# कादंबरी – मानसी # भाग ६

In this part mansi is feeling fresh nd relaxed and may get new ways to spend quality time

                                                         # कादंबरी – मानसी # भाग  ६

                                                                  मानसीला हुरूप आला

संध्याकाळी आईच्या भिशीच्या बायका आल्या होत्या घरी. बायकांच्या गप्पा गोष्टी ,खूप मज्जा मस्ती चालली होती. आई ने पण छान  मेनू केला होता खायला .मानसी आईला वाढण्यासाठी मदत करत होती. बऱ्याच जणींनी मानसीला पहिल्यांदा पहिले . मुख्य म्हणजे मानसी ने काढलेली रांगोळी आज सर्वांना खूप आवडली होती . "किती छान रांगोळी काढतेस ग? " प्रत्येक जण तिला सांगत होती .

मानसी आपली “थँक उ काकू” या  पुढे काही बोलत नव्हती .

इतक्यात राजू शाळेतून आल्या आल्या त्यांच्या घरी आली . तिची नजर मानसी ताईला शोधत होती . पण मानसी जरा गडबडीत होती ती आई ला मदत करत होती

राजू  च्या डोळ्यात खूप काही होत तिला मानसीला भेटायचं होत. तिची नजर मानसीवर टिकून होती . कधी एकदा मानसी ताई भेटते असे तिला झाल होत .

राजू ने तिला गाठलेच .” मानसी ताई इकडे येना  तुला काहीतरी सांगायचंय” . मानसी  म्हणाली " राजू थांब आपण मग गप्पा  मारू . मी जर आत्ता गडबडीत आहे . राजू ला लक्षात येत होत कि  ती गडबडीत आहे पण तिला मानसी ताई ला  काही सांगायचं होत .

तोपर्यंत सर्व बायका जायला निघाल्या . " छान झाला ग प्रोग्रॅम " आता पुढल्या महिन्यात जोशी काकूंकडे भेटू . असे म्हणत  एक एक जण जायला  लागल्या  . जाता जाता पुन्हा मानसीच्या रांगोळीची तारीफ सुरु झाली . कोण कोण म्हणाल्या आम्ही येऊ तुझ्याकडे शिकायला .तुला वेळ असेल तेव्हा सांग .

आणि अशा पद्धतीने आजचा भिशीचा कार्यक्रम संपला .

राजू सर्व बायका जाण्याची वाट बघत होती . सर्व बायका जाताच राजू ने मानसी ताई ला एक घट्ट मिठी मारली .

मानसीला काही कळलेच नाही हि अशी का करतेय

" काय ग काय झालं ?

राजू  म्हणाली " अग ताई आज तुझ्यामुळे मला शिक्षा झाली नाही . माझा होमवर्क  पहिल्यांदाच सगळा बरोबर होता . म्हणून बाईंनी आज माझ्यासाठी सर्व मुलांना टाळ्या वाजवायला सांगितल्या . माझं खूप कौतुक केले . आणि मला म्हणाल्या आज पासून असाच रोज अभ्यास करत जा .

थँक उ मानसी ताई .... आज तुझ्यामुळे माझ्यासाठी सर्वानी टाळ्या वाजवल्या.

मानसी ला कस रिऍक्ट व्हावं कळतच नव्हतं . हसू आणि अश्रू यांचं मिश्रण तिच्या डोळ्यातून वाहू लागले . "मग राजू आता रोज अभ्यास करशील ना ?

बघ अभ्यास केला कि कसं  छान वाटत . घरी आई पण किती खुश होईल ."

राजू " हो नक्कीच. आज मला खूप छान वाटतंय "

मानसी " ओके  आता तुला पण खायला देते आपण दोघी खाऊ आणि मग तू अभ्यासाला जा .

मानसी ला राजुचे हे रूप एकदम नवीन होते . तिच्या स्वभावातला हा झर्याप्रमाणे खळखळ वाहणाऱ्या भावनांचे आश्यर्य वाटत होते . प्रत्येका कडून काही ना काही तरी शिकण्यासारखे असते . फक्त आपल्याला हि नजर असली पाहिजे . बऱ्याचदा आपल्याला वाईट गोष्टी पटकन दिसतात . पांढऱ्या कपड्यावर एक छोटासा डाग असला तर तोच पटकन दिसतो त्याकडेच पहिले जाते आणि ते  कापड रिजेक्ट केला जातो . राजू मधला अल्लड पणा , तिच्यातला खोडकर पणा लगेच दिसतो पण तिच्या आतमध्ये वाहणारा एक भावनांचा झरा आहे तो दिसत नाही .

