# कादंबरी – मानसी # भाग २६
तुषार मानसी ची भेट
मानसीला एकदा काय ते सोक्ष मोक्ष लावायचा होता . तिने मनानं ठरवून टाकलं होतं .जे तिचे आई बाबांनी केलं असतं तेच ती करणार होती .फक्त एकदा अशा पद्धतीने भेटणार आहे आणि एक चान्स नात्याला द्यायचा ठरवलं होत .
मानसीने हे एक पाऊल टाकलं होतं .
पण आता भेटायचं कुठे ?हा मोठा प्रश्न होता . तुषार म्हटला तसं हॉटेल मध्ये बरोबर नाही वाटणार . मानसी यावर विचार करून करून मुल्ला कि दौड मस्जिद तक तसच तिने फायनल केले कि एखाद्या मंदिरात भेटायचं .
आई बाबांना न सांगता ती असा उद्योग पहिल्यांनदाच करणार होती . पण परिस्थितीच अशी आली होती कि ती ने खूपवेळा त्याला अव्हॉइड करण्याचा प्रयत्न केला . काही वेळेला त्याला सामोरे जाण्या शिवाय काही पर्याय नसतो .
मानसीने तुषार ला मेसेज केला आणि सांगितले कि उद्या सकाळी ९ वाजता या मंदिरात भेटूया का ?
तुषारने तिला सांगितलंच होत तू सांगशील तिथे अन त्या वेळी त्यामुळे त्याने होकार दिला .
मानसीने लगेचच नायडू सरांना मेल पाठवलं कि उद्या मी फर्स्ट हाल्फ येणार नाही . थोडं पेर्सनल काम आहे
आता एक काम जे ती नेहमी करते ते ती करणार नव्हती ते म्हणजे आई बाबांना सांगाणार नव्हती. आयुष्यात पाहिलांदाच असे काही तरी करणार होती . भविष्यात हि गोष्ट तिला चूक नको वाटायला म्हणजे झालं.
एवढं नक्की काय तुषार तिला सांगणार आहे त्याचा ती विचार करत होती .
दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमी प्रमाणे लवकर उठली ऑफिस ला जायला निघावी तशी आवरायला लागली . आई ने तिला डबा करून दिला . एक मन मानसीला असे वाटले कि आई ला सांगू का ? तिच्या तोंडात आलेले शब्द तीने थांबवले. तुषार च्या आग्रहा खातीर ती आज आई ला न सांगता किंवा आई ला ऑफिस ला जाते असे सांगून तुषार ला भेटायला निघाली .
तुषार ची रात्र कशी गेली काय सांगू. मानसी त्याला भेटणार आहे या कल्पनेनेच तो सुखावला होता . ती भेटल्यावर पहिल काय बोलावं , दुसरं काय बोलावं , तिला जाताना काही गिफ्ट न्यावं का ? अशा विचारातच त्याने रात्र मानसीच्या आठवणीत जागून काढली होती . सकाळ सकाळी छान तयार होऊन तो हि मंदिरात यायला निघाला.
मानसी त्याच्या आधी मंदिरात पोहचली . ती आधी मंदिरात गेली. शांत मनाने तिने बाप्पांचे दर्शन घेतले . हात जोडून बाप्पाला नमस्कार केला आणि डोळे मिटून शांत पणे उभी होती ती मनातल्या मानत देवाला सांगत होती कि बाप्पा मला माफ कर मी आज आईला किंवा बाबांना न सांगताच आले आहे . देवा तुझा आशीर्वाद असाच सर्वांवर राहू दे , आणि मला सद्बुद्धी दे .
आणि डोळे उघडून बघते तर तुषार तिच्या बाजूला उभा राहिला होता .तो हि बाप्पा ला हात जोडून नमस्कार करत होता . त्याला तिच्या बाजूला बघून एकदम दचकलीच . हि मूलं पण ना मुलींना इंप्रेस करण्यासाठी सॉलिड आयडिया काढत असतात .
मानसीने त्याला पहिले पण ती काही बोलली नाही. तिच्या नेहमी च्या प्रदक्षणा पूर्ण करून मगच त्याच्याकडे बघून हसली . तुषार पण तिच्या मागे मागे त्याने पण प्रदक्षणा पूर्ण केली .
मंदिरात असलेल्या बाकावर ती बसली .तुषार ला काही कळेना , त्या बाकावर ह्याने बसावं का नाही ? हिला तिच्या शेजारी हा बसलेला आवडेल का नाही?
तो आपला सरळ उभा राहिला . मानसी एकदा त्याच्या कडे बघून हसली ती पुन्हा त्याच्या कडे बघायला तयार नाही . ५ मिनिट झाली तरी कोणी कोणाशी बोलत नव्हतं
शेवटी मानसी म्हणाली अरे बस ना !
