# कादंबरी – मानसी # भाग ७

This part is about Manasi has accepted the truth

                                                               # कादंबरी – मानसी # भाग  ७  

                                                                 भाग  ७  मानसीने  सत्य  स्वीकारलं

आई वडील,चांगली पुस्तके आणि आपले चांगले कर्म आणि चांगले मित्र मैत्रिणी आपल्या सोबत असतील तर कोणीही आपलं वाईट करू शकत नाहीत . आपोआप मार्ग मिळत जातात ,आपोआप कोडी सुटत जातात . आणि जेव्हा संकटात असतो तेव्हा जरा पेशन्स ठेवले तर सोने पे सुहागा . मानसी ने अग्निपंख वाचायला घेतल्या पासून एक वेगळीच मानसी तयार होत होती . कदाचित ट्युशन , रांगोळी चे क्लास घेणे घरी बसून हे तिला आधी पटले नसते पण जेव्हा तिने वाचले ग्रेट डॉ. apj अब्दुल कलाम यांनी एके काळी न्यूज पेपर वाटले. त्यांच्या दृष्टीने कोणतेही काम कमी महत्वाचे नसते

तिने स्वतःहून ठरवलं जॉब मिळे पर्यंत मी हे काम करेन . सकाळी उठल्या उठल्या ती आई ला म्हणाली

“आई मी तयार आहे मी राजुचा ट्युशन  पण घेईन आणि मी रांगोळीचे क्लास पण घेईन तू कळव सविता मावशीला”

“आई अ ग  नुसतच घरात बसायचं ते मला पण बोर होईल त्या पेक्षा मी हे काम केलं तर माझं मन पण रमेल आणि मी माझ्या गाडीचा हप्ता पण मी माझ्या पैशाने भरेन . शिवाय मी दर महिन्याला पगार मिळाला कि १ ग्रॅम सोन्याचं वळ  पण घेते त्यातही खंड नाही पडणार . तोपर्यंत माझं जॉब च काम कुठे ना कुठे तरी होईलच . कारण मी without notice period  job सोडलाय ना तर मग कदाचित ते लोक माझी  या महिन्याची सॅलरी  कट  करतील . तसे फायनल सेटलमेंट मिळेल .पण ह्या महिन्याची  सॅलरी बहुदा कट करतील .तेव्हा हि काम केल्याने माझं ह्या महिन्याचे खर्च पण निघतील .”

Accepting real situation gives you proper solution.

जे झालंय तेच सत्य आहे आणि तेच स्वीकारून त्याच्या वर रडत न बसता त्यातून बाहेर कसं पडायचं हे बघितलं पाहिजे हे आता मानसीला कळलं होत .

मानसीच्या डोळ्यात काहीतरी करून दाखवायची चमक दिसत होती आज .' झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे .जीवनगाणे गातच राहवे  '. नोकरी गेली म्हणून काय झालं .मी जा जगात survive तर नक्कीच होइन आणि  नक्कीच काहीतरी चांगलंच होईल . अशा काहीश्या अंदाज मध्ये मानसी दिसली . तिच्यात झालेला बदल आईला प्रकर्षाने जाणवला .

आई म्हणाली "मानसी तुला मी पुन्हा एकदा सांगते .पैसे मिळतील म्हणून नाही तर तू घरी रिकामी बसण्यापेक्षा काहीतरी करशील तर तुला पण छान वाटेल नाहीतर जॉब गेला म्हणून दुखी होऊन बसून राहशील .

"हो आई तेच तर म्हणतेय मी "मानसी पटकन म्हणाली

तेवढ्यात मानसीचा मोबाइल वाजला

"हॅलो मॅडम ! मी पराग बोलतोय "

" ओह हाय पराग ,कसा आहेस , काय चाललंय तुझं ?"

"मॅडम मी पण जॉब सोडला "

" अरे पण का ? तू तर आता छान सेट होत होतास "

" हो मॅडम , पण इकडे खूप पर्सिलिटी चालू आहे . माझं आणि टीम लीडर च भांडण झालं ती खूपच दादागिरी करते "

"एवढं काय झालं "मानसी म्हणाली

"अहो मॅडम ती ची written complaint केली मी "

"बॉस ने केबिन मधे बोलावलं होतं मला पण आणि तिला पण . "

"ती म्हणाली हा पण नको मला माझ्या टीम मध्ये .  मग काय ? बॉस ने अशी झापली ना तिला "

असो मी तुम्हाला फोन यासाठी केलाय

कि मी टीम लीडर विरोधात एक पोलीस complaint करणार आहे . तिच्यामुळे तुमचा पण जॉब गेला तर तुम्ही पण मला जॉईन व्हाल का ?

मानसी " एक मिनिट पराग तू आता फार चुकीचं वागतोयस . कशाला उगाच नको त्या भानगडीत पडतोस , पोलीस कंप्लेंट जरा जास्तच होईल . तिची चूक तिला कळेल . "

" नाही मला तर खूप harrass केली तिने मी असा सोडणार नाही "

" सॉरी पराग या गोष्टीत मी तुझ्या बरोबर नाहीये . आणि मला असं वाटत कि तू सुद्धा यात फसू नयेस . उभे आयुष्य आहे तुझ्यापुढे .प्रत्येकाला आपल्या कर्माची फळ हि मिळतच असतात " मानसीने त्याला समजवायचा प्रयत्न केला आणि फोन कट केला

मानसीला पराग च्या अश्या वागण्याचा थोडा शॉकच बसला . वरून एकदम शांत दिसणारा मुलगा पोलीस कंप्लेंट वगैरे करायच्या गोष्टी करतो .

यातून एक मात्र नक्की झालं कि मानसीला आपण काय करायला हवं आणि काय करू नये हे तरी नक्की चांगलं कळतंय.

खरतर त्या टीम लीडर चा मानसीला पण  कुठे तरी बदला घ्यायचा  होता . पराग ने हि चांगली संधी पण आणली होती . पाहिजे तर ती त्याला मिळून दोघांनी मिळून पोलीस कंप्लेंट करू शकले असते . पण तरीही ती त्या मार्गाकडे जराही आकर्षली गेली नाहि . हीच तर ताकद आहे संस्काराची . दुसऱ्याला शिक्षा देणारे आपण कोण? . तिच्यावर जो अन्याय झाला त्याला ती बळी न पडता त्यातून मोकळी झाली .

काही वेळेला आपलं नुकसान होत कारण   लोकांना आपली भीती वाटत असते. मानसी कामात इतकी हुशार होती कि टीम लीडर ला तिची जागा धोक्यात येईल असे वाटू लागले होते . म्हणूनच जर तिची बदली दुसऱ्या डिपार्टमेंट ला झाली तर तिला थोडं रिलॅक्स होईल हाच बहुदा हेतू असावा . अशा लोकांचा जर बदला घ्यायचा असेल ना तर आपण आपली प्रगती इतकी करायची कि ती त्यांना सहन नाही झाली पाहिजे . आपल्या टॅलेंट वर अशा ठिकाणी जाऊन बसायचे कि ती आपल्याला टक्कर देऊच शकत नाही .

मानसी ने तिचा resume तर त्याच दिवशी अपलोड केला होता पण अजून एकही कॉल आला नव्हता . सध्या आपल्याकडे नोकरी नाही हे सत्य मानसीने पचवायला सुरुवात केली होती.

आणि तिच्या सोबत तिचे आई बाबा पण खंबीर पणे उभे होते. मानसीला ह्या परिस्थिती मध्ये सुद्धा तिचे निर्णय तिनेच विचारपूर्वक घेण्याची संधी तिला देत होते . आई वडिलांनी मार्गदर्शन करायचे आणि मुलांना त्यांचं त्यांना निर्णय घेण्यास तयार करायचं असत. तसे ते मार्गदर्शक बनले होते. त्यांनी सुद्धा तिला सत्य परिस्थितीला सामोरं जाण्यास ताकद दिली होती . आम्ही दोघे सदैव तुझ्या बरोबर आहोत ह्याची जाणीव करून दिली होती. आणि आई बाबा आपल्या साठी किती सबुरीने घेत आहेत हे तिलाही जाणवत होते.

एकुलती एक लाडकी असताना देखील मानसी तिच्या गाडीचे हप्ते तीच भरत होती. तिच्या लग्नाला उपयोगी पडतील म्हणून दर महिन्याला १ग्रॅम चे सोन्याचे वळे घेत होती . गरज नसताना आपल्या जवाबदारीची जाणीव असणे आणि त्याच जवाबदारीने वागणे हे सोप्प नाही. या सगळ्या साठी च क्रेडिट तिच्या आई वडिलांना आहे . मानसीने आता समोर आलेल्या गोष्टी स्वीकारून राजुची ट्युशन ,रांगोळीचा क्लास आणि आई कडून कूकिंग क्लास घ्यायला तयार झाली .

🎭 Series Post

View all