# कादंबरी – मानसी # भाग ३३ अंतिम भाग

In this Tushar and mansi has ring ceremony and everyone is happy forever

                                              # कादंबरी – मानसी  # भाग ३३ अंतिम भाग

क्रमश: भाग ३२  पुढे

आज बुधवार होता . आज संध्याकाळी मानसीला तुषार च्या घरी  जायचे होते .  तिला वाटत होतं आज   मुलाला  दाखवायचा कार्यक्रम करणार आहेत . तिच्या दृष्टीने तुषार च्या घरातून अजून फोन आला नव्हता . तीला  आता तुषार चा जाम  राग  येत होता . नंतर तिला वाटले कदाचित तुषार आपल्या  नशिबातच नसेल . आता जे काही होईल ते  स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही आई वडिलांना अजून त्रास द्यायचा नव्हता . आधीच त्यांनी खूप त्रास सहन केला होता . मानसी चे लग्न ठरले कि ते दोघे सर्वात जास्त खुश होणार होते . आणि त्यांना पण कर्तव्य पूर्ती झाल्यावर रिलॅक्स होणार होते .

मानसीने  मंगळवारी आज साठी रजा टाकली होती .

नायडू सर अचानक तामिळनाडू  ला निघून गेले  जाता जाता मानसी चे प्रमोशन करून गेले . मानसी ने आता ठरवून टाकलं कि जो समोर येईल त्याने जर मानसीला पसंत केलं तर ती पण होकार देणार आहे . म्हणून तिने बुधवरची  रजाच टाकली . तसेही संघ्याकाळी बाबांच्या मित्राकडे जेवायला जायचे होते आणि त्याआधी तिला एक काम पूर्ण करायचे  होते ते म्हणजे तुषार ला एकदा  भेटून त्याने दिलेले ते गिफ्ट त्याला परत करायचे आणि त्याचा चॅप्टर संपवून  टाकायचा होता  . म्हणून तिने तुषारला रात्री मेसेज करून आज म्हणजे बुधवारी सकाळी देवळात बोलावून घेतले .

घरी आईला सांगितलं कि ती मंदिरात जातेय आणि घरातून निघाली . तुषार ला असे वाटलं कि मानसीला होकार मिळालाय हे कळलंय म्हणून आनंदात त्याला भेटायला येतेय  . तुषार तिला भेटायला खूप उत्सुक झाला होता . त्याने तिला अजून एक गिफ्ट घेतलं होतं आणि तो पण छान तयार होऊन मंदिरात मानसी ला भेटायला निघाला .

मानसी जरा मनातून नाराज च होती . तुषार बरोबर आज आपण नातं कायमच तोडणार आहोत या विचाराने ती दुखी झाली होती .

मानसी मंदिरात आली देवाचं दर्शन घेऊन त्या बाकावर येऊन बसली. थोड्याच वेळात तुषार साहेब एकदम खटाखट तयार होऊन मंदिरात हजर. मानसीला भेटून काय करू ? पाहिलं ती काय बोलेल , मी काय बोलेन अशा अनेक सेशन मनात चालले होते . थोडक्यात मानत मांडे खात होता .

प्रत्यक्षात जेव्हा  मानसी समोर आली तेव्हा मानसी चा चेहरा  बघूनच त्याला कळलं कि काही तरी बिनसलंय . मानसी ने  तो आल्या आल्या  त्याला ते गिफ्ट रिटर्न केले .

तुषार ला काही कळेनाच

तुषार " का ? आता तर तू घालू शकतेस ना ?”.

मानसी " नाही . तुला मी सांगितलं होतं ना तू जर तुझ्या आई वडिलांना कॉन्व्हिन्स करून माझ्या वडिलांना कॉल केला असतास तर मी कदाचित आज हे ओपन करून पहिले असते . "

तुषार मनात विचार  करतोय " हि काय डोक्यावर पडली का ? आल्या आल्या मला मिठी बीटी मारेल कि काय अशा आशेने आलो होतो आणि हि काय बोलतेय काय कळेना "

मानसी " आज आम्ही माझ्या बाबांच्या एका मित्राच्या घरी जेवायला जाणार आहोत कदाचित त्यांच्या मुलाला जर मी पसंत आले तर बाबा हे स्थळ सोडणार नाहीत . आणि मी बाबांच्या विरोधात जाऊन काहीच करणार नाहीये . त्यामुळे सॉरी हे गिफ्ट तू परत घे . आज संध्याकाळ नंतर माझा आणि तुझा काहीच संबंध नसेल . तुझा नंबर पण मी आज डिलिट करणार आहे . "

तुषार च्या लक्षात आले कि तिच्या बाबांनी तिचा गेम केलाय . तिला अजून हे सांगितले नाहीये कि आमच्या कडून होकार कळवलाय ते . तो पटकन तिला सर्व सांगणार होता . त्याला पण आता तिला छळायचं होते . त्याला खूप हसू येत होते . पण बाबांच्या प्लॅन मध्ये तो हि सामील झाला .