देवळाच्या बाकावर तो एका टोकाला बसला नि ती तिकडच्या टोकाला बसली
मानसी " बोल कि आता , फोन वर किती बोलतोस ,आता समोर आलेय तर सुरुवात कर "
तुषार - " हो , बोलणारच आहे ,फक्त कुठून सुरुवात करावं तेच विचार करतोय "
मानसी " ठीक आहे , take your time "
तुषार " सुरुवात आपल्या बघायच्या दिवसा पासून करतो . त्या दिवशी मी तुला पाहिलं आणि तू मला खूप आवडलीस . तुला आठवते का ? पोहे देताना तू माझ्याकडे एक क्षण पाहिलेस तिथेच मी हरलो होतो . बाबांना पण तू खूप आवडलीस होती , आणि तृप्ती तर मला तिथेच कानात सांगत होती " दादा मला हीच वाहिनी हवीय "
मानसीला हे सर्व ऐकताना पोटात गुदगुदल्या होत होत्या पण ती निर्विकार अजिबातच काहीच एक्सप्रेशन दाखवत नव्हती . आम्हाला तू पसंत आहेस हे आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी लगेचच कळवणार होतो .पण आई ने हा मुद्दा काढला कि तिला भाऊ किंवा बहीण नाहीये .अशा मुलींना आई वडिलांची खूप attachment असते. शिवाय आई वडिलांच्या पाश्च्यात त्यांना माहेर राहत नाही.
माझ्या आईच्या भावाच्या भावाची सून एकुलती एक मुलगी आहे . रोज सकाळ संध्याकाळ आई शी मोबाईल वर बोलत असते. सारखं तिला माहेरची ओढ . सासू शी जरा पण जुळवून घेत नाही . हे सगळं पाहता आई च्या डोक्यात आधी पासूनच हे बसलं होतं कि मी एकुलती एक असलेली मुलगी सून म्हणून करणार नाही . जेंव्हां तुझ्या बाबांचा पहिला फोन आला होता तेव्हाच ती तुला बघायला यायला तयार नव्हतीं . पण बाबांनी तुझ्या बाबांना शब्द दिला होता म्हणून ते म्हणले बघायला काय हरकत आहे . त्यांना वाटलं कि आधी मुलगी बघून घेऊ मग काहीतरी कारण सांगून नकार कळवू असा विचार करूनच आम्ही सर्व आलो होतो .
झालं असे आम्ही इतके casually तुमच्याकडे आलो होतो . पण जेव्हा प्रत्यक्षात तुला पहिले तेव्हा सर्वांना तू आवडलीस . मला वाटलं तुला बघितल्यावर आई पण तिचं मत बदलेल पण आई काही तिचं मत बदलत नव्हती . तिच्या समोर एक ताज उदाहरण होत . तिला वाटे ह्याच मुलीवर काय अडलय ? आपण तुषार च लग्न माझ्या पसंतीच्या मुलीशीच लावायचं .
बाबांनी आई ला समजावण्याचा खूप प्रयत्न केला.
पण आई काही तिचा हट्ट सोडायला तयार नव्हती . आई बाबांची वादावादी झाली . आणि आई ची तब्बेत बिघडली .तिला असे वाटायला लागलं कि सून यायच्या आधीच हे तिघे एकत्र झाले आणि ती एकटी पडली . या टेन्शन ने ती आजारी झाली . पुढचे १० दिवस तिची तब्बेतीकडे बघण्यातच गेले . ह्या सगळ्या प्रकरणात तुम्हाला फोन करून काय सांगणार होतो तूच सांग .
मग आई आणि बाबा गावाला निघून गेले आणि आईने माझ्या साठी तृप्तीला इथे ठेवली होती . तृप्ती माझं रोज डोकं खायला लागली तू मानसीला भेटून विश्वासात घेऊन सांग . म्हणून मी तुला पहिला फोन केला होता . तेव्हा तू नाही असे सांगितल्यावर माझ्या लक्षात आले कि तू पण अशी लगेच भेटणार नाहीस . तू तुझ्या दृष्टीने बरोबर होतीस .
तृप्ती हट्टास पोहचली दादा तू काहीच करत नाहीस. तू तिला कॉल का करत नाहीस आता मीच तिला कॉल करत आहे आणि मला न विचारता तिने तुला कॉल करून मोकळी झाली . आणि तुला भेटायला देवळात बोलवत होती . मी तिला झापलं आणि ती रागावून घरातून निघून गेली आणि मला म्हणाली मी आता त्याच्या घरी जाते डायरेक्ट आणि तिला भेटून सगळं सांगते. आणि थोडा वेळ मागून घेते त्यांच्याकडून . मला वाटलं कि ती जाईल थोडा वेळ मैत्रिणींकडे आणि येईल संध्याकाळी पण ती आलीच नाही घरी . पुढचं काय ते सगळं तुला माहीतच आहे.
