# कादंबरी – मानसी # भाग २२
एक रोमांचक किस्सा
क्रमश: २१
बाबा तुषार ला फोन लावायला लागले . मोबाईल ची रिंग तर बऱ्याचदा वाजली पण तो फोन उचलेना . शेवटी बाबा मानसीला म्हणाले " अग कोणीच फोन उचलत नाहीये , जाऊ दे आपण उद्या बघू तू झोप आता "
मानसी पण म्हणा काय करू शकणार होती आता . " ठीक आहे बाबा " असे म्हणून पुन्हा ती झोपायला तिच्या रूम मध्ये आली
मानसी ला राहून राहून तृप्ती ची काळजी वाटत होती . तृप्ती बरोबर घरी गेली असेल ना . ती ला माझी एवढी काय मदत हवी होतीं ?
मी काही चुकले तर नाही ना असे प्रश्न झोपून देईनात .
आणि तुषार ? त्याने का बरे इतके कॉल्स केले असतील ? तुषार पण ना ? आता कॉल उचलायला काय प्रॉब्लेम होता ? एवढे कॉल केले त्याने तर आता माझा कॉल का उचलत नाहीये ?
इतक्यात मानसी चा मोबाइलला वाजला . समोरून तुषार चा कॉल येत होता .
हा मुलगा मानसी ला नेहमी संकटात टाकतो . आता पुन्हा बाबांना उठवायला जावं तर ते झोपले असतील . तिनेच उचलला तर रात्र झालीय हि वेळ नाही त्याच्याशी बोलायची . नाही उचलावं तर तृप्ती ची माहिती मिळणार नाही . मानसीने ठरवले फक्त तृप्ती संदर्भात बोलायचे आणि विषय मिटवण्याचा . आणि तिने तुषार चा कॉल रात्री , अपरात्री उचलला
मानसी " हॅलो "
तुषार " हॅलो "
मानसी " तुझे १० मिस्ड कॉल होते मोबाईल वर म्हणून मगाशी कॉल केला होता .काय झालंय ?
मानसीला इतका राग येत होता तुषार चा ती मनातल्या मनात म्हणाली अरे गाढवा बोल कि पटपट माझ्या बाबांना कळलं कि मी आता बोलतेय तर तुझी काही खैर नाही .
तुषार एकदम हळू आवाजात " मानसी तुला तृप्ती चा आज काही कॉल आला होता का ?"
मानसी " हो आला होता , मला मंदिरात भेटायला बोलवत होती , पण मी तिला सांगितले होते कि नाही येऊ शकत "
मानसी ला हा कॉल पटपट संपवायचा होता म्हणू पटापटा सांगत होती .
मानसी " का काय झालं ? कशी आहे ती ?
तुषार रडवेला आवाजात - " तेच तर माहित नाहीये ना , मी शोधतोय तिला "
मानसी " म्हणजे ? काय बोलतोस ? नीट सांग तुषार लवकर सांग ? इकडे मला टेन्शन येतंय "
तुषार " काही नाही ग , चल ठेवतो , "
मानसी : एक मिनिट …असं अर्धवट सांगून काय ठेवतोस .
तुषार " माझंच चुकलं " आणि तुषार ने आवंढा गिळल्याचा आवाज आला .
मानसी " तुषार , तृप्ती कुठे आहे ?
तुषार " नाही ना माहित , तिलाच तर शोधतोय , संध्याकाळ पासून मला भेटली नाही . मी खूप शोधलं तिला .
मानसी " अरे फोन लागत नाहीये का तिचा ?
तुषार " नाही ना ?
मानसी " कुठल्या मैत्रिणीचा नंबर आहे का ?"तिला कॉल करून बघ
तुषार " माझ्या कडे एकाच मैत्रिणी चा नंबर आहे ती पण तिला काहीच माहित नाही "
मानसी " तो नंबर मला पाठव "
तुषार " पाठवतो "
दुसऱ्या मिनिटाला तुषार च्या मोबाइल वरून मानसीच्या मोबाईल वर मेसेज आला त्यात त्या मुलीचं नाव आणि नंबर होता
मानसी म्हणाली “ ५ मिनिटात कॉल कर मला मी कॉल करून बघते “
मानसीने वेळ काळ न बघता त्या मुलीला फोन केला
मानसी " हॅलो मी तृप्ती ची मैत्रीण बोलतेय , तू स्वाती बोलतेस का ?
स्वाती " हो "
मानसी - " स्वाती ,तृप्ती चा काही कॉन्टॅक्ट झाला का आज ? ती घरी गेली नाहीये , जर काही माहिती असेल तर लवकर सांग , कारण आम्ही आता पोलीस कंप्लेंट करायला जातोय . जर तुला माहित असेल तर सांग , किंवा जे माहितेय ते सांग ?
स्वाती " अ .... आ ....
मानसी " स्वाती प्लिज लवकर सांग किंवा तिच्या अजून मैत्रिणीचा नंबर असेल तर दे "
स्वाती " ऐक ना मानसी ... तू कोण आहेस ?
