कधीतरी स्वतःसाठी जगून बघ
सुनीता व अर्चना जिवलग मैत्रिणी
इतक्या जिवलग की एकाच बिल्डिंग मध्ये राहतात तरी दिवसातून एकदा तरी व्हिडीओ कॉल करतात,
कुठेही या दोघी सोबतच
मग ते हळदीकुंकू असो की
की कुणाचे लग्न
मुंज असो की श्राद्ध
ही जोडी काही एकमेकींना सोडत नव्हती,
त्या भाजीपासून तर कपड्यापर्यत
सगळं सोबतच घ्यायच्या
कारण कमी जास्त करत करत स्वस्त मिळावं म्हणून,
रविवार चा दिवस असतो
सुनीता अर्चना ला कॉल करते
"काय ग काय करतेस "
"काही नाही मुलांसाठी वेगळं काहितरी म्हणून इडली करत होते व यांना व बाबा ना देखील आवडते" अर्चना मनमोकळेपणे म्हणाली
"झालं का तुझे चालू रोज रोज तेच असते तुझे, मुलांचे टिफिन करणे सासू सासऱ्याची सेवा करणे, आले गेलेले पाहुणे बघणे व नवऱ्याच्या पुढे पुढे करणे बस
आणि यातच तुझं आयुष्य जाणार आहे"
सुनीता रागाने म्हणाली
"अग बाई चा जन्म च मुळी झिजण्यासाठी झालेला असतो
तिच्या घरातील लोकांचे सुख हेच तिचे सुख
कुणी तिच्या स्वयंपाकाला छान जरी म्हणाल ना तरी तिचा कामाचा सगळा क्षीण निघून जातो,
ती अन्नपूर्णा असते घराची त्यामुळे तिला मुलांना वेगवेगळ बनवून खाऊ घालायला आवडते "
ती बोलत होती तेच सुनीता मध्ये बोलू लागली
"झाले तुझे स्त्री पुराण गाऊन
अग कधीतरी स्वतःसाठी जग
मेली ना तर सगळं खालीच राहील
सोबत जातील फक्त आठवणी व हे आनंदाचे क्षण "
सुनीता म्हणाली
"तू चालू नको होऊ बर
जे चालू आहे ते चालू दे उगाच स्वप्न कशाला बघायचे
आता काय वय आहे का आपले असले टुकारसारखे फिरायचे उगाच काही पण असत तुझं
"
अर्चना नाराजी च्या सुरात म्हणाली
"हो मला तुझे सगळे मान्य आहे पण तरीही
तू एक दिवस काढ पूर्ण दिवस आपण मनसोक्त फिरू "
सुनीता आनंदाने म्हणाली
"नाही जमणार ग "
अर्चना नाकारत म्हणाली
"जमेल जमेल तू प्रयत्न कर "
सुनीता
"बर प्रयत्न करते "
अर्चना मान्य करत म्हणाली
अर्चना चे प्रयत्न करणे अजून चालूच होते सुनीता रोज विचारायची व अर्चना चे नेहमीचे चालू च होते
उद्या नको ग
उदया बाबा ना हॉस्पिटलमध्ये न्यायचे आहे,
मुलीची परीक्षा आहे,
हे दौऱ्यावर जाणार आहेत,
आई नाहीत सद्या
असे एक ना अनेक कारणं चालूच होती
सुनीता हे सगळं बघत होती
एक दिवस सुनीता ने अर्चना ला कॉल केला व सांगितले मी आईकडे आली आहे
माझी तब्बेत ठीक नाहीये ,
व घरातील सर्व बाहेरगावी गेले आहेत
तू आज तुझी सगळी कामे आवरून घे, व घरी सांगून उद्या सकाळीच माझ्याकडे ये ,
आणि हो मुक्कामी ये
असे सांगितले,
सुनीता ने आवाजही इतका वेगळा काढला की अर्चना ची सुनीता आजारी असल्याची खात्री पटली,
एरव्ही स्वतःसाठी वेळ न काढणारी अर्चना आज मैत्रिणी साठी धावत पळत निघाली , घरातील सर्व आवरून सासू व नवऱ्याला विनवण्या करून ....
दुसऱ्या दिवशी सकाळीच सुनीता च्या आई च्या घरी पोहोचली ,
बेल वाजवताच
ठणठणीत सुनीता समोर आली
सुनीता ला सुखरूप समोर बघून
अर्चना थोडी चिडली पण नंतर सुनीता ने मारलेल्या एका मिठीने ती सगळं विसरली
"बर चल आवरून घे पटकन
इथून पाच किलोमीटर वर एक डोंगर आहे व तो खुप नटलाय सध्या तिथे धबधबा देखील आहे" सुनीता तिच्या अंगावर जीन्स फेकत म्हणाली
"ये बाई वेड लागले आहे का ???
