कौटुंबिक कथा
कशी मी राखु तुमची मर्जी
भाग -3अंतीम
कशी मी राखु तुमची मर्जी
भाग -3अंतीम
नेहा वीणाच्या धाकट्या भावाचीच मुलगी.आत्येघरी सुन.
आज वीणा नेहाच्या वर्तनाने खूपच दुखावली होती.सगळ्यांत महत्वाचे म्हणजे तिला निरजची जास्त काळजी होती.कारण तो आईबाबांचे वेगळे राहणे परिस्थितीवशात् एकवेळ मान्य करेल पण त्याच्या मानसिक स्थितीवर परिणाम होईल.
कारण वीणाला माहित होते तो नेहाला त्यांच्यापेक्षा जास्त ओळखत होता. ज्यावेळी लग्नासाठी त्याच्यासमोर प्रस्ताव ठेवला त्यावेळी तो हे बोलला होता."आई ,ती हायफाय पोरगी आपल्या घरात निभेल का ?पण वीणाने तेवढेसे मनावर घेतले नाही.कारण भावाचीच मुलगी.तिला वाटले होईल सगळेच व्यवस्थित.

वीणाचे लग्न झाले.सहा वर्ष उलटली पण पाळणा हलला नाही.तिला मुलीची खूप हौस.सातव्या वर्षी चाहूल लागली बाळाची.ती खूप आनंदली.तिनी सुंदर क्रोशाचा लोकरीचा फ्राॅक विणला .पण मुलगाच झाला.एवढे वर्षांनी झाल्यामुळे खूप कोडकौतुक होतेच. पण मुलीची हौस अपुर्णच राहिली.
निरज एक वर्षाचा झाला.
तो माहेरचा सांगावा आला.
तिच्या धाकट्या भावजयीचे वैशालीचे डोहाळजेवण होते.ती दोघेही छोट्या निरजसह गेलेत.कार्यक्रम आटोपला की निघू लगेच.पण डोहाळजेवणाचा कार्यक्रम झाला आणि रात्रीच वैशालीला कळा येऊ लागल्या म्हणून दवाखान्यात नेले.वीणाच सोबत होती. वैशालीला मुलगी झाली.नर्सने बाहेर आणून वीणाकडे दिले तर तिचं गोंडस रुपडं न्याहाळत वीणा भावाला म्हणाली," मी हिला सुन करून घेईन. "
गोष्ट गमती गमतीत तिथेच संपली.
भाऊ कंपनीत नोकरीवर.त्याची सतत बदली व्हायची.मुलीच्या शिक्षणासाठी म्हणून पुण्यात स्थायिक झालेत.
एकुलती एक मुलगी.त्यात घरी कशाचीच कमी नाही.ती लाडाकोडात वाढत होती.लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही प्रसन्न होत्या.ती बोलता बोलता इंजिनिअर झाली.एक चांगल्या आयटी कंपनीत नोकरीला लागली.आता तर तिच्या हातात स्वतःचा पैसा खुळखुळत होता.
त्याच कालावधीत निरजचं इंजिनिअरिंगचा शिक्षण पुर्ण होऊन तो एमबीए करायला पुण्यात गेला होता.त्याचे मामाचे घरी अधूनमधून जाणेयेणे व्हायचेच.
पण निरज सुरवातीपासूनच अगदी शांत स्वभावी आईसारखा.
कधी कधी मामाकडे एखाद दिवस मुक्कामाला असायचा.तेव्हा त्याने नेहाचे उच्छृंखल वागणे बघितले होते.तिचं पोरकटपण तो बघत होता.
निरजही शिक्षण संपवून एका चांगल्या कंपनीत नोकरीला लागला होता.सगळं स्थिरस्थावर झालं होतं.आता त्याचे दोनाचे चार हात करून द्यावे म्हणून वीणा,विवेकने त्याला तसे सुचित केले.वधुसंशोधन सुरु झाले.

इकडे नेहासाठीही मुलगा शोधतच होते.
वीणाच्या भावजयीला मनात आले निरज काय वाईट आहे?नेहासाठी म्हणून बघा म्हणत तिने नवर्याच्या कानावर घातले.त्याला बहिणीचे शब्द आठवले.त्याने लगेच विवेक वीणाशी संपर्क साधून आपले मनीचे त्यांच्या कानी घातले.
वीणालाही वाटले मुलगी देखणी,सुशिक्षित, घरादाराचा तर प्रश्नच नव्हता.नव्याने ऋणानुबंध घट्ट होतील.
विवेकलाही पटले.दोघांनी मिळून निरजला सहज विचारले ," आपल्या बाळुमामाची नेहा कशी वाटते ?"
निरज एक मिनिट काहीच बोलला नाही.तेव्हा वीणा म्हणाली," जबरदस्ती नाही.तुझ्या मनात दुसरी कोणी असेल तर तसे सांग .फक्त असे वाटले आणि मामाकडूनही निरोप आलाय म्हणून विचारतोय."

निरज अगदी हळुवारपणे म्हणाला,"आई, ती हायफाय मुलगी आपल्या घरात निभेल असं वाटतं तुला?"
त्यावेळी वीणा त्याला म्हणाली होती,' अरे! लग्नाआधी सगळ्याच मुली अशाच असतात.अल्लड, अवखळ.लग्न झालं अन् जबाबदारी पडली अंगावर की आपोआप सुधारतात. "

निरज आईवडीलांच्या शब्दाबाहेर नव्हताच.आईबाबा म्हणताहेत तर करुन टाकावं.होईल बदल नंतर.शेवटी आईच्या भावाचीच मुलगी नं.स्वभावाने आईसारखीच असेल.आपण फक्त तिचं बाह्य वर्तन बघितलं.अंतरंगातून चांगली असेल.
अशा सकारात्मक विचाराने त्याने होकर भरला.वीणालाही खूप आनंद झाला.
वीणाने रितसर माहेरी निरोप धाडला.तिकडेही आनंदीआनंद.
लगेच साखरपुडा आटोपला.लग्नाचा मुहूर्त काढला आणि थाटामाटात दोघांचे शुभमंगल संपन्न झाले.

लग्नानंतर चारसहा दिवसात पाव्हणे मंडळी गेली.ती दोघे मधुचंद्राला जाऊन आली.पण परत आल्यानंतर निरजच्या चेहर्यावर जो आनंद असायचा हवा होता तो दिसत नव्हता.वीणाने त्याचा चेहरा वाचला होता.आईची पारखी नजर ती.पण नवीन नवीन आहे काही दिवसांत होईल सुरळीत म्हणून ती शांत राहिली.
आता मात्र नेहाने आपले रंग दाखवायला सुरवात केली.
तिने लग्नाआधीच निरजला म्हटले होते," लग्नानंतर आपण वेगळे राहू."
निरजने तिला तेव्हाच समजावले होते.
पण घरी काय सांगणार ?एकतर मामाचीच मुलगी .दोन्हीकडचे संबध खराब होतील. तो शांत राहिला.वरतून जरी असे वाटत होते तरी तो आतून पोखरत होता.
त्याच्यासाठी रोजचेच मरण अशी अवस्था होती.त्याचे कशातच मन लागत नव्हते.त्याची तब्येत वारंवार खराब होऊ लागली.वीणाने त्याला डाॅक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला.नेहमी नेहमी असं का होतं? खरं कारण तिच्या लक्षातच आलं नाही.नेहा त्याला किती टाॅर्चर करते ते.अशात तो दिवस उजाडला.
आता मात्र वीणाच्या पायाखालची वाळूच सरकली. शेवटी माहेरी आपलीच बदनामी होईल. पण आता विचार करायला नेहाने वेळच दिला नाही.शेवटी निर्णय घ्यावाच लागला.

वीणा विवेक यांनी जशी जायची तयारी केली तशी ते बघून निरज आईच्या खांद्यावर मान टाकून एखाद्या लहान बाळासारखा हमसून हमसून रडत होता.वीणा त्याला समजावत होती.पण तो समजत नव्हता.त्याचा एकच घोषा मला तुम्ही हवे आहात.
शेवटी वीणा नेहाला म्हणाली,"नेहा, आज मला स्वातंत्र्य उपभोगायला हवे म्हणत सासुसासर्यांना दूर करतेय उद्या त्याच उच्छृंखल स्वातंत्र्यासाठी नवर्याला दूर करु नकोस.
एवढीच अपेक्षा करते त्याला सुखात ठेव पोरी. दोन कुळांचा उद्धार कर."
म्हणत एवढावेळ रोकलेला तिचा अश्रुबांध फुटला.निरज 'आई बाबा आई' करत रडत होता.
नेहाने वीणाचे शब्द ऐकले आणि तिही विरघळली.
ती बघत होती आईवडीलांशिवाय निरज राहु शकत नाही.तो कसा सुखी होईल ?
तिने विवेक वीणाचे पाय पकडले," आईबाबा तुम्ही जाऊ नका. मी चुकले.मला माफ करा.निरज,मला माफ कर.मी ओळखलेच नाही रे तुम्हा लोकांना. मी एकल कुटुंबात लाडाकोडात वाढले.नात्यांचे रेशीमबंध काय असतात ते अनुभवलेच नाही.जेव्हा वेळ आली तेव्हा पूर्वग्रह दुषित.
सासुविषयी एक वेगळेच चित्र मनात तयार झालेले.
पण आज कळली मला माझी चुक मला माफ करा.कोणीच कुठे जाणार नाही.मला तुमच्या ममतेची सावली नाही देणार ?"म्हणत ती वीणाच्या गळ्यात पडून रडायला लागली.
वीणानेही 'देर आये दुरुस्त आये' म्हणत नेहाला हृदयाशी कवटाळले
निरजचे अश्रु आनंदाश्रुत रुपांतरीत झाले.
रेडीओ वर गाणे सुरु होते,' अंगणी गुलमोहर फुलला...'
समाप्त
©®शरयू महाजन
अष्टपैलु लेखन स्पर्धा

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा