# कादंबरी – मानसी # भाग १८

in this part Manasi got call from unknown number

                                                                # कादंबरी – मानसी  # भाग  १८

                                                               मानसीला कोणाचा कॉल आला

भाग १७ ला क्रमश:

मानसी " हॅलो कोण बोलतय ?

समोरून " हॅलो मी तुषार बोलतोय  बोलतोय . काल  आलो होतो ना तुमच्याकडे तो "

अरे हो सांगायलाच विसरले मानसीला आवडलेल्या या सामान्यातला असामान्य मुलाचे नाव" तुषार "आहे . तुषार ने मानसीला का बरे कॉल केला असेल ?. त्याने हि घेतलेली स्टेप  बरोबर असेल का ?त्या स्टेप चे काय परिणाम होतात .सध्या तरी चित्र स्पष्ट दिसत नाहीये .पण तरीही तुषार ला मानसीला कॉल करावासा वाटला हि पण एक विचार करण्या सारखी गोष्ट आहे

मानसी थोडी हडबडलीच . ह्याने डायरेक्ट कसा काय कॉल केला ? .

मानसी " हा....  त .... तुम्हाला बाबांचा नंबर हवाय का ?थांबा देते

तुषार " नाही मला तुझ्याशी बोलायचं आहे ,तू मला कुठे तरी भेटशील का ?"

मानसी शॉकच .आता ती मनात त्याच्या विषयी विचार  होती आणि त्याचाच कॉल आला . तिला त्याला काय उत्तर द्यावे हेच कळेना . ती अशी कधी कोणाला घरा बाहेर  भेटली नव्हती . .त्या मुलाचे म्हणजेच तुषार चे बोलणे ऐकून मानसी चा थरकाप उडाला . काय उत्तर देऊ ... अशा विचारत पडली ?

तुषार " हॅलो , जमेल का भेटायला ?"

मानसी " आज नाही जमणार माझं खूप काम पेंडिंग आहे .त्या पेक्षा तुम्ही घरी याला का संघ्याकाळी?”

तुषार " नाही घरी नाही जमणार . माझा कॉल आला  होता हे घरी सांगू नका " आणि फोन कट केला त्याने .

मानसीला काही कळेच ना हा असे का बोलतोय .घरी सांगू नकोस काय? असे बोलून  तो मानसीला मोठ्या संकटात टाकत होता . आई वडिलांपासून काहीच न लपवणारी मानसी अचानक आई वडिलांना अंधारात कशी काय ठेऊ शकणार? . आणि ह्याला हिच्याशी काय बोलायचं होत कि तो आई वडिलांना न सांगता मानसीला सांगणार होता?? .

मानसी खूप अस्वस्थ  झाली ...

काय करावे कळेना ? कोणाला सांगावे ? काहीच कळेना ??

ज्या व्यक्ती च्या आयुष्यात कधी काही सेक्रेट्स आलेलेच नाहीत .कसली लपवा छपवी नाही आणि साधं सरण आयुष्य जगलेलं आहे त्या व्यक्तीला अचानक असे काही करायला लागले तर ते संकटच म्हणावे  लागेल  

मानसीने पटकन देवाला मनोमन हाथ जोडले .हे देवा , मला चांगला मार्ग दाखव .

तिला आता स्वतःचा राग यायला लागला.

का ?

कशासाठी ? हा unknown कॉल मी उचलला . कॉल उचलला नसता तर हि वेळच आली  नसती .

ती थोडा वेळ शांत बसली आणि तिने मनोमन ठरवून टाकले . काल भेटलेल्या मुलासाठी मी माझ्या आई वडिलांशी  खोटं  बोलणार नाही .

मानसी पुन्हा काम करण्या चा प्रयत्न करू लागली .

मानसी  चे  सर्व लक्ष विचिलित झाले होते एका कॉल ने .

तुषार चे शब्द  तिला सारखे आठवत होते. तो जरा  टेन्शन मध्ये वाटत होता . काय असेल जे कि त्याला मला भेटून सांगायचे असेल .

तसं तर मानसीला पण त्याच्याशी बोलायचे होते पण त्यांचा होकार आला तर . त्याच्या घरातून काही कॉल नाही आला आणि इकडे याला त्या आधीच हिच्याशी काय बोलायचं असेल .

मानसी  च एक मन सांगे कि आता  च्या अत्ता बाबांना फोन करून सांगावे कि तुषार चा कॉल आला होता .म्हणजे तिच्या मनाला शांती मिळेल .

काय योगायोग असा विचार करत असतानाच तिला फोन आला तो पण तिच्या बाबांना . म्हणतात आई वडिलांशी मुलांची नाळ जोडलेली असते .

मानसी ने बाबांचा कॉल घेतला

बाबा " मानसी ग एक बोलायचं होतं , आत्ता वेळ आहे का तुला थोडा "

मानसी " हा  बोला ना बाबा "

बाबा " अ ग सांगायचं असं  कि तू जरा अलर्ट राहा "

मानसी " म्हणजे "

बाबा " तसं नाही ग . अलर्ट म्हणजे जेव्हा एखादे स्थळ आवडते ना तेव्हा दोन आठवड्यांची मुदत मागून घेतात बरेच लोक "

मानसी " बाबा नीट सांगा ना , मला काही कळत नाही ये

बाबा " अग म्हणजे ते काल आलेले त्यांनी २ आठवड्यांनी सांगतो म्हणाले म्हणजे पुढच्या दोन आठवड्यात ते तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत किंवा असू शकतात . ते तुझ्या ऑफिस पर्यंत सुद्धा पोहोचतील . तिकडे विचारणा करतिल " हीच चरित्र कसं आहे ? हीच घराबाहेर वागणं कसं आहे ?वगैरे वगैरे.

