तिने स्वतःला सावरत त्याला विचारले, "सर तुम्ही नाही म्हटले तरी तसे दिसायला पण बरे आहात. स्वतःचे घर घेतले. कार घेतली आणि तरीही तुमच्या आयुष्यात ती नाहीये अजून..." तो दिर्घ श्वास घेऊन बोलला, "होती एक पण तिला फक्त मी हवा होतो. आई डॅड माझी लहान बहिण नको होती. म्हणून आमचे break up झाले."
"मुलगा हवा पण त्याचे चांगले चांगले आई बाबा नको अशा मुलींनी तर आयुष्यभर सिंगल राहायला हवे." आणि त्याच्या पोटात एक बुक्की मारली. तसाच तो आई गं म्हणून कळवळला. तो काही बोलणार इतक्यात ती बोलली, "sorry sir ते flow flow मध्ये झालं आणि तुमचं पोट आडवं आलं."
तिचा तो निरागस चेहरा बघून खळखळून हसत बोलला,"Don't worry कहानी. तुला तुझ्या पंचम दा यांचा record collection मिळाला नाही म्हणून तुला असे झटके येत आहेत."
"जाऊद्या सर असंच कोणीही मला का गिफ्ट करेल पंचमदांचे कलेक्शन तेही मला. त्यामागे पण कारण असतात. तुम्हाला म्हणून सांगतो माझ्या डॅडींनी माझ्या आईला त्यांचा लग्नाचा पहिला वाढदिवस होता तलत मेहमूद यांचं कलेक्शन दिलं होतं, कारण आईला तलतचे प्रत्येक composition आवडायचे. तेव्हा थांबवा सर गाडी आले माझे घर...! Thank you so much... Bye. घरी नीट जा." शिवराजचा निरोप घेऊन कथा घरी गेली.
तो तिच्या निरागसपणावर हसत बोलला, " मिळेल तुला दुकानात जाऊन विचार दोन तीन वेळा... ते आणून देतील.. किंवा तुझ्या डॅडींनी दिले तसे कोणीतरी गिफ्ट देईल ते तुला." असे बोलून तो हसतच निघून गेला.
रात्रीचे साडे बारा वाजले होते. थोडावेळ social media open केला तर त्या unknown ID वरून तिला पुन्हा मेसेज आला की तिने केलेल्या कविता त्याला खूप आवडतात. त्याचे ID पाहता FILMY SHAYAR असेच लिहीले होते फक्त.. कोणताही फोटो नव्हता. तसा तिनेही तिचा कोणताच फोटो ठेवला नव्हता. फक्त कवितांची देवाणघेवाण होत होती. तिला त्याच्याबद्दल स्मित सारखे Attraction असे नव्हते पण त्याचे लिखाण ती आवर्जून वाचायची. कधी हिंदीत कधी मराठीत किंवा कधी उर्दूत लिहायचा तो. पण कधीही पोस्ट करण्यापूर्वी चॅट box वर टाकायला विसरायचा नाही. त्याने खूप दिवस झाले एक कविता चॅटवर टाकली होती. तिनेही आवडली म्हणून रिप्लाय करूनही ती अजूनही पोस्ट झालीच नव्हती. तिने न राहवून त्यामागचे कारण विचारले तर तिला समोरून असा मेसेज आला की त्याला त्याच्या एकदम जवळच्या व्यक्तीला द्यायची आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा