# कादंबरी – मानसी # भाग १४

this part about how her family is getting ready for her would be husband

                                                         # कादंबरी – मानसी  # भाग  १४

                                                     भाग  १४  मानसी ला बघण्याचा कार्यक्रम

घर ऑफिस या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात खूप मॅटर करतात . घरातील वातावरणाचा ऑफिस च्या कामावर परिणाम होतो आणि ऑफिस च्या कामाचा ताण घरातल्या वातावरणावर फरक करतो . ऑफिस मध्ये जर टेन्शन असेल , कामाचं प्रेशर असेल तर त्याचे परिणाम घरातील लोकांना भोगावे लागतात . तसेच घरातील वातावरण आल्हाददायक  नसेल तर ऑफिस च्या कामात चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही . सांगायचं मुद्दा असा कि घर आणि काम याचा बॅलन्स साधता येणे हि सुद्धा एक टास्क आहे . ज्याला कोणाला हि तारेवरची कसरत नीट करता आली तोच सर्वात सुखी

कठीण आहे पण अशक्य नाही

मानसी ला ऑफिस चे काम तर चोख जमत होते .आणि घरात खंबीर पणे आई असल्याने तिला घरातल्या अश्या काही मोठ्या जवाबदाऱ्या सध्या तरी नव्हत्या .

सकाळचा नाश्ता , दुपारचा डबा , रात्रीचे जेवण , घरात आल्या आल्या चहा नाष्टा सगळं आयतं मिळत होतं

त्यामुळे ह्याची झळ तिला अजून लागली नव्हती .

आज सकाळी मानसी ऑफिस मध्ये गेली तर १५ दिवसांनी रामदास सर टूर वरून आले होते . आणि मार्च एन्ड आले होते . मार्च एन्ड ला ऑफिस मध्ये एक वेगळीच गडबड असते .सगळ्या डिपार्टमेंट्स ला त्यांचे रिपोर्ट्स द्यायचे असतात .शिवाय क्लायंट  ला पण त्यांचे त्यांचे रिपोर्ट्स हवं असतात . एकंदरीत वर्षभर  केलेल्या कामाचा आढावा घायचा असतो .

त्यामुळे काम आणि काम खूपच काम असे गणित होते . त्यात बॉस जर डोक्यावर बसलेला असला तर त्यात नक्कीच चुका  होण्याची शक्यता असते . मानसी तशी शांत होती पण कामाला वाघ होती .

त्यादिवशी कसं काय ते मानसी कडून चूक झाली

या क्लायंट च रिपोर्ट चुकून दुसऱ्या क्लायंट ला गेला . आणि प्रत्येक मेल रामदास सरांना cc ठेवलेला असतो . त्यांच्याकडून पण ते मेल चेक करायचं राहून गेले .

लक्षात केव्हा आलं जेव्हा क्लायंट  कढून मेल आलं .

एवढा पण काही मोठा प्रॉब्लेम नव्हता पण तरी कंपनी पॉलिसी नुंसार  क्लायंट चा डेटा प्रॉपर हॅन्डल करणे महत्वाचे होते.

रामदास सर नॉर्मली ओव्हर रिऍक्ट होत नाहीत . पण आज कामाचा ताण त्यांनाही खूप झाला असावा . त्यांना हि  चूक कळली ते जरा नाराज झाले आणि मानसीला म्हणाले " काय मॅडम लक्ष कुठे आहे तुमचे ?"

मानसी " सॉरी सॉरी ,ते मघाशी मेल पाठवत होते ना तेव्हाच तुम्ही दुसऱ्या क्लायंट चे डिटेल्स मागितले आणि त्यात ती गडबड झाली "

रामदास सर " हे तुमच्याकडून अपेक्षित नाहीये मॅडम "

मानसी काहीच बोलली नाही . तील पण जरा हर्ट झालं . तेवढयात बाबांचा फोन आला . मानसी ने रामदास सरांच्या समोर बाबांचा फोन कशाला उचलावा म्हणून फोन कट केला . नॉरमली आई आणि बाबांचा फोन ती कोणत्याही परिस्थितीत उचलतेच . आधीच सर जरा नाराज झालेत आणि आत्ता कामाची पण गडबड भरपूर होती.

