# कादंबरी – मानसी # भाग ११.

this part manasi got offer letter

                                                   # कादंबरी – मानसी # भाग ११.  

                                             भाग ११.   मानसीला मिळाले ऑफर लेटर

मानसी आता फक्त ऑफर लेटर ची वाट बघत होती. रात्री सुद्धा तिने मोबाईल तिच्या जवळ ठेवला . जरा वाजलं कि ई-मेल आलय का ते चेक करत होती . कधी एकदा हा महिना संपतोय आणि कधी एकदा मी पुन्हा त्या ऑफिस मध्ये जॉईन होतेय असे तिला झाले होते . मनात होणारी घालमेल तिला एक एक क्षण पुढे सरकत असण्याची जाणीव करून देत होतीं .

बाबा आणि आई पण या विषयावर रात्री चर्चा करत होते . बाबांना मानसीच्या मनातील घालमेल जाणवली होती . ती आता मागे हटणार नव्हती . त्यांनी आपला स्वतःचा पवित्रा  बदलला आणि आई ला मानसीच्या बाजूने पटवायला सुरुवात केली .

" अग मला तर तस काही प्रॉब्लेम वाटत नाहीये. .पाहिजे तर मी स्वतः जाऊन तिच्या सरांना भेटून घेईन . आणि यातून दुसरा एक प्रश्न आपोआप सुटला . नवीन ठिकाणी नवीन बॉस , नवीन मैत्रिणी ,नवीन काम या हि पेक्षा मानसीला तिथे ओळखतात . आपल्या घरापासून पण जवळ आहे . मानसीला सेटल होण्यासाठी वेळ द्यावा लागणार नाही .

आई " बघा बाबा , एकदा का जॉईन केलं कि मग या विषयावर चर्चा करण्यात काहीच पॉईंट नाही . ती जॉईन व्हायच्या आधी काय तीशहानिशा करून घ्या म्हणजे झालं "

बाबा " हो नक्कीच , ते मी करणारच आहे "

अजून एक मी म्हणत होतो " मानसीचे नाव वधु वर विवाह नोंदणी मध्ये नोंदवुया का ?"

आई " छे ! काय पण काय बोलता ? आपल्या समाजाच्  एक पुस्तक निघत त्यात बायोडाटा देऊ त्या पेक्षा . म्हणजे फक्त आपल्याच समाजातील स्थळ येतील .

बाबा " हो तू हे अगदी बरोबर बोललीस "

आई " मानसी ला याच शहरातलं स्थळ मिळालं तर बरं होईल नई काहो ?" आपली एकुलती एक लाडाची माझ्या डोळ्यासमोर राहील "

बाबा " हमम "... मुलीच्या लग्नाचा विषय आला कि आई बाबा दोघेही धीर गंभीर झाले . कोण असेल ,कसा असेल,असे अनेक प्रश्न दोघांच्या समोर नाचत होते

बाबा " मला वाटतंय ह्याच कंपनीत जॉब कन्फर्म झाला तर आपण सांगू शकतो मुला कडच्यांना कि आमची मुलगी जॉब सोडणार नाही , मग आपली मुलगी आपल्या डोळ्यासमोरच राहील .

आई " हो कळलं हो कळलं ... तुम्हाला लेकीच्या  लग्नापेक्षा मुलीच्या जॉब च पडलय . हे बघा माझा विरोध  यासाठी होता कि उद्या उठून टीम लीडर खुन्नस ठेवून काहीतरी कुरघोड्या करत बसेल हिच्या विरुद्ध .आणि त्याचा त्रास मानसीला च होईल . बाकी काही नाही "

बाबा " तसं नाही ग , पोरीचं मन मोडवत नाही . तिला खरंच तिथेच काम करायचंय . तिच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसतंय ते

आई " हो ना मला पण दिसतंय”

आई " ठीक आहे . तुम्हाला पटलंय ना मग काही प्रॉब्लम नाही "

बाबा " पटलंय  म्हणजे मी आधी ऑफर लेटर नीट वाचेन आणि मग माझा निर्णय देईल .

आई बाबा यांनी ह्या जॉब बद्दलचे सर्व बाजूनी विचार करून बघितला . आणि ठरवून टाकलं आलाय ना पुन्हा समोर तिच्या आणि करणारणीला आवडतंय ना मग झालं

मानसी ऑफिस च्या विचारात गाढ स्वप्नात गेली .

दुसऱ्या दिवशी तिचे सध्याचे रुटीन चालू ठेवले तसे हि ह्या मंथ मध्ये जॉईन व्हायचे नव्हते . मानसीचा दिवस रुटीन आणि ई-मेल ची वाट बघण्यात गेला तरी पण ऑफर लेटर काही आलं नाही . एक मन तिला वाटे रामदास सरांना फोन करून विचारावे कि काय झालं ऑफर लेटर च ? अजून आलं नाही का ? पण तरीही तीनएक दिवस कड काढला , आपण फोन केला तर आपणच मागे लागलोय असे नको वाटायला .

 ऑफिस मध्ये काम करता करता तिला एक नक्कीच कळलं होत . आपल्याला गरज आहे असे समोरच्याला कळले कि तो आपला फायदा नक्कीच घेणार . म्हणून जरी आपल्याला गरज असली तरी ती दाखवू नये . जे आहे त्यात मी समाधानी आहे असे जर आपण समोरच्याला भासवले कि मगच आपल्याला पाहिजे त्या पेक्षा , म्हणजेच आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळते . 

ऐकायला थोडे कसतरी वाटत असेल पण हेच सत्य आहे .

शेवटी मानसीचा संयम तुटायला आला आणि मग ५ दिवसांनी तिला रामदास सरांचा मेल आला

त्यात ऑफर लेटर  होतं तिच्या जॉइनिंग ची सॅलरी पॅकेज ची ,रिपोर्टींग ची,leaves ची सर्वांची रीतसर माहिती होती .

मानसीने अधाश्या सारखे ते ऑफर लेटर पुन्हा पुन्हा वाचले . काही प्रॉब्लेमॅटिक मुद्दा टाकलाय ते पाहिलं . आणि मग बाबाना दाखवलं

" बाबा म्हणाले तू वाचलस का नीट ?

मानसी " हो बाबा , माझ्या दृष्टीने काहीच प्रॉब्लेम नाहीये .तरी माझी एक HR डिपार्टमेंट ला मैत्रीण आहे मी तिच्याशी एकदा बोलून घेते . "

बाबा " ठीक आहे "

मानसी मनातून इतकी खुश झाली होती ना .... हा जो आनंद आहे तो सांगायला शब्द अपुरे पडतील असा आहे . मानसी ने हातपाय धुतले आणि देवापुढे साखर ठेवली आणि हात जोडून नमस्कार केला .

आई वडिलांच्या संमतीने आणि देवाच्या आशीर्वादाने मानसी ने रामदास सरांना ऑफर लेटर मिळाले आणि मी ते accept केले आहे असे मेल कॉन्फीर्मशन दिले . याचच अर्थ मानसी त्या जॉब ला जायला तयार आहे हे तिने कळवले.

घेतला वसा पुरा करावा अस म्हणतात ना तसच मानसीने दोन गोष्टी एका महिन्यापुरत्या स्वीकारल्या होत्या १ म्हणजे रांगोळीचा क्लास आणि राजुचे ट्युशन

त्यातील मानसीने रांगोळीचा क्लास अल्मोस्ट पूर्ण होत आलाच होता आता एकदा सर्वानी मिळून एक मोठा गालीच्छा काढायचा आणि मग पार्टी .

मानसीने सर्वासाठी एक एक रांगोळीचे बुक गिफ्ट म्हणून दिले आणि तिने तिच्या हाताने बनवलेली पावभाजी चा बेत केला . आई ने सर्वांसाठी मस्त मसाला चहा केला . सर्वानी काढलेल्या रांगोळी सोबत आणि मानसी बरॊबर फोटो काढले आणि क्लास ची फी मानसीला दिली . थँक उ मानसी . खूप छान रांगोळी शिकवलिस  तू . आम्हाला छान जमायला लागली . "तरी पण प्रॅक्टिस ठेवा , खूप गॅप पडली तर मग पुन्हा जमत नाही . जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढी छान बारीक टाकता येईल . आणि मला फोटो पाठवत जा काढली कि . आपला  ग्रुप तर आहेच . कीप इन touch . बाय सी उ असे म्हणत   सर्व जणी गेल्या .आणि अशा पद्धतीने मानसीचा रांगोळी क्लास हा विषय पूर्ण झाला .

आता राहिला होतं  राजू मॅडम ची ट्युशन . मानसीने स्वतः हुन ठरवलं कि राजुची परीक्षा होई पर्यंत ती तिचा अभ्यास घेईल . कारण तेव्हाच तिला जास्त गरज पडणार होती मदतीची.

राजू समोरच राहत असल्याने तिला काय ती कधीही बोलवू शकत होती अभ्यासाला . त्यामुळे जरी थोडा लेट झाला तरी रात्रीपर्यंत ट्युशन तर नक्कीच घेऊ शकते . आणि राजू च पण आता थोडं रुटीन सेट झालं होतं . रोज पाढे म्हणायचे.  वेग वेगळ्या कविता म्हणायच्या ,ग्रामर चे नियम पाठ करायचे . त्याचाच परिणाम म्हणजे तिला आता जे येत नाही तेच शिकवावं लागत होतं . काही काही वेळेला सोप्प सुद्धा यायचं नाही तिला पण अगदीच जे बारा वाजले होते त्यात सुधारणा नक्की होतीच .

बोल बोलता दिवस पटपट निघून गेले आणि मानसी चा ऑफिस ला जॉईन होण्याचा दिवस उजाडला.....

🎭 Series Post

View all