मानसी " बाप रे . काय हॉरिबल आहे हे ?

मानसी ला खरोखरच घाम फुटला . आता तिच्या लक्षात आले .तुषार चा हा कॉल माझं चरित्र चेक करण्यासाठी होता . ती पटकन त्याला भेटायला तयार होते का ते बघायला होता .

मानसीला इतका राग येत होता . आणि रागा  बरोबर तिच्या  डोळ्यांतून गरम  अश्रू वाहू लागले .

मानसी  "मी काय शो पीस आहे का .हे लोक मला मागून पुढून चेक करून विकत घेणार आहेत . माणूस म्हणून माणसाची किंमत आहे नाही "

बाबा " अग रडतेस कशाला ? मी तुला काय होऊ शकते ते सांगितले "

मानसी " हो. कळलं मला पण मला नाही करायचं असे लग्न , माझं लग्न नाही झालं तरी चालेल . बाबा हे थांबवा .काही पण करून थांबवा ."

तेवढयांत रामदास  सर आले केबिन मध्ये . मानसीने पटकन डोळ्यातले अश्रू पुसले .

मानसी " हो बाबा  मी फोन ठेवते आता . मला थोडं काम आहे आणि असे म्हणून बाबांचा कॉल संपवला "

मानसी काम  करू लागली

मानसीच्या आत एक समुद्र खवळलेला  होता . तिला  तुषार आणि फॅमिली चा इतका राग येत होता . इनफॅक्ट या साऱ्या सिस्टिम चा राग येत होता . अरे arrange marriage म्हणजे काय हा खेळ खंडोबा करून ठेवलाय मुलींच्या आयुष्याचा . तिला मुलगी होण्याचा राग येऊ लागला . तिच्या असण्याचा राग येऊ लागला . तिला असे कोणी तरी आपल्याला  judge करतंय त्याचा राग येऊ लागला .

रामदास सर खाली त्यांच्या बॉस बरोबर भेटून आले होते . त्यामुळे ते जरा रिलॅक्स झाले होते . पण केबिन मध्ये येत असताना मानसीचा आक्रोश त्यांना काचे तुन दिसला होता .

हे सगळं होई पर्यंत संध्याकाळचे ६ वाजले . रामदास सर मानसीला म्हणाले

"मानसी तू आता जा , सकाळी पण लवकर आलीस . आज खूप काम झालय . मी पण निघतोच आहे "

मानसी " हो सर मी निघतेच आहे  असेही  आज ६० क्लायंट चा डेटा तयार झालाय "

रामदास सर " दॅट्स ग्रेट , गुड "

रामदास सरानी लॅपटॉप उचलला आणि चालले घरी

मानसी " बाय सर "

रामदास सर " बाय "

सरांच्या पाठोपाठ मानसी पण घरी निघाली

मानसी ऑफिस च्या  बाहेर पडली खरी पण आज तिला बाहेर सुद्धा भीती वाटत होती . तिला कोणीतरी पाहत असेल ? तिच्या वर लक्ष ठेवायला माणूस लावला असेल का ? . तिच्या ऑफिस मध्ये पण जासूस लावला असेल का ?असे काहीसे विचार तिच्या मनात घोळत होते .

अशाच काही विचारात मानसी घरी पोहचली . आई  ला ती मी स्वतः नॉर्मल आहे असे भासवत होती .

तिला आता त्या मुलाचा कॉल आला होता हे सांगायचे होते . काय सांगू ? कसं सांगू ?या चा विचार करत होती .

बाबा आले कि एकदमच सांगू दोघांना असे म्हणून ती गप्प बसली .

का पण ? एव्हाना तिने सांगून टाकायला पाहिजे होत ?

त्या मुलाने तिला  फोन केला होता हे घरी सांगू नकोस असे सांगितलं होतं . मानसी च मन त्याचा कॉल आलेला हे आई बाबांना  सांगायला  तयार  का  होत  नव्हत.?

मानसीला त्याच नाव बाबांना सांगायला भीती वाटत होती . बाबांना जर कळले कि तुषार ने तिला डायरेक्ट कॉल केला होता तर ते लगेच मुलाच्या बाबांना फोन करून सांगतील आणि मग त्याच्या घरातली माणसे त्याला ओरडतील . हे सगळं नको होयला असे मानसीला वाटत होते .

ठरवून लग्नाचं हे असच असतं . एखादी गोष्ट कोणाला नाही पटली  तर लगेच लग्न मोडायला निघतात .

तुषार ने अवलंबलेला मार्ग त्याच्या दृष्टीने योग्य असेल पण त्याच्या किंवा मानसी च्या आई वडिलांच्या दृष्टीनं चुकीचा च ठरणार होता . म्हणूनच तर तो मानसीला म्हणाला कि मी तुला कॉल केला हे तू घरी बोलू नकोस .

सध्या तरी हे बाबांना कळून द्यायचे नाही असे मानसीने ठरवून टाकले

मानसी ने जर आता सांगितले तर इथून पुढच्या गोष्टी ना पूर्ण विराम लागेल . मुलगा अति शहाणा आहे असे किंवा फारच ऍडव्हान्स आहे असे कारण देऊन बोलणी थांबु  शकतात.

मानसी याच भीतीने अजून बाबांना बोलली नाहीये . बघू आता मानसी ने दिलेल्या जीवन दानाचा तुषार ला काही फायदा होतो का ?

🎭 Series Post

View all