जलद कथालेखन स्पर्धा फेब्रुवारी 2026
काचघर
भाग ४
काचघर
भाग ४
" साहिल, तुला वाटलं तू मीटिंगला आला नाहीस म्हणजे तू जिंकलास ? अजिबात नाही. उलट, तू क्लायंट समोर कंपनीची नाचक्की केलीस म्हणून तुझ्यावर डिसिप्लिनरी ऍक्शन का घेतली जाऊ नये, याचं स्पष्टीकरण आता तुला द्यावं लागेल. हे कॉर्पोरेट जग आहे फ्रेंड, इथे सत्य नाही, तर एव्हिडन्स चालतात ! "
तुषारने साहिलच्या केबिनमध्ये येऊन हा शेवटचा पत्ता टाकला. त्याच्या हातात एक नोटीस होती. कालच्या मीटिंगमध्ये झालेल्या फजितीचा सर्व दोष तुषारने अतिशय चलाखीने साहिलवर ढकलला होता. बॉसला त्याने पटवून दिले होते की, साहिलने मुद्दाम ऐनवेळी तांत्रिक माहिती लपवून ठेवली जेणे करून तुषारचा अपमान व्हावा.
साहिलने ती नोटीस हातात घेतली आणि शांतपणे वाचली. त्याच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, तर एक विषण्ण हसू होतं. तो म्हणाला,
" तुषार, पुरावे म्हणतोस ना ? माझ्याकडे प्रत्येक ईमेल, प्रत्येक चॅट आणि तू नाकारलेल्या प्रत्येक तांत्रिक सूचनेचा बॅकअप आहे. पण मला आश्चर्य वाटतंय तुझं, स्वतःची लायकी सिद्ध करायच्या नादात तू कंपनीचं कोट्यावधींचं नुकसान करायलाही मागे पुढे पाहत नाहीस ? "
साहिलने उत्तर तर दिलं होतं, पण या सततच्या मानसिक छळाचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होऊ लागला होता. त्याला रात्री अचानक घाम फुटायचा, छातीत धडधडायचं. याला डॉक्टरांनी पॅनिक अटॅक म्हटलं होतं.
ऑफिस सुटल्यावर तो घरी न जाता मुळशीच्या रस्त्याने गाडी चालवत गेला. शांतता हवी होती त्याला. पुण्याच्या गजबजाटा पासून लांब. त्याला जाणवलं की, तो एका अशा चक्रव्यूहात अडकलाय जिथे तो जितका बाहेर पडायचा प्रयत्न करतोय, तितकाच खोलवर रुतत चाललाय.
रात्री उशिरा तो घरी पोहोचला. कृत्तिका हॉल.मध्येच त्याची वाट पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर काळजीच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या.
" साहिल, तुम्ही फोन का उचलत नव्हता ? किती वेळ झालाय माहितीये ? आणि हे काय... तुमचे हात थरथरतायत ? " कृत्तिकाने धावत जाऊन त्याला पाणी दिलं.साहिल सोफ्यावर कोसळला.
" कृत्तिका, मला नाही जमणार हे सगळं. तो माणूस माझ्या चारित्र्यावर आणि निष्ठेवर संशय घेतोय. आज त्यांनी मला मेमो दिलाय. माझ्या दहा वर्षांच्या करिअरमध्ये कधी साधी तक्रार नव्हती, तिथे आज माझी चौकशी होणार आहे. मला खूप एकटं वाटतंय गं ! "
कृत्तिकाने त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले.
कृत्तिकाने त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले.
" तुम्ही एकटे नाही आहात साहिल. तुम्ही सत्याच्या बाजूने आहात. तो तुषार फक्त आरडाओरडा करू शकतो, पण तुमच्याकडे तुमची क्रिएटिव्हिटी आहे. उद्याच्या चौकशीला तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जा.
आणि जर त्यांना तुमच्या कामाची किंमत नसेल, तर आपण स्वतःचं काहीतरी सुरू करू. आपल्याकडे पुण्यात राहायला घर आहे, थोडी पुंजी आहे, मी पण नोकरी करत आहे.आपण मॅनेज करू ! "
आणि जर त्यांना तुमच्या कामाची किंमत नसेल, तर आपण स्वतःचं काहीतरी सुरू करू. आपल्याकडे पुण्यात राहायला घर आहे, थोडी पुंजी आहे, मी पण नोकरी करत आहे.आपण मॅनेज करू ! "
दुसऱ्या दिवशी सकाळी साहिल तयार होत असताना शुभ्रा त्याच्याजवळ आली. तिने आपल्या स्कूल बॅग मधून एक छोटीशी प्लॅस्टिकची खेळण्यातली ढाल बाहेर काढली, जी तिने तिच्या डॉलच्या हाऊसला लावली होती.
" बाबा, हे घ्या ! आज हे तुमच्या खिशात ठेवा. हे तुम्हाला इव्हिल लोकांपासून वाचवेल. आई म्हणते ना, तुम्ही सुपरमॅन आहात, मग सुपरमॅनला कोणीच हरवू शकत नाही ! "
शुभ्राने तो निरागस आत्मविश्वास साहिलच्या डोळ्यात ओतला.
शुभ्राने तो निरागस आत्मविश्वास साहिलच्या डोळ्यात ओतला.
साहिलने ती शील्ड खिशात ठेवली. त्याला आता एक वेगळीच ताकद जाणवू लागली.
ऑफिसमध्ये चौकशी समितीसमोर साहिल उभा राहिला. समोर बॉस आणि एच.आर. हेड बसले होते. बाजूला तुषार विजयाच्या आविर्भावात बसला होता.
ऑफिसमध्ये चौकशी समितीसमोर साहिल उभा राहिला. समोर बॉस आणि एच.आर. हेड बसले होते. बाजूला तुषार विजयाच्या आविर्भावात बसला होता.
बॉसने विचारले,
" साहिल, तुषारचं म्हणणं आहे की तू मुद्दाम तांत्रिक अडचणी सांगितल्या नाहीत. तुला काय म्हणायचं आहे ? "
" साहिल, तुषारचं म्हणणं आहे की तू मुद्दाम तांत्रिक अडचणी सांगितल्या नाहीत. तुला काय म्हणायचं आहे ? "
साहिलने आपला लॅपटॉप उघडला आणि स्क्रीनवर एक एक पुरावा मांडायला सुरुवात केली.
" सर, हे बघा माझे सेंड केलेले ईमेल्स, जे तुषारने रिजेक्ट केले होते. हे बघा आमचे व्हॉट्सॲप चॅट्स, जिथे मी त्याला धोक्याची वॉर्निंग दिली होती आणि त्याने मला शहाणपण न शिकवण्या बद्दल बजावलं होतं.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, काल मीटिंगमध्ये जो बग आला, तो मी आधीच फिक्स केला होता, पण तुषारने मला सिस्टीम अॅक्सेस नाकारला होता."
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, काल मीटिंगमध्ये जो बग आला, तो मी आधीच फिक्स केला होता, पण तुषारने मला सिस्टीम अॅक्सेस नाकारला होता."
जसजसे पुरावे समोर येऊ लागले, तसतसा तुषारचा चेहरा पांढरा पडू लागला. बॉसच्या नजरेत आता तुषार बद्दलचा राग स्पष्ट दिसत होता.
साहिल इथेच थांबला नाही. तो म्हणाला,
साहिल इथेच थांबला नाही. तो म्हणाला,
" सर, मी इथे माझी नोकरी वाचवायला आलो नाहीये. मी माझा स्वाभिमान सिद्ध करायला आलोय. ज्या कंपनीत कर्मा पेक्षा कर्त्याच्या जवळ असण्याला महत्त्व मिळतं, तिथे क्रिएटिव्हिटी गुदमरते.
मी माझा राजीनामा आधीच तयार ठेवला आहे, पण तो देण्यापूर्वी मला हे सिद्ध करायचं होतं की, मी माझं काम प्रामाणिकपणे केलंय."
मी माझा राजीनामा आधीच तयार ठेवला आहे, पण तो देण्यापूर्वी मला हे सिद्ध करायचं होतं की, मी माझं काम प्रामाणिकपणे केलंय."
समितीमध्ये सन्नाटा पसरला. तुषारची मान खाली गेली होती. साहिलने शांतपणे आपल्या गळ्यातील आयडी कार्ड काढलं आणि टेबलावर ठेवलं.
साहिल ऑफिसमधून बाहेर पडला, तेव्हा त्याच्या मनात एक विलक्षण शांतता होती. त्याने फोन काढला आणि कृत्तिकाला मेसेज केला.
साहिल ऑफिसमधून बाहेर पडला, तेव्हा त्याच्या मनात एक विलक्षण शांतता होती. त्याने फोन काढला आणि कृत्तिकाला मेसेज केला.
" मी बाहेर पडलोय. खऱ्या अर्थाने मुक्त झालोय. आज आपण कात्रजच्या इस्कॉन मंदिरात जाऊ, नाही तर सारस बागेत जाऊया ! "
साहिलने नोकरी सोडली होती, पण त्याने स्वतःला परत मिळवलं होतं. पण आता प्रश्न होता की, पुण्याच्या या महागातल्या आयुष्यात तो आपल्या कुटुंबाची जबाबदारी कशी पेलणार ?
आणि तुषार या अपमानाचा बदला घेण्यासाठी शांत बसेल का ?
आणि तुषार या अपमानाचा बदला घेण्यासाठी शांत बसेल का ?
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा