Login

कधी व्यक्त होऊन तर बघ.. भाग २

Love Is All About How You Express It
भाग २:

" अगं श्रेया, हे बघ मी आणि तुझे बाबा. आमच्या संसाराला आज जवळपास तीस वर्षे झाली.बाबांची नोकरी सरकारी बँकेत.त्यात मधून मधून बदली होत असे.आम्ही तर आमचा संसार घेऊन किती तरी ठिकाणे फिरलो.त्यात जेव्हा पुण्यात बदली झाली त्यांनतर इथे स्वतःचे घर घेतले आणि मग मी आणि तुम्ही दोघे आपण तुमच्या शाळा आणि सगळे पाहता इथेच राहिलो.बाबा मात्र येऊन जाऊन असायचे. "
ती पुढे तिला म्हणते.

"हो आई मला माहित आहे हे सगळे.पण तुमचा दोघांचा किती जीव आहे एकमेकांवर.किती ते प्रेम तेच आमच्या मध्ये मिसिंग आहे बघ." श्रेया भाऊक होऊन बोलते.

प्रेम म्हणजे समर्पण.एकमेकांची निस्वार्थी काळजी घेणं.एकमेकांना जपणं. आम्हाला दोघांना लग्नानंतर बऱ्याच जबाबदाऱ्या होत्या. दोन नणंद,दिर सगळ्यांची लग्न, सेटलमेंट आम्हीच पार पडली. आधीच्या एकत्र कुटुंबात कुठले आले ग प्रायव्हसी.
तरी एकमेकांच्या नजरेत प्रेम होते. आमची म्हणजे डोळ्यांची भाषा.नुसते एकमेकांच्या नजरेत पाहून समजायचे हो आम्हाला एकमेकांच्या मनातलं."
आई श्रेयाला अगदी मन लावून सांगते.

" किती छान ! आई अगं प्रेम व्यक्त पण करावं लागतं.म्हणजे बोलावं की प्रेमाने.काढावे काही क्षण आपल्या माणसासाठी.काय चुकीची अपेक्षा आहे का ही माझी.सांग तूच आता." श्रेया अजूनही थोड्या नाराज स्वरात बोलत असते.

"असं काय बोलते वेडाबाई,मी कुठे म्हणते चुकीचं आहे ते.पण नेहमीच वेळ काढणे नाही जमत.तेव्हा आपणच स्वतःहुन पुढाकार घ्यावा.शेवटी घरातले वातावरण आपल्या चिडचिड करण्याने बिघडते बघ.
तुमच्या पिढीला तर संवाद करणे अजून सोपे झाले आहे बघ.तुम्ही मोबाईल वर मेसेज करून, व्हॉटस ॲप वर चॅटिंग वर पण बोलू शकता.आधी तुझे बाबा मला त्यांची ख्याली खुशाली पत्र लिहून कळवायचे. किती आतुरता असायची त्या पत्राची. पंधरा दिवसातून एक पत्र यायचे.तेवढे वाचून मनाला समाधान मिळायचे." आई जुन्या आठवणीत रमते.

"किती भारी ना ...आई.ती पत्र तू आज देखील जपून ठेवली आहेस पाहिली आहेत ती मी. तुमचं ते एकमेकांना जीव लावणं कमाल आहे बाबा."

"मी ठरवले आहे काही दिवस तरी मी आता रोहन सोबत बोलणार नाही.त्याला माझी किंमत नाही ना माझ्यासाठी वेळ.कधीतरी त्यानेही लिहावं असं पत्र,व्हावं कधी भावनांनी व्यक्त माझ्यासमोर.
सतत वाढत जाणाऱ्या अपेक्षा आणि जबाबदाऱ्या.कंटाळा येतोच आई मग ह्यातून.घरी काय आणि ऑफिस मध्ये काय सगळे सारखेच." श्रेया आईसोबत सगळे बोलून स्वतःला शेवटी शांत करते.

त्यानंतर दोन चार दिवसांनी श्रेया माहेरहून सासरी जाते
घरी गेल्यावर देखील ती काही दिवस रोहन सोबत अबोला ठेवते.रोहनला आता मात्र ते खूप जाणवायला लागते की ह्यावेळी श्रेया जास्त शांत झाली आहे.तिला मनाला खूप जास्त लागले आहे.
आता मात्र तिचा राग हा तिच्या पद्धतीनेच मला दूर करावा लागेल आणि तो मी करणार.असे रोहन मनाशी ठरवतो.


🎭 Series Post

View all