Login

Kहाणी घर GHAR कि..भाग 1

परंपरा आणि आधुनिकता याची हलकी फुलकी कहाणी
"K हाणी घर GHAR कि...."

चॅम्पियन्स ट्रॉफी2025

भाग: 1

" पैंजणाचा नाद आला गोड कानी ग....
उंबरठ्यावर पाऊल पडते कोण आली ग.... "


वृषाली आपल्याच नादात गुणगुणत होती. श्रावण महिना सुरू झाला की चाहूल लागते ते येणाऱ्या सण उत्सवाची. प्रत्येक सण घेऊन येतो तो आनंद, चैतन्य आणि भरभरून ऊर्जा.

गौरी गणपती म्हणजे धमाल, मस्ती आणि मज्जा. वृषालीला भाऊ नसल्यामुळे रक्षाबंधन या सणाचे तिच्या लेखी फार महत्त्व नव्हते. गणपती बाप्पाला मात्र ती लहानपणीपासून राखी बांधायची. मलाच आपला भाऊ मानायची. त्यामुळे गौरी गणपती साठी काय करू आणि काय नको असे तिला होत असे.


यावर्षी तर ती या घरामध्ये नवीन होती. कौस्तुभ सोबत लग्न होऊन ती या घरात आली होती. त्यामुळे तिच्या उत्साहाला पारावार नव्हता.


यावर्षी पर्यावरण पूरक असा देखावा तयार करू असा ती विचार करत होती. 'ऑपरेशन सिंदूर ' यासाठी काय देखावा करू शकतो याच विचारा ती होती.


" अरे कौस्तुभ, इकडे घरात हजार कामे पडले आहेत आणि तुम्ही दोघे काय करत आहात? आज सुट्टी आहे ना? जरा हातभार लावा कामांना. गाणे, रिल्स झाले असतील तर वृषालीला सांग स्वयंपाकाचे बघायला. मी तरी काय काय करू. कि आजही नेहमीसारखं वर्क फ्रॉम होमच का? कधी जरा होम साठी आणि होम मध्येही वर्कही करा रे. "


"जस्ट चिल आई, किती चिडतेस? थांब मी कोल्ड कॉफी करतो म्हणजे जरा तुझं डोकं शांत होईल."


" गप रे नेहमी चेष्टा सुचते तुला. इथे मला काही कळत नाही कुठून सुरुवात करू कामाची आणि तुझं आपलं भलतंच. "


" अहो आई, अशी चिडचिड करू नका होईल सगळं व्यवस्थित " एवढा वेळ शांत बसून ऐकणाऱ्या वृषालीने तिच्या सासूबाईंना समजावण्याचा प्रयत्न केला.


" अग बाई...सण उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे आणि तरीही शांत बसू म्हणतेस? घराची स्वच्छता, खरेदी,किराणा,फराळाचे पदार्थ,वाती,,सजावट काय काय करू मी? आणि तुझं तर हे काम आणि ऑनलाइन कॉल. तुलाच हातात द्यावं लागतं सगळं. यासाठी नोकरी करणारी बायको करू नये कौस्तुभ. "


संधीचा फायदा घेत त्यांनी दोघांवर निशाणा साधला. कौस्तुभच्या आईला म्हणजे चित्राताईंना सून म्हणून त्यांची भाची सारिका पाहिजे होती. पण कौस्तुभ ला त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणारी, सॉफ्टवेअर इंजिनियर असणारी , वृषाली बायको म्हणून हवी होती.


मुलाच्या हट्टा पुढे नमते घेतले होते. पण संधी मिळाली की त्या अजूनही त्याबद्दल बोलून दाखवत.



नेहमीप्रमाणे आजही वृषालीने न बोलता ऐकून घेतले. ती रूम मध्ये आली आणि मनाशी काही ठरवून तिने मोबाईल वरून एक कॉल केला. तेवढ्याच शांतपणे ती बाहेर आली. स्वयंपाक, जेवणे झाले. चित्राताईंचे वाती वळण्याचे काम सुरू झाले. आणि टोमणे मारण्याचे सुद्धा!

वृषाली मात्र काहीच उत्तर न देता झोपाळ्यावर बसून कोणाची तरी वाट बघत होती..