाने हळूवार विचारलं.
साहिल काही न बोलता सोफ्यावर धाडकन बसला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं, पण तो ते लपवण्याचा प्रयत्न करत होता.
तेवढ्यात छोटी शुभ्रा धावत आली आणि साहिलच्या गळ्यात पडली.
" बाबा, बाबा ! आज माझ्या स्कूलमध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन होती. हे बघा, मी तुमचं आणि आईचं चित्र काढलंय ! मॅम म्हणाल्या, माझं चित्र सर्वात क्रिएटिव्ह आहे ! "
शुभ्राने काढलेलं ते साधं पण गोड चित्र पाहून साहिलच्या छातीत धस्स झालं. तो विचार करू लागला,
' मी माझ्या मुलीला काय शिकवू ? प्रामाणिक राहा असं सांगू की राजकारण शिका असं सांगू ? '
' मी माझ्या मुलीला काय शिकवू ? प्रामाणिक राहा असं सांगू की राजकारण शिका असं सांगू ? '
त्या रात्री साहिलने जेवण केलं नाही. तो बाल्कनीतून पुण्याच्या रात्रीच्या दिव्यांकडे पाहत राहिला. कोथरुडच्या त्या शांत रात्रीतही साहिलच्या मनात विचारांचं वादळ शमत नव्हतं.
" साहिल, जे झालं ते विसरा. तुम्ही तुमच्या कष्टाने इथपर्यंत आला आहात. " कृत्तिका त्याला समजावत होती.
" कष्ट, कृत्तिका ? इथे कष्टाला किंमत नाहीये. तुषारसारखी माणसं दुसऱ्याच्या घामावर आपली इमले उभी करतात. आज माझं प्रमोशन नाही गेलं, तर माझा माझ्या कामावरचा विश्वास उडालाय. मला त्या ऑफिसमध्ये पुन्हा पाऊल ठेवायचीही इच्छा नाहीये." साहिल हतबल होऊन म्हणाला.
मानसिक तणावाचा हा पहिला घाव साहिलच्या मनावर बसला होता. त्याला माहीत नव्हतं की, येणारे दिवस त्याच्या संयमाची आणि त्याच्या क्रिएटिव्हिटीची आणखी मोठी परीक्षा घेणार आहेत. तुषारच्या हाताखाली काम करताना होणारा अपमान आणि
ऑफिसचं ते विखारी राजकारण साहिलला कोणत्या वळणावर नेऊन ठेवणार होतं ?
ऑफिसचं ते विखारी राजकारण साहिलला कोणत्या वळणावर नेऊन ठेवणार होतं ?
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा