एक गम ही तो है जो मुफ्त मिलता है दुनिया में,
बाकी खुशियाँ पाने के लिए किमत चुकानी पड़ती है!
बाकी खुशियाँ पाने के लिए किमत चुकानी पड़ती है!
हे वाक्य ऐकून मीरा जरा नाक मुरडतच बोलली, "कथा...! इतकं काही react करण्याची गरज नाहीये. रोज ती काळी काॅफी घेतेस. एक दिवस चहा घेतलास मला कंपनी म्हणून तर काय फरक पडतो तुला ?"
"मीरा तू तुझ्या बाॅयफ्रेंड सारखी नको बोलूस. मी एरवी कधीतरी चहा घेतेच की.. ते फक्त सुचत असतं मला अधूनमधून. You know that very well..!" आपल्याच धुंदीत कथा मीराला बोलते.
कथा आणि मीरा एक corporate IT Compani मध्ये सहकर्मी आणि तश्या चांगल्या मैत्रीणी होत्या. छोटासा टी ब्रेक म्हणून ऑफिस canteen मध्ये चहाचा आस्वाद घेत होत्या. इकडे कथा मीराशी गप्पा मारण्यात व्यस्त होती, तितक्यात मागून तिचे बाॅस मि. शिवराज सिंघल आले, "मिस कहानी तुमचा फिल्मी शायराना झाला असेल तर ते कपातील चहा संपवा आणि मी आपल्याला दिलेले काम पूर्ण करा. तुमच्यामुळे मिस. मीरा खोळंबल्या आहेत." तो हलकेच हसला.
नाकावर रागाचा शेंडा मिरवणाऱ्या कथाने हसणाऱ्या मीराकडे एक रागीट कटाक्ष टाकला आणि बोलली, "सर माझे नाव कथा आहे कथा पाटील नॉट कहानी ओके...?" त्यावर शिवराज बोलला , "कथा आणि कहानी यामध्ये काय फरक आहे फक्त एका भाषेचा ना हिंदी किंवा मराठी?"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा