# कादंबरी – मानसी # भाग १२

manasi settled slowly in the office

                                                         # कादंबरी – मानसी  # भाग  १२

                                                            मानसीची उंच भरारी सुरु

मानसी ऑफिस ला जॉईन होण्याची वेळ आली . मानसी पूर्ण जोश मध्ये  ऑफिस ला निघाली . सकाळी लवकर उठून आवरून ऑफिस ला जायला तयार झाली . चेहऱ्यावर स्मित हास्य आपोआप आले होते . आरश्यात बघून आपला  चेहरा न्याहाळत होती .  स्वतः ला बघून बघून तयार होत होती . स्वतःला स्वतःचा  अभिमान वाटणे असे हावभाव होते ते. आयुष्यात फार कमी वेळा असे हावभाव बघायला  मिळतात . कारण हल्ली च्या जमान्यात लोक स्वतः साठी जगत नाहीत लोक काय म्हणतील या  विचारसरणीतून वागत असतात . बऱ्याचदा त्यामध्ये दिखावा असतो .

मानसी ने आता मनोमन ठरवले होते कि ती  कामाच्या बाबतीत काय आहे ती आतां सर्वांना दाखवून देणार होती . तशी तिला काम एके काम ची आवड होती .

रामदास सरांनी त्यांच्या डिपार्टमेंट च्या फायद्याच्या  दृष्टीने एक चांगला निर्णय घेतला होता आणि त्याचा फायदा मानसीला पण झाला होता .

घरातून निघता ना मानसी देवाच्या पाया पडली, आईच्या पाया पडली ,आई ने पण तिला छान तिच्या आवडीची पोळी भाजी डब्यात करून दिली होती . आई ला पण मनोमन आनंद झाला होता . मानसीच्या सुखात आईच सुख होतं .

"बाळा मन लावून काम कर " असं आई कडून आशीर्वाद घेऊन मानसी निघाली कामावर .

निघण्या आधी बाबांना पण कॉल करून सांगितले "

"बाबा मी ऑफिस  ला निघाले "

ओके बेटा " ऑल द बेस्ट, कॉल कर काही वाटलं तर  "

मानसी " हो नक्की "

आणि मानसी मॅडम निघाल्या ऑफिसला .

मानसी आली ते थेट रामदास सरांच्या  केबिन च्या इथेच आली . बघते  तर  सर आधीच येऊन बसलेत . जनरली मॅनेजर लोकं जरा उशिरा येतात त्यामुळे तिला जरा आश्यर्य च वाटले .पण ती हि वेळेतच आली होती .

" गुड मॉर्निंग मानसी मॅडम ! वेलकम टू  अवर  डिपार्टमेंट  "

बहुदा आज मानसीचा पहिला दिवस आहे तर तिला काम दाखवून देण्यासाठी ते लवकर आले असावे .

मानसीने तिचा कॉम्पुटर आणि डेस्क  ऑफिस बॉय ला बोलावून  साफ करून घेतला . एक डस्टबिन आणून ठेवायला सांगितला . केबिन मध्ये बसायचे तिचे सेटिंग करून घेतले , म्हणजे एकदा काम सुरु झाले कि अडचण नको .

एक स्त्री घरात असली कि घराला घरपण येतं तसच रामदास सरांच्या केबिन ला ऑफिसपण येऊ लागले होते .

हे सगळं आटपण्यात १२ वाजले .सर जेवायला गेले .मानसी थोडा वेळ शांत बसून राहिली . कुठून काम सुरु करावं ह्याचा विचार करत होती . रामदास सरांच्या टेबल वर क्लायंट च्या फाइल्स अस्ताव्यस्त पडल्या होत्या . मानसीने ऑफिस बॉय ला पुन्हा बोलावून घेतले . रामदास सरांच्या डेस्क वरचा पसारा यावरून घ्यायला सांगितलं .त्याला सांगितले एकही कागद हरवला  नाही पाहिजे अजून आपल्याला माहित नाहीये . कोणता कामाचं आहे कोणता नाहि ते .

फक्त सगळे सुटे कागद एका फाईल मध्ये ठेवून घेतले . डेस्क क्लीन करून झाल्यावर मानसी जेवायला गेली.

मानसी ला पुन्हा कॅन्टीन ला जेवायला जायला जरा ऑकवर्ड वाटत होते. पण काही पर्याय नव्हता .

तीच ती जेवण जेवायला बसली . तिच्या आधीच्या मैत्रिणी पण आल्या तिथे जेवायला . सगळ्यानी हे "वेलकम मानसी "म्हटलं आणि हसून तिचे स्वागत केले .

आणि नॉर्मल गप्पा मारू लागल्या . मानसीला थोडं ऑकवर्ड वाटत होते पण ती हि त्यांच्यातली च एक आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करत होती .

रामदास सर जेवून कॅबिन मध्ये आले आणि त्यांचा डेस्क पण आवरलेला त्यांना लक्षात आले . जास्त काही न हलवता डेस्क बऱ्यापैकी लावलेला होता . त्यांनाही बरं वाटलं .

जेवण झाल्यावर मानसी पुन्हा केबिन मध्ये आली . अजून हि दोघांमध्ये tunning जमले नव्हते . त्यांनाही मानसी नवीन एम्प्लॉयी होती आणि तिलाही रामदास सरांचा अंदाज नव्हता . आणि कामही अजून सुरु झाले नव्हते .

रामदास सरांनी तोपर्यंत कामाची लिस्ट काढून ठेवली होती .

" मानसी हे ५ क्लायंट आज तुम्ही पाहून घ्या . त्यांचा डेटा तुम्हाला मेल वर  पाठवतो . तुमचा नवीन ई-मेल आयडी सुरु झालाय .वगैरे.... असे म्हणून मानसीचा ऑफिस च्या कामाचा श्री गणेश झाला

रामदास सर आणि बॉस ची एकमेकांची चांगलीच फ्रेंडशिप होती . कधी रामदास सर बॉस च्या केबिन मध्ये डिसकशन साठी यायचे कधी रामदास सर बॉस च्या केबिन मध्ये जायचे . त्यांच्या नेहमीच्या रुटीन नुसार बॉस रामदास सरांना भेटायला आले .

" अरे मानसी तू हो गई क्या जॉईन .अच्छा व्हेरी गुड . अभि घुस्से  से छोडना नहीं "

मानसी " ऐसी बात नाही है सर "

“अच्छा चलो मैने मजाक किया “

अभि इस डिपार्टमेंट मी अच्छेसे काम करना । “ बॉस

मानसी " यस सर "

मानसी कामात हुशार होतीच मुळातच . तिने रामदास सरांच्या डिपार्टमेंट चे सोने केले . सर्व क्लायंट चे प्रॉपर रिपोर्ट्स , डेटा ,पेमेंट पेंडिंग ,मटेरियल पेंडिंग, असे सगळे नवीन फॉरमॅट्स , अपडेट करायला लागली .

क्लायंट रिपोर्ट्स बघून खुश होयचे . क्लायंट खुश झाले कि रामदास सर खुश होयचे .

हळू हळू मानसी ऑफिस मध्ये आणि डिपार्टमेंटमध्ये सेट झाली. संपूर्ण डिपार्टमेंट चा चार्ज घेतला . सर आणि मानसी यांची खूप छान टीम झाली .

दोघांनाही एकमेकां बद्दल खूप आदर होता. आणि कोणीही कोणाच्या अधिकाराचा गैर वापर करत नव्हते . मानसी च तिच्या ऑफिस मधलं स्थान तिने परत मिळवलेच . काम करत गेली आणि डिपार्टमेंट चा नाव रोशन करत गेली .

जो व्यक्ती आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा गैर वापर करतो तो व्यक्ती कधीच सुखी होऊ शकत नाही . कारण आज ना उद्या त्याने केलेल्या अन्याया चा रिटर्न्स त्याला फेडावेच लागतात . आज मानसी टीम लीडर च्या बरोबरीने ऑफिस मध्ये वावरत होती . तिच्या बरोबरच मिटींग्स अटेंड करत होती. एके कळी तिच्यामुळे मानसीला जॉब सोडावा लागला होता . आज काही दिवसानी मानसी तिच्याही पुढे जाण्याची शक्यता होती . ती मात्र तशीच राहिली  टीम लीडर .

नशीब पराग ने पोलिस कंप्लेंट केली नाही .त्याला सुद्धा मानसीनेच समजावले होते .आणि मानसी मॅडम ला तो मानत होता म्हणून त्याने पोलीस कंप्लेंट केली नाही . पण त्याने टीम लीडर ला फोन करून सांगितले होते

" मॅडम तुम्ही वाचलात , कारण मी तर ठरवलं होतं तुमच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करायची पण मानसी मॅडम नको करू असे म्हणाल्या म्हणून थांबलो "

टीम लीडर ला तेव्हाच कळले होते कि मानसी किती चांगली मुलगी आहे ते. म्हणून तर नंतर कधी तिच्या वाटे ला गेली नाही .

हे सर्व मानसीला तर माहीतच नव्हते .मागच्या मीटिंगला श्वेता ने मानसीला सांगितले कि असं झालं होतं आणि हि गोष्ट बॉस ला पण माहितेय .

मानसी च्या पुन्हा ऑफिस मध्ये येण्या मागे तिचं चांगलं कर्म होतं जे कि तिने न ठरवता केलं होतं . याच कारण चांगले संस्कार जे कि तिच्या आई वडिलांनी तिच्यावर केले होते . "आपलं ज्यांनी वाईट केले त्याचं सुद्धा वाईट करायचं नाही ". सोप्प नाहीये असे वागणे .

अखेर मानसीने तिचा करिअर मध्ये उंच भरारी घेतलीच  . म्हणतात ना पंखात बळ असेल तर पक्ष्याला उंच भरारी घेण्यापासून कोणीही अडवू शकत नाहि . एक ना एक दिवस तो उंच आकाशात उडणारच असतो.

आई आणि  बाबा पण मानसीची प्रगती पाहून खुश होत होते . प्रत्येक मुलीने किंवा मुलाने आपल्या  आई वडिलांना जर हा आनंद देता आला तर द्यावा , निदान प्रयत्न तरी असाच असावा . आई वडिलांना मुलांची प्रगती पाहून त्यांचं कर्तव्य पूर्ण झाल्याची पावती मिळत असते .आई वडिलांचा उर जेव्हा मुलाच्या चांगल्या कामगिरी बद्दल सांगताना भरून  आला तर समजा आपण योग्य दिशने जात आहोत .

मानसीने अजून एक काम पूर्ण केले होते . काय माहितेय आपल्या राजू ला घडवण्याचे . राजू ९ वीला उत्तम मार्काने पास झाली . अगदी फर्स्ट क्लास ने नाही पण तिच्यामध्ये आमूलाग्र बदल घडला होता आणि आता कोणीही म्हणू शकणार नाही कि ती १० च्या वर्गात जायला तयार नाही . मानसी चे रॉकेट ऑफिस मध्ये आणि राजू म्हणजेच राजश्री चे रॉकेट अभ्यासाच्या दृष्टीने उडण्यास सज्ज झाले . हल्ली राजू म्हणते मला राजश्री म्हणायचं मी आता मोठी झालेय . मुलीला मुलगी पण यायला  वेळ लागत नाही म्हणतात ना तेच खरे !!

🎭 Series Post

View all