मानसी चा  एकंदरीत दिवस कौतुक ऐकण्यात गेला . तिच्या रांगोळीचे कौतुक , राजू कडून मिळालेला बिग थँक उ. आई ला पण मदत केल्यामुळे आई ने पण मनोमन थँक उ दिले . तशी ती होतीच कौतुकाची कमळी . आजचा दिवस तर आनंदात गेला पण उद्याच काय ?जॉब च काय ? हे प्रश्न अनुत्तरित होतेच .

तेवढ्यात तिला आठवले बाबांनी तिच्यासाठी दोन पुस्तके काढून ठेवली आहेत ती पटकन  बाबांच्या डेस्कपाशी गेली वरती दोन बुक्स होती . १. अग्निपंख  आणि दुसरे होते  you can win . मानसी च्या बाबांना पण मानलं पाहिजे . इतकी सुंदर दोन्ही पुस्तके आहेत ना ती. अग्निपंख पुस्तका ची पहिली दोन पान जरी वाचली ना कि माणसाला पंख फुटतात आणि जसे रॉकेट उंच आकाशात उडते तसा  माणूस पण उंच आकाशात उडायला लागते.  एकदम मार्मिक बुक्स दिली होती बाबांनी . मानसीने दोन्ही पुस्तके घेतली आणि आपल्या रूम मध्ये वाचायला बसली

तेवढयात राजू ची आई मानसी च्या आई कडे आल्या

" वाहिनी येऊ का ? जरा बोलायचं होतं "

"हो या ना वाहिनी "

अहो बोलायचं होत “ असं कि राजू ची वार्षिक परीक्षा एप्रिल मध्ये आहे . मानसी पण सध्या घरी आहे . राजू आज खूप खुश होती . बाईंनी पण तिला शाबासकी दिली .होमवर्क केल्याबद्दल . तर माझं काय म्हणणं होतं . मानसी राजू ला ट्युशन देईल का ? अहो मी दोन ठिकाणी क्लास लावला हि होता  पण ती खूप मागे पडलीय तर आता कोणी घ्यायला तयार नाही . राजुला मानसी ने शिकवलेलं कळलं पण होत. अहो माझ्या पोरीचं वर्ष फुकट जाणार नाही म्हणजे नुसती पास झाली तरी मला बरे वाटेल . कारण कालच मी शाळेत  गेले होते बाई म्हणाल्या तिला या वर्षी रिपीट करा .ती दहावी साठी तयार नाही .

मानसी ची आई मोठ्या विचारात पडली . मानसी ने असाच मज्जा म्हणून आज सकाळी अभ्यास घेतला असाच ती रोज घेईल का ?तिला ते आवडेल का ?आणि मधेच दुसरा जॉब लागला तर ?आणि एवढे करून राजू नापास झाली तर ? उगाच रिलेशन खराब होतील . मानसी ची आई म्हणाली मी सावकाशीने तिच्याशी बोलते आणि मग सांगते तुम्हाला

राजू ची आई " हो चालेल .काही घाई नाही . आणि हो वाहिनी माझ्याकडून थँक्स सांगा मानसीला आज राजू स्वतःहून अभ्यासाला बसलीय .तिला आलेला हुरूप बघून मला पण असं वाटलं कि ती रोज मानसी बरोबर अभ्यास  करेल तर तिला अभ्यासाची सवय लागेल आणि मग शिकेल हळू हळू .

वाहिनी अजून एक " मी प्रॉपर ट्युशन फीस देईन बरं . त्या शिंदे बाई सर्व विषयांचे १२०० रुपये घेतात  महिन्याचे . मी पण देईन ."

मानसी ची आई " मी बोलते मानसींशी ? काय म्हणते ते सांगते मग तुम्हाला “

मानसी ची आई आज जरा गडबडीतच  होती . तरीही मनात विचार येउ लागले

काय लिहून  ठेवलाय हिच्या नशिबात . तिला आवडेल का असं ट्युशन घ्यायला . एवढी शिकून घरात ट्युशन घेणे बरोबर होईल का?तस म्हटलं तर एप्रिल महिन्यात परीक्षा होती एकच महिना तर घेयचीय ट्युशन . काय होतंय . तीच मन तरी रमेल त्या निमित्ताने आणि भारीत भारी  दोन  तास ट्युशन घेईल . राजुच वर्ष तरी सुटेल .

तेवढ्यात मानसीच्या आईचा मोबाइलला वाजला .

" हॅलो मी सविता बोलतेय "

हा सविता , बोल ग . पोहचलीस का घरी ?

सविता आत्ताच भिशी पार्टी ला आली होती घरी पोहचताच तिने मानसीच्या आईला फोन केला

" अहो मला एक विचारायचं होत , मानसी रांगोळीचे क्लास घेईल का ?आम्ही ७ जणी आहोत . आम्हाला सर्वांना शिकायचीय रांगोळी काढायला .

बाहेर महिन्याचे १००० रुपये घेतात . जर मानसी घेणार असेल तर मी अजून २/४ जणी बघते १० जणी झाल्या तर तिला हि बर पडेल . आणिआम्ही सर्व घरीच आहोत तर तिच्या वेळेत आम्ही यायला तयार आहोत”

मानसीच्या आई ला काय चाललंय ते कळेच ना .

" सविता मी मानसी शी बोलून कळवते उद्या तुला "

हो चालेल वाहिनी . बाकी आजचा प्रोग्रॅम छान झाला .मज्जा पण आली .

" हो ..

"ठीक आहे मग मी उद्या कॉल करेन तुम्हाला "

"तुम्ही बोलून ठेवा तिच्याशी . "

"हो चालेल "

मानसी ची आई इतकी गडबडीत होती कि तिला आता बोलायला फार वेळ नव्हता .फोन ठेऊन ती कामाला लागली . मानसीचे बाबा यायची वेळ झाली होती .

मानसी पुस्तकात रमली होती . बाबा आल्यावर एकत्र बसूनच या विषयावर मानसी शी बोलू असे मानसीच्या आईने ठरवले

बाबा आले. रात्रीचे जेवण आटपली . मग मानसीच्या आईने मानसीला थांबवले .

"मानसी थांब ग तुझ्या जवळ बोलायचं मला "

"काय ग आई "

सांगते " अहो तुम्ही पण ऐका हो . आज मघाशी समोरची राजू ची आई आली होती म्हणत होती कि मानसी राजुला ट्युशन देईल का ? आज राजू खूप खुश होती ती फीस द्यायला पण तयार आहे  .

आणि दुसरं एक मगाशी सविता चा पण फोन आला होता ती माझ्या भिशीमध्ये आहे . मघाशी आली होती तिला आणि तिच्या मैत्रिणीचा १० जणींचा  ग्रुप आहे त्यांना मानसी कडून रांगोळी शिकायची आहे . त्याही फीस देणार आहेत . तर आता सांग तुला ह्या पैकी काही करावस वाटतंय का ?तुला आवडेल का?

म्हणजे तुला इच्छा असेल तर आपण सांगू . माझ्या दृष्टीने पैसे मिळणार आहेत म्हणून करावे असे मी मुळीच म्हणणार नाही एक म्हणजे ह्या सर्व  स्वतःहून चालून आलेल्या गोष्टी आहे . जोपर्यंत तुला जॉब मिळत नाही तोपर्यंत तू हे करू शकतेस . तुझं मनही चांगलं रमेल . काय हो तुम्हाला काय वाटत ?"

बाबा " हा decision मानसीनेच घ्यावा . रांगोळी तर तिचे आवडीचे काम आहे . राजू चा अभ्यास घेण्यासाठी तिला थोडा अभ्यास करावा लागेल . तीच तिने ठरवावे

मानसी ची आई " काय ग मानसी तुला काय वाटत ?"

मानसी म्हणाली” सांगते थोडा वेळ विचार करुन”

आणि निघून गेली पुस्तक वाचायला . हे पुस्तकाचं ना असाच असत . एकदा का वाचायला सुरुवात केली कि पूर्ण होई पर्यंत मनाला चैन पडत नाही

मानसी अग्निपंख वाचायला सुरुवात केली होती तीच रॉकेट काय करतय काय माहित ?

फक्त एकच देव तिच्या पंखांना उंच उडायचं बळ देवो!!!

🎭 Series Post

View all