तुषार " अरे देवा ! असे आहे का ? का ग ? मला थोडा वेळ मिळाला असता . "

मानसी चे डोळे भरून येत होते

मानसी "  वेळच तर नाहीये ना माझ्याकडे . तुला काय सांगू अरे गेले कित्येक दिवस मी टेन्शन मध्ये होते . तुझी आई मला acept करेल कि नाही ? शेवटी त्यांनी रिजेक्ट केलेच . अजून एक तुला सांगायचं होतं मला एक लहान बहीण पण आहे ?"

तुषार " काय ? काय बोलतेस काय ? कुठे लपून ठेवली तिला ?"

तुषार ला मानसीने सर्व किस्सा सांगितला . एक मिनिट तो पण शांत झाला . तरी पण तिला छेडायला म्हणाला " म्हणजे मला एक साली पण होती तर "

मानसी ला एक क्षण असं वाटत होत कि हा दुःखी नाहीये पण ती तिच्याच नादात इतकी होती कि तो आपली खेचतोय हे हि तिला कळत नव्हतं .

तुषार मध्ये मध्ये तोंडावर हात ठेवून हसत होता . त्या ला मानसी चे दोन्ही गाल हातात घेऊन लहान बाळांना करतात ना तस  " अरे माझ्या शोना " असे करावंसं वाटतं होतं .

मानसी " त्याला निरोपाच्या गोष्टी बोलत होती. तुषार आई वडिलांची काळजी घे , तृप्ती ची काळजी घे . तीला समजून घे . अजून लहान आहे ती . ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर . टेक केअर . "

तुषार " थँक उ , उ अल्सो टेक केअर .तू माझी बायको झाली असतीस तर बरं झालं असतं ? " आणि तोंड लपवून हसला .

मानसी तिच्या डोळ्यातून एक अश्रू टपकला . तो तुषार ला दिसू नये म्हणून तिचा असफल प्रयत्न झाला . मानसी रडायला लागल्यावर मात्र तुषार खरोखर सिरिअस झाला .

तुषार " ऐक ना मानसी , रडू नकोस ना प्लिज . तुम्ही त्या फॅमिला कडे आज  जाऊन या . मी उद्या च्या उद्या तुमच्याकडे माझ्या आईला घेऊन येतो . एका दिवसात तर लग्न होणार नाही ना . त्या मुलाच्या आधी माझा क्लेम आहे तुमच्याकडे . मी आई ला आज पाय पडतो आणि पटवतो . तू फक्त आज  त्या फॅमिलीकडे फॉर्मॅलिटी म्हणून जाऊन ये "

मानसी " आणि तुझी आई तयार नाही झाली तर ?

तुषार " तू का निगेटिव्ह विचार करतेस ?

मानसी " मग काय करू ? माझ्याकडे दुसरा ऑपशन नाहीये  आता " आणि मानसी च्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले . बिचारी खूप रडवेली झाली होती . ती जेवढी रडवेली होत होती तेवढा तुषार तिच्या प्रेमात पडत जात होता .

बोल बोलता १२ वाजले . मानसी निघाली घरी आज हि भेट मात्र ती गुपित ठेवणार होती . मानसी बाकावरून उठली आणि तुषार ला बाय करून जायला निघाली . तुषार ने तिच्या साठी अजून एक गिफ्ट आणले होते ते तिला द्यायचा प्रयत्न केला पण ती घेतच नव्हती .

शेवटी तुषार ने तिला जवळ घेतले आणि तिच्या कपाळावर  एक हलका किस केले . आणि तिला म्हणाला माझ्यावर विश्वास ठेव " तुझं लग्न माझ्याशीच होईल . तू टेन्शन घेऊ नकोस ." आणि जबरदस्तीने तिच्या हातात आधीचे गिफ्ट आणि  आज आणलेले गिफ्ट तिला दिले .

मानसी येडाबाई अजूनही तिला कळले नाही हा एवढा कॉन्फिडन्स मध्ये कसा वागू शकतो .

तुषार -" मनू आज संध्याकाळी हि दोन्ही गिफ्ट घालून तू जा . माझे हे गिफ्ट घातलेस तर तुला असे वाटेल कि मीच तुझ्या बरोबर आहे "

शेवटी मानसीने दोन्ही गिफ्ट्स पर्स मध्ये ठेवले .

मानसी " मी हे घालणार नाही . तुझ्या ऑफिस ला मी हि कुरिअर ने पाठवीन , ह्यावर माझा अधिकार नाही बाय " आणि निघाली .

तुषार " हे बघ मानसी जर तू कधी माझ्यावर १ % तरी प्रेम केले असशील तर हे दोन्ही तू संध्याकाळी घालून येशील . म्हणजे जाशील .. "

तुषार चुकून जाशील च्या ऐवजी येशील बोलला होता तरी आपल्या ठमा ची  ट्यूब पेटेना .

माणसाचं हे असच असतं देव अनेक वेळा अश्या अनेक हिंट्स देत असतो पण आल्या सारख्या पामराला त्या पटकन कळत नाहीत . दिसत नाहीत . जेव्हा अनुभव येतो तेव्हा च कळतात . तोपर्यंत कदाचित फार वेळ झालेली असते .

मानसी  साडे डे बाराला   घरी आली ती वेगळ्या तोर्यातच

मानसी रूम म मध्ये गेली आणि आईला म्हणाली -  "  आई संध्यकाळी कोणती साडी नेसू ग ? "

मानसी ची आई " अरे वाह मानसी तू आता स्वतः हुन साडी नेसायला तयार झालीस हे बरं झालं "

मानसी - " आई आज जर मला मुलाकडच्यां कडून होकार आला तर माझ्याकडून पण होकार आहे मी आधीच सांगून ठेवते "

मानसी -  " अग  हो . आधी मुलाला बघून तर घे . कदचित काळा असेल ? उंच असेल ? तुषार इतका हँडसम नसेल मग ?"

मानसीची आई पण तिला चिडवत होती .

मानसी - " नुसता हँडसम असून काय उपयोग . त्याच्या आईला पण पसंत पडायला पाहिजे ना "

मानसीची आई " जाऊ दे त्यांचं त्यांच्याकडे . आपण आपलं या नवीन मुलाकडे आशेने बघू . तो  तुला नकार देऊच शकत नाही . त्याने म्हणे तुला आधी कधीतरी पाहिलंय . त्याला तू आधीच पसंत आहेस . आज फक्त फॉर्मॅलिटी करायची आणि लगेच लग्नाची बोलणी सुरु करायची आहेत "

मानसी " हो चालेल . उद्याच  लग्न करून  टाका म्हणजे तुम्ही पण मोकळे .." आणि मानसीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले .

मानसी ची आई " अग बाळा सर्व मुलींना एक ना एक दिवस आपल्या नवर्याच्या घरी जावंच लागतं ? तू रडू नकोस .

मानसी " हमम "

मानसी  दुपारी जेवली आणि रूम मध्ये जाऊन झोपली .

रडून रडून माणूस दमला ना कि खूप छान झोप लागते .

संध्याकाळी ४ वाजता मानसी ची आई तिला उठवायला गेली तेव्हा तिला ते दोन्ही गिफ्ट्स दिसल्या त्यावर फ्रॉम तुषार असे लिहले होते . आई च्या लक्षात आले कि दोघे आज पण भेटले असणार . पण तिने ते  न पहिल्या सारखे केले आणि तिला उठवून म्हणाली जा फ्रेश हो मी तिला आज छान साडी नेसवते .

मानसी उठली आणि आवरायला लागली .

मानसीच्या आई ने मानसी साठी एक नवीन साडी तयार  करून ठेवली होती . तिला मस्त सागर वेणी घालून गजर्यांनी सजवली आणि ती रेड कलर ची कांचीपुरम साडीत मानसी नवी नवरीच दिसत होती . आईने तिला नजर लागू नये म्हणून तिच्या कानामागे एक काजळाची टीट लावली .

बाबा पण लवकर आले आणि त्यांची तुषार च्या घरी जायची वेळ जवळ आली .

मानसीने ते दोन्ही गिफ्ट्स फेकून द्यायचे ठरवले होते किंवा कुरिअर ने पाठवून द्यायचे ठरवले होते पण तिला तुषार चे वाक्य आठवले " जर १ % तरी प्रेम केलं असशील तर हे दोन्ही तू आज घालशील . "

शेवटी निघता निघता तिने ते गिफ्ट्स ओपन केलेच . आधीच्या गिफ्ट मध्ये सोन्याचे कानातले होते आणि आजच्या गिफ्ट मध्ये एक हार्ट शेप च पेंडेंट होते . मानसीने ते गपचूप घातले आणि बाहेर आली . आई ने ते पहिले आई ला लक्षात आले कि हे कानातले आणि ते पेंडंट जे तिने तिच्या सोन्याच्या चेन मध्ये घातलाय जे कि हार्ट शेप च आहे ते तुषार ने दिलाय .

जर हिने तुषार ने दिलेले गिफ्ट्स घातलेत तर हि खुश का नाहीये हे मात्र आईला कळत नव्हतं .

आई बाबा आणि नवरी नाही पण नवरी चे रूप घेऊनच मानसी तुषार  च्या घरी निघाली . स्वर्गातील अप्सरा खाली येऊन मानसीला तयार करावं अशे मानसी चे रूप दिसत होते .

अर्ध्या तासातच सर्व जण तुषार च्या नवीन फ्लॅट वर पोहचले . त्यांच्या घरी वेगळीच गडबड दिसत होती . दारापुढे छान रांगोळी काढली होती . घरात खूप पाहुणे मंडळी आले होते . घरातील बायका सर्व जण ट्रॅडीशन साड्या नेसून तयार . जसं कि घरात काहीतरी प्रोग्रॅम आहे अश्या तयारीत . मानसीला कोणचं ओळखीचे दिसत नव्हते . अनोळखी पुरुष मंडळी तिच्याकडे बघून हसत होती आणि पोच पावती देत होते कि मुलगी छान आहे . मुलगी छान आहे .

मानसी आई ला " आई अग हे लोक असे का तयार झालेत ? काही प्रोग्रॅम आहे का त्यांच्या कडे ?"

आई  " हो म्हणून तर आपल्याला बोलावलंय त्यांनी . "

हॉल मध्ये छान पूजेची तयारी चालू होती . भटजी बुवा पाटावर बसून कसली तरी तयारी करत होते .

मानसी पूर्ती गांगरली . काय होतंय आज ? काहीच कळेना .

तेवढया एक मुलगी पटकन आतून वाकून बघत आहे असे तिला वाटले . कोण होती ती ? तिला पटकन तृप्ती वाटली ?

मानसी ने मनाला फटकारलं " इकडे कुठे तृप्ती असेल ? "

तेवढ्यात भटजी म्हणाले चला नवरा मुलगा आणि नवरी मुलगी ला बोलवा . विधीला  सुरुवात करू .मानसी ची आई मानसीला घेऊन पाटावर बसायला नेऊ लागली . अनेक प्रश्न डोळ्यात घेऊन मानसी आईकडे बघत होती आई पण तिच्याकडे लक्ष नसल्या सारखे दाखवत होती . ती मोठया आशेने बाबांकडे बघत होती. " बाबा पण मस्त गप्पा मारत बसलेत .

मानसी ला एक एक क्षण ती आई बाबा आणि तुषार पासून परकी होत आहे जाणवत होत . मनात धड धड वाढली होती . कोण आहे नवरा मुलगा ? आई बाबांनी असे का केलं ? डायरेक्ट कोणता विधी करत आहेत . मला काहीच कोण का सांगत नाहीये ? शरीर विजे सारखं गरम झालं होत . असे वाटत होत तिला मोठ्याने ओरडावे " अरे थांबवा हे सगळं . असे नाही करू शकत तुम्ही लोक ?

तेवढ्यात आतून एक मस्त नाजुकशी शेरवानी घालून नवरा  मुलगा बाहेर आला . मानसी ची नजर खाली होती . ती त्याच्या चेहऱ्याकडे बघूच शकत नव्हती . तो आला पाटावर बसला आणि विधी करायला सुरुवात पण केली .