आता माझ्या समोर मी आई ला तुझ्या साठी कशी मनवावि हाच मोठा प्रश्न आहे . आणि आई ला दुखवून मी काहीच करू शकत नाही . आधीच आई ची तब्बेत ठीक नाहीये आणि प्रत्येक आई ची आपल्या मुलाच्या लग्नाची , होणाऱ्या सुने बद्दलची काही स्वप्न असतात . ती ह्या गोष्टी साठी तयार होईल कि नाही ? हे सध्या तरी मला माहित नाहीये .
हे झालं आई च पण आता माझं काय ? मला आता तुझ्या शिवाय कोणी दिसत नाही . मला लग्न फक्त तुझ्याशीच करायचंय . आता यातून कसा मार्ग काढायचा हेच कळत नाहीये . तू च बोल ?
तुषार हळू हळू त्याच्या आयुष्याचं एक एक पान उलगडत होता .सांगता सांगता त्याच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या .
मानसीने सगळं एकूण घेतला आणि खूप शांत झाली
तुषार "काय ग ? शांत झालीस ?
मानसी " काय बोलू ? सर्व आहे ते अवघडच आहे ? मला वाटतय तुषार तू सध्या आई कडे बघ , सध्या त्यांच्या तब्बेती पेक्षा काही महत्वाचे नाही . "
तुषार " हो ते तर आहेच , पण आपलं काय ?
मानसी " हे बघ तुषार , आपण दोघेही आपल्या आई वडिलांवर खूप प्रेम करतो . दोघांनाही आपले आई वडील खुश असले पाहिजेत असच आहे .हे प्रेमच आपल्याला काही तरी मार्ग दाखवेल.
मानसी " मला वाटतं सध्या शांत राहू . काहीच नको करू या . एक दोन महिन्यात तुझ्या आई ची तब्बेत सुधारेल तेव्हा बघू"
तुषार " तोपर्यंत काय करायचं ? मला भीती वाटते , तुझ्या आई वडिलांनी दुसरा मुलगा पहिला तर हि भीती म ला सारखी वाटते "
मानसी " ते तर आहेच , माझ्या वडिलांना पण तू खूप आवडला होतास . पण तुम्ही फोन केला नाहीत त्यामुळे ते खूप नाराज झालेत . काल पर्वा आई ने वधू वर सूचक मेळाव्यात माझे नाव टाकलेय . त्यामुळे माझा नवरदेव शोध मोहीम त्यांनी दोघांनी जोरात हातात घेतली आहे.”
तुषार " तेच तर ना . मला थोडा वेळ हवाय. तू मला थोडा वेळ देऊ शकशील का ?"तोपर्यंत आई ची तब्बेत बरी झाली तर मी आई ला पटवेन "
मानसी काहीच बोलली नाही
तुषार " काय ग ? काय विचार करतेस ? म्हणजे मी तुला माझ्या मनातलं सगळं सांगितलं पण तुझं माझ्या बद्दलच मतं काय आहे हे मला कळलं नाही . तू तुला पाहिजे तर थोडा वेळ घे आणि मला सांग "
मानसी " मी पण माझ्या आई वडिलाच्या शब्द बाहेर नाही . तुला जर माझ्याशी लग्न करायचे असेल तर तुला आधी माझ्या बाबांना पटवायला लागेल. " मी आज तुला त्यांना न सांगता भेटले हेच मी खूप केलय . या पेक्षा माझ्या कडून काही अपेक्षा ठेऊ नकोस .कारण काहीही असो पण तुझ्या आई ला मी आवडले नाही हे सत्य आहे . आणि हे सत्य तुला आणि मला स्वीकारले पाहिजे . आपलया नात्याचं भविष्य आपल्या आई वडिलांकडे आहे .
आज मी आले आता मी पुन्हा तुला अशी परत भेटायला नाही येणार .
तुषार " ऐका ना , थोडं समजून घे ना मला . मला थोडा वेळ हवाय "
मानसी " नक्की काय माझ्याकडून अपेक्षा आहे तुझी ?"
तुषार " तुझी साथ हवीय मला आयुष्यभरासाठी "
तेवढया मानसी ला आई चा फोन आला
आई " मानसी तू कुठे आहेस ?"
मानसी " आहे इथेच ऑफिस मध्ये , आई मी जरा बिझी आहे तुला अर्ध्या तासात कॉल करते "
आई " हो चालेल बाळा "
आई चा फोन ठेवला आणि मानसी ढसाढसा रडायला लागली .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा