# कादंबरी – मानसी # भाग २८ आई ची तब्बेत बिघडली

in this part Mansi ;s mother become ill & she has to take to the hospital.

                                                      # कादंबरी – मानसी  # भाग २८ आई ची तब्बेत बिघडली

अचानक मानसी च तिथे येणे म्हणजे तुषार ला अपेक्षा नसताना मिळालेला बोनस च होता . मगाच पासून तो ज्या टेन्शन मध्ये  तो उन्हात तळपत बसला होता मानसी च्या येण्याने त्याला सावली मिळाली होती . खूप आनंद झाला होता त्याला . ख़ुशी उसके चेहरे पर साफ दिखाई दे रही थी ।बराच वेळ दोघे नुसते हसत होते . कोणीही  कोणाशी बोलत नव्हते .

कसं असतं ना कधी कधी कोणाच्या तरी नुसत्या बरोबर असण्याने आयुष्यात पालवी फुटते .त्याने  काही केलं नाही तरी चालेल फक्त असण्याने उभारी येते . आणि हीच व्यक्ती आपल्या आयुष्यात अनन्य साधारण महत्वाची असते .

हि व्यक्ती असते बरं का ? फक्त आपल्याला ती दिसली पाहिजे . सापडली पाहिजे ,आणि सापडल्यावर तिला जपून ठेवता आलं पाहिजे .

तुषार ला त्याची आनंदाची चावी सापडली होती .

मानसी ला  आता खूप भूक लागली  होती . तिने सरळ बाकावर डबा काढला आणि खायला सुरुवात केली . तुषार ला डब्याच्या झाकणात वाढून त्याच्या हातात दिल आणि मग स्वतः जेवायला बसली .  दोघांनी आंनदाने डबा  संपवला .पोटात घास  गेला  कि डोकं पण चालायला लागतं .

दोघे  पोट  भरून जेवण जेवले आणि मग निघाले घरी जायला .

तुषार म्हणाला " मी आज  पासूनच कामाला लागतो आई ला पटवण्याच्या  , शेवटी ती माझी आई ती माझं ऐकलंच . "

मानसी " गुड ,

मी माझ्या आई वडिलांना खरं खरं सांगणार आहे . बाबा मला ओरडतील पण नक्की मला साथ देतील ,

शेवटी आपले आई वडील आहे त्यान्ना आपण खुश पाहिजे आणि आपल्याला ते खुश पाहिजे .. "

तुषार " हो  पण काय सांगायचं आणि कसं  सांगायचं?

मानसी " जे खर आहे ते सांगायचं "

मानसी म्हणाली "चल मी निघते घरी मला आता कधी एकदा आईला सांगते असं झालंय "

तुषार " तुझं बरं आहे ग . प्रॉब्लेम माझी आई तयार नाहीये ना . तिला कसं कॉन्व्हिन्स करायचं हाच तर प्रश्न आहे . काश  कि तुला एखादा भाऊ  किंवा बहीण असती  तर किती बरं झालं असतं  "

मानसी " हे बघ जे आहे ते आहे . मी पण माझ्या आई वडिलांना खूप attach आहे . माझ्या लग्न नंतर मला पण माझ्या आई वडिलांची काळजी घ्यायचीय . आणि तुषार मला या कामात तुझी मदत लागणार आहे "

तुषार " हो अर्थातच "

मानसी " जसे तू तुझ्या आई वडिलांची जशी काळजी घेतोस तशीच तुला माझ्या पण आई वडिलांची काळजी घ्यावी लागेल , मला तुझ्याकडून हे वचन पाहिजे "

तुषार -" तू पण माझ्या आई च्या मनात एकुलती  एक मुलगी बद्दल असलेले गैरसमज खोडून काढशील हे वचन दे मला "

दोघांनी एकमेकांच्या एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा बोलून दाखवल्या . बघता बघता संध्याकाळचे ६ वाजले . आज दिवस जरा लवकर संपत होता ,वेळ पटपट निघून  जात होती .