कोणीतरी मागून बोलले " जोडी अगदी शोभून दिसत आहे , जसा कि लक्ष्मी नारायणाचा जोडाच दिसतोय . " मानसी ची मान  अजूनही खालीच . तेवढ्या एक मुलगी आली तिला पाटावर बसण्यासाठी घेऊन जाऊ लागली . ती तृप्ती होती

ती मानसी ला म्हणाली " छान दिसत आहेस वाहिनी "

मानसी काहीच बोलली नाही . ती मनो मन देवाची प्रार्थना करून जे होईल ते होईल असे म्हणून पाटावर बसली .

तेवढ्यात नवरा मुलगा म्हटला " कानातले आवडले का ? छान दिसत आहेस "

तो आवाज तुषार चा होता . मानसीने पटकन मान  वर केली तर तुषारच पाटावर शेरवानी घालून बसलेला .

तुषार तिच्याकडे बघून हसला . ती च्या डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागले . तुषारने एवढ्या लोकां समोर त्यांचा रुमालाने तिचे डोळे पुसले आणि म्हणाला " रडू नकोस , आता हसायचे दिवस आलेत "

मानसी ला त्याला काठीने बडवून काढावेसे वाटत होते . ती रडायची थांबली आणि उठली आईच्या गळ्यात जाऊन पडली आणि जोर जोरात रडली . शेवट भटजी  म्हणाले एक ५ मिनिटांचा ब्रेक घ्या आणि मग विधी सुरु करू .

मानसी ची आई ने तिला आतल्या रूम मध्ये घेऊन गेली . तिला शांत केली . आणि म्हणाली “कसं वाटलं सरप्राईझ?. हि आयडिया तुझ्या बाबांची आणि तुषार दोघांची होती. आज तुझा आणि तुषार चा साखरपुडा आहे . तू खुश आहेस ना बाळा . अजून वेळ गेलेली नाही . तू मुक्तपणे सांग . “

आता मानसी सावरली आणि हसू आणि लाजू लागली . मानसीने स्वतःला थोडं फ्रेश केलं आणि मेक अप ला टच अप केला आणि आता ती आनंदात  पाटावर विधीला बसायला तयार झाली . भटजींनी एक एक विधी करत करत तुषार आणि मानसीचा साखरपुडा पार पडला . दोघांनी एकमेकांना पेढा भरवला आणि जमलेल्या सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

फायनली मानसी आणि तुषार यांचा साखरपुडा अचानक पण देव ब्राम्हणाच्या साक्षीने आणि दोघांच्याही आई वडिलांच्या आशीर्वादाने पार पडला . तुषार च्या आई ने पण मानसीला आनंदात तिचा स्वीकार केला . त्यांच्या चेहऱ्याकडे बघून त्या आज खुश आहे आणि छान सुंदर सुशील सून मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता .

मानसीचे आई आणि बाबा तुषार म्हणून एक चांगला जावई आपल्याला मिळाला याने आंनदी दिसत होते. मानसीची आई तिने केलेला नवस फिटणार होता वीकेंड ला दोन्ही मुलींना घेऊन देवीच्या दर्शनाला जाणार होती त्यामुळे त्या पण समाधानी होत्या .

साखरपुडा झाल्या वर सर्वानी जेवणाचा स्वाद घेतला आणि आपापल्या घरी जायला निघाले . या सर्व गडबडीत तुषार आणि मानसी दोघे चोरून चोरून एकमेकांकडे बघत होते पण बोलायला असा एकांत काही मिळेना . शेवटी जाता जाता तृप्ती म्हणाली वाहिनी ये मी तुला घर दाखवते आणि तिला आत घेऊन आली . तिथे तुषार आधीच आला होता . तृप्ती ला खुणेने तुषार ने थँक्स दिले आणि मानसीला त्याच्या रूममध्ये घेतले .

मानसी खूप ऑकवर्ड झाली होती . जसे त्याने दरवाजा लावला तस असा त्याला हाताने त्याच्या दंडावर मारायला लागली .

तुषार " अग  हो , हो थांब जरा . लोकांच्या बायका ओरडतात माझी बायको मला मारणार पण का ?"

मानसी ओशाळली आणि शांत झाली .

तुषार च्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसली . तुषार ने पण तिला सॉरी म्हटले आणि तिच्या कपाळावर पुन्हा एकदा हक्काने किस केले .

अशा पद्धतीने मानसी  च्या  सुखी संसाराला सुरुवात झाली . !!!


आणि अशा प्रकारे सर्वच जण सुखी समाधानी झाले . 

🎭 Series Post

View all