Login

कहानी थोडी फिल्मी है...(भाग-२)

Finest Love Story
त्यावर शिवराज बोलला , "कथा आणि कहानी यामध्ये काय फरक आहे फक्त एका भाषेचा ना हिंदी किंवा मराठी?"
  
   मीरा ने दोघांनाही थांबवत शिवराजला विचारले, "सर तुम्ही तर नॉन मराठी आहात मराठीत बोलता कसे येते?"  त्यावर त्याने हसून सांगितले, "माझे बाबा नॉन मराठी आहेत पण माझी आई कट्टर मराठी आहे. म्हणून घरामध्ये  बहुत करून मराठी भाषा बोलली जाते."

    यावर तिने पुन्हा विचारले, "सर मग तुम्ही कथाला कहानी म्हणून का हाक मारतात त्यावर शिवराय हसून बोलतो क्योंकि कहानी थोडी फिल्मी है...!" आणि आपले काम करण्यासाठी निघून गेला आणि इकडे कथा रागातच पाठवण्या शिवराज कडे बघत उभी राहिली मीराने तिला हटकले, " कथे हा चालेल का?"

   "म्हणजे?" कमरेवर हात ठेवत मीराने विचारले. त्यावर मीराने डोक्यावर हात मारत तिला सांगितले, "कथा... चोविसची झालीस आता..! काका काकूंना उगीच त्रास का देतेय तुझ्यासाठी शोधण्याचा..? सर आणि तू एकसाथ उभे राहीले की काय रापचिक दिसता..!" दोघीही चालत चालत ऑफिसच्या lobby पाशी येतात.

    त्यावर कथा बोलली, "हमम...! तसा वाईट नाही. पण मला हवा तसा नाही." मीरा वैतागून बोलली, "स्वतः junior engineer आहेस. तो कंपनीत regional head  आहे पूर्ण मुंबई region चा . हुशार आहे चांगलं कमावतो. बाकी तुला काय हवे. आता काय अंबानीचा मुलगा हवाय का तुला?"

  "गप ग मीरे, माझे आणि सरांचे आधीच वाकडे आहे. मी अशी शब्दात रमणारी आणि ते इतके अरसिक. तुला ठाऊक आहे ना आई बाबा बोलू नयेत म्हणुन इंजिनीरिंग करून जाॅब करतेय. नाहीतरी मी literature मध्ये करिअर प्लॅन केले आहे. पुढल्या एका वर्षात मी हे corporate world सोडणार आहे, कारण मी माझं project assign केलं आहे. म्हणून मला companion कलासक्त किंबहुना कलाकारच हवा असे नाही पण माझ्या कलेचा आदर करणारा हवा आहे. त्याने असे अचानक येऊन मला i love you म्हणेल आणि मी ते फुलराणी नाटकात कशी ती करते
कुठूनसा येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार,
नदरेला जेव्हा नदर भिडंल, झटक्यात माज्या पायाच पडंल
म्हनल, रानी, तुज्यावर झालो फिदा, क्या खुबसुरती कैसी अदा.
माग, माग, काय हवं ते माग, प्यारी माज्यावर धरू नकोस राग" पुढे काही बोलणार तोच तिचे लक्ष मागे गेले तर शिवराज हाताची घडी घालून भिंतीला टेकून तिची नौटंकी ऐकत होता.

"ओय Filmy जा जरा काम कर. तुझ्या स्वगताचा एक तास राखीव ठेवण्यात येईल नंतर कधीतरी. " असे बोलून शिवराज निघून गेला. त्याचे ऐकून कथा सोडून बाकी सगळे आपापल्या डेस्कवर जाऊन काम करू लागली. मीराने एकवार कथाकडे पाहीले आणि दोघी डेस्ककडे जाऊ लागल्या. न राहवून कथा बोलली, "आली आली चाबुकस्वार. सारी लेकरे झाली पसार." तेव्हाही शिवराज तिच्या मागे होता हे तिच्या गावीही नव्हते. शिवराज तिला काहीच बोलत नव्हता. कारण ती अल्लड असली तरी कामाच्या बाबतीत खूप चोख होती आणि ती फक्त एका वर्षाच्या probation period वर होती. नंतर ती continue करणार नाही हे open secret होते.

🎭 Series Post

View all