कधी व्यक्त होऊन तर बघ....
भाग १
भाग १
"कधी फोन उचलायचा नाही की कधी वेळेवर मेसेजला रिप्लाय करायचा नाही. खुप चिडचिड होते माझी आणि संताप होतो सगळ्याचा." माहेरी आलेल्या श्रेयाची सकाळी सकाळी चिडचिड सुरू होते.
" काय झाले तुला इतके चिडायला ? हे घे पाणी पी आणि थोडे शांत हो बघू"
इतके काय झाले अचानक, एवढी चिडचिड करणे चांगले नाही आरोग्याला.आई श्रेयाला शांत करत म्हणते.
इतके काय झाले अचानक, एवढी चिडचिड करणे चांगले नाही आरोग्याला.आई श्रेयाला शांत करत म्हणते.
"आई अगं काय सांगू तुला?.. हा रोहन , नुसतं काम काम. घरी उशिरा यायचे त्यांनतर कसेबसे जेवायचे की परत काम सुरू.शनिवार- रविवार सुट्टी असते तेव्हा काय तो मला त्याचा थोडा वेळ मिळेल पण नाहीच तेव्हा पण मीटिंग असतात आणि काम सुरूच राहते .
मान्य आहे की हे कमवायचे, प्रगती करायचे दिवस आहेत.त्यात त्याने स्टार्टअप कंपनी जॉईन केली आहे. पण तरीही थोडावेळ काढावा ना स्वतःसाठी, कुटुंबासाठी पण नाहीच.वर्कोहोलिक आहे नुसता बाकी काही नाही." श्रेया बोलते.
"थोडे समजुतीने घे नसेल वेळ सध्या.त्याने नवीन कंपनीत मागच्या वर्षीच तर नोकरी धरली आहे.थोडा वेळ दे सेटल व्हायला. " आई श्रेयाला तिच्या परीने समजावण्याचा प्रयत्न करते.
"काही नाही ग , आहे हे सगळं निमित्त आहे.मी तर म्हणेल कारणं आहेत हि. आता आमच्या लग्नाला सहा वर्षे झाली. माझे आपले नोकरी,घरचे, पै- पाहुणे सगळे सांभाळून नुसती तारेवरची कसरत सुरू असते. कधी कशाला मदत तर करत नाहीच पण कौतुक म्हणून नसते कधी.उलट झालीच एखादी चूक माझ्याकडुन काही करण्यात किंवा स्वयंपाकात तर लगेच बोलून दाखवायचे असते ह्याला." श्रेया रागात बोलत असते.
"हे सगळे त्याचे वागणे पाहून, माझ्यावर प्रेम आहे का नाही ? हा प्रश्नच पडतो मला तर.दोघेही वर्किंग आहोत त्याव्यतिरिक्त कधीही कुठे गेलो की घरचे सगळे सतत सोबतीला असतातच.म्हणून आपण थोडा वेळ बाहेर भेटून तरी वेळ काढून बोलूया का ? किंवा एखाद्या मूव्ही बघायला दोघेच जावूया का ? म्हणून माझीच धडपड सुरू असते.
पण हा आहे की सतत नुसते ऑफिसचे काम.कधी काही आपणच प्लॅन करावा तर फोन देखील उचलत नाही की पुन्हा कॉल करत नाही.असे कोणी तरी वागते का? " श्रेया आईजवळ तिचे मन मोकळे करत बोलते.
पण हा आहे की सतत नुसते ऑफिसचे काम.कधी काही आपणच प्लॅन करावा तर फोन देखील उचलत नाही की पुन्हा कॉल करत नाही.असे कोणी तरी वागते का? " श्रेया आईजवळ तिचे मन मोकळे करत बोलते.
आईला कळून चुकते की हे काही आजचे नाही.एकामागोमाग एक घडत गेलेल्या गोष्टींमुळे हिला इतका राग आला आहे.त्या सगळ्या साठलेल्या गोष्टींचा हा उद्रेक आहे.त्यांना हे माहीत असते की श्रेया आणि रोहन एकमेकांवर प्रेम पण करतात आणि जीव पण लावतात फक्त त्यांच्यात तुटत चाललेला संवाद ह्या सगळ्याला कारणीभूत आहे.
क्रमशः
©® सुप्रिया शिंदे महादेवकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा