# कादंबरी – मानसी  # भाग २९

in this part manasi has got one doubt about her life

                                      # कादंबरी – मानसी  # भाग २९

                                      मानसीच्या मनातील  एक शंका

मानसी रात्री दहा साडे दहा पर्यंत आई ला घेऊनच घरी आली . मानसी आणि बाबांचे जेवण राहिले होते .दोघे जण आईला झोपवून जेवायला बसले . घरात इतकी निरव शांतता होती. कोणचं कोणाशी बोलत नव्हते . आई झोपली होती आणि बाबा डिस्टर्ब होते आणि मानसी अस्वस्थ होती .

आई बाबांनी असे काय  जे तिच्यापासून लपवले असेल असा विचार ती करत बसली होती .

बाबा जेवण उरकून लगेच गेले पण मानसी चा आजचा दिवस संपता  संपत नव्हता . सकाळ पासून काय काय तिने अनुभवले होते हे तीचं  तिलाच माहित होत . आई ला माहित होतच. पण हे ऐकून आई ची तब्बेत का बिघडली हा एक मोठा प्रश्न होता.

तुषार ने आत्तापर्यंत मानसीला जवळ जवळ ५० कॉल्स केले होते .मानसीने त्याचे सगळे कॉल रिजेक्ट केले होते . ती त्याचा कॉल घेण्याच्या मनस्थितीत नव्हती 

तुषार ला काय चाललेय कळलेच नाही . त्याला मानसी थोडी मुडी वाटायला लागली . हे काय मूड आला तर बोलायचं , मूड नसला  तर नाही बोलायचं . एवढे कॉल केल्यानंतर ती एकही रिप्लाय देत नाही म्हणून थोडासा नाराज झाला.

मानसी आज वेगळ्याच टेन्शन मध्ये होती.

ती लहानपाणापासूनच आठवत होती. लहानपणी बाबा शाळेत सोडायला यायचे , आई छान तयार करायची, तेव्हा तिचे दोन छोटे छोटे पोनी बांधायची . लहानपणीचा सर्व काळ तिच्या डोळ्यासमोरून सरकू लागला.

तिला आठवलं एकदा ती खेळताना झाडावरून पडली होती आणि तिची आई खूप घाबरली होती . तिला मलम पट्टी करता करता तीच स्वतः रडत होती . बाबा म्हणत होते  अग मानसी रडत नाहीये पण तू किती रडतेस . राहून राहून आज मानसीला भीती वाटत होती कि काय असे सिक्रेट असेल. कशा बद्दल असेल?

माझ्याशी रेलटेड आहे एवढे  नक्की , पण नक्की काय ? याचा विचार करून तिला हजारो प्रश्न पडले .

मानसीच्या मनात विचार यायला आपण दत्तक चाईल्ड  तर नाही ना ? नुसत्या विचाराने मानसीला घाम फुटला . हे जे घर मी माझे म्हणते ते माझं नाहीच . अचानक आपल्या उभा राहिलेल्या  अस्तित्वावर प्रश्न तिला टोचायला लागला . तिला वाटे आत्ता च्या आत्ता आईला गदागदा हलवून विचारावे कि आई काय आहे सीक्रेट जे तुम्ही माझ्या पासून लपवून ठेवले आहे.

आणि तुषार च काय ? त्याची आई ती एकटी आहे म्हणून तिला accept करायला तयार नाही तर जर हि दत्तक आहे हे कळल्यावर  ती काय करेल ?

नक्कीच आता हे लग्न पण १००% मोडणार . मानसीचे  तर अवसानच गळाले . शरीरातून त्राणच निघून गेला .

मधेच बाबा म्हणाले " मानसी बेटा  आवरले का ?झोप बाळा आता , उद्या मी रजेवर आहे. तर तू ऑफिस ला जा .

मानसी ने डोळ्यातले अश्रू पुसले आणि म्हणाली " हो बाबा "

मानसीने पटापटा जेवण आणि जेवणानंतरच उरकून ती तिच्या रूम मध्ये जायला निघाली .

जाता  जाता ती आईला बघायला गेली . आई बेडवर झोपली होती " ती आई ला म्हणाली आई तू काही काळजी करू नकोस सर्व काही ठीक होईल "

मानसी च्या डोक्यावरून आईने मायेने हात फिरवला . आणि म्हणाली " झोप बाळा आज तुला अजिबातच आराम नाही मिळाला . झोप आता शांत "

मानसी मान हलवून तिच्या रूम  मध्ये झोपायला गेली

मानसी तिच्या नेहमीच्या रुटीन प्रमाणे मोबाइल चार्जिंग ला लावायला गेली तर बघते तर तुषार चे ६० मिस्ड कॉल्स होते . मानसी पटकन त्याला कॉल बॅक करायला गेली पण रिंग जायच्या आताच तिने कॉल कट केला .

कॉल करून तरी काय करणार होती .कदाचित हि गोष्ट कळल्यावर तुषार ला पण ती नकोशी वाटेल . काहीही होऊ शकतं . थोडक्यात तिला सगळ्याच  गोष्टी जरा  कठीणच वाटत होत्या .

तरी पण मोठ्या धीराने तुषार ला मेसेज पाठवला

" हॅलो , सॉरी तुषार घरी आले तर  आई ची तब्बेत अचानक बिघडल्याने मी बिझी होते "

मानसी च्या मेसेज ची तुषार चातका  सारखी वाट बघत होता . त्याने लगेच रिप्लाय केला

" कशी आहे तब्बेत आता "?

"काळजी करू नकोस "

"होईल सगळं ठीक."

थडाथड मेसेज येऊ लागले .

मानसी काही रिप्लाय देत नव्हती .

" काय ग ? काही टेन्शन आहे का ?"

मानसीचा काहीच रिप्लाय नाही .

यासगळ्यात तुषार आणि मानसीचे  एक वेगळेच बॉण्डिंग तयार होत होते. तुषार सुखी संसाराचे स्वप्न मानसी ला बरोबर घेऊन पाहत होता . मानसी ला तो आवडला होता हे नक्कीच , तिला त्याच्याशी लग्न करायला आवडेल हे पण  नक्कीच होते तरी पण जर उद्या आई बाबांनी नाही सांगितले तर ती त्यांच्या शब्दा बाहेर जाऊच शकणार नव्हती .

मानसीला याची कल्पना तुषार ला द्यायची होती . तुषार ला न दुखवता तिला त्याला हे सांगायचे होते . त्यात आता हे नवीन प्रकरण आई बाबांचं काय सिक्रेट आहे हे तिला माहित नाही

तिने तुषार ला मेसेज पाठवला

" हॅलो तुषार मला तुला काही तरी सांगायचंय "

तुषार " बोला राणी सरकार . तुमच्या काहीतरी ऐकण्यासाठी   साठी माझे कान तरसले  आहेत "

मानसी - " तुषार तू वाईट वाटून घेऊ नकोस पण मला तुला हे सांगायचंय कि तुझं आणि माझं लग्न होईल का नाही याची मला अजून खात्री वाटत नाहीये . तरी तू माझ्यात जास्त इन्व्हॉल्व होऊ नकोस . कदाचित सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या होतील कि नाही याची मला खात्री वाटत नाही "

तुषार " अग काय झालय जरा नीट सांगशील का ?"

मानसी " काहीही झालेले नाही . पण काही होईल अशी आशा पण नाही "

तुषार " का ग कोड्यात बोलतेस ? जरा कळेल असे बोल ?

मानसी " काही  प्रश्नांचं उत्तर हे फक्त आणि फक्त वेळच देत असते "

तुषार " आज तू खूप दमलेली आहेस ? आता तू झोप. आपण  उद्या बोलू "

मानसी " ऐक ना , मला सांगायचंय कि आपण असा मोबाईल वर कॉन्टॅक्ट नको ठेवुया . तू जेव्हा तुझ्या आई वडिलांना सांगशील आणि ते तयार होतील तेव्हाच मी तुला कॉन्टॅक्ट करेन आणि तुझ्याशी कॉन्टॅक्ट ठेवीन . सॉरी मी जरा स्पष्ठच बोलते . यातच आपली भलाई आहे , तुला आज हे जरा रूड वाटेल पण मला तरी हेच बरोबर वाटतं .

तुषार " ????"

मानसी " तुझ्या या प्रश्नांचं  उत्तर सध्या माझ्याकडे नाहीये "

तुषार " ठीक आहे . तुझ्या शब्दा बाहेर मी नाही . तुला त्रास देणार नाही , बाय , टेक केअर "

तुषार " आणि एक स्वतः ची काळजी घे . कुठेतरी तुझ्यासाठी कोणीतरी जगतय हे लक्षात ठेव . तुला जर वाटलं किंवा माझी मदत लागली तर मी केव्हाही येईन हे लक्षात ठेव "

मानसी -" थँक्स डिअर " यू अल्सो टेक केअर "

मानसी ने  चॅटिंग थांबवलं आणि ओक्सबोक्शी रडायला लागली .

कुठेतरी मानसीने एक कठोर पाऊल उचललं होतं . सद्याच्या परिस्थितीत हि स्टेप तिला तरी बरोबर वाटत होती.

मानसीची अवस्था फारच कठीण झाली .इकडे जर तिच्या मनात जी शंका आहे कि ती दत्तक आहे ती शंका जर देव न करो पण खरी निघाली तर जिवाभावाचे आई वडील पण एका क्षणात परके होतील आणि जे नवीन नातं जे तयार होत होतं ते सुद्धा तुटणार होतं . मानसीला खूप एकाकी वाटत होतं आज . सर्व जण तेच आहेत पण अचानक कोणी च आपलं नाही आणि आपण कोणाचे नाही हे किती दुःखदायक आहे हे फक्त ज्याच्यावर हि वेळ येते त्यालाच कळते .

आई बाबांना मानसीची काळजी वाटत होती. मानसीला त्यांना सीक्रेट सांगायचे होते पण हि ती वेळ आली आहे की नाही ह्यावर त्यांचे एकमत होत नव्हते . बाबांना वाटत होते आता इतके वर्ष हे सिक्रेट कोणाला सांगितले नाही तर अचानक मानसीची आई हे सत्य मानसीला सांगून टाकावं असे का सांगतेय ? आज असे काय झाले कि मानसीच्या आईला ह्या गोष्टीचा त्रास होऊ लागलाय ? अश्या अनेक प्रश्न बाबांना पडले होते .

तरी पण बाबा मानसीच्या आई ला  सांगत होते कि " काळजी करू नकोस . मानसी समजूतदार आहे ती आपल्याला समजून  घेईल , शिवाय तू आणि मी केलेले संस्कार आपल्यातले प्रेम कधीच कमी होऊ देणार नाही . माझ्यावर आणि देवावर विश्वास ठेव होईल सारे ठीक .

कठीण समयी तिघेही आणि आता त्यात तुषार हि समंजस पणा दाखवत होते. आणि एकमेकांना सांभाळून घेत होते . तुषार च अश्यर्यच वाटलं .तो हि मानसीच्या बाजूने तिच्याशी संपर्क न ठेवण्याच्या निर्णयात साथ देऊन तिला खऱ्या  अर्थाने साथ देत होता .

समोरच्या ची काहीतरी वेगळी अडचण असू शकते म्हणूनच ती व्यक्ती आपल्याशी तुटक वागतेय हे कळणे म्हणजेच खरं प्रेम . !!

त्यावेळी तिच्यावर न रागावता तिला सपोर्ट करणे म्हणजे प्रेम सिद्ध करणे . नुसतं प्रेम आहे तुझ्याशिवाय जगू शकत नाही असे बोंबलून सांगणे म्हणजे प्रेम नाही . असो प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो पण मानसीच्या मनात तुषार बद्दल चा आदर वाढला होता . तो न चिडता ,न वैतागता तिच्यासाठी तिने सांगितले त्यासाठी तयार झाला आणि वर म्हणाला " मला कधी हि बोलावं मी येईन , हा जो सपोर्ट आहे ना तो शब्दात सांगणे कठीणच .

🎭 Series Post

View all