मानसी ची घरी जायची घाई झाली . घरी आई ला सांगायची मुश्किल होणार होती दिवसभर कुठे होती  सांगतानाच तिची परीक्षा होती . मानसी ने आता पर्यंत हि अशी स्टेप कशी काय उचलली हे तीच तिलाच कळलं नव्हतं . आई ला ती कसबस सांगेल पण बाबांचं काय ? त्यांच्या पुढे ती चांगलीच गारठणार होती . तुषार ला बाय म्हणून मानसी निघाली घरी.

तुषार पण त्याच्या रूम वर जायला निघाला . दोघांनी एकमेकांना बाय केले आणि  निघाले  घरी . पण आता मनात काहीतरी चांगलं होईल अशी आशा होत्या . तुषार मनात  एक पॉसिटीव्ह आशेचा किरण घेऊन घरी निघाला . सर्वात पाहिलं आईला विश्वासात  घेणं गरजेचं होत .त्यासाठी आई ची तब्बेत बरी होई  पर्यंत वाट बघावी लागणार होती.

मानसी १५ ते २० मिनिटात घरी पोहचली . तिची आई आ वासून वाट बघत होती . मानसी घरी आल्या आल्या मानसी चा अवतार बघून जरा घाबरलीच .

आई " काय ग " केस काय असे विस्कटले त "

मानसी " अग काय विचारू नकोस आज खूपच गडबड झाली ."

आई "  अंघोळ करून घे मग बोल "

मानसी " न बोलता अंघोळीला पळाली "

आई ला खरं तर एक फटका लावून द्यावासा वाटला  होता . पण  तरणी ताठी पोरीला कस मारायचं म्हणून गप  बसली .

आई आज चांगलीच मानसीची शाळा घेणार होती .सविता चा फोन आला तेव्हा कळलं कि हि ठमा आज ऑफिस ला नाही गेलीय . ते हि दुसर्याकडून कळलं . मानसी कडून हि अपेक्षा नाही . मानसी फ्रेश होऊन बाहेर आली रागारागातच आईने तिच्या साठी चहा केला , चहा बरोबर दुपारी केलेल्या तिच्या आवडीच्या ताज्या शंकरपाळ्या दिल्या . मानसीने अंघोळ करून देवासमोर दिवा लावला . शुभमकरोति म्हटले आणि मग बसली चहा घ्यायला . आई पण तिचं चहा होई पर्यंत शांत बसली . बाबा यायच्या आत तिला मानसी कडून सगळं काढून घ्यायचं होत .

आई " झाला का चहा घेऊन ?"

मानसी " हो "

आई " बोल आता बाबा यायच्या आत बोल "

मानसी " हो आई मी सगळं सांगणारच आहे तुला ?मला पण माझं मनं मोकळं करायचंय "

आधीपासून नीट सांगते तुला तर मी बोललेच होते कि मी मला  तुषार भेटायला बोलवत होता , त्याची बहीण पण भेटायला बोलवत होती पण मी दोघांनी खूपदा सांगितलं कि मी अशा पद्धतीने नाही भेटणार . तरी पण काहींना काही कारणाने दोघे कॉन्टॅक्ट करत होते . शेवटी माझ्या समोर काही पर्याय च नाही उरला .

शेवटी मी म्हटलं एकदा त्याला भेटून त्याचा काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकूया .

म्हणून मी आज सकाळी त्याला गणपती च्या मंदिरात भेटायला बोलावले होते . मानसीने आईला आजच्या दिवसाचा क्षण आणि क्षण सांगितला .आई आपली अवाक होऊन  सगळं'ऐकताच बसली . काय लिहून ठेवलय माझ्या मुलींच्या नशिबात असे म्हणाली . बघत बघता आई घामाने ओली झाली आई चे हातपाय थरथर कापू लागले . अचानक आई ची तब्बेत कशी काय बिघडली . मानसीला काहीच कळेना'

. तिने बाबांना लगेच फोन लावला आणि कळवलं . बाबांनी तिला लगेच दवाखान्यात न्यायला सांगितले . मानसीने लगेच रिक्षा बोलावून आई ला दवाखान्यात नेलं .

