# कादंबरी – मानसी # भाग 10

This part is about mansi has taken one decision on which her parents not agree

                                                              # कादंबरी – मानसी # भाग 10

                                                 बाबांचा विरोध स्वीकारून मानसीने घेतला निर्णय

मानसी घराच्या दिशेने निघाली . वाटेत गणपती बाप्पाच्या देवाळात गेली . येताना प्रसाद म्हणून पेढे घेऊन आली. आई घरात तिची जेवायला वाट बघत होती . मानसी भर उन्हाची बाहेर गेली होती . आई वाटे कडे डोळे लावून बसली होती . मानसी आज आपल्याच धुंदीत होती . भर दुपारी देवळात काय जात होती . मनात  छान विचार असले ना कि बाह्य वातावरणाचा इतका   त्रास होत नाही . तेच जर मन त्रासलेले , चिंतेने ग्रासलेलं आले तर ऊन , पाऊस ,वारा सुद्धा त्रास द्यायला लागतात . सांगायचा मुद्दा असा कि ”इट्स ऑल इन माईंड”

हवा पाणी ऊन हे तर रोजच असतात पण आपल्याला एके दिवशी खूपच रडकुंडीला आणतात .

मानसी मॅडम आज खुश होत्या . त्यांच्या स्वाभिमानाला जी ठेच लागली होती त्याच्यावर मलम पट्टी बसली होती. जॉब तर मिळाल्या सारखाच होता . १५ दिवसांचा प्रश्न होता . दुसरीकडे कुठे बघायच्या आधीच ,इनफॅक्ट फायनल सट्टेलमेंट व्हायचा आधी तिला त्याच ऑफिस मधून कॉल आला होता.

एक वेगळाच आनंद मिळाला होता . कुठेतरी हि लढाई तिची तिलाच लढावी लागणार होती.

हि लढाई तिने छेडली नव्हती पण लढाई सुरु तर झाली होती . पहिला टप्पा पार पडल्यासारखे वाटत होत .

घरी आल्यावर फ्रेश झाल्यावर मस्त गरम गरम जेवण जेवली . बाहेर किती उन्हाळा असला तरी जेवण मात्र गरमच लागते . वाटलं तर त्याच्यावर मस्त एक आईस -क्रीम खावी पण जेवण गरम पाहिजे .

जेवण होई पर्यंत आई ने पण एकही प्रश्न विचारला नाही . जेवण झाल्यावर आईने प्रश्नाचा भडीमार सुरु केला .

"काय झालं?

काय म्हणाले सर ?

ती नवीन पोस्ट कोणती आहे ? चांगली आहे का? बाकी कोण भेटलं का?ऑफिस कुठे असेल ?

मानसी ने सगळे प्रश्न ऐकून घेतले आणि मग एक एक सांगायला लागली

"ऑफिस तेच आहे . आता मला एक केबिन मिळेल .त्या केबिन  मध्ये रामदास सर आणि माझं अशी दोन टेबल खुर्ची असेल,त्यांच्याकडे त्यांचा लॅपटॉप असतो .मला मात्र कॉम्पुटर मिळेल . "

आई अग आणि एक गम्मत म्हणजे माझी पोस्ट आता असिस्टंट मॅनेजर ची असेल . आणि त्यातली गम्मत म्हणजे हि पोस्ट टीम लीडर च्या लेवल ची आहे .

रामदास सर म्हणत होते ह्या डिपार्टमेंट ची फुल्ल ऑथॉरिटी देणार आहेत ते. आणि रिपोर्ट्स बनवणे हे एक महत्वाचं काम असणार जे कि मला खूप आवडत . मी खूप excite आहे .कधी एकदा ते काम सुरु होईल ते . अ ग जवळ जवळ ५० क्लायंट आहेत .जरा कामाचा लोड असेल तरी पण खूप मज्जा येईल आणि खूप शिकायला हि मिळेल कारण हे कॅलिएंट्स खूप मोठं मोठे आहेत.

आईला या सगळ्या रामायणात काहीही इन्टरेस्ट नव्हता . आई ला वाटत होत एकदा आपण सोडलीय ना ती कंपनी मग त्याच कंपनीत कशाला परत जायचे . बाहेर काय कंपन्या नाहीयेत का ?मानसीला हे समजावणार कसं . एकदा ह्या कंपनीमुळे किंवा कंपनीतल्या पॉलिटिक्स ला बळी पडल्यानंतर पुन्हा तिथेच जाणे म्हणजे स्वतः च्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे . आई काही खुश होईना . तिला हा मानसीचा निर्णय साफ चुकीचा वाटत होता.

इतक्यात मानसीच्या रांगोळीच्या स्टुडंट्स आल्या . मग काय हा विषय बोलायचा राहून गेला . मानसी आपली रांगोळी शिकवण्यात गुंतली .

आई च मन काही थाऱ्यावर नव्हतं . तिने आतल्या खोलीतून वडिलांना फोन लावला . मानसीने सांगितलेले सर्व तिने वडिलांना सांगितले . "काय हो तुम्हाला काय वाटते " ? करू देत का तिला तिथेच जॉब पुन्हा . मला जरा खटकतंय . उगाच ऑफिस मध्ये एकमेकींची खुन्नस कशाला ? आता तिची पोसिशन पण त्या तिच्या टीम लीडर च्या बरोबरची असेल . नाहीतर असे व्हायचं काम राहिल बाजूला या दोघीं मध्ये कॉम्पिटिशन लागेल . मानसी तशी साधी आहे . तिचा उपयोग करून घेईल हे सुद्धा कळणार नाही . मग बसेल पुन्हा रडत .”

बाबा म्हणले " बघतो मी आल्यावर बोलतो तिच्याशी आपण पटवून सांगू तिला तू टेन्शन घेऊ नको "

दोघांनी ठरवून टाकलं कि मानसीला पुन्हा त्याच कंपनीत जॉब करून नाही द्यायचा . त्यापेक्षा दुसरीकडे बघ म्हणून सांगायचं.

इकडे मानसी सारखा ई-मेल चेक करत होती .ऑफर लेटर आलय का ते बघत होती . ऑफर लेटर ची ती आतुरतेने वाट बघत होती . रांगोळीच्या बायकांना  तिने आज दोन तीन चिन्ह दाखवले आणि प्रॅक्टिस करायला लावले .त्या मध्ये मध्ये पुन्हा काढून दाखवा म्हणून सांगत होत्या .

आणि अशाप्रकारे रांगोळीचा क्लास संपला . मानसी तिच्या रूम मध्ये जाऊन बुक्स वाचत बसली . actually बाहेर आले कि आई तीला  शंभरसे साठ प्रश्न विचारेल हि तिला पण कळेले होते . ती वाट बघत होती बाबांची . बाबा तिला समजूत घेतील ह्याची तिला खात्री होती . बाबा आल्यावरच एकदम बोलू असे तिने ठरवले होते .

इतक्यात राजू आली "मानसी ताई  हे गणित सांग ना कसं करायचं . अग खूप वेळ मी प्रयत्न केला पण उत्तर चुकतंय . "

मानसी तिचं गणित सोडवायला बसली .

तितक्यात बाबा आले , मानसीने राजुला गणित समजावून घरी पाठवले आणि म्हणाली काही अडलं तर उद्या सकाळी क्लास च्या वेळेत सांगेन .

सर्व जण एकमेकांवर प्रेम करत असले कि काही वेळा खूपच ऑकवर्ड सिचवेशन तयार होते . कोणालाच कोणाचं मन मोडायचं नसतं पण आपलं म्हणणं पण सांगणे गरजेचं असत .तसेच काहीसं वातावरण झालं होतं त्यांच्याकडे . प्रत्येक जण हॉट टॉपिक पुढे ढकलत होता . आई ला वाटे बाबा बोलतील , बाबांना वाटतंय आई सुरुवात करेल आणि मानसी मी कधी बोलू जेवल्यावर कि जेवणाआधी.

शेवटी बाबांनी चहा घेतल्यावर मानसी ला विचारले

" आता  बोल काय म्हणतायत तुमचे सर ?

मानसी ने सर्व घडलेले शब्द न शब्द सांगितले .  “बाबा मी हा जॉब करण्याची संधी सोडणार नाहीये. मला असे अचानक सोडायला लागल्याचे त्यांना हि आवडले नाहीये . मला ते मानाने तिथे परत बोलावत आहेत मग काय हरकत आहे.”

आई बाबा एक मेकांकडे बघू लागले

बाब म्हणाले "तू घाई करू नकोस . मी सकाळी पण तुला म्हटले होते कि असे निर्णय कधीच पटकन नसतात घ्यायचे . त्यांचं ऑफर लेटर आलं का ?

त्या मध्ये काय काय आहे याचा विचार करू ? आधीच ठरवू नकोस  कि मी हा च जॉब करणार आहे . त्यांचा टर्म्स आणि कंडिशन असू  शकतात . सगळं छान असत किंवा दिसत तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो

टीम लिडर चा बदला किंवा तिच्यामुळे आलेल्या आपल्यावर प्रॉब्लेम च उत्तर देण्यासाठी तुला तिथेच जॉब करायला पाहिजे असे नाही .

मानसी "नाही ओ बाबा .. तसं काही नाहि . माझा आणि तिचा आत्ता काहीच संबंध नसणार आहे . आणि त्याही पेक्षा काम खुप छान असेल .

तरीही बाबानी तिला सांगून टाकले "हे बघ मानसी मला आणि तुझ्या आईला असे वाटतंय कि एकदा आपण सोडलीय ना ती कंपनी मग पुन्हा तिकडे मागे वळून पाहायचं नाही . बाहेर खूप काय कमी आहेत का कंपनी . आपलं  त्याच्यावरच काय घोडं अडलय एवढं . हे बघ मी सांगतो तुला  ह्या पेक्षा खूप छान जॉब मिळेल तू ह्या जॉब चा नाद सोडून दे "

मानसी ला कसं सांगू आई बाबांना हेच कळत नव्हते. “तुम्हा दोघांनाही माझं म्हणणं पटत का नाहीये . मी काय त्यांच्या मागे लागले होते का मला परत घ्या . त्यांनी  स्वतः हुन मला जॉब ऑफर केलीय . बॉस पण किती छान बोलले होते आज . तसेच काही असतं  तर बॉस पण काहीतरी बोलला असता . पण तसं नाहीये .उलट माझ्या टॅलेंट वर आणि मी आधी केलेल्या मेहनतीमुळेच हा जॉब मला ऑफर केलाय त्यांनी .

जेव्हा ते घ्यायला तयार आहेत तेही चांगल्या पॅकेज वर आणि चांगल्या पोस्ट वर घेत आहेत . या मार्च एन्ड ला माझं प्रोमोशन due होते ते पण आपोआप मिळालेय .”

झाली त्यांच्याकडून एक चूक .ते ती सुधारत आहेत . बाबा माझं माझ्या कामावर किती प्रेम आहे ते तुम्हाला माहितेय . आणि आपण जर प्रामाणिक असेल तर आपलं कोणीही काहीच बिघडवू शकत नाही हे तुम्हीच म्हणत असता ना नेंहमी "

"माझ्या प्रामाणिक पणाचे परिणाम आहेत हे "

मी जॉब सोडल्यावर त्यांना माझी किंमत कळली असेल . किंवा एक चांगला एम्प्लॉयी दुसरीकडे जाऊ नये हा पण हेतू असेल . या पलीकडे काही नाही . आणि यात माझा पण फायदाच आहे .

मानसी  न थांबता बोलत होती. आई बाबांना तीचे मुद्दे पटवत होती .

दोघांच्याही लक्षात आले कि हि आता ऐकणार नाही .आज या विषयावर डिस्कशन थांबवु .तुझं ऑफर लेटर आलं कि सांग मला . पूर्ण वाचून मग ठरवू या अशा पॉईंट वर डिस्कशन थांबलं .

बाबांच्या लक्षात आलं कि तिच्या मतावर ठाम आहे . आणि हा जॉब तिच्यासाठी किती महत्वाचा आहे हे हि कळले. काही झालंच नाही अशा अविर्भावात सर्व झोपायला गेले .

🎭 Series Post

View all