बाबांना पण जरा आश्यर्य च वाटले कि मानसी ने माझा फोन कसा नाही उचलला

मानसी जर हर्ट झाली पण ठीक आहे आपली चूक झाली म्हटल्यावर सर काहीतरी बोलणारच ना ! असे म्हणून पुन्हा नॉर्मल कामाला लागली .बरेच वर्ष एकत्र काम केल्यावर एक चांगली बॉण्डिंग तयार होते .त्यात इतका राग नक्कीच सहन करू शकतो . आणि सर काय  उगाच चिडले नव्हते . पण आता जरा काळजीने दोनदा चेकिंग करून मेल पाठवू लागली.

बाबांनी पुन्हा फोन केला ,पुन्हा कट , इकडे बाबा नाराज ,तिकडे सर नाराज ,मानसी ला हि अशी परिस्थिती पहिल्यांदाच आली होती .

रामदास सर उठून केनिब च्या बाहेर गेले बहुदा त्यान्ना कळले कि हि  ते असल्याने फोन उचलत नाहीये .

मानसी ने एक मिनिट वाया न घालवता लगेच बाबांना फोन लावला

" हॅलो बाबा , बोला ... मी जरा मीटिंग मध्ये होते "

" हा मानसी फोन या साठी केलाय कि तू आत्ता च्या आत्ता घरी यायला निघ ते काल बोललो ना ते स्थळ वाले आज संध्याकाळी घरी येत आहेत तुला बघायला .त्या मुलाचे बाबा नेमके इकडेच आलेत . उद्या ते परत जाणार आहेत गावाला , मग आपल्याला जावे लागेल त्यांच्या गावी . त्यापेक्षा आजच्या आज होऊन जाईल बघण्याचा कार्यक्रम . "

बाबा " नको ना बाबा आज नको,आज खूप गडबड आहे . माझं खूप काम पेंडिंग आहे”

बाबा " माझं कधी पासून ऐकत नाहीस ग तू ? तुला सांगतोय ना ते कर . मी त्यांना शब्द दिलाय .आता कार्यक्रम कॅन्सल नाही होऊ शकत "

मानसी  डोक्याला हात लावून बसली . काय करावं आता या क्षणी सरांना कस सांगू कि घरी जायचंय . एवढं काम पेंडिंग आहे .बाबांनी तिला धर्मसंकटात टाकले .  आपला प्रॉब्लेम नेहमी दुसऱ्याला फालतू वाटतो .ज्याच्यावर तो प्रसंग आलेला असतो त्याच्या साठी  तो  खूप मोठा प्रॉब्लेम असतो .

" किती वाजता येणार आहेत ते " मानसी

" ते संध्याकाळी  ५ ते ६ च्या दरम्यान येणार आहेत "बाबा

मानसी " ठीक आहे मी त्याच्या आधी पोहचते .

बाबा " ठीक आहे "

मानसी ला आता सरांची परमिशन घ्यायची होती लवकर जाण्यासाठी .

मानसी काम करू लागली .कामच स्पीड थोडा वाढवला . पण तरीही थोडं काळजीपूर्वक पण करत होती .

तोपर्यंत सर बाहेरून आले .

रामदास सर "  मानसी त्या  ABC कॉर्पोरेशन चा रिपोर्ट देतेस का ? मगाशी त्यांचा फोन आला होता "

मानसी " हो सर देते “

मानसी मनात म्हणत होती आधी हे तर पूर्ण होऊ दे मग देते  ABC कॉर्पोरेशन चा  रिपोर्ट . हे बाबा पण ना ! जरा सुद्धा माझा विचार करत नाहीत .त्यांना शब्द द्यायच्या आधी मला नको का विचारायला ?

मानसीने रामदास सरांना रिपोर्ट ची प्रिंटाऊट देता देता मानसीच्या मनात विचार आला आता  बोलू का सरांशी तेवढ्यात

रामदास सर " मानसी व्हॉट इस युअर प्रॉब्लेम टुडे ? लक्ष नाहीये आज कामात ?"

मानसी " काय झालं "?

रामदास सर " मला  ABC कॉर्पोरेशन चा रिपोर्ट हवाय . तू CCD  लिमिटेड चा दिला आहेस "

मानसी ला तिच्या अशा कृतीवर विश्वासच बसत नव्हता " ओह शीट ! आय एम रिअली सॉरी "

रामदास सर " i think you should take a  break”

मानसी " सॉरी सर . पण मी खरंच जाते आज घरी लवकर .मला आज थोडा ब्रेक घ्यावा असा वाटतोय " सर मी उद्या  सकाळी लवकर येईन आणि सर्व काम आटपेन .

मी जे काम हातात आहे ते संपवते आणि जाते घरी .

रामदास सर " ओके  "

मानसी " थँक उ सर "

घेतलेले काम उरकून मानसी फायनली निघाली घरी .

तितक्यात बाबांचा फोन आला " अग  निघालीस का ? तुला सरांना कस सांगावं असा प्रश्न पडला असेल म्हणून मी च सांगून टाकले . बघ सोडलं कि नाही लगेच . खर तर अशा पर्सनल गोष्टी बॉस ला नसतात सांगायच्या पण रामदास सर तसे बरे आहेत म्हणूनच सांगितले त्यांना . "

तेव्हा मानसीला कळले कि सरांनी मानसीला का सोडले. बाबांनी त्यांना फोन करून ठेवला होता.

शिवाय का घरी लवकर जायचंय त्याच कारण पण सांगितलं होतं

मानसी " हो निघालीय पोहचेन आता २० मिनिटात घरी "

बाबा " मी एक साडी नवीन आणून ठेवलीय .तू आज ती साडी नेस " मी पण  मी पण ३० मिनिटात पोहोचतोच घरी ,

मी काजू कतली आणायला आलोय ".

मानसी " बाबा कशाला एवढी धांदल करून घेताय .”

बाबा " मी येतो सावकाश ,तू पोहच सावकाश "

बाबांची नुसती गडबड चालू होती .मानसी च्या दाखवण्याच्या प्रोग्रॅम च चांगलाच मनावर घेतलं होत  त्यांनी.

मानसी घरी पोहचली आणि जरा बेड वर आडवी पडली .

" आई मी जरा १५  मिनिट पडते . मग तयार होते "

आई " ठीक आहे ,पण बाबा यायच्या  आधी उठ "

मानसी "होय"

मानसी लिटरली १५ मिनिट छान झोपी गेली .त्यामुळे तिच मन जरा शांत झालं.

हि १५ मिनिटांची पण शांत झोप खरोखरच खूप चांगलं काम करते . थकवा घालवते ,चिडचिड पण कमी करते ,आणि मग विचार पण चांगले येऊ लागतात

१५ मिनिटांनी मानसी उठली आणि बाबांनी आणलेली साडी बघितली . इतकी सुंदर साडी होती,मानसीला बघताच क्षणी आवडली . आईने शेजाऱ्यांकडून पिको करून ठेवला होता . मग मानसी पटापट आवरायला लागली .

आई ची बिचारीची काय गडबड घर आवरणे ,खाण्याचे पदार्थ बनवणे , स्वतः तयार होणे आणि बाबा सांगतील तसे वागणे . अशा वेळी बाबा एकदम चिडचिडे होतात ,त्यांना सर्व गोष्टी त्यांच्याच पद्धतीने होयला पाहिजे असतात . अशा वेळी त्यांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत.

त्यांचा राग , राग म्हणण्यापेक्षा त्यांची excitement कंट्रोल करायचं डिपार्टमेंट आईला हॅन्डल करावे लागते, ती बरोबर त्यांना सावरून घेते.

पाहुणे यायची वेळ तर झालेलीच .बघूया आता हा बाबांनी निवडलेला मुलगा मानसी ला आवडतोय का

🎭 Series Post

View all