अग आपण पस्तिशी ओलांडली आहे आता
आपण सोळा वर्षाच्या नाही आहोत असे थेर करायला,
मी येणार नाही व असे काही घालणार नाही मी जाते घरी"
अर्चना माघे फिरत म्हणाली
"हो का बरं जा मग
व मी मेल्यावर ये "
सुनीता रागात म्हणाली
"काय ग काहीपण बोलतेस
"अर्चना खाली बसत म्हणाली
"मग चल जाऊयात "सुनीता म्हणाली
"बर " अर्चना नाराजीने
दोघीही आवरून निघाल्या
आज मुद्दाम अर्चनाने तिची गाडी घेतली होती, शहरापासून बाहेर आल्यावर अगोदर एक चहाची टपरी दिसली त्यांना
दोघींनि तिथे चहा घेतला,
गाडी पुढे पुढे जात होती व अर्चना तिच्या भूतकाळात रमत होती,
ती अशीच मैत्रिणी सोबत फिरायची लग्नापूर्वी मनसोक्त वारा अंगावर घेत,
डोगर , दऱ्या तिचा जिव्हाळ्याचा विषय , तिचे वाऱ्यावर उडणारे लांबसडक केस तिलाच खुप आवडायचे,
तेवढ्यात पाऊस चालू झाला, सुनीता ला वाटले आता कुठेतरी थांबू पण आज अर्चनाने मोकळा स्वास घेतला होता ती आज पुन्हा भेटलीहोती तिच्यातल्या तिला म्हणून ती थांबायला नको म्हणाली
व त्यांचा पावसात प्रवास चालू झाला, हळूहळू झाडे, झुडपे, पूल, तलाव त्या माघे टाकत होत्या
शेवटी त्या पोहोचल्या त्या डोंगर पायथ्याशी,
तसे डोंगरावर जायचे कुणाला होते त्यांना तर ही प्रवासाची मजा अनुभवायची होती,
सगळीकडे पसरलेली हिरवळ,
वेगवेगळ्या रंगाचे दिसणारे पक्षी
अंगावर पडणारे ते टपोरे थेंब
तो मनमोकळं वाहणारा झरा सगळं कसं मोहित करत होत,
त्या दोघी त्या पाण्यात मनसोक्त डुबल्या
आज सुनीता ज्या अर्चना ला बघत होती ती खुप वेगळी होती तिच्यासाठी,
नाचत काय होती,
मधेच शेर काय मारत होती
गाणे म्हणत होती
तर मधेच शिट्टी मारत होती
ती फक्त उद्या मारत होती इकडून तिकडे,
तिने म्हणलेलं गाणं ऐकून सुनीता ला तर धक्काच बसला,
एक गुण असेल तर सांगावा ना
पण ती परिपूर्ण होती,
नाचणे, गाणे, शेर शायरी, व ती कविताही करत होती
आज नव्याने भेटत होती
तीच तिला स्वतः ला ,
त्यांनी धमाल केली दिवसभर,
रात्री बाहेर जेऊन सुनीता च्या घरी पोहोचल्या,
आता रातभर गप्पा रंगणार हे ठरलं होतं,
सुनीता ने तिच्या टेरिसवर दोघीसाठी अंथरून टाकले व पुन्हा चालू झाला त्यांचा गप्पाचा प्रवास ,
"यार तुला इतकं सगळं येत माहीत नव्हतं मला "
सुनीता कौतुकाने म्हणाली
"हो ग तुला खर सांगू
हे सगळं मला येत हे मीच विसरले होते, कमी वयात बाबा नि लग्न लावून दिले व अंगावर जबाबदारी पडली लग्नाला एक वर्ष होत नाही तर देवाने मुलंही पदरी घातले, मग घरातील माणसे लेकरं नवरा यांना सांभाळता सांभाळता मी स्वतः चे अस्तित्व देखील विसरले,
खुप वाटायचे कधीतरी असे एकटीने बाहेर जावे मनसोक्त जगावे जिथे कुणीच नसेल रागावणार
पण हे फक्त स्वप्न च राहिले होते,
घरात सगळ्यांचे करता करता स्वतःसाठी कधी वेळच मिळाला नाही,
नेहमी घरचे काय म्हणतील समाज काय म्हणेल याची भीती
व याच भीतीपोटी मी मन मारून जगायला लागले,
माझ्या ईच्छा, आकांक्षा सगळं मी दडवून ठेवलं मनाच्या एका कोपऱ्यात पण आज तुझ्यामुळे मी पुन्हा एकदा आयुष्य जगले,
आता मरण जरी आले ना तर मी समाधानाने मरेल
कारण लग्नापूर्वी व लग्नानंतर मी पहिल्यांदा
जीन्स घातली दुसऱ्या मुली दिसल्या की खुप हेवा वाटायचा पण मला कधी कुणी घालू च दिली नाही
पण आज तुझ्यामुळे माझी ईच्छा पूर्ण झाली
Thank you "
अर्चना डोळ्यात पाणी आणत म्हणाली,
"ये रडूबाई तू इतक्या लवकर मरणार नाहीस बर व ऐक यापुढे आपण वर्षातून एकदातरी असे भेटत जाऊ बाहेर मनसोक्त चालेल ना "
सुनीता म्हणाली
"हो नक्की
"
अर्चना सुनीताला मिठी मारत म्हणाली
@खरच स्त्री चे आयुष्य च मुळात दुसऱ्यासाठी झिजण्यात जाते, पण तिला देखील मन आहे तिला देखील भावना आहेत, त्यामुळे
एकदातरी स्वतः साठी जागून बघा
घर ,जबाबदारी हे चालूच राहील पण स्वतःसाठी वेळ द्या,
स्वतः ला ओळखा,
स्वतःतील क्षमता ओळखा
मनसोक्त जगा कुमी नावं ठेवलं तरी चालेल पण जगा कारण हे जीवन पुन्हा नाही
जे करावं वाटत ते एकदातरी करा,
तोडा सगळी बंधने व घ्या मोकळा स्वास जगा पुन्हा एकदा ते सोळाव्या वर्षातील आयुष आता चाळीशी ओलांडली तरी....
कधीतरी स्वतःसाठी जगून बघ ......
कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहे,
कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा व जगा एकदा स्वतःसाठी व आपला अनुभव नक्की सांगा
कथा कशी वाटली नक्की कळवा
धन्यवाद
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा