# कादंबरी – मानसी # भाग ४

This part is about mansi's emotional situation

                                                           # कादंबरी – मानसी  # भाग ४

                                                         भाग ४   मानसीची मानसिक अवस्था

मानसी घराच्या दिशेने निघाली . घरी गेल्यावर आई ला कसं सांगू? बाबा काय म्हणतील ?शेजारी पाजार्यांना कळल्यावर ते काय म्हणतील ?आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अचानक पुढल्या मंथ पासून सॅलरी मिळणार नाही मग गाडीचा हप्ता कसा भरायचा?पुन्हा नोकरी कधी आणि कुठे मिळेल?त्यांनी विचारले कि आधीचा जॉब का सोडला तर काय सांगायचं? आपला decision चुकला तर नाही ना?असे अनेक प्रश्न उभे राहिले होते . मानसी च लग्नाचं पण वय झालं होतं .हल्ली सर्वांना जॉब करणारी मुलगी हवी असते . लगेच जॉबचं नाही मिळाला तर ?एका मागून एक सर्व प्रश्न मनात भीती दाखवत होते . मानसी मनाने खंबीर असल्याचा आव आणत  होती . बघू काय होईल ते ... प्रॉब्लेम्स ला फेस  करण्यातच खरी मज्जा असते . मानसी मनातल्या मनाला धीर देत देत घरी पोहचली .

"आलीस काय ग ? कसा गेला आजचा दिवस? ताप  नाही ना आला ?" मानसी च्या आई चे प्रश्न सुरु झाले . मानसी काही कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देई ना . आई च्या लगेच लक्षात आलं . आज काही तरी गडबड आहे. नाहीतर एक पाय घरात पडताच आई भूक लागलीय काहीपण खायला दे असं म्हणणारी मानसी काही बोलत नाहीये .

मानसी फ्रेश होऊन बसली . बसल्या बसल्या पण विचारातच हरवलेली . आई ने गरमा  गरम चहा आणि फोडणीचे पोहे दिले खायला .

काय ग ? आज शांत का? बरी आहेस ना? दुपारी औषध घेतलंस का?

मानसी आई पुढे काही बोलायच्या आत आईला म्हणाली "आई मी जॉब सोडून दिलाय ". उद्या पासून मला ऑफिस ला जायची गरज नाही पडणार .

तिला वाटलं आई ओरडेल ?हजार प्रश्न विचारेल पण तस काही झालं नाही . उलट आई म्हणाली बरं झालं  आता चांगला आराम कर एक दोन महिने . जरा तब्बेती कडे लक्ष दे . हातापायाच्या नुसत्या काड्या झाल्यात . आणि थोडी मला घरात मदत करत जा म्हणजे थोडं थोडं जेवण बनवायला शिक . उद्या लग्न झाले तर म्हणतील आई ने काय जेवण बनवायला शिकवलं कि नहि ?

आई ने दिलेल्या नॉर्मल reaction ने मानसी थोडी सावरली . एवढा काही मोठा प्रॉब्लेम झालेला नाहीये .थिंग्स कॅन बी मॅनेज .

मानसी ने बोलता बोलत पोहे आणि चहा चा फडशा पाडला .सकाळ पासून तशी व्यवस्थित काही खाल्लं पण नव्हते . एकदा का माणसाचं पोट भरलं कि थोडी चिडचिड कमी होते . आणि मनात चांगले विचार येतात . तसच मानसी पण घरातील कॉम्पुटर समोर बसली आणि सर्वात पाहिलं स्वतःचा resume अपडेट करायला घेतला . वेग वेगळ्या साईट्स वर तो अपलोड केला . हे सर्व होई पर्यंत ७ वाजले .दिवा लावण्याची वेळ झाली . मानसी  आता थोडी शांत झाली होती .

यातून काहीतरी मार्ग मिळेल .नोकरी तर नक्की मिळेलच फक्त कुठे आणि कधी हे काही सांगू शकत नव्हते .

मानसीने देवासमोर छान छोटीशी रांगोळी काढली ,दिवा लावला .. शुभंकरोती, स्तोत्र म्हटली . म्हणतो ना वेळ हि सर्व दुःखावर फुंकर घालत असते .तसे जस जसा वेळ जात होता  तस तशी मानसीचा मूड नॉर्मल होत होता . तिला आता एकच टेन्शन होत कि बाबांना  हि बातमी कळल्यावर ते कसे रिऍक्ट करतील ..

ती आई ला म्हणाली "आई अग बाबा ओरडतील का ग ?"

" छे ! त्यात काय ओरडायचं?ते  कशाला ओरडतील ."

 असे म्हणे पर्यंत बाबा दारात हजर . "मानसी तुझी तब्बेत कशी आहे ?  आज गेलेलीस ना ऑफिस ला ?

 मानसीने मान हलवून उत्तर दिले .

बाबांना कसं सांगू ? काय झालं ते ऑफिस मध्ये? याच विचार करत बसली .

तिच्या आधी आई “अहो ऐकलं का ? मानसी म्हणतेय तिने जॉब सोडला म्हणून ?”

बाबा आतूनच “हो का ? काय झालं ? “

“ते काही बोलली नाही पण आल्यावर म्हणाली मी जॉब सोडून आलेय . तुम्हीच विचारा . “

एक प्रकारे आई ने सांगायला घाई केली ते बरंच झालं मानसीला कसं सांगायचं हा प्रश्नच पडला होता

बाबांनी चहा घेतला आणि मग  मानसीला म्हणाले

" आता बोल काय झालं?

असा अचानक का सोडलास जॉब?

मानसीने धडाधड आज च्या पूर्ण दिवसाची कथा आई आणि बाबांना सांगितली .सांगता सांगता तिच्या डोळ्यांमधून अश्रू  वाहत होते . आई मध्ये मध्ये सांगत होती " अग  रडतेस कशाला ? आपण काढू यावर काहीतरी सोलुशन . असा रडून प्रोब्लेम संपणार आहे का?"

बाबा आपले ऐकत होते काय काय घडलय ते समजून घेत होते .

“ठिक आहे आता सोडलाय ना जॉब मग जास्त विचार करू नकोस . जॉब काय तुला मिळेल लगेच त्याचं टेन्शन घेऊ नकोस . आता तसेही तुला बरं नाहीये तर आराम कर मग बघू काय करायचं ते ?

बाबांना सांगताना मानसी ने एक एक क्षण पुन्हा जगला होता . दिवसभर झालेली घुसमट पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत होती. तिच्या मनावर खूप खोलवर आजचा दिवस काट्यासारखा रुतून बसला होता . आणि रुतलेल्या काटयामुळे जसा अख्खा पाय दुखतो तसा तिचं शरीर आणी आत्मा तळमळत होते . हे आपल्याच बाबतीत का घडले? मी काय कोणाचं पाप केलं होतं कि हे माझ्या वाट्याला आलं. व्हाय मी ????

हे सगळं ऐकल्यावर आई पण थोडी डिस्टर्ब झाली. उगाचच माझ्या लेकराला त्रास दिला त्या टीम लीडर ने हिचंच का बरं नांव दिल असावं ?.

आई च्या पण डोक्यातुन सहज सहजी जाईनात . आईने याच विचारता जेवण केलं आणि सर्वाना जेवायला बोलावलं .

"आई मला आज भूख नाहीये तुम्ही दोघे जेवून घ्या "मानसीने  आईला सांगितले

"अग बाळ न जेवून कसं चालेल ?थोडंसं  खाऊन घे . तुला रात्री गोळ्या पण घ्यायच्या आहेत ना ? चल बघू

बाबानीं पण तिला जेवणाचा आग्रह केला मग काय बाबांपुढे चालत का कुणाचं ?

जेवण आटपल्यावर बाबा म्हणाले "मी उद्या जाऊन भेटू का तुझ्या सरांना . चांगला खडसावून जाब विचारतो त्यांना .का बरं  असे केलेत तुम्ही आमच्या मानसी बरोबर “.

दुसऱ्या क्षणाला मानसी म्हणाली "नाही बाबा , नको असं काही नको . ते बरोबर नाही वाटणार . आपण दुसरा जॉब बघू माझ्यासाठी . "

बाबांना पण पटलं ते . जाऊदे आता सोडलंय ना जॉब मग त्या बद्दल फार विचार करायचा नाही . त्यांनी त्यांचा decision घेतला आपण आपला decision घेतलाय . सध्या घरात आहेस ना तर छान एन्जॉय कर.

घरातील बाकीची काम आटपल्यावर सर्वजण झोपायला गेले . मानसी पण आई बाबांना गुड नाईट बोलून झोपायला गेली . रडून रडून बिचारीचे डोळे दुखायला लागले होते .डोळ्यांची  जळजळ होत होती . सगळीकडे रात्रीची शांतता आणि काळोख होता पण हिला काही झोप येईना .सारखी हया कुशीवरून त्या कुशीवर वळत होती

एकप्रकारची बेचैनी होती. श्वास कोंडत  होता तिचा . मीच का? ह्याच उत्तर मिळत नव्हतं . आतातर डोळ्यात अश्रू येण्यासाठी पाणीच नव्हते . कुठेतरी तिला ह्या सगळ्या गोष्टींचा कसा बदला घ्यायचा याचा विचार मनात डोकावत होता .कोणाकडून घ्यायचा ? बॉस कडून का टीम लीडर कडून ? काय केले म्हणजे स्वतःला आत्मशांती मिळेल याचा विचार ती करू लागली . एक मन सांगे मरूदे  कुठं यांच्या नादी लागायचं?त्यांचं कर्म त्यांच्या जवळ . आणि दुसरा मन प्रतिशोध घ्यायला सांगत होत. काय करू ? काय करू ? ह्या विचारांनी  तिच्या  मनातं हौदोस मांडला होता .झोप येणार तरी कशी?

नतर पहाटे पहाटे तिला झोप लागली असावी बहुदा .ती कधी झोपली तीच तिला कळलं नाही .सकाळी मिक्सर चा आवाज ऐकल्यावर ताडकन उठली आणि पटापट आवरायला लागली नेहमीप्रमाणे . जणू तिला ऑफिस ला जायचंय ? आणि मधेच तिला कळले कि आज पासून आपण घरीच बसायचं . घरी बसायचं या विचाराने छातीत  धस्स झालं माझ्या सगळ्या मैत्रिणींना जॉब आहेत मी एकटीच आता घरात बसणार .मला दुसरा जॉब लगेच मिळाला पाहिजे . आजच्या आज . या विचाराने ती एकदम शांत स्तब्ध झाली.

🎭 Series Post

View all