Login

कधीतरी घ्यावा दुर्गेचा अवतार भाग 3 अंतिम

Potstlya Balavhya Astitvachi Ladhai Jinknari Aai
भाग ३
चवथ्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये "बाळाची वाढ अगदी  छान आहे." गुड न्यूज घेऊनच रेवा घरी आली.  सुमित्राबाईंचा अपेक्षाभंग झाला होता. 


एक दिवस सुमित्राबाईंनीच, रेवाच्या हातात एक चिठ्ठी ठेवली. "हा एक डॉक्टर सांगतो म्हणे.  जाऊन बघतेस का एकदा." सुमित्राबाईं शांतपणे बोलल्या.


रेवाने हातातली चिठ्ठी न बघताच. चिठ्ठीचे चार तुकडे केले आणि चुरगळून फेकून दिली. "मला याची गरज नाही." रेवाला सासूचा राग राग आला होता. त्यानंतर या विषयावर बोलायचं नाही तिने सासूला स्पष्टच सांगितलं.


"आई अशी कशी ग तू? असा भेदभाव करतेस. खरच काही गोष्टी ना तूझ्या मला अजिबात पटत नाही." अगं मुलगा मुलगी सारखेच." सागर ने ही समजावून सांगितलं. 


"दुसरी मुलगी होईल आणि मुली सासरी निघून जातील तेव्हा आठवेल या म्हातारीचे वाक्य तुम्हाला. पण तेव्हा वेळ हातातून निघून गेली असेल. लक्षात ठेवा." सुमित्रा बाई चिडून बोलल्या.


गोड कौतुकात.  रेवाचे नऊ महिने पूर्ण झाले. डिलिव्हरीचा दिवस उजाडला. 


सुमित्राबाईंनी देवाला साकडं घातलं, नवस बोलले. डिलिव्हरीच्या दिवशी, डॉक्टर आनंदाची बातमी घेऊन बाहेर आले 


"अभिनंदन मुलगी झाली"

सुमित्राबाई कोलमडल्याच..


चार महिने माहेरी राहून पाचव्या महिन्यात रेवा सासरी आली. दोन मुली झाल्याची नाराजगी सुमित्राबाईंनी आपल्या वागण्यातून जराशी दाखवलीच. पण नंतर लवकरच सगळं सुरळीत झालं.


बाळाचं बारसं झालं.. पिहूची बहिण कुहू...  


पिहू आणि कुहू, मोठ्या होत होत्या. छोटी कुहू पण आता शाळेत जायला लागली होती. सुमित्राबाईं दाखवत नसल्या तरी, नातू असावा.. त्यांना मनापासून वाटत होतं. आडून आडून त्या या विषयावर बोलायच्याच.


आज पुन्हा त्यांनी विषय काढला... 


"पिहू ,कुहू मोठ्या झाल्या आता. आता तरी विचार करा! घराण्याला वारीस नको का?" 


"रेवाला आश्चर्य वाटलं ऐकून. 

मी बाई आहे. कुत्रा किंवा मांजर नाही, वर्षाकाठी पिल्ले द्यायला. म्हणून म्हणाले होते तेव्हाच ऑपरेशन करू? पण नाही... आजकाल डॉक्टर ही पहिलं बाळ पाच वर्षाचं झाल्याशिवाय ऑपरेशन करत नाहीत. आता जातेच आणि कुटूंब  नियोजनाच ऑपरेशन करूनच येते." सगळं व्यवस्थित चाललंय तुम्हाला खपतेय कुठे?" 


नवरात्रीत देवीला पुजता ना!. कन्या भोजनाला मुली मिळत नाही म्हणून, कुठून कुठून नऊ मुली शोधून आणता. आणि आपल्या घरच्या लक्ष्मी, दुर्गेचा असा दुस्वास." आज जरा ती जास्तीच भडकली..

मुलगा!! मुलगा!! मुलगा!!

यावरून तिने त्यांना चांगलं खरंखोट सुनावलं आणि रूममध्ये निघून गेली.


"दुस्वास नाही ग बाई.. त्यांना का कमी जीव लावते मी, पण एक मुलगा असावा." सुमित्रा बाई बोलत होत्याच.. तर सागर जोरात चिडला.


"आई अगं वेड लागलं का तुला? नातू..नातू

नातवाच्या हव्यासापायी, एक दिवस वेड लागेल तुला" नकोय मला पोरगा... कळलं का?" 


"तुमचं करायला आम्ही आहोत ना, आमचं आमचं आम्ही बघुन घेऊ.. तू नको काळजी करू?" सागर रूम मध्ये तडक निघून गेला होता. कधी नव्हे ते दोघींमध्ये फार न बोलणारा, आदर्श लेक आपल्याला उलट बोलला आणि बायकोच्या मागे निघून गेला. सुमित्रा बाईना खटकलं होतं. रेवा आत गेली.. तसा तो ही तिच्यामागे आत निघून गेला होता. 

 

"सोन्यासारख्या, दोन महालक्ष्म्या आहेत घरी, तरी या म्हातारीला कौतुक नाही.  वारीस वारीस करत मरणार रक दिवस तू बहुतेक."

"खबरदार यापुढे.... हा विषय काढवला तर!" माधवरावांनी सुमित्राबाईना चांगचं दटावलं.


सुमित्राबाईंच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली. त्यांनी डोळ्याला पदर लावला तशी, कुहू आजीच्या मांडीत येऊन बसली.


"आजी काय झालं तुला? आबा, तुम्ही आजीला का ओरडले."

"कट्टी!" छोट्या कुहूच बोबडे बोल ऐकून, सुमित्राबाई खुदकन हसल्या...


"ओ ग माझी बाय ती."

"पोरी जीव लावतात तेवढी पोरं लावत नाहीतच."

"पोरं शेवटी, बायकोच्या मागचीच...."

माझी नात, मला रडताना बघून, डोळे पुसायला आली... सुमित्राबाई सर्वांना ऐकू जाईल, जराशा उंच स्वरातच बोलल्या.


"काय झालं?" म्हणून रेवाने, रूम बाहेर डोकावलं 

पिहू आजीच्या मांडीत बसून.... आबांना दम देत होती... 


"तूझ्या आईच्या देखरेखीत, दुसरी सुमित्राबाई तयार होतेय!!

म्हणत रेवा खुदकन हसली!" सागर बाहेर जाणार तोच, तिने ही मागून कवटाळून घेतलं... 


"आहो मॅडम... काय प्लॅन आहे."


"करू दरवाजा बंद!"


"तशी ही, आई म्हणतेच आहे तर.. करायचा का विचार!"

"मला चालेल, म्हणत त्याने डोळा मिचलावला.

दोन हातांचा विळखा त्याने रीयाच्या कमरेभोवती घट्ट केला. हलकेच तिच्या ओठांवर ओठ टेकवले. रीया लाजेने गोरी मोरी झाली होती.


 "तुम्ही पण ना! कधी ही काहीही सुचत तुम्हाला," रीया पुटपुटली.


"छोटासा घर हैं ये मगर

मैं तुजको रजामंद कर लू

दरवाजा बंद कर लू"... बघतोच तुला रात्री, मिश्किल भाव चेहऱ्यावर देत, सिनेमातलं गाणं गुणगुण तो बाहेर आला..


छोट्या कुहूला आजीच्या मांडीत बघून, सुखावला... 


"करा आपल्या मनाचं... 

खूश आहात, दोन पोरीवर.

नको तिसरं.. नको तर नको!"


"बघा... जमलं तर माझ्या, कुहूसाठी. घर जावई शोधा... 

पाचवी पिढी, या झोपाळ्यावर... लांब च लांब झोके घ्यायला इथे असायला हवी!!


पिहू आणि कुहू,  झोपाळ्यावर बसून.. 

उंच जाई झोका

उंच जाई झोका

झाले आभाळ ठेंगणे

घेऊ गगनभरारी

हेच नभाला सांगणे

हेच नभाला सांगणे.....

लांबच लांब झोके घेत, मज्जा करत गाणं गात होत्या..


कुर्र.. कुर्र... कड्यांचा आवाज वाढला तसा सागर पुटपुटला... 


"तो झोका.. शाबूत राहील तेव्हा ना?"


"या नाजूक फुल पाकळ्या.. चालवतील माझ्या घराचा वारसा!!" तो नाही तुटायचा एवढ्यात..

कुहू आणि पिहुला झोके घेताना कौतुकाने न्याहाळत सुमित्रा बाई बोलल्या. 

"कधीतरी घ्यावा लागतो दुर्गेचा अवतार...." आईच ती, आपल्या लेकरांच्या अस्तित्वाची लढाई तर जिंकावी लागणारच ना."
पडद्याआडून रेवा, सासूचे बोलणे ऐकून, गालातल्या गालात हसली. 'म्हातारी माणसं ती. असतात त्यांच्या काही अपेक्षा.... 

नातवंडं म्हणजे त्यांचा जीव की प्राण. घराचा वारस... म्हणजे फक्त मुलगा!! त्यांच्या मनावर कोरलं गेलेलं असतं..

काही गोष्टी मात्र आपल्या हातात नसतात त्यांना समजूनच घ्यायचं नसतं. त्यातून.. मग हे असे छोटे मोठे खटके उडत राहतात घरात! आपण मात्र. योग्य अयोग्य काय? परीस्थिती सापेक्ष, नैतिकता पाळून निर्णय घ्यायचे.. 

पटलं तर घ्या.. नाही तर सोडा...

पण, एक दिवस पटतात त्यांना! 

एका आईला, आपल्या लेकरांसाठी खंबीर रहावं लागतचं.' दिवे लावणीची वेळ झाली होती, ती देवघरात गेली. आज देवघरातला गोपालकृष्ण तिच्याकडे बघून गोड हसताना दिसला... 


'कर्तव्यदक्ष गृहिणीला, घरातली लक्ष्मी बनून वावरताना, आपल्या हक्कासाठी घ्यावाच लागतो, कधीतरी दुर्गेचा अवतार... ती पुटपुटली... देवघर दिव्याच्या प्रकाशात उजळून निघालं होतं.
कथा कशी वाटली, नक्की जाणून घ्यायला आवडेल.
धन्यवाद
समाप्त..