डॉक्टरांनी सांगितले आईचं BP वाढलंय . मानसीला पण आईच्या तब्बेतीने भीती वाटायला लागली . आपल्याच मुळे आईची तब्बेत बिघडली असे वाटून वाटून मानसी रडायला लागली  तोपर्यंत बाबा पण डायरेक्ट  दवाखान्यात आले . आई ला डॉक्टर एक सलाईन लावून सोडणार होते . मानसी बाबांना दवाखान्यात थांबवून घरी जेवण करायला पुढे आली .

मानसी घरी आली आणि जेवण करू लागली . आई ची तब्बेत बिघडल्याने तिचा मूडच गेला होता . अजून तर काही महत्वाचं बोलणं झालच नव्हतं त्याच्या आधीच आई ची तब्बेत बिघडली आणि तिकडे तुषार च्या आईची आधीच तब्बेत बिघडलेली होती.

मानसी ने मनातून ठरवून टाकले या पुढे आई ला कधीच त्रास देणार नाही . ती आई वडिलांच्या शब्दा बाहेर कधी नव्हतीच पण आज तिने एक शहाणपणा केला होता त्यामुळे आई च BP वाढलं होतं . यापुढे आई आणि बाबांच्या  पुढे काही जायचं नाही असे ठरवलन आणि तिचा मोबाईल वाजला .

समोरून तुषार चा कॉल येत होता . मानसी घरी व्यवस्थित पोहचली का ? हे विचारायला त्याने तिला ४ मेसेज पाठवले होते पण मानसीला त्या मेसेजचा रिप्लाय द्यायला वेळ कुठे होता ,इनफॅक्ट तिने ते पहिलेच नव्हते . मोबाइल वाजल्यावर तिने जेव्हा बघितला  तुषार चा कॉल आहे . तिने कॉल रिजेक्ट केला .

तुषार ला आता मानसी शिवाय काही सुचत नव्हतं . घरी पोहचली का या नावानं त्याला तिच्याशी बोलायचं होतं . मानसी च्या आईची तब्बेत बिघडलीय  हे त्याला माहीतच नव्हते .

हे असंच असतं आपल्या ला पाहिजे तसे फासे पडतच नाहीत . फासे नेहमीच उलटे पडतात . आपण ठरवतो पण करणारा" तो"असतो . आपल्याला वाटत असतं . कि हे मी केलं ,ते मी केलं . पण होत असते देवाच्या मर्जी ने .

मानसीच्या आयुष्यात देवाने काय लिहलंय त्याच एक एक पान  उलगडत होत .

मानसीने पटकन डबा तयार केला आणि हॉस्पिटल ला आई साठी घेऊन निघाली

मानसी दवाखान्यात रूम च्या बाहेर असताना तिने आई चे शब्द ऐकले

आई  - " अहो आपली मानसी आता मोठी झाली ." मला  वाटतंय आपण तिला एकदा विश्वासात घेऊन सांगू या का "?

बाबा -" काय वेड बीड लागलाय का तुला ?"

आई " अहो ती आता मोठी झाली तिला तिच्या बाबतीतल्या सर्व गोष्टी  माहित पाहिजे असं मला वाटतंय "

मानसी दारातच थांबली आई आणि बाबा आपल्या विषयी काहीतरी बोलत आहेत . खरं तर चोरून ऐकणं हे तिचे संस्कार नव्हते . तरी पण आई बाबा आपल्या विषयी काहीतरी बोलत आहेत म्हटल्या वर तिला राहवेना.

बाबा " अग आता तिला कळले तर ती  दबून जाईल . तिला सहन होईल कि नाही , ती कसं रिऍक्ट करेल याचा काही अंदाज नाही ग "

आई " अहो , मी मरायच्या आत पोरीला काय ते सांगून टाकू "

आणि आई  हमसून हमसून रडायला लागली .

बाबा " अग तू रडू नकोस . इतके वर्ष हे सिक्रेट आपण व्यवस्थित जपून ठेवलंय . तिला सांगूच पण योग्य वेळी सांगू "

आई " मला वाटतंय ती  वेळ आलीय आता . "

बाबा " बघू , तू  झोप आता . मानसीची यायची वेळ झालीय "

मानसी ने हे सगळं संभाषण बाहेरून ऐकले आणि खूपच टेन्शन मध्ये आली . तरीपण न ऐकल्यासारखं दाखवून ती डबा  घेऊन आत गेली.

🎭 Series Post

View all