मानसी : मी तिची फॅमिली फ्रेंड आहे . मी तुझं नाव अजिबात कोणाला सांगणार नाही . पण जर पोलिसात गेलो तर मला तुझं नाव घ्यावं लागेल "
स्वाती " हि तृप्ती पण ना ,,, मला उगाच अडकवलंन तिने “
मानसी " म्हणजे "
स्वाती " म्हणजे , तृप्ती च नि तिच्या दादाचं आज दुपारी भांडण झालं , कशावरून ते मला नाही माहित . पण ती खूप अपसेट होती आज . संध्याकाळी गणपतीच्या मंदिरात ती मला भेटली होती . "
मानसी " मग आता कुठे आहे ती ?"
स्वाती " तिला तिच्या भावाचा खूप राग आला होता सो त्याला अद्दल घडवायला ती म्हणाली आज तिला घरी नाही जायचंय "
मानसी " मग कुठे गेली ती ?"
स्वाती " माझ्या घरी राहायला चल म्हटलं तर म्हणाली , तुझं घर दादाला माहितेय , तो लगेच येईल तिथे " आणि तसच झालं मगाशी दादा आला होता .त्याला तिने मला सांगायला लावले कि तिला या संदर्भात काहीच माहित नाही "
मानसी : स्वाती ऐक ना , तृप्ती कुठे आहे ? ठीक आहे ना ?
स्वाती " हो ठीक आहे , माझ्या शेजरी आमची एक कॉमन फ्रेंड तनुजा राहते . तिच्या घरी आहे "
मानसी " तनुजा चा नंबर आणि पत्ता दे "
मानसी ने तनुजा चा नंबर आणि पत्ता मिळवला
मानसी " थँक्स स्वाती , बाय , उद्या बोलू डिटेल मध्ये " आणि स्वाती चा फोन कट केला .
दुसऱ्या मिनिटाला तनुजाला फोन लावला
मानसी "हॅलो मी मानसी बोलतेय , तृप्ती ची फॅमिली फ्रेंड बोलतेय "
तनुजा " हॅलो मानसी ताई बोल
मानसी " अच्छा म्हणजे तू मला ओळखतेस ? तृप्ती कुठे आहे?मला बोलायचं आहे तिच्याशी .
तनुजा " एक मिनिट , तृप्ती कडे देते "
तृप्ती " हॅलो !
मानसी " तृप्ती कशी आहेस ? बरी आहेस का ?
तृप्ती " तशी बरी आहे ?तू का आली नाहीस ग मला भेटायला ?
मानसी " मी तुला कारण सांगितलं होतं "
तृप्ती " पण माझी पण काहीतरी मजबुरी असेल ना "
मानसी " आता हा विषय आपण नंतर बोलू .. तुझा दादा खूप टेन्शन मध्ये आहे ? तुला माहिते का ? चार तास शोधतोय तुला ? रडायला आलाय "
तृप्ती " रडू दे त्याला , त्याला शिक्षा आहे ती , मला समजून घेत नाही , मी माझे प्रॉब्लेम घेऊन दादाकडे नाही तर कोणाकडे जाणार ?
मानसी " तृप्ती , घरातले प्रॉब्लेम असे मैत्रिणींसमोर डिसकस नसतात करायचे , तुझा मोबाइल चालू कर आणि एक दादाला फोन कर कि तू इथे आहेस आणि सुरक्षित आहेस ते त्याला कळव . बस झाली शिक्षा ?
मानसी च्या आवाजात एक प्रकारचा अधिकार आला होता . तृप्ती तिच्या पेक्षा तशी खूप लहान होती त्यामुळे ती कदाचित अधिकारवाणीने बोलली असेल .
तृप्ती " ठीक आहे .
मानसी " तू आधी तुझ्या दादा ला कॉल कर .
तृप्ती " यस ! यस ... लगेच करते
मानसी ला तृप्ती शी बोलल्यावर खूप बर वाटलं. ती सुरक्षित आहे हे कळल्यावर जिवा त जीव आला "
पुढे तिने तुषार ला पण कॉल केला नाही . तृप्ती ला च कॉल करायला सांगितला होता . आणि ती तो करणारच होती याची ग्यारंटी आली होती . तरी पण तिने तुषार ला तनुजा पत्ता आणि नंबर मेसेज करून ठेवला
थोड्याच वेळात तुषार चा मेसेज आला
थँक उ हे शब्द फारच कमी आहेत. ... सॉरी तुला त्रास दिल्या बद्दल ...
मानसी ने मेसेज वाचला पण काहीच रिप्लाय दिला नाही . आणि अंगावर चादर ओढून शांतपणे झोपून गेली
तुषार , तृप्ती , आणि मानसी यांच्यातला हा किस्सा फार रोमांचक तर होता . पण मानसीला आणि तुषार ला खूप काही शिकवून गेला .
तृप्ती अल्लड होती . तिला थोडा वेळ देऊन समजून घ्यायला पाहिजे होत. आज नशीब ती मैत्रिणीकडे राहायला गेली होती . अशा वेळी डोकं जर नीट नाही वापरलं तर काहीतरी विपरीत घडलं असतं .
असो आता हा किस्सा तुषार आणि मानसीच्या नात्याला सुरुवात करतो का नातं सुरु होण्याच्या आधीच संपवतो
देवास ठाऊक !
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा